कर्म व मर्मबंध कंटकारी: CUTTING CORDS अत्यंत आवश्यक आहे. – भाग दुसरा | Why Cord Cutting is Important? PART 2

बर्‍याच जणांनी विचारलं की, हे गूढ शीर्षक काय आहे? कर्म व मर्मबंध कंटकारी ? कर्मांपासून cords निर्माण होतात आणि मर्मांतूनही असे गूढ रहस्ययुक्त बंध अथवा cords ज्यातून नकळतपणे अव्याहतपणे आपण अवशोषित होत असतो. अनेकांना cords वरील लेखाचा पहिला भाग आवडला. म्हणून लवकराच दुसरा भाग लिहून पूर्ण केलाय व सादर करीत आहे.

मागील (पास्ट) नातेसंबंधांना आणि त्यांना ते संबंध पूर्ण करण्यापासून प्रतिबंधित करा. थांबवा. बहुतेक
लोकांना हे समजत नाही की, जेव्हा तुमचा एखाद्याशी संबंध (कनेक्टिव्हिटी) असतो, तेव्हा तुमची ऊर्जावान प्रणाली (सिस्टिम) बनते. Cord फॉर्म झाल्यामुळे तीव्र भावनिक किंवा मानसिक घटना घडते, जसे की आघातजन्य किंवा वेदनादायक घटना, याचा त्रास तुम्हाला विनाकारण होतो.

कधीकधी लैंगिक संबंधातून ऊर्जा दोर तयार होतात; तुम्ही सो कॉल्ड “मेड फॉर इच अदर” वगैरे असता. धडकते दिल, कपकपाती राते वगैरे. हे असे शब्द वापरल्याबद्दल सॉरी. पण असंच काहीसं असताना, निर्माण झालेल्या ढासू ताकदवाल्या cords, आयुष्यभर बाळगाव्या लागतात. अगदी ‘तो पर्टिक्यलर’ प्यार का मौसम वगैरे संपल्यानंतरही या स्टबर्न cords तुमची प्राणशक्ती शोषतात. फक्त प्रणयच नव्हे, तर शपथा, वचनं, करार, मागण्या सर्वकाही जोडलेलंच राहतं. आणि तुमच्या वर्तनाने आयुष्याला काळी झालर निर्माण होत राहतं.

विचार करा जरा, वय वर्ष सोळा सतरा अठरा कुठे आणि वयाची पन्नाशी कुठे!! all the cords are alive till date!! आताच्या आयुष्याशी संबंधितच नाहीय, असे ‘सुकलेले गुलाब’ भस्म झालेलेच बरे! इसीमें सबकी भलाई है। मुझे पीने का शौक नही, पीता हूं गम भुलानेको, असं म्हणणार्‍या मद्यपीची पावलं मद्यशालेकडे कधी वळतात, अनाकलनीय असतं. (हे मी रुपकात्मक उदाहरण दिलेलं आहे)

सर्व कॉर्ड दुर्दैवी व विनाशकारी असतात, असं नाहीय. याचा अर्थ असा की, तुमच्या प्रेमाच्या माणसांसोबत असे बंध कायम असतातच. हे बंध तुम्हाला स्ट्रेन्थ, प्रोत्साहन व आत्मविश्वास देत असतात. त्या तोडायच्या नाहीत हो तुम्हाला! उलट त्या अधिकाधिक मजबूत कशा होतील, यावर प्रोसेस करायला हवंय.

या चांगल्या कॉर्ड्स चा उपयोग असा की, तुम्हाला तीन स्तरावर लोकांना समजून घेण्यात मदत करतात ते म्हणजे — भौतिक, भावनिक, मानसिक. चांगल्या cords, तुमच्या त्या व्यक्ती, गोष्टींसोबत उच्चस्तरीय संवेदनात्मक नातं प्रस्थापित करतात. अर्थात, तुम्हाला तसं विश्वासाचं नातं निर्माण करण्याची आंतरिक ताकद नक्कीच हवी. बरोबर ना!! चांगल्या व सकारात्मक कॉर्ड्स यांचं पोषण व्हावं आणि त्या सुरक्षित राहाव्या, म्हणून तुम्ही तुमच्या इष्ट कडे अथवा सुप्रीम विश्वात्म्याकडे कायम प्रार्थना करु शकता.

या कॉर्ड्स चं स्वरुप काळानुसार व circumstances (वातावरण परिस्थिती) नुसार बदलत राहतं. उदाहरणार्थ, प्रेमाच्या कॉर्ड्स चं पाहुया. एखादे केअरिंग आणि प्रेमळ नातेसंबंध जर कमकुवत होत असतील, तर हे कॉर्ड्स सुद्धा विरळ, निस्तेज व धूसर बनतात.

जसं मी म्हटलं, तसं चांगल्या cords बद्दल तुम्ही जाणून घेतलंत. आता वाईट cords बद्दल जाणुन घ्या. तुमचा कधीकधी ब्रेक अप होतो. कधी कधी एखाद्यासोबत प्रचंड वितुष्ट येते. कधी कधी खूप मोठ्ठे मैत्रीविरोधी अथवा नातेविरोधी कांड घडते. मी तरुणांबद्दलच फक्त सांगत नाहीय, हां! सर्वांबद्दल सांगतेय.

दुसरीकडे, जेव्हा आपण मित्रांमध्ये ब्रेकअप आणि फॉल-आउट सारख्या समस्यांना तोंड देतो तेव्हा हे दोरखंड तुटले जाऊ शकतात. अनोळखी लोकांशी आणि जीवनातील नकारात्मक व्यक्तींशी संबंध तोडण्याची शिफारस केली जाते, कारण या नकारात्मक विचारांचा आणि भावनांचा तुमच्या मनाच्या आरोग्यावर आणि एकूणच आरोग्यावर थेट परिणाम होतो.

वर उल्लेखिलेल्या निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये हे बंध, हे cords आपोआप सुद्धा तुटून जातात. It is ok. पण जर या cords तुटल्याच नाहीत, तर ??? एकतर यांचं स्वरुप साध्या नजरेला visible नाहीय. तर तुम्हाला कसं समजणार की आहेत की नाहीत ते? उत्तर सांगते.

Randomly विचार केला, तर चांगल्या व पवित्र cords सुपोषित (nourish) करणं आणि अनावश्यक, दु:खदायक, क्लेशकारक, असुरक्षित भासणार्‍या सर्व cords तोडून टाकणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काही संकल्पनायुक्त (mindset) कृती तुम्ही अंगिकारु शकता.

काही affirmations मी तुम्हाला सांगते. ते तुम्ही म्हणा. पण या cord च्या cutting च्या विश्लेषणासोबत एक विशिष्ट attitude तुम्हाला तात्पुरता का होईना, स्वत: मध्ये आणावा लागेल. बोला, आहे तयारी तुमची? असेल तर सांगते.

काही वाक्यं सांगते. ‘माझं घर व कुटुंव अवाजवी भीतीतून मुक्त झाले आहे.’ ‘मला स्वसंरक्षण करणे उत्तम जमत आहे.’ ‘माझी धनसंपत्ती व समृद्धी पूर्णपणे सुरक्षित राहिली आहे.’ ही वाक्यं मनातल्या मनात बोलून पहा. मनातला भाव पहा. आता पुढची गम्मत वाचा. ती अशी की, तुमच्यासमोर चोर दरोडेखोर येउन पुढ्यात ठाकले, तर काय कराल अशावेळी? वर लिहिलेली जी वाक्यं आहेत, त्यात निर्माण होणारा जो भाव आहे, त्याच सर्वसाधारण भावांमध्ये तुम्ही त्या चोरांचा सामना करणार का? तर नक्कीच नाही ना!!

अगदी हेच मला तुम्हाला सांगायचे आहे. पुढे मी जी प्रोसिजर सांगणार आहे त्यात असंच काहीसं अपेक्षित आहे. तुम्हाला एखादा दोरखंड कापायचा आहे आणि हा दोरखंड अतिशय वाईट आहे; त्रासदायक आहे; घातक आहे. अशा वेळेला तो दोरखंड एखाद्या धारदार शस्त्राने कापताना मनात जे भाव आणले पाहिजे ते भाव आणा. तुम्ही ‘अहिंसावादी आहात की हिंसावादी आहात याचा याच्याशी काहीही संबंध नाही.’ हे एक प्रकारचे स्वसंरक्षण आहे याची जाणीव मनामध्ये असू द्यावी.

थोडक्यात काय तर अशा शस्त्र हातात घेतलेल्या माणसासारखा म्हणजेच सैनिकासारखा, त्वेष व आवेशपूर्ण भाव मनात आणायचा आहे आणि तुम्हाला या नको असलेल्या कॉर्ड्स ना नष्ट करायचं आहे, ही मनोभूमिका नीट समजून घ्या आणि मगच मी पुढे सांगत असलेलं कार्य करायला हातात घ्या.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

या cords ना तोडण्यापूर्वी काय म्हणायचे ते सांगते. काही पॉझिटिव्ह सजेशन्स (सूचना वाक्य) सांगते. हे मनातल्या मनात तुम्ही बोलु शकता.

1) आयुष्यातील अनेक टप्पाटप्प्यांमध्ये माझ्या अस्तित्वासोबत अनेक कॉर्ड्स डेवलप झाल्या आहेत हे मला समजलं आहे. माझ्या हातात कापण्यासाठीचे धारदार शस्त्र आहे. या कॉर्ड्स मधील ‘फक्त’ त्रासदायक, अकल्याणकारी, हार्मफुल, विनाशकारी, वर्तमान प्रगतीत अडथळे निर्माण करणार्‍या कॉर्ड्स ना मी _ ←- तुमचं नाव , या क्षणी संपूर्णतः तोडून टाकत आहे.

2) या सर्व cords मध्ये काही माझ्यासाठी हितकारक, कल्याणकारी, माझ्या प्राणशक्तीचं पोषण करणार्‍या, मला प्रोत्साहित, उल्हसित करणार्‍या, मला विविध स्त्रोतांमधून (सोर्स) मार्गदर्शन करणार्‍या, मला पवित्र व सात्विक ऊर्जा देणार्‍या काही उत्तम cords आहेत. त्यांना माझ्यासोबत राहू देत. ©

3) ज्या माझ्या आवडत्या लोकांसोबत, उर्जादायी वस्तुंसोबत, आनंददायी घटनांसोबत, माझे प्रेमाचे बंध निर्माण झालेले असतील अथवा भविष्यात निर्माण होत असतील, ते बंध अधिकाधिक दृढ (स्ट्रॉंग) होत आहेत.

4) परमात्मा व सदगुरुंकडून माझ्यासोबत कल्याणकारी पवित्र सात्विक cords निर्माण होउ दे आणि ज्या झाल्या आहेत, त्या शक्तिशाली बनत आहेत. (तुम्हाला हवे ते कोणीही देव, देवता, कुळदेव) ©

5) मला हवी असलेली सर्व माणसे, विलोभनीय निसर्ग यांच्यासोबत माझ्या मजबूत cords बनल्या आहेत.

6) सोडून गेलेले / तुटलेले / विरलेले संदर्भ, व्यक्ती / घटना (gf, bf, exhusband, exwife, शत्रु) यांच्यासोबतच्या cords मी धारदार शस्त्राने तोडत आहे.

हे बोलून झाल्यावर “कल्पनेमध्ये” धारदार शस्त्र हातात आणून या निगेटिव्ह cords ना तोडावे. जर इथवर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, तर ही प्रोसिजर पूर्ण करावी. मला फीडबॅक सांगायला विसरु नका. ©

हे सर्व तुम्ही करुन पहावे. लक्षात असू द्या की, जी संमोहन उपचारांची थेरपी (हिप्नोथेरपी व इतर सर्व निसर्गोपचार) मी देत असते, त्यात या प्रोसिजर्स मी संपन्न करीत असते, त्यात माझ्या मार्गदर्शन करणार्‍या तत्त्वांचाही व सदगुरु तत्त्वांचाही आशिर्वाद समाविष्ट असतो. आशीर्वाद म्हणजे शक्तिस्त्रोत; आशीर्वाद म्हणजे फिलॉसॉफी नव्हे. या सर्व शक्तिसंभाराच्या विशुद्ध वर्षावामध्ये तुम्ही न्हाउन निघता आणि बरे होता. ©

कठिणातले कठीण झालेले, स्टबर्न झालेले cords हिप्नोथेरपी (@our center only) द्वारे काढून टाकले जातात. काही शक्तिशाली थेरपीसंबंधित गोष्टींसाठी तुम्हाला हिप्नोक्लिनिक का यावंच लागेल. काही कॉर्ड्स खूपच कठीण, कडक व अभेद्य असतात. But we can destroy them thoroughly. ©

यात वर्णन केलेल्या प्रॉब्लेम्स ने अनेक बंधुभगिनी, युवकयुवती, गृहस्थ, मुलं, वयोवृद्ध व्यक्ती ग्रस्त आहेत. काही जण तर नैराश्यात कसंबसं आयुष्य कंठत आहेत. प्रत्येकाला माझ्यापर्यंत पोहोचणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. समाजातील अशा दु:खी व्यक्तींपर्यंत मी पोहोचून त्यांना समस्यामुक्त करावे, असे मला मनापासून वाटते. एकतर या लेखाचे दोन्ही भाग, तुमच्या माहितीतील – ग्रस्त, पिडीत असलेल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तसेच त्यांना माझ्या थेरपीपर्यंत पोचण्यासाठी encourage करा. तुम्ही लांब कुठेतरी राहता, म्हणून काळजी करु नका. मी अनेक वर्षांपासून ONLINE sessions सुद्धा घेत असते. त्यांचाही इच्छित परिणाम प्राप्त होतो. भेटा अथवा फोन वर सेशनचा लाभ घ्या. कोंडमारा बास्स आता !! ONLINE sessions साठी WhatsApp message द्वारे संपर्क करावा. तुम्हाला सेशन्स शेड्युल करुन दिले जातील. 9820373281 

जेव्हा तुमच्या आयुष्याच्या कटकटींमधून, तुम्हाला मुक्त होण्याची तीव्र इच्छा होईल आणि हिप्नोथेरपिस्ट म्हणून माझ्यावर व पारंपारिक भारतीय संमोहन शास्त्र उपचारांवर श्रद्धा निर्माण होईल, तेव्हा आमच्या केंद्राशी WhatsApp message द्वारे संपर्क साधावा. आपले स्वागत आहे. समस्यांचा चकवा भेदून फक्त, पावलं पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. या “Cutting cords”च्या विषयावर हे दोन भाग सध्यातरी enough आहेत, असं मला वाटतं. नंतर जर वाटलंच तर तिसरा भाग लिहिन. सध्या तुम्ही एवढं तर करा आणि कळवा, how do you feel. ©

हा लेख कसा वाटला, ते मला नक्की कळवावे. या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. हे लेख copyrighted आहेत. copyright कायद्याचे, आणि कर्म सिद्धांताचे – कोणीही स्क्रीनशॉट किंवा copypaste, तत्सम माध्यमातून उल्लंघन करु नये. तुम्हाला लेख शेअर करावासा वाटला तर या लेखाची लिंक (नावासहित आहे) शेअर करावी. धन्यवाद. ©

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

2 Comments

  1. डॉक्टर मॅडम,
    मी CUTTING CORDS विषयावर आपले दोन्हीही लेख वाचले मला त्यातून अनेक नव्या गोष्टीं समजल्या ज्या वर्तमानात आपण सहज जगत असतो परंतु त्या सर्व Cords चाच एक भाग असतात हे त्यातून जाणवले. सकारात्मक आणी नकारात्मक या दोन्ही भावनांमधील भेद सुस्पष्ट झाला.
    आपल्याकडून यापूढेही कायम संमोहन या माझ्यासहं अनेकांसाठी गूढ आणी अवघड असणाऱ्या विषयाला सहज, सोप्या आणी समजणाऱ्या भाषेत उकलं करुन आम्हाला प्रत्यक्ष त्याच्याशी जोडणाऱ्या लेखनाची प्रतीक्षा असेल.

3 Trackbacks / Pingbacks

  1. कर्म व मर्मबंध कंटकारी: CUTTING CORDS खूप आवश्यक आहे. – भाग पहिला – ज्ञान power
  2. कर्म व मर्मबंध कंटकारी: CUTTING CORDS खूप आवश्यक आहे. – भाग पहिला (Why Cord Cutting is Important? PART 1) - Dnyan Power: Dr. Sunetra J
  3. कर्म व मर्मबंध कंटकारी: CUTTING CORDS खूप आवश्यक आहे. – भाग पहिला (Why Cord Cutting is Important? PART 1) - Dnyan Power: Home

Leave a Reply

Your email address will not be published.


*