सकारात्मक स्वयंसूचनांचे महत्त्व:
आपल्याला काय वाटतंय आणि आपण स्वतःसाठी काय काय चांगलं करू शकतो या प्रक्रियेमध्ये सकारात्मक स्वयंसूचना (Positive Affirmations) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. या स्वयंसूचना आपल्या विचारांवर चांगले नियंत्रण आणतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता रुजवतात. यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.
जेव्हा आपण सकारात्मक स्वयंसूचना वारंवार बोलतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत जातो. स्वयंसूचना बोलल्या मुळे नकारात्मक विचार करणे व स्वतःवर शंका घेणे कमी होते. जेव्हा आपण नेहमी स्वतःला स्वयंसूचना देत असतो, तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास गहिरा होत जातो. मग काही दिवसांनी सर्वसाधारणपणे या सूचना आपल्या विचारांवर चांगला प्रभाव निर्माण करतात. या स्वयंसूचना मुळे आपल्याला बरे वाटते, तसेच या सुचानांमुळे आपण सकारात्मकतेने आयुष्यातल्या आव्हानांचा सामना करू शकतो.
जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला स्वयंसूचना आपल्याला मदत करतात:
भावनांवर सुद्धा स्वयंसूचना प्रभाव टाकतात. सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपला नकारात्मक कल सकारात्मक बनतो. तो असा की, आपण जर भित्रे असू तर, सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपण शूर बनू शकतो. तसेच आपण जर स्वतःवर शंका घेत असू तर, स्वयंसूचानांमुळे आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागतो.
आपली स्वप्ने व आपली ध्येये ह्यांना नजरेसमोर ठेवून जेव्हा आपण स्वयंसूचना बोलतो तेव्हा एक सकारात्मक भावनिक वातावरण आपल्यामध्ये तयार होते. यामुळे असे होते की, आयुष्यात कितीही संकटे आली तरीही आपण आयुष्याकडे आशावादी नजरेने बघू लागतो.
वर लिहिलेली सर्व माहिती तंतोतंत सत्य असली तरीही सोप्या शब्दात सांगावं तर, स्वयंसूचना बोलताना आपल्याला एकंदरच खूप छान वाटते आणि हे छान वाटणे आपल्याला तणाव (stress) कमी करायला, आपले मानसिक आरोग्य सुधारायला आणि मनःशांती व समाधान प्राप्त करायला मदत करतात.
तर तात्पर्य असे की, जेव्हा आपण सातत्यपूर्ण पद्धतीने सकारात्मक सूचना पुन्हा पुन्हा बोलतो, तेव्हा आपल्या आतमध्ये एक सकस व प्रेरणादायी संवाद सुरू होतो आणि हा प्रेरणादायी संवाद आपल्या मन व आत्म्याचे पोषण करतो.
ही पुढील वाक्यं तुमच्या निरोगी, परफेक्ट शरीरा संदर्भातील सकारात्मक सूचना असलेली वाक्यं आहेत. तुम्ही स्त्री व पुरुष या फरकाने ही वाक्यं स्वतःसाठी तयार करावीत. म्हणजे स्त्रीलिंगी वाक्य अथवा पुल्लिंगी वाक्य असे तयार करून घ्यावेत.
Positive Affirmations (सकारात्मक स्वयंसूचना) म्हणजे काय?
Affirmations म्हणजेच स्वतःला देण्याच्या सकारात्मक सूचना. याबद्दल माझ्या या ब्लॉगच्या आर्टिकल्स मध्ये काही आर्टिकल्स यापूर्वी लिहिलेले आहेत, ते आपण जरूर वाचावे. यापुढील सकारात्मक सूचना तुम्ही रोज पेपरवर लिहू शकता किंवा मनातल्या मनात वाचू शकता प्रत्येक सूचना 3 ते 5 वेळा रिपीट करावी. सकारात्मक सूचनांचा उत्तम परिणाम तुम्हाला आयुष्यावर दिसून येत असतो, हे ध्यानात ठेवावे. आता आपण शरीरासंदर्भातील परफेक्शन साधणाऱ्या Affirmations ना सुरुवात करूया.
ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
सुंदर व निरोगी शरीरासाठी 30 सकारात्मक स्वयंसूचना मराठी मध्ये
- माझं शरीर अतिशय उत्तम आहे.
- माझं सुंदर, छान शरीर ही मला मिळालेली देणगी आहे.
- माझ्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक अन्न मला नेहमी प्राप्त होते व मी ते पोषक अन्न नेहमी खात असते/असतो.
- आयुष्य खूप मौल्यवान आहे, हे माहीत असल्यामुळे, मी माझ्या शरीराला नेहमी ब्लेसिंग देत असते/असतो.
- माझ्या शरीराचं वजन एक आदर्श वजन आहे. म्हणजे माझ्या शरीराचे वजन कमी अथवा जास्त नाही; तर ते परफेक्ट आहे.
- माझ्या शरीराचे वजन आदर्श रहावे, म्हणून हवे असलेले सर्व परिश्रम मी नेहमी घेत असते/असतो.
- मी माझ्या सुंदर शरीराची तुलना कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसोबत कधीच करत नाही.
- माझ्या शरीराचे अवयव खूप चांगले अवस्थेत आहेत.
- माझ्या शरीरातील सर्व वेगवेगळ्या सिस्टिम्स चांगल्या पद्धतीने कार्य करीत आहेत.
- माझे शरीर वेळोवेळी सर्व प्रकारचे खराब विषद्रव्यं शरीराबाहेर टाकण्याचे काम परफेक्ट करीत असते.
- माझ्या शरीराच्या सर्व पेशी आनंदित आहेत.
- माझ्या रक्ताची क्वालिटी खूप चांगली आहे.
- माझे केस, त्वचा, हाडे, मांस, स्नायू, हात, पाय, डोके, पाठीचा कणा, सर्व सांधे, पचनाचे अवयव, श्वास घेणारे अवयव हे सर्व काही व्यवस्थित छान अवस्थेत आहेत.
- माझा श्वास अतिशय सुरळीतपणे चालू आहे.
- श्वासोच्छवासामध्ये भाग घेणारे सर्व अवयव अतिशय उत्तमपणे काम करत आहेत आणि करत राहणार आहेत.
- मी माझ्या श्वासाचे नेहमीच आभार मानत असते/असतो.
- माझ्या शरीराला जे उपजत ज्ञान आहे, ते कौतुक करण्याजोगे आहे.
- कामांचा व्याप कितीही वाढला तरीही, माझे शरीर अतिशय मजबूत असल्यामुळे ते कधीही आजारी पडत नाही.
- माझ्या शरीराची सिग्नल यंत्रणा अतिशय परफेक्ट आहे.
- कोणतेही नवीन आव्हानात्मक काम करायला किंवा कोणतेही साधे काम करायला माझे शरीर नेहमी सज्ज असते.
- माझं शरीर चैतन्यपूर्ण आहे.
- माझ्या शरीरातील सर्व गोष्टींचे वहन अतिशय व्यवस्थित पणे होत असते.
- माझे शरीर बलवान व शूर आहे.
- माझे शरीर नेहमी चांगल्या सवयींना फॉलो करते.
- माझे शरीर आतून बाहेरून नेहमी स्वच्छ असते.
- माझे शरीर नेहमी वाईट वर्तनापासून दूर असते.
- मी हसल्यावर सर्वांना खूप चांगले वाटते.
- माझे शरीर मंदिर आहे. त्यामुळे मी माझ्या शरीरासोबत प्रेमाने व आदराने वागते/वागतो.
- माझ्या शरीराचे अंतर्गत कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम आहे.
- मला सुंदर आणि बलवान शरीर प्राप्त झाले आहे, याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो.
Leave a Reply