BFF मन माझे: Subconscious Mind is My Best Friend Forever!

‘तू इस तरहसे मेरी जिंदगीमें शामिल है। जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है।’

ही तर गुड न्यूज आहे, नाही का! कधीही न रुसणारा, कधीही न धोका देणारा, माझी सर्व अखंड बडबड न थकता ऐकणारा, माझं दिसणं आणि माझं असणं (अस्तित्व) कोणतेही मोजमाप न लावता, मला लोभसवाणे जाणवून देणारा, माझा जिवलग मित्र, ज्याला आधुनिक भाषेत BFF – best friend forever म्हणतात, तो माझा मित्र अंतर्मन आहे. इंटरेस्टिंग आहे ना!

हा मित्र प्रत्येकासोबत असतो; But you have to give ‘high five’, regularly !!! शाळा- कॉलेज किंवा कुठेही मित्र भेटला की, हायफाइव देता ना! तस्संच! आजपासून लक्षात ठेवा. हा फ्रेंड खूप पॉवरफुल आहे. सुपरमॅन, स्पायडरमॅन, आयर्नमॅन सगळे लहान भासतील, इतका पॉवरफुल फ्रेंड!! ‘तुझ्यासाठी काय पण’ वाला फ्रेंड. हा फ्रेंड असणं, ही फक्त माझ्यासाठीच नाही, तर सर्वांसाठी असलेली एक शक्तिशाली सुविधा आहे. ©

शांत एका ठिकाणी बसा. मन शांत करा आणि या सामर्थ्यशाली दोस्ताला अनुभवा. आरशासमोर उभं राहिल्यावर दिसतं, ते शरीर आहे बाह्यशरीर. इतरांसोबत गप्पांमध्ये मशगूल असताना जे कम्युनिकेट करत असतं, ते बाह्यमन. 

फुलपाखरासारखं  भिरभिरणारं बाह्यमन. आपल्या विचारसरणी वर हक्क गाजवणारं बाह्यमन. हक्क कशासाठी, तर सर्व निर्णय बाह्यमनच घेत असतं. आपल्याला आता हे हवंय, हे नकोय, हे बाह्यमनच सांगत असतं. ते आपले बरेच निर्णय स्वत: घेत असतं. आपण म्हणतो मी हे केलं, ते केलं हे बाह्यमनच सांगत असतं.

आपलं यश अपयश, गरिबी, भरभराट, प्रोग्रेस, बिनधास्त किंवा संकुचित वागणं, इत्यादी सर्व बाह्यमनाच्या चॉईस वर चालतं. टिपिकली हे असंच आहे आणि तुमचं प्रेझेटेशन (अंगबोली, हावभाव आणि समजुतदारपणा यांचं सादरीकरण) जे समाजासमोर तुम्ही करत आहात, यातून – तुमच्या व्यक्तिमत्त्वाची डेफिनेशन समाजमनात बनत असते.

समाज म्हणजे कोणता नक्की? ही पण एक गंमत आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतरचा गोतावळा, हा समाज तर आहेच. पण गंमत अशी आहे की, तुम्ही ‘स्वत: सोडून सर्व जण समाज’च आहेत. तुम्ही काय प्रसारित करत आहात, यावरुन तुमची सामाजिक बोली (व्हॅल्यू) ठरते.

असो. काही ‘गोल सेटर’ विचारांना स्वत:च्या प्रगतीसाठी निवडले, अंगिकारले तर व्यक्तिमत्त्व आमुलाग्र नविन तयार होतं याद वाद नाहीय. हे जे मॅनेजमेंट आहे, यासाठी लागणारी बॅटरी पॉवर – अंतर्मन पुरवत असतं. अंतर्मनाला बिलकुल माहित नसतं, की तुमच्यासाठी काय उपयोगी, कल्याणकारी, डेंजरस असेल. असं लेबलिंग तुम्ही स्वत: करत असता, तुमच्या ‘समजेनुसार’.

याचा अर्थ, बॅटरी तर रेडी असते, तुमच्या क्रियाशीलतेसाठी. पण तुम्ही ज्या कारवाया (कर्तृत्व म्हणू आपण!) करत असता, त्यात स्वत:चं पुनर्वसन व्हावं ही ओढ ह्रदयात असायला हवी. तुम्ही भिरभिरणार्‍या व ठावठिकाणा माहित नसलेल्या घरमाशीप्रमाणे स्वत:ला भरकटवत बसाल, तर उपयोग काय या ऑटोमॅटीक एनर्जी प्रोव्हायडरचा?!

मॉरल काय आहे? मी आता पुढे जे सांगतेय ते इमॅजिन व फील करा. – तुमच्या सर्व भितींना, दुर्घटनांच्या मेमरीज ना एकसाथ बोलवा पाहू. एक पॉझ घ्या आणि आठवा. तुमच्या लाईफमधील अप्रिय, अपघात, मानहानी, टॉर्चर, तीव्र नाराजी असलेलं सर्व आठवा. ही फिलिंग लक्षात ठेवा. त्या सर्व गोष्टी जमल्या की, आता कसं वाटतंय ते जाणून घ्या आणि नंतर सेम प्रयोग – चांगल्या चीअरफुल घटना आठवा. आता सुद्धा फिलिंग्सना बघा. आनंद, उत्साह वाटतोय ना !! याआधीचं सर्व कसं फील झालं होतं ते सांगा. फुल डिप्रेस्ड फिल झालं होतं  ना!

या दोन्ही टास्कमध्ये एनर्जी कोणी दिली बरं?! तोच तो BFF, म्हणजेच अंतर्मन. व्यक्तिगत ‘फील गुड’ फॅक्टर ओळखा. हे करताय तुम्ही स्वत:चं वर्कशॉप स्वत:च. आत्मविश्वासाने भरलेले विचार हे शंकासुर विचारांपेक्षा अधिक शक्तिशाली व एनर्जेटिक असतात, हे तुमच्या लक्षात येईल.

तर अंतर्मन ही तुमची लाखमोलाची बॅटरी आहे. तुमच्या फिलिंग्स ना ओळखा. गोल सेटर विचारांवर प्राणशक्ति घालवणं आणि आयुष्याच्या आजवरच्या पसार्‍यावर काथ्याकूट करत बसणं या दोहोंमधील आनंददायी, बहुआयामी, चैतन्य व स्फूर्ती (नवनविन क्रिएटिव्ह गोष्टींच्या प्रेरणा) देणारं नेमकं कोणतं टास्क आहे, हे ओळखा.

तुमचा व माझा ताकदवाला BFF (अंतर्मन) at your service नेहमीच तत्पर असतो. आपल्या अंतर्मनाचे कार्यक्षेत्र हे भरपूर मोठे व अमर्याद आहे. तुम्ही बुद्धीच्या पातळीवर धडाधड निर्णय घेता आणि मनाला सांगता आता तू हे असं करच. आज्ञाधारक अंतर्मन हे बाह्यमनाने (म्हणजेच तुमची   मागणी) मागितलेली गोष्ट पूर्ण करणासाठी एनर्जी देतं आणि ती गोष्ट घडुनही येते. मग आता तुम्हीच ठरवा की, काय सांगितलं पाहिजे आणि काय विचारांमध्येही आणायला नको आहे.

चला एक प्रयोग करुया. एक प्रश्न विचारते. खरं उत्तर द्यायचं मात्र. Are you in ‘NOW’ ?…….. शुद्ध मराठीत — तुम्ही आत्ता इथे वर्तमानात आहात का?…….

काही जण येस म्हणतील तर काही जण नो.

आता नो म्हणणार्‍यांनी आणि सर्वांनीच डोळे मिटा. मी 1 ते 7 अंक मोजते.

1, 2, 3, 4, 5, 6, 7 जरा वेळ डोळे बंद अवस्थेत बसा. आता न विसरता मला सांगा की, आता तुम्ही काही क्षण वर्तमानात आहात का?

हिप्नॉटिझम किंवा हिप्नोथेरपी हेच कार्य करते. संमोहन उपचार हे फक्त मानसिक समस्यांवरच केलं जातात, असं नसून, अनेकजण त्रुटी, सवयी घालवून  व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी सुद्धा येतात. जास्त कमावलेले चार पैसे, ऐषआरामातील आयुष्य, उच्च शिक्षण यामधून विवेकपूर्ण सामाजिकता प्राप्त होते, आणि हे सर्व नसलेला माणूस सामाजिकदृष्ट्या अपात्र व विवेक नसलेला असतो असं जर वाटत असेल, तर चुकीचं आहे. तसं असतं तर गर्भ श्रीमंत व्यक्ती कधीही असाध्य आजाराने ग्रस्त नसली असती. तणावात जगली नसती. 

माझा हा BFF आहे ना, तो 24 तास जागाच असतो. झोपतच नाही. त्याला क्रिएटिव्ह टास्क द्या. तो तसं घडवून आणण्यात मदत करेल. त्याला भूतकाळातली रडगाणी सांगत बसा; मग तो तुम्हाला 100 पटीने जर्जर बनण्यात मदत करेल. कारण तो फक्त सर्व्हिस प्रोवायडर आहे. त्याचा विधायक वापर करुन घ्या. अंतर्मन ही न संपणारी पॉवर बँक आहे. Use it thoroughly before you die. धन्यवाद.

लेख कसा वाटला यावर फीडबॅक सांगा. 5 मिनिटं द्या आणि कमेंट्स मध्ये लिहा. विषय पुढे कंटिन्यु होइलच. तुमच्या कमेंट्समुळे स्फूर्ती प्राप्त होते.

या लेखामधले ‘तुझ्यासाठी काय पण’ वाला फ्रेंड’ – हे जे वाक्य लिहिलं आहे ते, डीप लेवलला समजून घेण्याचं आहे. हे फक्त वाक्य नाही, तर सबकॉन्शसचं वास्तव आहे.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*