Positive Affirmations in Marathi for Happiness in 2024 | मराठी सकारात्मक स्वयंसूचना Dr. Sunetra Javkar, February 5, 2024February 5, 2024 सकारात्मक स्वयंसूचनांचे महत्त्व:आपल्याला काय वाटतंय आणि आपण स्वतःसाठी काय काय चांगलं करू शकतो या प्रक्रियेमध्ये सकारात्मक स्वयंसूचना (Positive Affirmations) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. या स्वयंसूचना आपल्या विचारांवर चांगले नियंत्रण आणतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता रुजवतात. यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.जेव्हा आपण सकारात्मक स्वयंसूचना वारंवार बोलतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत जातो. स्वयंसूचना बोलल्या मुळे नकारात्मक विचार करणे व स्वतःवर शंका घेणे कमी होते. जेव्हा आपण नेहमी स्वतःला स्वयंसूचना देत असतो, तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास गहिरा होत जातो. मग काही दिवसांनी सर्वसाधारणपणे या सूचना आपल्या विचारांवर चांगला प्रभाव निर्माण करतात. या स्वयंसूचना मुळे आपल्याला बरे वाटते, तसेच या सुचानांमुळे आपण सकारात्मकतेने आयुष्यातल्या आव्हानांचा सामना करू शकतो.आपल्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला स्वयंसूचना आपल्याला मदत करतात:आपल्या भवनांवर सुद्धा स्वयंसूचना प्रभाव टाकतात. सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपला नकारात्मक कल सकारात्मक बनतो. तो असा की, आपण जर भित्रे असू तर, सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपण शूर बनू शकतो. तसेच आपण जर स्वतःवर शंका घेत असू तर, स्वयंसूचानांमुळे आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागतो.आपली स्वप्ने व आपली ध्येये ह्यांना नजरेसमोर ठेवून जेव्हा आपण स्वयंसूचना बोलतो तेव्हा एक सकारात्मक भावनिक वातावरण आपल्यामध्ये तयार होते. यामुळे असे होते की, आयुष्यात कितीही संकटे आली तरीही आपण आयुष्याकडे आशावादी नजरेने बघू लागतो.वर लिहिलेली सर्व माहिती तंतोतंत सत्य असली तरीही सोप्या शब्दात सांगावं तर, स्वयंसूचना बोलताना आपल्याला एकंदरच खूप छान वाटते आणि हे छान वाटणे आपल्याला तणाव (stress) कमी करायला, आपले मानसिक आरोग्य सुधारायला आणि मनःशांती व समाधान प्राप्त करायला मदत करतात.तर तात्पर्य असे की, जेव्हा आपण सातत्यपूर्ण पद्धतीने सकारात्मक सूचना पुन्हा पुन्हा बोलतो, तेव्हा आपल्या आतमध्ये एक सकस व प्रेरणादायी संवाद सुरू होतो आणि हा प्रेरणादायी संवाद आपल्या मन व आत्म्याचे पोषण करतो.सतत आनंदी राहण्यासाठी 15 सकारात्मक स्वयं सूचनामी आनंदाची एक उत्तम नैसर्गिक अवस्था म्हणून निवड करत आहे आणि तशाच स्वरुपात आनंदाला स्विकारत आहे.माझ्या जीवनाच्या प्रत्येक विभागात व प्रत्येक क्षेत्रात आनंद ओसंडून वाहत आहे.प्रत्येक गोष्टीतील मजा व आनंद अनुभवण्यास मी पुरेपूर पात्र आहे.बाहेरील परिस्थिती कशीही असू देत, माझा आनंद मला नेहमीच प्राप्त होतो.नेहमीच आनंदी व कृतज्ञ (ग्रेटफुल) राहण्यासाठी मला काहीना काही निमित्त सापडतंच असतं.माझ्याकडून जो आनंद प्रसारित होत असतो, त्याचा खूप चांगला प्रभाव सर्वांवर पडत असतो.स्वतःसाठीच्या आनंदाची निवड आणि त्या निर्मितीसुद्धा मीच करत आहे व एक आनंदी जीवन बनवत आहे.माझे ह्रदय नेहमी आनंदाने भरून जाण्यासाठी मी सर्व नकारात्मकतेला दूर फेकून देत आहे.नेहमीच्या आयुष्यातील लहान-मोठे आनंद आणि शुभाशीर्वाद यांच्यामध्ये मी आनंदाने रमत आहे.परमात्म्याने प्रसारित केलेले आनंद आणि समृद्धी मी मुक्त हृदयाने स्वीकारत आहे.आनंदी असणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क मी कृतज्ञतेने स्वीकारत आहे.भूतकाळाच्या परिणामांना मी घालवून देत आहे आणि वर्तमानातील आनंदाच्या क्षणांना आलिंगन देत आहेदिवसेंदिवस मी स्वतःशी आनंदाने एकरूप होत आहे.मी नेहमीच आनंददायी व कल्याणकारक कृती करत आहे आणि तसेच विचार सुद्धा करत आहे.मला आयुष्यात प्राप्त झालेल्या आनंदाच्या क्षणाबद्दल व प्रसंगांबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करत आहे. याच भावनेतून माझे नित्य पोषण होत आहे.लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Related Affirmations (Marathi) affirmationhypnosismindtraining