कर्म व मर्मबंध कंटकारी: CUTTING CORDS खूप आवश्यक आहे – भाग पहिला | Why Cord Cutting is Important? PART 1

आज मी एका नविन विषयावर प्रकाश टाकणार आहे. तुमच्यातील काही जणांना हा विषय माहितही असेल. या विषयाचं नाव आहे, ‘Cutting Cords’ कॉर्ड्स कापणे/ तोडणे.

आता या cords कसल्या आहेत? cords चा अर्थ वायरी किंवा दोर्‍या. आता हे सांगताच, डोळ्यांसमोर काही चित्र दिसत असेल; नसेल तर तसं चित्र मन:चक्षूंसमोर आणावे. काय नजरेसमोर आणायचं, ते मी सांगते. या ब्लॉगसोबत मी फोटोज सुद्धा जोडले आहेत. ते फोटोज नीट निरखून पहावेत. यात तुम्हाला दोरी अथवा वायर सारखं कनेक्शन दिसतंय ना? ती आहे इथर कनेक्टिव्हिटी. थोडं सोपं करुन, एनर्जी वायर कनेक्शन असं म्हणुया. ©

cut-the-cord

तर हे कसे असतात? कुठे असतात? कोण जोडतं यांना? यांना कोणीही जोडत अथवा निर्माण करत नसतं; तर ते आपोआप जनरेट होत असतात. आणि ते कनेक्शन्स जसजसे जुनाट होत जातात, तसतसे त्रासदायक ठरत जातात. आता मी हे स्पष्ट करते की, असे कनेक्शन्स कुठे कुठे बनत असतात?

तुमच्या आयुष्यात आलेली, तुमच्या सभोवतालची अनेक माणसं, विशिष्ट स्थळं, तसेच दु:खाचे, मानहानीचे, अपमानाचे, आप्तांच्या मृत्युंचे, भीतिदायक, प्रक्षोभक, अटीतटीचे, ह्रदयद्रावक, मनभंजक, युद्धाचे, क्लेशकारक, वेदनादायक, विदारक, अन्यायकारक, नाराजी निर्माण करणारे, मेंदुचं वाटोळं करणारे, ह्रदयस्पर्शी प्रसंग इत्यादी अनेकानेक घटनांचे विविध आकार आहेत. या आकारांसोबत तुमच्या अस्तित्वाला थेट जोडणारी एक वायर / दोरी / कॉर्ड निर्माण होते.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

माझ्या – तुमच्या मनात आलं म्हणून तटातट तोडून टाकाव्यात, एवढ्या सहज या दोर्‍या / कॉर्ड्स तूटत पण नाहीत. आता पुढे लिहिलेलं description वाचा. त्याचा अर्थही सांगते.

“Attaching or Connecting or Cording is like this. — Being corded is a means to tap into someone else’s energy which, in turn, acts as a feedback mechanism. When you are corded with someone or something, it allows you to understand their feelings and even their thoughts to some extent.” ©

जोडणे किंवा जोडले जाणे किंवा कॉर्डिंग हे असे असते पहा.— कॉर्डिंग म्हणजे दुसर्‍याच्या एनर्जी फील्डमध्ये टॅप करणे आणि त्याचा परतावा म्हणून त्या व्यक्तीच्या एनर्जी फील्डने ते बाउन्स बॅक करणे. (डिफेन्स केल्यासारखं) जेव्हा तुमची एखाद्या व्यक्तीसोबत किंवा वस्तुसोबत cord निर्माण होते, तेव्हा काही प्रमाणामध्ये, त्या object चे फीलिंग्स आणि विचार तुम्हाला कळू लागतात. हेच ते एक प्रकारचं bonding आहे. ©

प्रत्येक रिलेशनशिप अशा प्रकारच्या cord bonding वर run होत असते. या वायरी / कॉर्ड्स किती मजबूत किंवा कमकुवत किंवा स्टबर्न आहेत, हे त्या वायरींमधून वाहणार्‍या इमोशन्स वरुन / प्राणउर्जाप्रवाहावरुन ठरते.

अर्थातच ही cord असते, इथरची. इथर ला ‘एनर्जी’च संबोधुया. ही एनर्जी कॉर्ड असते, या कॉर्डमधून मुळातच, ती एनर्जीपासून बनलेली असल्यामुळे ती प्राणशक्तीचं वहन चालू असतं. तुमच्या प्राणशक्तीला तुमच्यातून बाहेत शोषून नेत असते. या कॉर्ड्सचं अस्तित्वच तुम्हाला माहित नसल्यामुळे, अथवा ती का व कशी तोडायची, हे ठाऊक नसल्यामुळे ती तशीच लाईव राहते. याचा अर्थ समजतोय का तुम्हाला? प्राणशक्तीचं हे अमर्यादित ड्रेनिंग नेहमीच चालू राहतं. ©

तुम्हाला याची डेप्थ कळावी, म्हणून मी सलाईनचं उदाहरण देते. एखाद्या पेशंटला जेव्हा हॉस्पिटलाइज्ड केलं जातं, तेव्हा उपचारांमध्ये सलाईनद्वारे मेडिसीन व तत्सम द्रव शरीरात सोडलं जातं. सलाईन लावण्यासाठीची सुई शरीरात टोचताना फक्त सुरुवातीलाच कचकन दुखतं. नंतर प्रवाह चालू आहे, हे तुम्हाला समजतही नाही. अगदी तसंच हे ड्रेनिंग चालू राहतं. अव्याहतपणे चालू राहतं. अखंड आयुष्य चालू राहतं. ©

यांनाच तुम्ही पेनफुल मेमरीज असं समजता. ज्या मेमरीज ड्रेनिंग ड्रॅक्युला सारख्या शोषण करतच राहतात. यामुळे तुम्हाला वर्तमानात जगण्यासाठी मिळणारी प्राणशक्ती (सतत संपत राहिल्यामुळे) अपुरी पडते आणि प्राणवायु कमी पडल्यावर जसं आपण गुदमरतो, अगदी तस्साच फील या अनिर्बंध ड्रेनिंगमुळे आपल्याला येत राहतो. बरं तसं पाहिलं तर, तुमचा नैसर्गिक श्वासोच्छ्वास तर सुरु असतो. तरीही तुम्ही स्वत:ला depleted फील करत असता. (depleted म्हणजे पॉवर गेलेल्या बॅटरी सारखं) ©

energy-cord

काही ठिकाणी या शोषणाला (जणुकाही) एनर्जी व्हॅम्पायर्स हे शोषण करत आहेत, असंही म्हणतात. कारण तुम्ही याच प्रकारच्या शोषणाच्या सोबत आयुष्य जगत असता आणि एनर्जी लेवलच्या या ड्रेनिंग पासून अनभिज्ञ असता. विचार करा, असे किती किती सुईसारखे काटे शरीरात रोवले गेले असतील आणि किती कॉर्ड्स मधून तुमचं अस्तित्व झरझर वाहून जात असेल. ©

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तो म्हणजे हे सगळं इतकं वाईट असतं का? या प्रश्नाचं उत्तर आहे — अजिबात नाही. फक्त वाईट्ट कॉर्ड्सच नाही, तर चांगल्या कॉर्ड्स पण असतात. कोणकोणत्या? तर आपल्या जवळच्या वर्तमान नात्यांसोबत जोडलेल्या (कुटुंब इत्यादी) आपल्या इष्ट दैवतासोबत, आपल्या सदगुरुंसोबत, आपल्या मार्गदर्शकांसोबत डेवलप झालेल्या, फॉर्म झालेल्या कॉर्ड्स या चांगल्या असतात. त्यांना असु द्यावं. त्यांच्यासोबत आपल्याला प्राणशक्ती संपतेय, असं जाणवत नाही, तर उलट एनर्जेटिक वाटतंय, चिअरफुल वाटतंय असंच वाटत राहतं. कारण ते तसंच असतं. या सर्व पोषण करणार्‍या कॉर्ड्स आहेत. ©

यात वर्णन केलेल्या प्रॉब्लेम्स ने अनेक बंधुभगिनी, युवकयुवती, गृहस्थ, मुलं, वयोवृद्ध व्यक्ती ग्रस्त आहेत. काही जण तर नैराश्यात कसंबसं आयुष्य कंठत आहेत. प्रत्येकाला माझ्यापर्यंत पोहोचणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. समाजातील अशा दु:खी व्यक्तींपर्यंत मी पोहोचून त्यांना समस्यामुक्त करावे, असे मला मनापासून वाटते. एकतर या लेखाचे दोन्ही भाग, तुमच्या माहितीतील – ग्रस्त, पिडीत असलेल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तसेच त्यांना माझ्या थेरपीपर्यंत पोचण्यासाठी encourage करा. तुम्ही लांब कुठेतरी राहता, म्हणून काळजी करु नका. मी अनेक वर्षांपासून ONLINE sessions सुद्धा घेत असते. त्यांचाही इच्छित परिणाम प्राप्त होतो. भेटा अथवा फोन वर सेशनचा लाभ घ्या. कोंडमारा बास्स आता !! ONLINE sessions साठी WhatsApp message द्वारे संपर्क करावा. तुम्हाला सेशन्स शेड्युल करुन दिले जातील. 9820373281 

याच्यावर उपाय काय करावा, ते पुढच्या लेखात स्पष्ट करते. हा लेख कसा वाटला, ते मला नक्की कळवावे. या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. हे लेख copyrighted आहेत. copyright कायद्याचे, आणि कर्म सिद्धांताचे, कोणीही स्क्रीनशॉट किंवा copypaste, तत्सम माध्यमातून उल्लंघन करु नये. तुम्हाला लेख शेअर करावासा वाटला तर या लेखाची लिंक (नावासहित आहे) शेअर करावी. धन्यवाद.©

दुसर्‍या भागाची लिंक: कर्म व मर्मबंध कंटकारी: CUTTING CORDS अत्यंत आवश्यक आहे. – भाग दुसरा

डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*