HEALTH SECRET – २० मस्त धमाकेदार आरोग्य मंत्र!

Dnyan Power Cover Fitness Mantra

हसत-खेळत आरोग्य सुधारा, चुकांना दूर फेका आणि पुढे चला !

  1. अगदी ठरवून सकाळी ६ पूर्वी चालायला निघा – हो मला माहित आहे, आजकाल डोळ्यांना फोनचा फ्लॅशच सूर्य वाटत असतो!
    सूर्योदयाच्या आधी २० मिनिटं चालणं म्हणजे शरीराचं नैसर्गिक रिस्टार्ट बटण प्रेस करणं – वजन कमी, हॉर्मोन मस्त बॅलन्स, मूड सुपरहिट!
  2. मीठ, भरपूर तिखट कमी करा – आयुष्यातील तिखट, सॅड अनुभव पुरेसे आहेत, हो ना! अति मीठ = बीपीचा गेम बिघडतो. रोज सेंद्रिय सेंधव मीठ वापरल्यावर पचन, त्वचा आणि हाडं Happy झालीत!
  3. जेवल्यावर पाच सात मिनिटं वज्रासन – Netflix बघून झाल्यानंतर नाही, जेवणानंतर बसायचं! पचन सुधारतं, अपचन गायब, गॅसला एग्झिट. बघा एक साधं सोपं आसन, किती मोठं आरोग्य देतं.
  4. चहा कॉफी, दिवसातून २ कप पुरे – नाहीतर शरीर ‘Over-Caffeinated Zombie’ बनतं! अति चहा/कॉफी = अ‍ॅसिडिटी, झोपेची बोंब, चिंता, केसगळती, चीडचिड. नो म्हणा! कधी कधी “No” म्हणणं आरोग्यदायक असतं.
  5. हवं तितकं पाणी प्यायला विसरलात? असं कसं चालेल? शरीरात ओलावा हवा ना! अधून मधून, थोडं-थोडं सातत्याने पाणी प्या. यामुळे शरीर Detox होतं, त्वचा चमकते, मेंदूला ऊर्जा मिळतो. अर्थात शरीर मागील तितकं पाणी प्या.
  6. ताटात शिजलेल्या जेवणासोबत, कच्चा आहार म्हणजे सॅलेड सुद्धा असू द्या – यामुळे अन्नपचनाला छान मदत होईल! कच्च्या भाज्या, फळं यामध्ये एन्झाईम्स असतात – जे तुम्हाला फ्री पचन सहाय्यक मिळवून देतात.
  7. झोपायच्या 2 तास आधी मोबाईलला टाटा करा– नाहीतर स्वप्नांत facebook Instagram reels नाचत राहतील!! स्क्रीन ब्लू लाइट झोपेचा शत्रू. मोबाइल बंद = मेलाटोनिन सुरू = मस्त गाढ झोप.
  8. दिवसातून 10 मिनिटं मौन – शरीराला “Mute” वर टाकलंत की, आतली शांतता बोलायला लागते. ही मौन साधना म्हणजे मेंदूची ‘cooling therapy’ आहे. मौनाचे मिनीवेलनेस स्पा असं समजा हवं तर!
  9. आठवड्यातून एक दिवस उपवास – म्हणजे शरीराची स्वतःची आराम युक्त सफाई मोहीम! पचनसंस्था सुट्टीवर गेली की, शरीर स्वतः रिपेअर मोडमध्ये जातं – वजन, ब्लोटिंग आणि अ‍ॅसिडिटीवर जबरदस्त काम.
  10. आवडत्या पद्धतीने मेडिटेशन सुरू करा – नाहीतर मन सतत Google Search करत राहतं! दररोज दहा-बारा मिनिटं मेडिटेशन केल्यास स्ट्रेस कमी होतो, मेंदू हुशार व0तीव्र होतो आणि निर्णय क्षमता वाढते.
  11. रोज थोडं उन्हात उभं रहा – व्हिटॅमिन D कोणाच्या स्टोरीवर मिळत नाही! ते बाहेर मोकळ्या वातावरणात फुकट मिळतं हो!! हाडं, हृदय आणि मेंदूला बळकटी देणारं व्हिटॅमिन D तुम्हाला दररोज सकाळी फ्री मिळतं – वापरा!
  12. प्रत्येक जेवणात थोडेफार प्रोटीन असू द्या – स्नायू म्हणतात जरा स्ट्रेंथ द्या हो आम्हाला!! डाळी, मोड आलेले कडधान्य, दूध, अंडी, ज्वारी नाचणी किंवा कोणताही अन्य पौष्टिक पर्याय – रोज काहीतरी प्रोटीन हवं. अर्थातच नैसर्गिक प्रोटीन खा.
  13. 5000 ते 10000 पावलं चालणं म्हणजे काही मॅरेथॉन साठी धावायचं नाहीय – ते वॉकिंग करणं शरीरासाठी मूलभूत गरज आहे! यासाठी जिम नको, फक्त लिफ्ट ऐवजी जिना, फोनवर चालता चालता कॉल – बस्स.
  14. दररोज किमान 20 दीर्घ श्वास घ्या– म्हणजे मेंदूलाही खूप ताजंतवानं वाटेल. डीप ब्रीदिंग = स्ट्रेस आऊट, ऊर्जा इन. किती साधं सोपं आहे डीप ब्रीदिंग, पण लोक विसरतात!
  15. कशाला ते रात्री 11 नंतर जागरण = शरीराची सर्व मेंटेनन्स ची वेळ बेकार! जसा आपला मोबाईल अपडेट वेळेवर करतो, तसंच शरीरालाही झोपेचा अपडेट वेळेवर हवा असतो. तो द्या आपल्या शरीराला.
  16. नित्य एक हरित ताजं पान खा म्हणजे पालेभाजी वगैरे – तुळस, कोथिंबीर, पालक – हे सगळं औषधासारखं असतं. आयुर्वेदाला वनस्पतीशास्त्राला आयुष्यात वेलकम करा!! फ्री साइड इफेक्ट्ससकट!
  17. दात फक्त दिसण्यासाठी नाही – ते पचनाच्या गेटवरचे बाऊन्सर आहेत! दातांची नीट स्वच्छता नसेल तर पचन बिचारं तुमच्यापुढे हात टेकणार! दात स्वच्छ, फ्लॉस, ब्रश, नंतर जीभसुद्धा क्लीन!
  18. होय हो, तुमचं शरीर ऐकतं – पण तुम्ही नेहमी त्याचं ऐकताय का? थकवा, डोकेदुखी, चिडचिड ही ‘Body Notifications’ आहेत. त्याकडे दुर्लक्ष = बिचारं ब्लॉक झालेलं आरोग्य!
  19. हसणं हे नैसर्गिक अँटीबायोटिक, वेदनाशामक आहे – दिवसातून 3 तरी वेळा तरी डोस घ्या! हसणं म्हणजे फ्री मेंटल हेल्थ थेरपी. जिथे हास्य नाही, तिथे रोग भरपूर!
  20. “फक्त खाणं आणि झोपणं” हे जगणं नाही – शरीरात प्रेम, प्रेरणा आणि थोडा हलकेपणा हवाच! आनंदाने जगणं = इम्युनिटी वाढणं, पचन सुधारणं, आणि मन ताजं होणं!

काय मग कशा वाटल्या तुम्हाला या हेल्थ टिप्स?!!


Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

About Dr. Sunetra Javkar 90 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply