ज्ञानज्योती ज्ञानेंद्रिये: Ultimate Power of Super Senses

panchamahabhute marathi article

सर्वसाधारणत: ज्ञानेंद्रिये म्हणजे काय : काहीतरी जाणून घेण्याची पाच साधने म्हणजेच ज्ञानेंद्रिये आहेत. हा शब्द संस्कृतमधून आला आहे, पंच, म्हणजे ‘पाच’, ज्ञान, म्हणजे ‘जागरूक असणे’ किंवा ‘उच्च ज्ञान होणे’, आणि इंद्रिय, म्हणजे ‘संवेदना’ किंवा ‘अवयव. ते (इंद्रिय) निम्न ज्ञानेंद्रियांच्या रूपात ओळखले जातात, जे मानवांना त्यांच्या सभोवतालचे जग जाणण्याची परवानगी देतात.आता निम्न असं का बरं म्हटलेलं आहे? कारण ही कान, नाक, त्वचा, जीभ, डोळे हे अवयव ही बाहेर दिसू शकणारी फक्त साधनं आहेत. प्रकट असलेली साधनं आहेत. ‘मी माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं’ असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा जर डोळाच बाहेर काढून अभ्यास केला, तर आत फक्त हाडामांसाची संरचनाच दिसणार आहे ! मग ज्ञान कुठे आहे? / होतं? आपण पुढे पाहणारच आहोत.एक गंमत सांगते. क्रिकेट मॅच हरलो, म्हणून टीव्हीच फोडला, तर फुटलेल्या टीव्ही च्या आतमध्ये ज्यांच्यावर वचपा काढायचा, ते क्रिकेटर्स सापडायला हवे ना?!! नाही सापडत ना! अगदी तस्संच !!

पंच ज्ञानेंद्रिये:

मनात सुप्तावस्थेत असलेली व बाह्य जगाचा अनुभव देणारी पाच अव्यक्त ज्ञानेंद्रिये समस्त प्राण्यांचे (मानव व अन्य सर्व) प्रतिनिधित्व करतात. ती वैयक्तिक व वैश्विक असतात व विविध प्राणिमात्रांच्या निर्मितीत ती केवळ निश्चित जागी असतात. डोळे, नाक, कान, त्वचा, ही ज्ञानेंद्रिये वैश्विक वायुला व्यापतात व ती व्यक्तीत (मानव व प्राणी) प्रकट होतात. वैश्विक उत्क्रांतीच्या पद्धतींनी ती विकसित होतात व वेगळी दिसून येतात. प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या तन्मात्रेशी व मूलतत्त्वाशी हे संबंधित असते.

मुंगीला सुद्धा ज्ञानेंद्रियं आहेत. आपलं अन्न मिळवायचं कसं, आणि ते एका ठिकाणी साठवायचं कसं याचं कामापुरतं पण नियोजनबद्ध ज्ञान मुंगीला असते.

आपण थोडा मानवाच्या अनुषंगानेही विचार करुया.

1) कान – ध्वनीचा अवयव आहे – निरभ्र आकाशासोबत संलग्न आहे.
2) त्वचा – स्पर्शाचा अवयव – वायुसोबत संलग्न आहे.
3) नेत्र – दृष्टीचा अवयव – अग्नीसोबत संलग्न आहे.
4) जीभ – रुचीचा (चवीचा) अवयव – जलासोबत संलग्न आहे.
5) नाक – गंधाचा अवयव – पृथ्वीसोबत संलग्न आहे.ज्ञानेंद्रियांना ज्ञान मिळविण्याचे अवयव असेही म्हणतात.
हे अवयव ज्ञान ग्रहण करणारे असून ते ज्ञान दर्शवू शकत नाहीत. त्यांचे कार्य त्या त्या संबंधित कृती करणाऱ्या अवयवांचा उपयोग करून होते. ज्ञानेंद्रिये ही वाहक असून त्याद्वारे आपले तन्मात्रांच्या सूक्ष्म स्तरावर पोषण होते. या अवयवांचे सूक्ष्म किंवा अंतर्गत प्रकारसुद्धा भौतिक शरीराच्या मयदिबाहेर अस्तित्वात असतात आणि त्यांच्या कृतीद्वारे ज्ञानेंद्रियजन्य ज्ञानाव्यतिरिक्त जादा असे ज्ञान प्राप्त होते. इथे तन्मात्रा हा शब्द आला आहे त्याचा अर्थ स्पष्ट करते.तन्मात्राचा अर्थ काय?तन्मात्रा / तन्मात्र ही एक संस्कृत संज्ञा आहे, पुढील मूळ शब्दांपासून येते, ‘तन’ म्हणजे ‘सूक्ष्म’ आणि ‘मात्र’ म्हणजे ‘तत्व’. योगिक तत्त्वज्ञानात, तन्मात्र हे सूक्ष्म घटक आहेत, जे पाच इंद्रियांच्या वस्तू आहेत: ध्वनी, स्पर्श, दृष्टी, रुप, चव आणि गंध. पाच तन्मात्र म्हणजे ज्या मार्गाने लोकांना वस्तुनिष्ठ, मूर्त जगाची जाणीव होते.

पाच कर्मेंद्रिये:

पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये ही, पंचमहाभूतांशी संबंधित आहेत. कर्मेंद्रिये विविध कृती करतात. शारीरिक अवयव हे केवळ कर्मेंद्रियांना शारीरिक जगात कार्य करण्यासाठी, वावरण्यासाठी मदत करतात. शरीर हे माध्यम अशा प्रकारे रचलेले आहे की, त्यामुळे काही कृती करता येतात, या कृतींमुळे मनाला अनुभव मिळतो.या कृतींसाठीच्या अनेक गोष्टी निसर्गात (आजुबाजुला) सर्वत्र आढळतात आणि त्या विविध स्वरुपात दिसून येतात. त्यापासून आपला शारीरिक भेद एकमार्गी आहे. या अवयवांचे सूक्ष्म व अंतर्गत प्रकारसुद्धा अस्तित्वात आहेत, ते मनाशी व मानसिक उर्जेशी थेट सरळ मार्गांनी विचारानुसार व काही अंतर राखून कृती करतात. सूक्ष्म व अंतर्गत प्रकार म्हणजे जे आतमध्ये असतं, ते. म्हणजे मला आता बाहेर जायचे आहे, या विचारांनी पाय चालु लागले आहेत. ही बॅग इथून उचलून उंचावर ठेवायला जावे, या विचारांमुळे, हात सक्रिय झाले. कर्मेंद्रिये ही अर्थपूर्ण असतात, त्यांच्यात ग्रहणक्षमता नसते. ज्ञानेंद्रियामार्फत त्यांना ग्रहणक्षमता मिळते. कर्मेंद्रिये ही, ते ज्यावर कार्य करतात, त्या पंचमहाभूतांशी अधिक जोडलेली असतात, तर ज्ञानेंद्रिये तन्मात्रा व सूक्ष्म तत्वांशी अधिक संबंधित असतात. कर्मेंद्रिये प्राणाच्या क्रिया किंवा जीवनशक्ती परावर्तित करतात. परावर्तित करतात, म्हणजे दाखवून देतात.

पाच मूलतत्त्वे (पंचमहाभूते):

पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत. ती अनुक्रमे घन, द्रव, तेजस्वी, वायुरूप व निरभ्र आकाश या स्वरूपातील पदार्थांचे प्रतिनिधित्व करतात. या प्रकारच्या वस्तूंनी आपण भौतिक शरीरासकट संपूर्ण बाह्य जगाचा अनुभव घेतो. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये वरील वस्तूंवर त्यांच्या ग्रहणजन्य व कृतिजन्य गुणांनी कार्य करतात. असे असेल तरी मूलतत्त्वे घनतेच्या तत्त्वाप्रमाणे सर्व माध्यमांना लागू पडतात, व त्यांच्या कृती मनाशी व जीवनशक्तीशी संबंधित असतात. एकीकडे पृथ्वी ही संपूर्णपणे घन माध्यम असल्यामुळे ती स्पष्टपणे हालचाली दर्शवू शकत नाही, तर दुसरीकडे निर्मेघ आकाश हे संपूर्णपणे सूक्ष्म किंवा ग्रहण करणारे माध्यम असल्याने, ते हालचालींना संपूर्णपणे स्वातंत्र्य देते. या दोन ध्रुवांमध्ये (इथे धृव म्हणजे ‘दोन टोकाच्या गोष्टी’ असा अर्थ घ्यावा. पृथ्वी व आकाश ही दोन टोकं, म्हणजेच धृव झाले) शक्य असलेल्या सर्व घनता असतात.

पुढील वर्णन वाचा. ब्रह्म से स्वयं प्रकाश रूप आत्मा की उत्पत्ति हुई। आत्मा से आकाश, आकाश से वायु, वायु से अग्नि, अग्नि से जल, जल से पृथ्वी की उत्पत्ति हुई। इन पाँचों तत्त्वों से मिलकर ही मनुष्य-शरीर की रचना हुई है।”

यामुळे संपूर्णपणे अनुभव मिळू शकतात व सर्व कल्पना दृश्य स्वरूपात दिसू शकतात. पंचमहाभूते हीसुद्धा कल्पनेची दृश्य स्वरुपे आहेत. ही वेगवेगळ्या घनता किंवा वेगवेगळ्या कल्पनांची भावदर्शनाची क्षेत्रे आहेत.

पंच महाभूतांमध्ये – पृथ्वी तत्व, आप तत्व, वायु तत्व, आकाश तत्व, अग्नी तत्त्व असतात. आपल्या शरीरात आप तत्व 72%, पृथ्वीतत्त्व 12%,वायुतत्व 6%, अग्नी तत्व 4% आणि आकाश तत्व 6% हे संतुलित प्रमाण आहे. या प्रमाणाचे संतुलन बिघडलं की, आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात.
१) पृथ्वी घनतेची किंवा स्थिरतेची कल्पना दर्शवित असून ती कृतीला अडथळा उत्पन्न करते. थोडक्यात हे अचल जड तत्त्व आहे.
२) जल द्रवतेची किंवा गतीने वाहण्याची कल्पना दर्शविते व ती जीवनाला वाहत्या पाण्यासारखे प्रवाही बनवते. ही कल्पना नाही, जलतत्त्वाचं कार्य आहे.
३) अग्नी प्रकाशाची कल्पना दर्शवितो, आकलनाची प्रेरणा देतो. तसेच एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे हालचालीला प्रेरणा देतो.
४) वायु सूक्ष्म हालचाली दर्शवितो, दिशेची, गतीची व त्यातील फरकाची कल्पना देतो व विचारांना पाया (विशिष्ट बेस) देतो. हे वायु तत्त्व चंचलता सुद्धा देते.
५) निरभ्र आकाश जोडणीची (कनेक्टिव्हिटी) कल्पना देते. तसेच सर्व पदार्थांच्या, माध्यमांच्या, संपर्काच्या व स्वतःला दर्शविण्याच्या तसेच त्यातील घडणार्‍या बदलांना चालना व प्रेरणा देते.

हे थोडं सोपं करुन, असे सांगता येईल की, निरभ्र आकाश – अवकाशाची, वायू – वेळेची, अग्नी – प्रकाशाची, जल – जीवनाची, आणि पृथ्वी – आकाराची (सॉलिड शेप) जाणीव करुन देतात. जसे चित्रकाराला विविध रेषा आणि रंगांची आवश्यकता असते, तशी ही विविध माध्यमे साधने, हे सर्व – वैश्विक बुद्धीला तिच्या भावदर्शनासाठी आवश्यक असतात. वैश्विक बुद्धिमत्ता म्हणजेच — युनिव्हर्सल कॉन्शसनेस. अंतराळाची स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव.पाच मूलतत्त्वे म्हणजे त्याचे ढोबळ प्रकार नव्हे, तर त्याचे सूक्ष्म आणि कारण प्रकार, त्यांचे ज्ञानेंद्रियांचे संबंधित भाग आणि त्यामागील कल्पना या सर्वांना कोंडून मूलतत्त्वे आत्मा, मन व शरीर यांना दृश्य स्वरूपात आणतो. म्हणून ही पंचमहाभूते विश्वातील सर्व पदार्थांचे आदर्श (बेसिक मूळ स्त्रोत आहेत. प्रकृती ही पाच तत्त्वांची बनली आहे. त्यासह पुरुष (म्हणजेच माणूस) किंवा आत्मा हे सहावे तत्त्व (पूर्ण जाणिवेचे तत्त्व) समजले जाते.

तर पंच महाभूतांमध्ये — आकाश तत्व, अग्नी तत्व, पृथ्वी तत्व, आप तत्व, वायु तत्व. सर्वसाधारणत: आपल्या शरीरात 72 % पाणी तत्व, 12 % पृथ्वी तत्त्व, 6 % वायु तत्व, 4 % अग्नी तत्व आणि 6 % आकाश तत्व हे संतुलित प्रमाण आहे. या प्रमाणाचे संतुलन जेव्हा बिघडते, तेव्हा तब्येत सुद्धा बिघडते. शरीरामध्ये नवीन पेशी तयार होण्यासाठी पृथ्वी तत्व कार्य करत असते. अन्न पचनाचे कार्य अग्नी तत्व करत असते, रक्ताभिसरणाचे काम पाणी तत्व करत असते, श्वसनक्रियेसाठी व शरीराची हालचाल होण्यासाठी वायु तत्व कार्यरत असते, मनाच्या आरोग्यपूर्ण उलाढालींसाठी आकाश तत्व कार्यरत असते.

आपण पुन्हा कधीतरी सप्तचक्रांविषयी माहिती प्राप्त करुया. सप्तचक्रे, ज्यांचा संबंध आपल्या शरीरातील ग्रंथीसोबत आहे.


लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 85 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*