“जान है, जहान् है।” असं कुणीतरी कशाला, मीच्च म्हटलंय!! पाऊस पडतोय, जिमला जायचा कंटाळा आलाय? नो वरीज! आपण मस्त पहुडायचं आणि घरच्याघरी फास्ट आणि स्लो व्यायाम करायचा.
व्यायाम म्हणजे काय?
शरीर चेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी ।
देह व्यायाम संख्याता मात्राया तां समाचारेत ।।
शरीराच्या ज्या क्रियांमुळे शरीराला स्थिरता आणि बळ प्राप्त होते, त्यास व्यायाम म्हणतात. व्यायाम हा नियोजनबद्ध असावा.
व्यायामामुळे होणारे लाभ
- शरीर बळकट, दृढ व स्थिर होते.
- शरीराला छान हलकेपणा जाणवतो.
- शरीराचा योग्य व उत्तम विकास होतो.
- शरीरातील वात, मेद व कफाचा संचय कमी होतो.
- कष्ट सहन करण्याची क्षमता (tolerance) वाढते.
- भूक मस्त लागते व पचनशक्ती सुधारते.
- शरीराचे समसमान पोषण होते.
10 झोपून व्यायाम
चला 2 मिनिटं जागच्या जागी जॉगिंग करा आणि मऊ एक्सरसाईज मॅट वर व्यायाम सुरु करा. एक्सरसाईज पूर्ण संपेपर्यंत नॉर्मल ब्रिदिंग सुरु ठेवा.
1. पाठीवर झोपा. पाय प्रथम स्ट्रेट ठेवा. दोन्ही हात पालथे करून शरीरालगत स्ट्रेट ठेवा. त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय एकमेकाला चिकटवलेल्या अवस्थेमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे वर न्या आणि पुन्हा एकदा खाली घेऊन या, ही क्रिया सलग 10 वेळा करा. पोटावर, मांड्यांवर किती मस्त स्ट्रेचिंग होतं पहा!
2. उताणी झोपून, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट बंद करा. नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे अंग उचलून मुठीसहित उजवा हात दुमडून, डाव्या पायाच्या दिशेने पुढे न्या. हे करत असताना डावा पाय सुद्धा दुमडून डावा गुडघा, उजव्या हाताच्या कोपराच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. नंतर हीच क्रिया डावा हात व उजवा गुडघा यांच्यामध्ये घडवून आणा. ही क्रिया 15 वेळा रिपीट करा. हातपाय, पोट व कंबरेला उत्तम व्यायाम होतो.
3. पोटावर पालथे झोप. हात व पाय स्ट्रेट करा. हळूहळू हात व पाय वर उचला आणि पुन्हा हात व पाय खाली टेकवा. ही क्रिया 12 वेळा करा. यामुळे पोट, छाती, मांड्या, खांदे,सर्व सांधे यांना उत्तम व्यायाम होतो. वेट गेन की ऐसी की तैसी!!
4. पाठीवर पालथं झोपा. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडा. तसेच दोन्ही हात कोपरातून दुमडून, दोन्ही गुडघ्यांना गच्च पकडा आणि नंतर दोन्ही गुडघे हातातून सोडून देऊन, पूर्णपणे पाय सरळ करून खाली टेकवा. हातही सरळ करुन खाली रेस्ट करा. ही संपूर्ण क्रिया 15 वेळा रिपीट करा. हातपाय, पार्श्वभाग, मांड्या, पोट, पाठ, कणा या सर्वांचा मस्त व्यायाम झाला.
सामर्थ्यशाली व सर्जनशील मानवी मन: The Powerful and Creative Mind
मनही असंच आहे. मन घन पदार्थ नाही. पण सामर्थ्यवान आहे. आपल्या शरीरावर, वागणुकीवर, सर्व हालचालींवर जे काही कमीजास्त परिणाम होत असतात, त्यावरुन मनाचे अस्तित्व..
Continue Reading सामर्थ्यशाली व सर्जनशील मानवी मन: The Powerful and Creative Mind
मानवी मन: अंतर्मन व बाह्यमन (The Human Mind: Conscious and Subconscious Mind)
अंतर्मनात जतन केलेल्या डेटावर प्रोसेस करुन, मनाजोगत्या गोष्टी घडवून आणणं हे आपल्या अखत्यारीत असते. मनातील विचार आणि मनातील भावभावना यांना कोणताही ‘गोल’ सेट..
Continue Reading मानवी मन: अंतर्मन व बाह्यमन (The Human Mind: Conscious and Subconscious Mind)
मनाची अदभुत शक्ती व संमोहन शास्त्र (Miraculous Powers of The Mind and Hypnotherapy)
अंतर्मनाला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नाही आहे. बाह्यमनाचं कार्य थांबल्यावर अंतर्मन सक्रिय होतं. सूचनाग्राहकता हा अंतर्मनाचा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे…
Continue Reading मनाची अदभुत शक्ती व संमोहन शास्त्र (Miraculous Powers of The Mind and Hypnotherapy)
5. पोट खाली टेकवून झोपा. आता दोन्ही हात चित्राप्रमाणे टेकवा. हातांच्या आधारावर सरड्याप्रमाणे अंग शक्य तितकं वर उचला. पाय साधारणपणे जवळ ठेवा. त्यानंतर पुन्हा अंग खाली टेकवा. ही क्रिया 10 वेळा रिपीट करा. बनलेच आता पोटांचे पॅक!! पोट, खांदे, हात, बरगड्या, पाठीचा कणा, मनगटं सर्वांचा मस्त व्यायाम झाला!
6. पाठीवर पालथं झोपा. त्यानंतर दोन्ही पसरलेले पाय गुडघ्यात दुमडून जवळ आणा. आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाच्या अँकलला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. सेम क्रिया शरीराच्या डाव्या बाजूला सुद्धा करा. ही क्रिया 15 वेळा रिपीट करा. यामुळे हात, पाठीचा कणा, कंबर, खांदे, व दोन्ही पाय यांना छान व्यायाम होतो. चित्र पहा.
7. पाठीवर पालथं झोपा. त्यानंतर डोक्यापासून खांद्यापर्यंतचं शरीर फक्त खाली टेकवून, बाकीचे शरीर व डावा पाय अगदी स्ट्रेट वर उचला. पाय असा उचला, जणू काही तो वरच्या दिशेला खेचला जात आहे. पुन्हा मूळ पोझिशनला परत या आणि ही सेम क्रिया उजव्या बाजूला करा. ही क्रिया 15 वेळा रिपीट करा. यामुळे मानेसहित, संपूर्ण शरीराला छान व्यायाम होतो.
8. पाठीवर पालथं झोपा. हात स्ट्रेट टेकलेले. त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून मागे घ्या. नंतर संपूर्ण शरीर चित्रानुसार वर उचला व एक पाय हवेत स्ट्रेट करा. पुन्हा एकदा मूळ पोझिशनला परत या आणि हीच क्रिया शरीराच्या दुसऱ्या भागाला करा. अशा पद्धतीने 10 वेळा रिपीट करा. पाय, पोट, पाठ व कमरेचे सर्व स्नायू मजबूत होतात.
9. पाठीवर पालथं झोपा. पाय गुडघ्यामध्ये दुमडून थोडे मागे घ्या. कमरेचा भाग पूर्ण वर हवेत उचला. एकदा उजवीकडे व एकदा डावीकडे, कंबर जमेल तशी फास्ट न्या. मूळ पोझिशन ला या आणि 16 वेळा रिपीट करा. पोटाचे, कमरेचे फॅट गायब (weight loss) करणार तुम्ही आता!!
10. चित्रात दाखवल्यानुसार, उजव्या कुशीवर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना चिकटवा आणि त्यानंतर डावा पाय स्ट्रेट हवेमध्ये वर उचला. ही क्रिया दहा वेळा करा आणि त्यानंतर ही संपूर्ण क्रिया डाव्या कुशीवर झोपून, पुन्हा एकदा 10 वेळा करा. यामुळे शरीराच्या संपूर्ण उजव्या व डाव्या अंगाचा, सांध्यांचा खूप चांगला व्यायाम होतो.
काय मग कसे वाटले पावसाळ्यातले घरी करण्याचे भारी व्यायाम!! ते पण मस्त झोपून वगैरे. तुम्ही या सर्व व्यायामाचे भरपूर सेट्स पण प्लॅन करु शकता. तुमची मर्जी!! छान व्यायाम करा, घाम गाळा आणि कायम निरोगी राहा!
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.
Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.
Leave a Reply