आपले दररोज चे गोल्स (लहानसहान ध्येये) कसे प्राप्त करावे? How to Achieve Daily Goals..

Dnyan Power Cover daily goals
  • रोजच्या दिवसाची सुरुवात काही स्पष्ट उद्दिष्टाने करा. सकाळी उठल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर त्या दिवसाचं स्पष्ट लक्ष्य (डेली टार्गेट्स) असावं. मनोवृत्ती सकारात्मक व प्रसन्न राहते व दिशा निश्चित होते.
  • मन एकाग्र करण्यासाठी 5-10 मिनिटे ध्यान करा. ध्यानामुळे मन शांत होते, विचारसरणी स्वच्छ होते. तुमची मानसिक ऊर्जा (माईंड पॉवर) एकत्र होऊन, कामात सहज लक्ष लागते. (आम्ही अर्धा तास करू का ध्यान? नको कशाला, पाच दहा मिनिटे खूप झालीत हो!!
  • To-Do List तयार करा. Things to do today! आज दिवसात काय करायचं आहे, ते लिहून ठेवल्याने ‘अर्रे, कसं हे काम डोक्यातून स्कीप झालं???!!’  हे असं वगैरे होत नाही. कामांची स्पष्टता निर्माण होते.
  • प्राथमिकतेनुसार कामांचा क्रम ठरवा. (म्हणजे प्रायोरिटी लिस्ट) सर्व कामं एकसारखी महत्त्वाची नसतात. हो ना, मग जे काम सर्वात महत्त्वाचं आहे, ते आधी करा, सिंपल!! म्हणजे उशीर लगबग होणार नाही.
  • टाइम ब्लॉकिंग वाली पद्धत वापरा. प्रत्येक एका कामासाठी ठराविक वेळ बाजूला ठेवा. वेळेच्या चौकटीत काम झालं, की प्रगती लवकर होते.
  • डिस्ट्रॅक्शन्स टाळा. मोबाईलमधील सततच्या नोटिफिकेशन्समुळे लक्ष उडतं. काम करताना मोबाईल किंवा सोशल मीडिया बाजूला ठेवा. मोबाईलला अक्षरशः कुठेतरी कपाटात ठेवलं तरी चालेल!!
  • काम करताना Smart Techniques वापरा – कामावर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी Pomodoro Technique वापरा, ज्यामध्ये 25 मिनिटं एकाग्रपणे काम आणि 5 मिनिटांची विश्रांती घेतली जाते. कामांचं योग्य नियोजन करण्यासाठी Eisenhower Matrix वापरावी, जी कामांना त्यांचे महत्त्व आणि त्यांची इमर्जन्सी यावर आधारित चार प्रकारांमध्ये विभागते. काम आटवण्यासाठी हे सोपं जातं. काळजी करू नका, लवकरच या दोन्ही टेकनिकचं आपण बारसं करूया!! अशा टेक्निकने काम केल्यामुळे, काम आणि ब्रेक यांचं संतुलन साधलं जातं.
  • एकाच वेळी एकच काम करा, भाई! मल्टीटास्किंग केल्यास कुठलंही काम धड चांगलं होत नाही. एकाच गोष्टीवर नीट लक्ष ठेवल्यास गुणवत्ता (क्वॉलिटी) वाढते.
  • महत्वाची कामं सकाळीच पूर्ण करा. सकाळी मेंदू ताजातवाना असतो, निर्णयक्षमता अधिक असते. यामुळे अवघड कामंही सहज पार पडतात.
  • दिवसभरात 2-3 मोठी कामं ठरवून नक्की पूर्ण करा. सर्व काही करायच्या नादात काहीच होत नाही. केवळ गोंधळ होतो. अगदी दोनतीन महत्त्वाची कामं पूर्ण झाली, तरी छान समाधान मिळतं.
  • कामं पूर्ण झाल्यावर टिकमार्क करा. तुमच्या To-Do List वर ✔️ चिन्ह लिहिल्यावर प्रगती दिसते. त्यामुळे मनात आनंद व आत्मविश्वास वाढतो.
  • दिवसभर स्वतःशी संवाद ठेवा. बोला ना स्वतःशी! स्वतःला सकारात्मक बोलून प्रोत्साहित करा. “मी करू शकतो”, हे मनात एकदा ठामपणे बिंबवलं की, मनशक्ती जागृत होते.
  • नेहमी आरोग्याची काळजी घ्या. शरीर बळकट असेल तर मनही उत्तम साथ देतं. अशक्त शरीराने उद्दिष्ट (गोल्स) गाठणं कठीण होतं.
  • हलकीशी हालचाल करा. हलकी नाहीतर जोरदार, बॉडी ऍक्टिव्हिटी झालीच पाहिजे! थोडं चालणं, स्ट्रेचिंग यामुळे शरीरात रक्ताभिसरण चांगलं होतं. यामुळे थकवा दूर होतो आणि मन प्रसन्न राहतं. फ्रेश फील होतं.
  • पाणी प्या. अंगातील पाणी सुकलं की, डिहायड्रेशनमुळे थकवा व चिडचिड होते. दिवसभरामध्ये पुरेसं पाणी प्यायल्याने कार्यक्षमता टिकते. शरीरामध्ये आवश्यक असलेला ओलावा टिकून राहतो.
  • डिस्टरबन्सेस ना आणि डिस्टर्ब करणाऱ्यांना ‘NO’ म्हणायला शिका!! प्रत्येक गोष्ट स्वीकारत राहिल्यास,  तुमचं वेळापत्रक कोसळतं. म्हणून जे तुमच्या ध्येयाशी संबंधित नाही, त्याला नम्रपणे नकार द्या. त्यांना निक्षून सांगा, ‘सॉरी, पतली गलि से निकल ले!!’
  • दररोज सकाळी किंवा त्याच दिवशी रात्री कालचं मूल्यांकन करा. काल काय जमलं, काय नाही, याचा विचार करा. चुका समजल्या, तर वेल अँड गुड, सुधारण्याची संधी मिळते.
  • छोट्या मोठ्या सक्सेस ला, प्रगतीला स्वतःला गिफ्ट द्या. ध्येय थोडं जरी साध्य झालं तरी त्याचं कौतुक करा. हेच पुढच्या टप्प्यासाठी प्रेरणा देतं.
  • SMART Goal Format वापरा
    उद्दिष्टे Specific, Measurable, Achievable, Relevant, आणि Time- bound असतील तर ती अधिक सोपी व सुस्पष्ट होतात. (विशिष्ट, मोजमाप घेता येण्याजोगी, साध्य करता येण्याजोगी, उचित, कालमर्यादित)
  1. स्वतःचा वेळ कसा जातो, याचे निरीक्षण ठेवा. वेळ कुठे वाया जातो, हे समजल्यावरच सुधारणा शक्य होते. स्वतःचं टाइम- ऑडिट (पडताळणी, पाहणी) स्वतःच केल्याने आपली वेळ अधिक फायदेशीरपणे वापरता येते. या वेळेच्या मुद्द्यावर मनात राग येत असेल, तरीही फॉलो करा!! तुमच्या भल्यासाठी आहे!!
  2. काही अडचणीत वेळ पडल्यास, इतरांची मदत मागा. प्रत्येक गोष्ट एकट्याने करण्याची गरज नाही. आपण काही लाल निळे कपडे घातलेला, सुपरमॅन नाही!! मदत घेतल्यामुळे वेळ वाचतो व एखाद्याने केलेल्या हेल्पमधून आपल्याला नवी दृष्टी सुद्धा मिळते.
  3. आज काय काय शिकलात?? नेहमी काहीतरी नवीन शिका. रोज काहीतरी नवीन शिकलात, तर मन उत्साही राहतं. शिकणं हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
  4. नियोजनात लवचिकता ठेवा. काही गोष्टी नियोजनानुसार न झाल्यास निराश होऊ नका. मनाला सांगा इट्स ओके!! परिस्थितीप्रमाणे बदल स्वीकारल्यास यश आपल्या जवळ येऊ लागतं.
  5. रात्री झोपण्यापूर्वी दिवसाचं विश्लेषण अगदी आठवणीने करा. काय साध्य झालं आणि काय सुधारायचं आहे, हे स्वतःला किंवा कधी कधी आपल्या सभोवतालच्या विचारल्याने पुढचा दिवस अधिक सुस्पष्ट बनतो.
  6. कृतज्ञता व्यक्त करा. दिवसभरात जे काही चांगलं घडलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद द्या. थँक्यू थँक्यू थँक्यू!! कृतज्ञतेने मन शांत राहतं व चांगल्या गोष्टी आकर्षित होतात.

आता सांगा बरं तुम्हाला या 25 गोष्टी कशा वाटल्या ते. आणि हे पण सांगा की, तुम्ही यातलं काय काय फॉलो करणार आहात. अभिप्राय जरूर कळवावा.


लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 94 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply