Helpful Positive Affirmations in Marathi for Everyday Success | मराठी सकारात्मक स्वयंसूचना

सकारात्मक स्वयंसूचनांचे महत्त्व:

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्याला काय वाटतंय आणि आपण स्वतःसाठी काय काय चांगलं करू शकतो या प्रक्रियेमध्ये सकारात्मक स्वयंसूचना (Positive Affirmations) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. या स्वयंसूचना आपल्या विचारांवर चांगले नियंत्रण आणतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता रुजवतात. यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.
जेव्हा आपण सकारात्मक स्वयंसूचना वारंवार बोलतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत जातो. स्वयंसूचना बोलल्या मुळे नकारात्मक विचार करणे व स्वतःवर शंका घेणे कमी होते. जेव्हा आपण नेहमी स्वतःला स्वयंसूचना देत असतो, तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास गहिरा होत जातो. मग काही दिवसांनी सर्वसाधारणपणे या सूचना आपल्या विचारांवर चांगला प्रभाव निर्माण करतात. या स्वयंसूचना मुळे आपल्याला बरे वाटते, तसेच या सुचानांमुळे आपण सकारात्मकतेने आयुष्यातल्या आव्हानांचा सामना करू शकतो.

आपल्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला स्वयंसूचना आपल्याला मदत करतात:

आपल्या भवनांवर सुद्धा स्वयंसूचना प्रभाव टाकतात. सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपला नकारात्मक कल सकारात्मक बनतो. तो असा की, आपण जर भित्रे असू तर, सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपण शूर बनू शकतो. तसेच आपण जर स्वतःवर शंका घेत असू तर, स्वयंसूचानांमुळे आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागतो.
आपली स्वप्ने व आपली ध्येये ह्यांना नजरेसमोर ठेवून जेव्हा आपण स्वयंसूचना बोलतो तेव्हा एक सकारात्मक भावनिक वातावरण आपल्यामध्ये तयार होते. यामुळे असे होते की, आयुष्यात कितीही संकटे आली तरीही आपण आयुष्याकडे आशावादी नजरेने बघू लागतो.
वर लिहिलेली सर्व माहिती तंतोतंत सत्य असली तरीही सोप्या शब्दात सांगावं तर, स्वयंसूचना बोलताना आपल्याला एकंदरच खूप छान वाटते आणि हे छान वाटणे आपल्याला तणाव (stress) कमी करायला, आपले मानसिक आरोग्य सुधारायला आणि मनःशांती व समाधान प्राप्त करायला मदत करतात.
तर तात्पर्य असे की, जेव्हा आपण सातत्यपूर्ण पद्धतीने सकारात्मक सूचना पुन्हा पुन्हा बोलतो, तेव्हा आपल्या आतमध्ये एक सकस व प्रेरणादायी संवाद सुरू होतो आणि हा प्रेरणादायी संवाद आपल्या मन व आत्म्याचे पोषण करतो.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 18 सकारात्मक स्वयंसूचना:

 1. मला प्रत्येक दिवशी मिळत असलेल्या प्रेम व जिव्हाळ्याबद्दल मी खूप आभारी आहे.
 2. मला प्राप्त होत असलेल्या अनेक शुभाशीर्वादाच्या स्त्रोताबद्दल मी खूप ऋणी आहे.
 3. आयुष्यात आलेल्या आव्हानांमधून मला प्राप्त झालेल्या शिकवणी बद्दल मी खूप आभारी आहे.
 4. माझा प्रत्येक दिवस खास बनवणाऱ्या आनंदी क्षणांबद्दल मी खूप आभारी आहे.
 5. मी माझ्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाबाबत आणि माझ्या सुस्वास्थ्याबाबत खूप खूप आभारी आहे.
 6. निसर्गाचे सौंदर्य आणि अस्तित्व मला खूप आवडते व भुरळ घालते.
 7. माझा परिवार व माझे मित्रमंडळी यांच्यासोबत माझे जे प्रेमाचे नातेसंबंध आहेत, त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.
 8. निरागस आनंद व खळखळून हसणे यांमुळे माझे हृदय आणि जगणे प्रकाशमान होत आहे.
 9. माझ्या जीवन प्रवासामध्ये माझ्या विकासाला मदत करणाऱ्या सर्व संधींबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.
 10. शांततेचे समाधानाचे असे सर्व क्षण जे माझ्या मनाला स्थैर्य देतात, त्यांचे मी अभर मनात आहे.
 11. इतरांकडून मला जे प्रेम, ममता व जिव्हाळा मिळतो त्याबद्दल मी आभार मानत आहे.
 12. माझ्या गरजा आणि इच्छा पूर्ण करेल अशी जी विपुलता संपूर्ण विश्वामध्ये पसरलेली आहे, त्याबद्दल मी खूप आभारी आहे.
 13. माझ्या आयुष्यातील प्रत्येक जिवंत क्षणाबद्दल मी अमर्याद कृतज्ञता प्रसारित करत आहे.
 14. मला मिळालेल्या माझ्या आई वडिलांच्या प्रेमासाठी मी आभारी आहे.
 15. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत घेत पुढे जात आहे.
 16. लहानपणापासून मला मिळालेल्या वेगवेगळ्या अनुभवांमधूनच मी आता घडत आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे आणि यासाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहे.
 17. माझ्या शिक्षणासाठी कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक स्त्रोतासाठी मी आभारी आहे.
 18. विविध माणसांकडून तसेच प्राणीमात्रांकडून मिळणाऱ्या मायेसाठी, दयेसाठी आणि करूणेसाठी मी कृतज्ञ आहे.

सुंदर व निरोगी शरीरासाठी 30 सकारात्मक स्वयंसूचना


दीर्घकाळ टिकणारे नाते जोपासण्यासाठी 21 सकारात्मक स्वयंसूचना:

 1. माझा जोडीदार व आमचे सुंदर नाते यांच्यातील सकारात्मकतेकडे मी कायम focus करीत आहे.
 2. माझे नाते प्रेम, विश्वास आणि आनंदाने परिपूर्ण आहे.
 3. मी माझ्या जोडीदाराला नेहमीच प्रोत्साहित करत आहे
 4. आमच्यातील संवाद हा नेहमीच मुक्त, प्रामाणिक आणि समजूतदारपणाने भरलेला असतो.
 5. माझ्या जोडीदाराकडून मला कायम मिळणारा पाठिंबा आणि सतत मिळणारे प्रोत्साहन याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.
 6. आयुष्यातील आवाहनांना आम्ही एकमेकांच्या साथीने सामोरे जातो, आणि यामुळे आमचे नाते अधिकाधिक घट्ट होत चालले आहे.
 7. मी माझ्या जोडीदाराचे नेहमीच कौतुक करत आहे.
 8. आमच्या नात्यामध्ये मी सकारात्मकता आकर्षित करत आहे आणि जोपासत आहे.
 9. एकेमकांवरचा विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर हा आमच्या नात्याचा पाय आहे.
 10. मी माझ्या जोडीदाराशी पूर्णपणे पारदर्शकतेने वागत आहे.
 11. आम्ही एकमेकांचे यशाचे क्षण साजरे करतो आणि एकमेकांना नेहमी प्रेरणा देत असतो.
 12. आम्ही भूतकाळात घडलेल्या नकारात्मक गोष्टींना पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि एकमेकांना माफ करतो.
 13. आम्ही स्वतःच्या इच्छा व गरजा नेहमी एकमेकांना मनमोकळे पणाने सांगतो.
 14. आमचे प्रेम दिवसेनदिवस अर्थपूर्ण होत चालले आहे.
 15. मी माझ्या जोडीदारासोबत नेहमीच एक निरोगी आणि परिपूर्ण नातं जोपासत आहे.
 16. एकमेकांसोबत मुक्त व विश्वसनीय संवाद साधण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो.
 17. मी आणि माझा जोडीदार यांच्यामध्ये संपूर्ण पारदर्शकता आहे.
 18. मी माझ्या नात्यामध्ये प्रेम, सहानुभूती, सामंजस्य यांना आकर्षित करत आहे.
 19. कोणताही वाद किंवा समस्या सोडवताना आम्ही आमची विवेकबुद्धी व अंतःप्रेरणा यांचा वापर करतो आणि ती समस्या सोडवतो.
 20. माझे माझ्या जोडीदारासोबत एक सुंदर प्रेमळ आणि आश्वासक नाते बनले आहे.
 21. आमच्या नात्याने आमच्या आयुष्यात प्रेम शांतता व परिपूर्णता आणली आहे.

1 Trackback / Pingback

 1. Helpful Positive Affirmations In Marathi For Healthy Body Image | सुंदर व निरोगी शरीरासाठी सकारात्मक स्वयंसूचना - Dnyan Power

Leave a Reply