याआधी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी (पूर्वजन्म प्रतिगमन) यावर जो लेख मी लिहिला होता, त्याला भारतात आणि भारताबाहेर उत्तम प्रतिसाद मिळाला, वाचकांनी तसे कळवले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. ©
आजच्या लेखाचा विषय आहे. Holding grudges होल्डिंग ग्रजेस. अर्थात गोष्टींना किंवा गोष्टींचा राग मनात धरुन ठेवणे. विषय जरा सिरियस आहे; पण आपण तो सोपा करुया. कारण या मानसिक टाईपने ग्रस्त झालेल्या बहुसंख्य व्यक्ती, बर्याच प्रमाणामध्ये संमोहन उपचारांसाठी येत असतात.
ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे रागाचे ग्रजेस वगैरे किती काळ ठेवले जातात, त्याला काही काळवेळ नाही. कायमचेच. याचा इतका अतिरेक होतो की, एखाद्याच्या मनातलं जे दालन उघडावं, तिथे असे अनेक ग्रजेस (मनात धरलेले राग किंवा तीव्र नाराजी) घोळक्याने पडलेले असतात. ©
हे सर्वच ग्रजेस निरुत्तरीत असतात. खरं तर इतक्या विषण्ण अवस्थेत असतात की, त्यांची उत्तरं मिळाली पाहिजेत, अशा डिमांडच्याही पलीकडे पोचलेले असतात. अनेक वर्षं अशाच पॅटर्नमध्ये कायम जगल्यामुळे, काही नात्यांची पडझड झालेली असते, नाराजी, राग मनात साचवून वागल्यामुळे, सभोवतालचे काही जण खूप दुखावलेले असतात. मनधरणी, स्पष्टीकरण, सुसंवाद, सॉर्ट आऊट वगैरे फक्त शब्दच उरतात. असो. आपण विषय जरा अजून समजून घेऊया.
एक प्रसंग सांगते. (हा प्रसंग तुम्हाला माहित असू शकतो) एका गावातल्या एका रस्त्याने दोन संन्यासी साधू चालले होते. त्यातला एक थोडे सिनिअर आणि दुसरे साधू थोडे ज्युनिअर. सकाळची वेळ होती. अतिशय प्रसन्न मनाने हे साधू मार्गक्रमण करत होते. काही वेळाने एका जलाशयाजवळ येउन पोहोचले. तो जलाशय पाण्यात उतरुन पार करुन, त्यांना पलीकडे त्यांच्या आश्रमात पोहोचायचे होते. ©
ते पुढे जातायत, तोवर त्यांना एक तरुणी दिसली. ती त्या दोघांकडे आशाळभूतपणे पाहत होती. त्यांना पाहून ती त्या दोघांच्या समीप आली; आणि म्हणाली की, ‘नमस्कार. मला हा जलाशय ओलांडून पलीकडे जायचं आहे. पण मला खूप भिती वाटतेय की, मला हे जमणार नाही. त्यामुळेच पाण्यात जाण्याची आता हिम्मतच होत नाहीय. काय करु मी? हात जोडते, मला मदत करा.’ ही तरुणी अतिशय सुंदर, यौवनपूर्ण व कमनीय होती.
या दोघांपैकी एक जे सिनिअर साधू होते, ते काही न बोलता पुढे गेले आणि त्यांनी तिला उचलून घेतले आणि जलाशय पार करवून दिला. पलीकडे काठावर पोहोचल्यावर तिने त्यांचे आभार मानले आणि ती निघून गेली. दोन्ही साधू आपल्या मार्गाने पुढे चालू लागले. जे ज्युनिअर साधू होते, त्यांच्या मनात अस्वस्थतेचा आगडोंब उसळला. त्यांना या कृतीचे (तरुणीला पाण्यातून उचलून नेण्याची कृती) खूप आश्चर्य वाटु लागले. आपण तर संन्यासी आहोत, ब्रम्हचारी आहोत, तर मग आपल्याला तर तरुणीला उचलून नेण्याचं कोणतंच कम्पल्शन नसायला पाहिजे. मग या सोबती महाराजांनी तिला उचलणं, टाळलं का नाही? नकार का नाही दिला तिला? हे काही योग्य झालं नाही. हे सर्वच प्रश्न निर्माण करणारं आहे. असे अनेकअनेक विचार!! ©
दोघंही बराच वेळ रस्त्याने चालत जात होते. आता थोड्या वेळाने ते आश्रमात पोहोचणार होते. त्याला अस्वस्थ झालेलं पाहून, सोबतच्या साधुने विचारलं की, काय झालं? तू इतका अस्वस्थ का आहेस? दुसरा साधू म्हणाला की, ‘एक प्रश्न विचारु का?’ दुसरे साधू म्हणाले, ‘हो. विचार.’ बर्याच वेळापासून मी मनात विचार करतोय की, ‘आपण तर संन्यासी आहोत; ब्रम्हचारी आहोत. असं असताना तुम्ही त्या तरुणीला प्रत्यक्ष उचलून, पलीकडे कसं काय आणलं? हे कसं काय योग्य आहे? तुम्ही नाही म्हणू शकले असता.’
दुसर्या साधूने स्मित केलं आणि ते म्हणाले की, त्या रुपवान तरुणीला मी एक असहाय व्यक्ती म्हणून पाहिलं. स्त्री की पुरुष म्हणून नाही. आणि हे सुहृदा, ‘त्या तरुणीला तर मी तिकडे काठावरच सोडून आलो आहे. पण मला तर दिसतंय की, तू तर तिला इथपर्यंत सोबत घेउन आला आहेस. बरोबर ना!!’ हे ऐकताच दुसर्या साधुला कळलं की, आपण खरंच किती वेळ ही गोष्ट मनात धरुन ठेवली? आणि कायकाय विचार करत बसलो? ©
या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? की आपण एखाद्या प्रसंगामध्ये व्यक्ती आणि त्यातले संदर्भ यांच्याकडे ज्या जाणिवेतून बघतो, तेच तुमच्या आत तयार होत असते. आणि हे संदर्भ, या व्यक्ती अथवा हे प्रसंग, आपल्या अंतर्मनात नकारात्मकतेचे सिग्नल देणारे असतील, तर आपण एकाच निगेटिव्ह व अकल्याणकारी अँगलने विचार करुन, कित्येकदा ओव्हरथिंकिंग करत बसतो. आणि हे आत चालणारं नेव्हरएंडिंग द्वंद्व, अजूनअजून व्यापक व न संपणारं बनत जातं. ©
किती ते ग्रजेस ठेवायचे, आणि किती कुठवर ठेवायचे? तेही फुप्फुसाचा, ह्रदयाचा, पॅनक्रिआचा, मेंदुचा पार चोथा होईपर्यंत??? घडणार्या घटना घडून जातात. इतर माणसं गोष्टींना ‘लेट गो’ करुन आपापल्या कामाला लागतात. तुम्हाला माहित आहे का, तुमच्याच मनात तुमची स्वत:ची प्रतिमा निगेटिव्ह असेल, परिस्थितीचा सामना करण्याची क्षमताच तुमच्यात नसेल आणि तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे रागीट असाल, तर हा ग्रजेस वाला कचरा मनात साचून राहण्याची शक्यता मॅक्झिमम असते.
अर्थात, नाराजी आणि दीर्घकाळापर्यंतचा राग बहुतेकदा मोठ्या चुकांमुळे उद्भवतो, जसे की कोणीतरी तुमचा वाढदिवस विसरलं असेल, तुम्हाला गरज असताना तुम्हाला मदत केली नसेल, कोणीतरी अविचारी किंवा असभ्य टिप्पणी केली असेल किंवा तुम्हाला खूपच निराश केले असेल. कामावर तुमच्या प्रयत्नांचं कोणीतरी स्वत:च क्रेडिट घेतलं असेल, खोटं बोलणं, खोटे आरोप करणं असं केलं असेल, आपली एखादी महत्त्वाची गोष्ट दुसर्या माणसाने विसरणं किंवा त्याला इग्नोर मारणं यासारख्या गंभीर घटनांमधून ग्रजेस’वाला राग स्वाभाविकपणे तयार होतो. ©
हे सर्व वर्णन सांगुन झालं. पण यातला चिंता करण्यासारखा भाग काय आहे ते मी आता सांगते. हा होल्डिंग ग्रजेस वाला राग तुमच्या समस्येचे निराकरण करत नाही आणि तो बाळगल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं असंही नाही. कारण मनातल्या मनात चरफडणं तर सुरूच राहतं. म्हणजेच तुमच्या या तणावाच्या भावना अनुभवून त्या व्यक्त न करता येणं, काहीतरी मनाविरुद्द स्विकारणं, हे निश्चितच अनारोग्यकारक आहे.
संशोधन असं सांगते की, नकारात्मक भावनांचे निराकरण करण्याऐवजी त्या भावना बांडगुळाप्रमाणे स्वत:सोबत बाळगणं, हे हानिकारक आहे. होतं असं की, तुम्ही एक मिसबिहेव करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता आणि हे निश्चितच तुमच्या जीवनासाठी कल्याणकारी नाहीय. मानसिक ताण वाढत जातो. मनावर परिणाम होतो; शरीराला व्याधी जडतात; बळावतात. आयुष्यातला फ्रेशनेस पार निघून जातो. सगळं जगच मला त्रास द्यायला बसलं आहे, ही नकारात्मकता ह्रदयात फोफावु लागते. ©
ग्रजेसना आश्रय देणे, हे आपल्या मानसिक आरोग्यावर विविध मार्गांनी विपरित परिणाम करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला आलेला नकारात्मक अनुभव स्वीकारून पुढे जाण्याऐवजी किंवा स्वीकारार्ह संकल्प शोधण्याऐवजी, तो घट्ट धरुन राहिल्यामुळे तुम्ही संताप, कटुता, निराशा, शून्यता, असंतोष यांनी भरुन जाता. आणि मग सर्वच गोष्टींकडे निगेटिव्ह अँगलने बघण्याची सवयच लागते. स्वभाव एकतर भयाण चिंता करणारा, नाहीतर अॅग्रेसिव बनत जातो.
वेळीच या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल, संमोहन उपचारच यातून बाहेर काढु शकतात. कारण तेच तुमच्या समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचू शकतात. हिप्नोथेरपी सेशन्स साठी संपर्क करावा. लक्षात ठेवा की, उपचार घ्यायला माणूस केव्हा जातो, तर त्याला थोडी का होईना, ही जाणीव होते की, Something should get repaired thoroughly. हा लेख कसा वाटला, जरुर कळवावे आणि मित्रांना शेअर करावे. Let’s live grudges free life !! लेखाच्या copyright चा भंग करु नये. लिंक शेअर करु शकता. ©
डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. ©
नमस्कार,आपला लेख वाचला.आसुया किंवा दुसर्या बद्दलचा द्वेष किंवा”जलन”मनात राहणं, स्वतः ला किती हानिकारक असतं याची माहिती देणारा आपला लेख माझ्या मनात काही शंका निर्माण करून गेला.मग एखादी प्रभावी व्यक्ती, सौंदर्यपूर्ण कलाकृती किंवा एखाद्या स्मरणात राहील अशा सकारात्मक घटनेचं स्मरण होतं…… आपणही अशाच एखाद्या बाबतीत इतक्या मनापर्यंत पोहोचावं….. असं वाटणं….. योग्य आहे की अयोग्य?
प्रश्न नीट सोपा करुन विचारावा.