Majestic Kriya Yoga of Mahavatar Babaji: Part 1 महावतार बाबाजी दिव्य क्रिया योग: भाग 1

kriya yoga mahavatar babaji

 कोण जगवतंय तुम्हाला? तुम्ही म्हणाल, हा काय प्रश्न आहे? बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आम्हाला जगवत आहेत. हवा, पाणी, अन्न, एकमेकांवरचं प्रेम, हेल्दी शरीर, जगण्यासाठी सोय, तुम्ही राहताय ती राहती जागा, पैसे मिळवून देणारा रोजगार, जवळची नाती, जितकं जमेल तितकं अध्यात्माचं अनुकरण व अनुसरण, अंगावरचे कपडे, बरंच काही!

लिस्ट नक्कीच मोठी आहे. नेव्हर एंडिंग आहे. पण मग आता असं विचारलं की, श्र्वासांचं काय? तुम्ही विसरलात का? या श्वासामधून तुम्ही जगत आहात, आत बाहेर होणारा हा श्वास तुम्हाला जिवंत ठेवतोय. तुम्ही म्हणाल, हे किती बेसिक नॉलेज आहे की, श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे हे सुरुच आहे. यु आर राईट!!

नक्कीच तुम्ही हे शिकलेले असाल की, श्र्वासांसोबत बाहेरची हवा आत घेतल्यावर आपलं इंटेलिजंट शरीर – त्यातला ऑक्सिजन स्वतःला ठेवते आणि बाकीचा नको असलेला वायु, उच्छवासाद्वारे नाकाने बाहेर टाकून देते. किती बेसिक नॉलेज बद्दल मी बोलते आहे ना!!

 बरं मग, या वायुला जर इंग्लिश नाव ऑक्सिजन आहे, तर त्याला मराठीत आपण काय म्हणतो बरं? तर प्राणवायु.

याच विषयावर मी आता बोलणार आहे. ज्या हवेद्वारे म्हणजे श्वासाद्वारे एक वायू आतमध्ये घेतला जातो, ज्याला तुम्ही आम्ही प्राणवायु सुद्धा म्हणतो, तो वायू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या आतमध्ये, ‘तुम्हाला जगण्यासाठी म्हणजे जिवंत ठेवण्यासाठी’ लागणारा अत्यावश्यक प्राण घेऊन येणारा वायु आहे. 

म्हणजे खरंतर आपण इथून पुढे ऑक्सिजन हे नाव जरा बाजूलाच ठेवुया. प्राणवायु या नावावर मन एकाग्र करुया. शरीरामध्ये अनेक प्राण कार्यरत आहेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. थोडक्यात अनेक प्राण, एकत्रितपणे को-ऑर्डिनेशन मध्ये आपलं शरीर नावाचं यंत्र चालवत असतात.

बुद्धीचे आणि लॉजिकल थिंकिंग चे लेवल्स जरा बाजूला सारुन, आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये आपण चाललोय, हे ध्यानात ठेवून ही जर्नी, हा प्रवास आपण आता सुरू करूया.

 ज्या क्रिया योगाबद्दल तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं – ऐकलं असेल, त्या क्रिया योगाकडे जाण्याची ही आपली जर्नी आता सुरू झाली आहे.

काय आहे असं, आपल्या श्वासांमध्ये, जे क्रियायोगाद्वारे खूप छान चांगले व उत्तम बनणार आहे?!

तर आता वर उल्लेख केल्यानुसार, आपले हे आपल्याला जिवंत ठेवणारे सोsहम श्वास – यातच तर सर्व काही आहे. आत येणारा प्राण आणि शरीरात सदैव कार्यरत असणारा प्राण ज्याची अनेक नावं, तुम्हाला माहिती आहेतच. हा प्राण कसा जपून वापरता येईल आणि आपल्या शरीराची, मनाची, वृत्ती – प्रवृत्तीची, सामाजिकतेची, शारिरीक सिस्टिमची क्वालिटी कशी उत्तम बनत जाईल, याबद्दलचे विज्ञान म्हणजे क्रियायोग शास्त्र. (प्राण – अपानाचे शास्त्र)

क्रियायोग या विषयामध्ये केलेला हा एक फक्त चंचुप्रवेश आहे. हा विषय विस्तारत जाईल तसतसं आपणा सर्वांना या प्राचीन क्रिया योगाचे इतके प्रस्थ आजच्या काळामध्ये का आहे, ते लक्षात येईल.

 मी क्रिया योगाबद्दल लिहायला सुरुवात केली आणि महावतार बाबाजींचा उल्लेख पहिल्याच लेखांमध्ये केलाच नाही, असे कसे होईल बरे!!

महावतार बाबांजींच्याच शब्दात सांगायचं तर — फार जुन्या काळी भगवान श्रीकृष्णांनी क्रिया योगसाधनेचे हे अविनाशी ज्ञान, (त्यांच्या पुर्वीच्या जन्मात) द्रष्टा विवस्वत याला सांगितले. विवस्वताने मनुला सांगितले. (मनु मोठा न्यायी राजा होता), मनु ने इक्ष्वाकुला सांगितले. अशा पद्धतीने ऋषिमुनींनी हे ज्ञान सतत टिकवून ठेवले.  भगवान श्रीकृष्णांनी क्रिया योगाचे ज्ञान अर्जुनालाही दिले होते.

पुढे जडवादी युग आले. म्हणजेच भौतिक जगताकडे जास्त झुकणाऱ्यांचे युग आले. त्यामुळे या ज्ञानाची उपेक्षा होत गेली. म्हणून नंतर हे ज्ञान गुप्त ठेवायला सुरुवात केली गेली.

महर्षी पातंजली यांना कोण ओळखत नाही? योगशास्त्राचे अग्रेसर प्रणेते असलेले भगवान पातंजली यांनी म्हटले आहे की, क्रियायोग म्हणजे शारीरिक यम, मनाचा संयम आणि ओम (प्रणव मंत्र) यावरील ध्यान होय. ध्यानात स्पष्ट ऐकू येणारा “ओम” हा विराट शब्द म्हणजेच परमेश्वर असे महर्षी पातंजली म्हणतात.

 खरंतर योग साधनांची, ध्यानाची ज्यांना आवड आहे आणि त्याहीपेक्षा जास्त, एक आंतरिक ओढ आहे, अशा अनेकांना हा क्रिया योग शिकायचा असतो.

 हा क्रियायोग अचानक आत्ताच कसा चर्चेमध्ये आला बरं!! म्हणजे आत्ता जर चर्चा होत आहे, तर हा क्रियायोग प्राचीन आहे की, आधुनिक आहे? नक्की काय?

क्रिया योगाची माहिती अलीकडच्या काळामध्ये जास्त प्रमाणात चर्चेमध्ये यायला सुरुवात झाली. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाबाजींची माहिती देणारी भूतकाळातील पुस्तके म्हणजेच ग्रंथ.

तर प्रिय साधकहो, क्रिया योग अचानक आता सर्वांसमोर  प्रकट झाला, असे वरकरणी वाटत असलं, तरीही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काही शतकांपूर्वी पूजनीय श्री श्यामा चरण लाहिरी महाराज यांच्याकडे हा क्रियायोग नव्याने दिला गेला. त्यामुळे आपण तो अलीकडच्या काळातील क्रियायोग म्हणून ओळखतो.

क्रिया योगाचा महिमा अतिशय प्राचीन जुना आहे. आज क्रिया योगाच्या शीर्षकांतर्गत बऱ्याच वेगवेगळ्या साधना शिकवल्या जातात. असो.

काही वर्षांपूर्वी जेव्हा मी महावतार बाबाजींबद्दल लेख लिहिले होते, तेव्हा बाबाजींच्या अनेक भक्तांनी क्रिया योगाची साधना शिकवायला मी सुरुवात करावी, अशी विनंती भरपूर प्रमाणात केली होती.

हे लिहिलेले लेख हे माझ्या प्रत्यक्ष अनुभूतींवर आधारित होते. जे अतिशय साध्या आणि सत्याचा संपूर्ण स्पर्श असलेल्या भाषेमध्ये मी लोकांसमोर मांडले होते. कदाचित अशा सोप्या सरळ भाषेतूनच अनेक बाबाजी-प्रेमींना कनेक्टिव्हिटी जाणवली असावी. खूपखूप जण भेटायला येऊ पहायचे. त्यातील जे व्यक्ती आधी फोनवर ‘आम्ही तुम्हाला भेटायला येणारच’ असं कळवायचे, त्यांना मी विनम्रपणे थांबवायचे. कारण जे काही विशेष आहे ते, महावतार बाबाजींमध्ये सामावलेले आहे. त्यापुढे माझे अस्तित्व ते काय! तरी काहीजण भेटायला पोहोचायचेच!!

क्रियायोगाचा उत्तम परिणाम तुमच्या एकंदर आयुष्यावर खूप चांगला होत असतो. ‘श्वास सुधारला की आयुष्य सुधारते’ ←  हे प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसेल. सर्व शरीर क्रिया सुद्धा अगदी आदर्शपणे सुरळीत होतील.

बाबाजींबद्दलच्या, ज्या प्रत्यक्ष अनुभूती मला अनुभवास आल्या, त्यांची संपूर्ण सत्य स्वरूपात मांडणी मी पूर्वी अनेक लेखांमध्ये केलेली आहे आणि हे लेख बरेच मोठे असल्यामुळे त्याचे रसग्रहण तुम्हाला व्यवस्थित करता यावे, म्हणून हे लेख काही भागांमध्ये मी विभागून लिहीत आहे. त्यामुळे हा क्रिया योगाबद्दलचा सुरुवातीचा लेख वाचून झाल्यावर, पुढचे भाग सुद्धा आपण वाचावे, ही नम्र विनंती.

विशेष निवेदन: या लेखांसंबंधी सांगण्याची एक विशेष गोष्ट म्हणजे, हे लेख ज्या अंकामध्ये छापून आले होते, त्या व्यक्तींनी (ज्या एक महिला होत्या) त्यांच्या अंकामध्ये हा लेख छापून येणार म्हणून त्यांचे नाव त्या लेखामध्ये लिहिण्यासाठी आग्रह केला होता आणि त्याप्रमाणे त्यांची विनंती मी मान्य केली होती.

त्यामुळे हा लेख आता पुढील भागांमध्ये मी जेव्हा प्रकाशित करणार आहे, तेव्हा त्या स्त्रीचा नामोल्लेख त्या लेखांमध्ये असणार नाही आहे, याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी. ही गोष्ट आवर्जून इथे मेन्शन करण्याचं कारण असं की, हा लेख असलेले ते पुस्तक, आजही अनेक लायब्ररींमध्ये वाचनासाठी उपलब्ध आहे. ते कदाचित तुमच्यापैकी काही वाचकांनी वाचलेले सुद्धा असेल. म्हणून वर दिलेला पॉईंट मुद्दाम मेन्शन केला आहे.

सहस्त्रकं उलटूनही, ज्यांनी अजुनही देह ठेवला नाही, म्हणजे सोडला नाहीय, त्या परमपूज्य सदगुरु महावतार बाबाजींचा विश्वातील प्रचलित तारखेनुसार आज जन्मदिवस आहे. 30 नोव्हेंबर. याआधी बाबाजींसंदर्भातील काही लेखन काही ठिकाणी मी केलं आहे.

माझ्या आध्यात्मिक वाटचालीतील प्रकाशमान दीपस्तंभ म्हणजे महावतार बाबाजी होय. मानवजातीला सहकार्य करण्यासाठी झटणारे, परमपूज्य श्री महावतार बाबाजी. बाबाजींबद्दलच्या त्या लेखनातून, बाबाजींच्या अनेक प्रिय भक्तांसोबत सुसंवाद निर्माण झाला. काही निरागस श्रद्धाळुंनी तर, “महावतार बाबाजींसोबत कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा फॉर्म्युला काय आहे”, असंही विचारलं. असो.

आजच्या शुभदिनी श्री महावतार बाबाजींसोबत ज्यांचं नातं जोडलं गेलंय, त्या सर्वांना वंदन करते, नवागतांचं स्वागत करते आणि सदगुरु महावतार बाबाजींना साष्टांग अभिवादन करते. सर्वांना कृपाप्राप्ती होउ दे.

हा “क्रियायोग“– परिचयातील व्यक्तींना शिकवितच होते. आता परम आदेशानुसार, सोशल मिडियावर प्रथमच लिहित आहे. मी क्रियायोग व महावतार बाबाजी यांच्याबद्दल लेखन करतच राहणार आहे. ते तुम्हाला वेळोवेळी वाचायला उपलब्ध होईल.

 ॐ क्रिया बाबाजी नम: ॐ

महायोगी सौरवतनु परमपूज्य श्री महावतार बाबाजी की जयजयकार है। सब संतन की जय हो।

इतकं सारं व्यवस्थित इथवर तुम्ही वाचत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे ह्रदयपूर्वक आभार.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

क्रिया योगाच्या क्लासचे शेड्युल काही दिवसात सांगितले जाईल. ज्यांना क्रियायोग शिकायचा असेल, त्यांनी या 9820373281, 7400473893, 9004976087 तीन WhatsApp नंबर पैकी एखाद्या नंबरला WhatsApp वर मेसेज करावा आणि मेसेज मध्ये KRIYA YOG असे लिहावे.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Spiritual Teacher, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Trackback / Pingback

  1. What are The Extraordinary Benefits of “Kriya Yoga”?: 19 Advantages of Kriya Yoga | क्रिया योगामुळे काय काय फायदे होतात? - Dnyan Power

Leave a Reply

Your email address will not be published.


*