Helpful Positive Affirmations in Marathi for Workplace Stress Management | मराठी सकारात्मक स्वयंसूचना

सकारात्मक स्वयंसूचनांचे महत्त्व:

आपल्याला काय वाटतंय आणि आपण स्वतःसाठी काय काय चांगलं करू शकतो या प्रक्रियेमध्ये सकारात्मक स्वयंसूचना (Positive Affirmations) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. या स्वयंसूचना आपल्या विचारांवर चांगले नियंत्रण आणतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता रुजवतात. यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.
जेव्हा आपण सकारात्मक स्वयंसूचना वारंवार बोलतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढत जातो. स्वयंसूचना बोलल्या मुळे नकारात्मक विचार करणे व स्वतःवर शंका घेणे कमी होते. जेव्हा आपण नेहमी स्वतःला स्वयंसूचना देत असतो, तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास गहिरा होत जातो. मग काही दिवसांनी सर्वसाधारणपणे या सूचना आपल्या विचारांवर चांगला प्रभाव निर्माण करतात. या स्वयंसूचना मुळे आपल्याला बरे वाटते, तसेच या सुचानांमुळे आपण सकारात्मकतेने आयुष्यातल्या आव्हानांचा सामना करू शकतो.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलायला स्वयंसूचना आपल्याला मदत करतात:

आपल्या भवनांवर सुद्धा स्वयंसूचना प्रभाव टाकतात. सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपला नकारात्मक कल सकारात्मक बनतो. तो असा की, आपण जर भित्रे असू तर, सकारात्मक स्वयंसूचनांमुळे आपण शूर बनू शकतो. तसेच आपण जर स्वतःवर शंका घेत असू तर, स्वयंसूचानांमुळे आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवू लागतो.
आपली स्वप्ने व आपली ध्येये ह्यांना नजरेसमोर ठेवून जेव्हा आपण स्वयंसूचना बोलतो तेव्हा एक सकारात्मक भावनिक वातावरण आपल्यामध्ये तयार होते. यामुळे असे होते की, आयुष्यात कितीही संकटे आली तरीही आपण आयुष्याकडे आशावादी नजरेने बघू लागतो.
वर लिहिलेली सर्व माहिती तंतोतंत सत्य असली तरीही सोप्या शब्दात सांगावं तर, स्वयंसूचना बोलताना आपल्याला एकंदरच खूप छान वाटते आणि हे छान वाटणे आपल्याला तणाव (stress) कमी करायला, आपले मानसिक आरोग्य सुधारायला आणि मनःशांती व समाधान प्राप्त करायला मदत करतात.
तर तात्पर्य असे की, जेव्हा आपण सातत्यपूर्ण पद्धतीने सकारात्मक सूचना पुन्हा पुन्हा बोलतो, तेव्हा आपल्या आतमध्ये एक सकस व प्रेरणादायी संवाद सुरू होतो आणि हा प्रेरणादायी संवाद आपल्या मन व आत्म्याचे पोषण करतो.

Helpful Positive Affirmations in Marathi for Everyday Success | मराठी सकारात्मक स्वयंसूचना

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ताणतणावाचे व्यवस्थापन करणाऱ्या मराठी सकारात्मक स्वयंसूचना

  • माझ्या मार्गात येणारे कोणतेही चॅलेंज/आव्हान मी व्यवस्थितपणे हाताळू शकत आहे.
  • माझ्या स्ट्रेस लेव्हल्स चे मी प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतो आणि त्यांच्यावर माझा पूर्णपणे ताबा आहे.
  • स्वतःचे कल्याण करणे आणि स्वतःची काळजी घेणे यांच्यावर मी उत्तम रीतीने फोकस करत आहे व या गोष्टींना मी प्राधान्य देत आहे.
  • काम करताना कामांचा व परिस्थितीचा कितीही दबाव माझ्यावर असला, तरीही शांत राहण्याची क्षमता माझ्यात आहे.
  • प्रत्येक श्वासाबरोबर माझा सर्व स्ट्रेस मी, माझे शरीर व मन यामधून बाहेर टाकून देत आहे.
  • कधीतरी येणाऱ्या अपयशांना मी खूप ताकदीने आणि निश्चयी वृत्तीने हाताळत असतो.
  • कामाच्या ठिकाणी निरोगी वातावरण ठेवणे आणि माझे डेली रुटीन व्यवस्थित फॉलो करणे हे मला नेहमीच जमत असते.
  • कितीही संकटे आली तरी माझ्या क्षमतांवर मला विश्वास आहे आणि माझ्या चांगल्या गुणांबद्दल सुद्धा मला आत्मविश्वास आहे.
  • मी नेहमी सकारात्मक विचारांनी पुढे जात आहे त्यामुळे मला नेहमीच सोल्युशन्स सापडतात.
  • कामाच्या ठिकाणी वातावरण नेहमीच व्यवस्थित व निरोगी राहावं म्हणून मी सतत प्रयत्नशील असतो.
  • दिवसभराची कामे करत असताना मी अधून मधून ब्रेक घेऊन स्वतःला रिचार्ज करत असतो.
  • मला जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा मला हवे असलेले मार्गदर्शन व सपोर्ट मी नेहमीच प्राप्त करत आहे.
  • माझ्या कामाच्या/व्यवसायाच्या ठिकाणी मी नेहमी प्रगती व वाढ कशी होईल यावरच लक्ष केंद्रित करतो.
  • दिवसभराची सर्व कामे करत असताना मी जास्तीत जास्त वर्तमानामध्ये लक्ष केंद्रित करत आहे.
  • माझ्या कामाच्या अनुषंगाने मला मिळणाऱ्या सर्व संधी आणि मला मिळणारे सर्व अनुभव यांच्या बद्दल मी नेहमीच कृतज्ञ आहे.
  • माझ्या वेळेचे नियोजन अतिशय उत्तम असल्यामुळे सर्व ताण निघून जातो आणि उत्पादन क्षमता वाढते.
  • माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत मी नेहमी सकारात्मक संबंध प्रस्थापित करतो यामुळे कामाच्या ठिकाणी सहकाराचे वातावरण राहते.
  • ज्यातून नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळेल अशा कामा संबंधित सर्व गोष्टींना मी नेहमी वेलकम करीत आहे.
  • मी नेहमी योग्य मार्गावर चालत आहे याची मला पूर्ण खात्री असते आणि येणाऱ्या कोणत्याही संकटाच्या परिस्थितीचा मी न घाबरता सामना करत आहे.

Helpful Positive Affirmations In Marathi For Healthy Body Image | सुंदर व निरोगी शरीरासाठी सकारात्मक स्वयंसूचना

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*