Things to Tell Yourself Everyday | स्वतःला दररोज सांगण्याच्या (की बजावण्याच्या!!) महत्त्वपूर्ण गोष्टी

I am the best:

मी खूप उत्तम व्यक्ती आहे; बेस्ट व्यक्ती आहे:

जगात आजूबाजूला कोण कसे आहेत, काय करत आहेत, कसे वागत आहेत, या सर्व गोष्टी व हे सर्व ऊहापोह नंतर येतात; त्याआधी महत्त्वाचं हे आहे की, आपण एकदम बेस्ट आहोत. स्वतःला रोज हे जाणीवेसहित ( फील करून ) सांगावे की, मी एकदम बेस्ट व्यक्ती आहे.

I can do this:

मला हे सहज जमेल:

कोणतेही काम समोर आल्यावर, त्याचे ज्ञान असो वा नसो, स्वतःला नेहमी हे सांगा की, मला हे काम नक्की जमेल. समोर आलेले काम कितीही आव्हानात्मक असले तरी, अथवा अतिशय साधे असले तरी, जेव्हा आपण स्वतःला सांगतो की, मला हे काम जमणार आहे, तेव्हा आपोआप तुम्हाला पुढे काय करावे, हे सुचत जाते.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

Future is bright:

माझे भविष्य उज्वल आहे:

भविष्यकाळासाठी नेहमीच आपल्याला काही ना काही प्लॅनिंग करावेच लागते. हे अगदी अनिवार्य आहे. तरीही नेहमी स्वतःला सांगत राहावे, म्हणजेच असा विश्वास (assurance) देत राहावा की, येणारा भविष्यकाळ अतिशय ब्राईट म्हणजे तेजस्वी आहे. म्हणजेच फक्त चिंतातुर जंतु बनून राहू नका! भविष्यकाळ उज्वल असणार आहे, हे स्वतःला सांगत राहा.

Today will be a good day:

माझा आजचा दिवस खूप चांगला असणार आहे:

सकाळी उठल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी आनंदी मनाने सुरुवात करा आणि स्वतःशीच असा संवाद करा की, आजचा दिवस खूप चांगला उत्तम दिवस असणार आहे. एका छान दिवसाची सुरुवात आता झाली आहे.

woman in collared shirt

I will work hard:

आज मी भरपूर मेहनत करणार आहे:

आपल्या कामांना सुरुवात करण्याआधी, भरपूर मेहनत करण्याची आपली मानसिक तयारी झालीच पाहिजे. म्हणून नेहमी आत्मविश्वासाने म्हणावे की, मी भरपूर मेहनत करणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेणार आहे. या अशा मानसिक तयारीतून कामांना सुरुवात केली की, कामं पटापट पूर्ण होतील.

I will make no excuses:

आज मी कोणताच बहाणा करणार नाहीय:

काल कोणते काम होते, आज कोणते काम आहे, आणि उद्या कोणते काम असणार आहे किंवा या आठवड्याची कोणकोणती कामे आहेत, हे सर्व आपल्याला व्यवस्थित माहित असते. असं असताना बहाणा कशासाठी बरं करायचा? बरोबर ना?! मग स्वतःला रोज हे सांगावं की, आज मी कोणत्याच कामामध्ये, कोणताही बहाणा करणार नाहीय. बहाणे केले की सर्वच कामं पेंटिंग राहतात ना!!?

Also Read: 444+ Daily Affirmations for a Positive Day

I was born to do great things:

अनेक महत्त्वपूर्ण कामं (जॉब /टास्क) पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला आहे:

‘अरे यार, हे काम माझ्याच वाटेला का आलं?’ असं बोलण्यापेक्षा स्वतःशी हे बोलायला शिका की, अनेक महत्त्वपूर्ण कामं, आव्हानात्मक प्रोजेक्ट / टास्क संपन्न करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. मी त्यासाठी पूर्ण तयार आहे, असं नेहमी म्हणा आणि जोशामध्ये कामांना सुरुवात करा. मरगळ निघून जाईल.

People’s opinions don’t affect me:

लोकांच्या मतांचा परिणाम मी माझ्या कामांवर करून घेत नाही:

खरं तर हे असं म्हणायला हवं की, लोकांच्या मतानुसार मी चालत नाही. मला माझी कामे कशी करावीत, याचे पूर्ण ज्ञान आहे. म्हणून लोकं माझ्याबद्दल किंवा माझ्या कामाबद्दल काहीही म्हणत असू देत, मी माझ्या परफेक्शनच्या मार्गावर चालतच राहणार; काम व्यवस्थित व शांत डोक्याने पूर्ण करत राहणार.

Life is precious:

माझे हे जीवन खूप मौल्यवान आहे:

काय मग, लगेच विचार केलात ना की, ‘इतरांना कुठे तसं वाटतं? नुसतं मला वाटून काय उपयोग?!’ इथेच तर आपण चुकत असतो. आपले जीवन हे खूप मौल्यवान आहे, याची जाणीव आपल्याला स्वतःला 1000% असायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये कल्याणकारी गोष्टी घडवून आणू शकतो आणि बऱ्याच प्रमाणात समाधानी जीवन जगू शकतो.

या लेखातल्या विषयांना मुद्दाम अंक लिहिले नाहीयत. का बरं? सांगा. कारण हा विषय इथे संपत नाही. वर लिहिलेल्या पॉईंट्स च्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण स्वतःला सांगू शकत। पुढील लेखांमध्ये अजून इंटरेस्टिंग गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणारच आह. तोपर्यंत वर लिहिलेल्या गोष्टी फॉलो करा आणि मला नक्की फीडबॅक सांगा.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*