एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety

एंझायटी की जगाचा अंत की वर्ल्ड वॉर सुरु आहे? एंझायटी प्रॉब्लेम्ससाठी स्वयंसूचना: Hypnotherapy works Marathi Affirmations for Anxiety
Press PLAY and Listen to this Article Now!

एन्झायटी हा अलीकडच्या काळात सर्वांना अगदी व्यवस्थित पाठ झालेला शब्द आहे. अर्थातच एन्झायटीचा अर्थ तुम्हा सर्वांना माहितीच आहे. तरीसुद्धा समजेल अशा भाषेत एन्झायटी चा अर्थ सांगते. आपल्याला लहानपणी काही वाक्प्रचार माहीत होते. कावरंबावरं होणं, जीव भांड्यात पडणं, जीवाची घालमेल होणं, जीव टांगणीला लागणं हे सर्व वाक्प्रचार वाचल्यावर अगदी तशीच सिच्युएशन मनामध्ये आठवून पहा. अर्थातच हे सर्व वाक्प्रचार हे अतिशय सौम्य अस्वस्थता दर्शवणारे आहेत; पण ज्याला तुम्ही आम्ही एन्झायटी म्हणून ओळखतो, ती एन्झायटी याच सौम्यपणे अस्वस्थ करणाऱ्या मानसिकतेचं हायर व्हर्जन आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. ©

मराठीत एक म्हण आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. आज आजूबाजूची परिस्थिती व मानसिक आरोग्य लक्षात घेता, ‘व्यक्ती तितक्या एन्झायटी’ असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. हो हे खरंच आहे. मानसिक आरोग्यविषयी समस्या घेऊन माझ्याकडे हिप्नोथेरपी हवीय, म्हणून येणाऱ्या मॅक्झिमम केसेस या एन्झायटीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या आहेत. हा आजार तर मानसिक आजारांमध्येच मोडतो. परंतु त्याची व्यापकता तुम्हाला शारीरिक आजार सुद्धा भेटस्वरुप देत असते. म्हणून आज हा विषय लिहायचा घाट घातला आहे. ©

anxious-facade

अर्थातच मी या लेखाच्या सुरुवातीला जग एन्झायटीने किती ग्रासलेलं आहे, त्याची आकडेवारी आता सांगत नाहीय. ती लेखाच्या शेवटी तुम्हाला वाचायला मिळेल; कारण लेखाचा उद्देश घाबरवून सोडणे हा नसून, एन्झायटीग्रस्त आयुष्यातून मार्ग काढण्यासाठी आशेचा किरण देण्याचा प्रयत्न करणे, हा आहे. आता हळूहळू एन्झायटी या विषयांमध्ये आपण प्रवेश करूया. ©

Anxiety meaning in Marathi (एन्झायटी मीनिंग इन मराठी) असं इंग्लिशमध्ये गुगल सर्चमध्ये टाईप करून काय उत्तर येते ते पहा, ‘एन्जायटी मीनिंग इन मराठी’साठी गुगलने पहिला फक्त एक शब्द लिहिलाय चिंता. नाही रे गुगल बाबा, एन्झायटी म्हणजे फक्त चिंता नाहीय. कळकळ, हूरहूर, घोर चिंता, पराकोटीची काळजी, भीतीयुक्त धडधड असे बरेच अर्थ एन्झायटी या एका शब्दामध्ये सामावले आहेत. ©

एन्झायटीची काय काय लक्षणे आहेत ते बघूया :

1) हृदय धडधडणे
2) घामाघूम होणे
3) श्वास घेताना अडथळा जाणवणे
4) गुदमरल्यासारखे वाटणे
5) डोकं गरगरणे
6) चक्कर आल्यासारखे वाटणे
7) नॉशिया फिलिंग होणे
8) छातीत दुखणे
9) जगापासून आपण खूप दूर झालो आहोत अशी भावना होणे
10) अचानक थंडी वाजणे किंवा शरीर थरथरणे
11) रडू येणे
12) डिसकनेक्टेड फील होणे
13) जेव्हा व्यक्तीला एन्झायटी येते त्यावेळेला त्याला असं वाटतं की, आजूबाजूचं सर्व जग खोटं, मिथ्या आहे, जगात चुकीचं घडत आहे.
14) एन्झायटी ग्रस्त व्यक्तीला वाटत असतं की, मी तर इथे आहे, पण भोवतालचं सगळं जग आता संपतंय.
15) पोटातील सर्व अवयव ओके असतानाही पचनाचे प्रॉब्लेम्स निर्माण होणे
16) सतत अ‍ॅसिडिटी होणे.
17) कधीकधी आत्मघातकी विचार येणे.
18) रुटीन कामं करताना एन्झायटीमुळे गंभीर चुका करणे
19) वागायचं असतं वेगळं, पण चारचौघांत काहीतरी विचित्रच वागून जाणे
20) वेगवेगळ्या गिल्ट फिलिंग्ज (अपराधी भावना) मनात सतत बाळगणं इत्यादी. ©

ही सर्व लक्षणं नीट वाचा. स्वत:चा मानसिक आजार अथवा समस्या आधी स्वत: व्यवस्थित ओळखायला शिका. मग तुम्ही इतरांपर्यंत ती पोहोचवू शकाल आणि मार्ग काढू शकाल. बरोबर ना!
एक घटना सांगते. 10 वर्षांखालील मुलांच्या केसेस शक्यतो संमोहन उपचारांसाठी, संमोहन तज्ञ घेत नाहीत. म्हणजे तसं यात काही डेंजरस नसतं. पण हिप्नोथेरपीस्ट ज्या सूचना सेशनदरम्यान देत असतात, त्या सूचना समजण्याइतपत त्या मुलाची बुद्धी हवी या एवढ्याच उद्देशाने दहा वर्षांपासूनच्याच मुलांसाठीच हिप्नोथेरपी केली जाते.

पण हा नियम मला अनेकदा बाजूला ठेवावा लागला. कारण दहाच्या खालील वयोगटातील मुलांच्या काही पालकांनीच आपल्या मुलांचे हिप्नोथेरपी सेशन घ्यावे, असा आग्रह केल्यामुळे मी दहा वर्षे वयोगटापेक्षा कमी वयाच्या मुलांचे सुद्धा हिप्नोथेरपी सेशन्स घेतलेले आहेत व ते यशस्वी झालेले आहेत. ©

त्यातलीच ही घटना सांगतेय. एक छोटी चुणचुणीत मुलगी होती. तिचं वय आठ वर्षे होतं. अभ्यासामध्ये व सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये ती अतिशय हुशार होती. त्याचबरोबर स्वतःहून महत्त्वाकांक्षी होती.©

तिचा प्रॉब्लेम असा होता की, तिला आपण स्वतः परफेक्ट असावं, असं नेहमी वाटायचं. पण ती शिक्षकांच्या जवळपास जाऊन उभी राहिली किंवा कोणत्यातरी पेपरचा रिझल्ट कोणी सांगणार असेल अशा वेळेला ती अतिशय घाबरीघुबरी व्हायची आणि तिला अक्षरशः ताप भरून यायचा. तिच्याही पालकांना मी स्पष्ट सांगितले की, तुमची मुलगी हिप्नोथेरपी च्या मानाने फार लहान आहे. तिची सजेस्टिबिलिटी म्हणजेच सूचनाग्राहकता मी पहिल्यांदा चेक करेन आणि मगच थेरपीचा उपयोग होणार आहे की नाही, ते सांगेन. ©

आनंदाची बाब म्हणजे, ती मुलगी खूप व्यवस्थित ग्रहणशील होती. तिची सूचनाग्राहकता बेस्ट होती. कारण ती एकंदर आज्ञाधारक होती. असो. तिची सर्व सेशन्स अतिशय व्यवस्थित पार पडली आणि या मुलीचा प्रॉब्लेम सहा सेशन्स मध्ये संपुष्टात आला. ©

anxious woman

ही घटना इथे या लेखांमध्ये सांगण्याचं कारण म्हणजे, तिला होणारा हा त्रास म्हणजेच एंझायटीचा त्रास होता. जसं की, आपल्याला आढळून येणारी ही वेगवेगळी लक्षणं, ही एन्झायटी या विषयात मोडतात, हेच मुळात तुम्हाला माहीत नसते. त्यामुळेच आपण या लक्षणांवर विशेष लक्ष देत नाही. वेळीच ही लक्षणं ओळखून, या लक्षणांचं निर्मूलन करणं, गरजेचं असतं. म्हणजेच एन्झायटीची ही मनाची प्रवृत्ती बऱ्यापैकी आटोक्यात आणली जाऊ शकते. पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही या लक्षणांना वेळीच ओळखू शकता तेव्हाच. ©

एन्झायटी हा ‘एखाद्या ठिकाणच्या सतत बदलत्या हवामानासारखा’च सतत व्हेरिएट होणारा, काहीसा विचित्र मानसिक आजार आहे. त्याचं रूपांतर बऱ्याचदा शारीरिक आजारांमध्ये होताना दिसून येतं. कधी कधी तर असं होतं की, जी व्यक्ती आधीपासूनच काही विशेष आजारांनी ग्रस्त आहे, जसं की बीपी, डायबेटीस, अस्थमा, मायग्रेन इत्यादी त्यांच्या या आजारांच्या तीव्रतेमध्ये सुद्धा या एन्जायटीमुळे वाढ होऊ शकते. ©

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

संपूर्ण जगामध्ये या एन्झायटीने ग्रस्त व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या एन्झायटीच्या महत्वपूर्ण विषयावर मी अजूनही काही भागांमध्ये लेखन करत आहे. पण या पहिल्या भागामध्ये काही सोल्युशन लिहावं, म्हणून पुढे काही affirmations मी सांगत आहे. हे affirmations म्हणजे पॉझिटिव्ह वाक्यं आहेत, जी एन्झायटीच्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडावं, म्हणून तयार केलेली आहेत. ©

Marathi Affirmations for Anxiety problem:

1) मी अतिशय शूर व धैर्यवान आहे.
2) माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी शांत आणि रिलॅक्स होत आहे.
3) मी स्वतःला भीती वाटणे, जजमेंट करणे व डाऊट घेणे या प्रोसेस मधून मुक्त करत आहे.
4) माझ्या स्वतःच्या विचारांनी मी मला स्वतःला मदत करणार आहे, असं ठरवलं आहे.
5) मला सतावणारी एन्झायटी माझ्या जीवनाचा कंट्रोल घेऊ शकत नाही.
6) मी सर्व सिच्युएशन्स उत्तम हाताळू शकते.
7) मी खूप सुरक्षित आहे आणि नजीकच्या काळामध्ये कोणतीही धोकादायक घटना घडणार नाही आहे.
8) आता कोणतीही विचित्र घटना किंवा प्रसंग घडत नाहीय किंवा घडणार नाहीय त्यामुळे मला पॅनिक होण्याची काहीही आवश्यकता नाही आहे.
9) आयुष्यात घडणाऱ्या सर्वसाधारण गोष्टींपैकीच हे, मी जगत असलेले आताचे क्षण आहेत.
10) माझ्या फिलिंग्समुळे, विचारांमुळे मी आता घाबरून जात नाही आहे.
11) आता मला फक्त पुढे कोणते पाऊल उचलावे आणि कोणती कृती पुढे करावी याचंच प्लॅनिंग करायचे आहे. असं करणं मला वेळोवेळी जमत आहे.
12) हे जे काही घडत आहे, ते आत्ता पुरतेच आहे, हे कायमस्वरूपी असंच घडत राहणार नाहीय, परिवर्तन होत राहणार आहे, याची मला जाणीव आहे.
13) या एन्झायटीमध्ये मी आतापर्यंतचे जीवन जगले आहे. आता यापुढील जीवन मी उत्तम रीतीने जगणार आहे. ©

असं तर तुम्हाला एन्झायटी या विषयावर अनेक पॉझिटिव्ह वाक्यं सापडतील. ती पॉझिटिव्ह वाक्यं तुम्ही या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. मी यातील काही निवडक स्पेसिफिक वाक्यं तुम्हाला लिहून दिली आहेत.

120+ Helpful Affirmations for Everyday

वर दिलेली पॉझिटिव्ह वाक्यं म्हणजे मनाला देण्याच्या सकारात्मक सूचना आहेत, याची जाणीव मनामध्ये ठेवावी. ही वाक्यं तुम्ही रोज ठराविक वेळेला, दिवसातून दोन वेळा, तीन वेळा वाचू शकता किंवा दोन कामं एकाच वेळी करू शकता; ती म्हणजे ही वाक्यं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा आणि समोर लिहिलेली वाक्यं ही रेकॉर्डेड वाक्यं ऐकता ऐकता सोबतच वाचा. ©

सोल्युशनकडे आपली पावलं वळली आहेत, या विचाराने तुम्हाला जर आता बऱ्यापैकी धीर आला असेल, तर मी या लेखाच्या सुरुवातीला जे लिहायचं टाळलं होतं, ते आता स्पष्ट करते. म्हणजेच एन्झायटी या मानसिक आजाराची आकडेवारी आता मी तुम्हाला सांगते.

2010 मध्ये जागतिक स्तरावरील आजारांमध्ये एंझायटी हा सहा नंबरचा प्रमुख आजार होता. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’च्या मते, एन्झायटी विकार हा यू.एस. मध्ये सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे, ज्याने यु एस मधील 2005 मध्ये 40 दशलक्ष प्रौढांना किंवा 18 टक्के लोकसंख्येला प्रभावित केले होते. एका अभ्यासानुसार क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने 2012 मध्ये 91 देशांतील 4,80,000 लोकांचा या आजारग्रस्तांमध्ये समावेश झाला आणि उत्तर अमेरिका, पश्चिम युरोप आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील सुमारे दहा टक्के लोकांना, मध्य पूर्वेतील सुमारे आठ टक्के आणि आशियातील सहा टक्के लोकांना एन्झायटीचा आजार झाला झाला आहे. ©

इन्झायटी हा आजार तीव्र स्वरूप धारण करण्यापूर्वीच यावर उपचार करून घेणे अनिवार्य आहे. उपचारांची गरज ज्यांना आहे, अशा लोकांमध्ये ढोबळ मानाने मी दोन कॅटेगरी पाहिल्या आहेत. त्यातली एक म्हणजे (मानसिक असू दे अथवा शारिरीक) जे काही होत आहे, ते तातडीने ओळखून त्याचे उपचार घेऊन वेळीच पूर्णपणे बरं व्हावं, अशी प्रवृत्ती असलेली कॅटेगरी आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे – कुठे काय होतंय, जे होतंय ते मानसिक आहे, दिसत तर काही नाहीय लोकांना; आज ना उद्या बरं वाटेल आपोआप. नंतर कधीतरी ट्रीटमेंट घेऊ. असा विचार करून आजारांवरचे उपचार टाळण्याची वृत्ती असलेली कॅटेगरी. ©

आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, एन्झायटीच्या बागुलबुवामधून आधी स्वत:ला बाहेर काढा. तसं पाहायला काही प्रमाणात सिच्युएशनल एन्झायटी तर प्रत्येकाला असते. ती अतिशय सौम्य असते. जसं की एखादी अत्यंत महत्त्वाची म्हणजे राष्ट्रीय व सामाजिकदृष्ट्या उच्च शक्तिशाली असलेली व्यक्ती माझ्यासमोर अचानक येऊन उभी राहिली, तर अशा वेळेला मला सुद्धा तिथे काही मिनिटे एंझायटी येऊ शकते. आपण एवढा वेळ जी चर्चा केली ती या प्रकारच्या एन्झायटीवर केलेली नाहीय. कारण या प्रकारच्या एन्झायटीला सिच्युएशनल एन्झायटी असं म्हणतात. आणि आपण जी चर्चा केलेली आहे ती एन्झायटी हा आजार झालेल्या व्यक्तींबाबत केलेली चर्चा आहे. कमेंट्समध्ये फीडबॅक सांगा. ©

हा लेख कसा वाटला, ते मला नक्की कळवावे. या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. हे लेख copyrighted आहेत. copyright कायद्याचे, आणि कर्म सिद्धांताचे, कोणीही स्क्रीनशॉट किंवा copypaste, तत्सम माध्यमातून उल्लंघन करु नये. तुम्हाला लेख शेअर करावासा वाटला तर या लेखाची लिंक (नावासहित आहे) शेअर करावी. धन्यवाद. ©

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. Spiritual & Mind blogger.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

2 Comments

Leave a Reply