सामर्थ्यशाली व सर्जनशील मानवी मन: The Powerful and Creative Mind

Find more episodes on Spotify: Mind, Body and Soul

    ‘मनाचे संकल्प पाववील सिद्धी। जरी राहे बुद्धी याचे ठायी॥’

– इति संत श्री तुकाराम महाराज.

मनात निर्माण झालेले संकल्प, कोणतंही आव्हान पेलवु शकतात. या मनाचे नियोजन शिकणे फक्त महत्त्वपूर्ण असते.

मनाचे सामर्थ्य, मनाची विशालता, मनाची खोली, तसेच मनाचे कर्तृत्व यांचा अभ्यास शतकांपासून सुरु आहे आणि तो पुढेही तसा करावा लागणार आहे. त्यावर आधारितच अनेक कवी, लेखक यांना हे मन अथांग महासागराप्रमाणे भासते आणि गंमत म्हणजे, मन म्हणून वेगळी वैशिष्ट्यपूर्ण वस्तू किंवा अवयव असा दाखवता येत नाही. म्हणून तर मनाची, एक परिपूर्ण व्याख्या बनवता येत नाही! तरीही आपण मन म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करुया. 

‘अनेक मानवी अनुभवांच्या मागे अथवा त्यांच्या मुळाशी असणारी, तरीही अव्यक्त असलेली गोष्ट म्हणजे मानवी मन आहे.’

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या शरीराच्या अंतर्गत आणि बाहेर अनेक हालचाली व क्रिया घडत असतात. मनच आपल्या हालचालींना प्रेरणा देणारी प्रेरक शक्ती आहे.

आता जरा वेगळ्या दृष्टीकोनातून मनाला पाहूया आणि समजून घेऊया. तुम्हाला जर विचारलं की, तुमच्या ‘आईचं प्रेम’ आणि तुमच्या ‘आईने दिलेली भेटवस्तु’ यात काय श्रेष्ठ आहे? तर तुम्ही काय उत्तर द्याल? साहजिकच ‘आईचं प्रेम’. बरोबर ना? कारण तुम्हाला ते ताकदीने जाणवतं.

आता दुसरं उदाहरण – एका उपकरणाचं ‘सर्किट’ आणि त्यातून ‘वाहणारी विद्युत’ यामध्ये कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे, असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? तर ‘त्यातून वाहणारी विद्युत’. बरोबर? कारण त्या विद्युतमध्येच तर ते सर्किट वर्क होण्यासाठीची ताकद आहे.

यातून आपल्याला सहजच समजतं की, भेटवस्तु आणि सर्किट या दृश्यमान स्थूल (सॉलिड) वस्तू आहेत. ‘आईचं प्रेम’ आणि ‘वाहणारी विद्युत’ या दोन्हींचे स्वरुप सूक्ष्म आहे. दृश्यमानही नाही. पण हे दोन्ही शक्तिशाली आहेत.

मनही असंच आहे. मन घन पदार्थ नाही. पण सामर्थ्यवान आहे. आपल्या शरीरावर, वागणुकीवर, सर्व हालचालींवर जे काही कमीजास्त परिणाम होत असतात, त्यावरुन मनाचे अस्तित्व आपल्याला अनिवार्यपणे मान्य करावेच लागते.

‘माझ्या मनात गोंधळ चाललाय’,’माझं मन आता विचार करुन थकलंय’, माझ्या मनातल्या भावना मी आता सांगणार आहे’ अशी वाक्यं बोलताना नेहमी आपण सहजच डोकं हातांनी पकडत असतो! 

Podcast: Powerful and Creative abilities of Human Mind! (सामर्थ्यशाली व सर्जनशील मानवी मन)

मन हे फक्त डोक्यात नसतं, तर शरीरभर व्यापलेलं असतं! मनाची अवस्था सतत बदलत असल्यामुळे, ते प्रस्थापित व प्रचलित शास्त्रांच्या ठोकताळ्यात बसवले जाउ शकत नाही. किती आश्चर्यकारक आहे ना!! ज्या मनामधून अनेक प्रेरणा सर्वाना (संशोधकांना देखील) मिळाल्या, अनेक नवनविन शास्त्रे जगाला ज्ञात झाली, त्या मनालाच संपूर्णत: शास्त्राच्या मितीत उतरवणं अशक्य आहे!

तर मूळ मुद्दा असा की, मानवी मनाच्या अदभुत सामर्थ्याची कल्पना, आपल्याला नसल्यामुळे मनाच्या ताकदीचा फक्त काही भागच आपले संपूर्ण आयुष्यभर आपण वापरत असतो. (100 पैकी 10 टक्के पण वापरत नाही) मग उरलेला हा भाग कधी वापरणार!!

अनेक जणांना, मनाशी निगडित अनेक समस्यांना तोंड देताना, मी माझ्या वीसहून अधिक वर्षांच्या संमोहन उपचारांच्या (हिप्नोथेरपी व माईंड कौन्सेलिंग) कारकिर्दींमध्ये जवळून पाहिलं आहे. मनातील भावभावना, प्रश्न, संघर्ष व विचार यांच्या अंधारी चक्रव्युहात अडकून, नैराश्यात मन, शरीर व सामाजिकता यांची वाताहत लागताना पाहिली आहे. आणि त्यांच्या याच मनावर कार्य करुन झाल्यावर, यशाची उत्तुंग भरारी घेताना सामर्थ्यवान बनलेल्या त्यांच्याच मनालाही पाहिले आहे. तर, या मनाचे स्वरुप अबोध आहे. तुमच्या स्वत:च्याच या मनाचे तंत्र (टेक्निक) व मंत्र (मॅनेजमेंट की-पॉइंट्स) समजून घेउन आपले वर्तमान जीवन आपण सुखी आणि समाधानी नक्कीच बनवु शकता. लेख आवडल्यास जरुर कळवावे. 

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

3 Comments

  1. फारंच उपयुक्त माहिती. मॅडम आपण टेलिपथी, दोन जन्मांमधीलच्या काळातील आत्म्याची स्थिती अशा विषयांबाबतही मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद

  2. हे आर्टकल मी नेहमीच वाचत असतो. ते वाचताना मनात जे चित्र, प्रसंग उभे राहतात अगदी तसेच आणि त्याहीपेक्षा अधिक प्रभावीपणे आपण add केलेल्या YouTube video मधून आपण मांडले आहेत. तसेच YouTube video च्या खाली देखिल आपण या आर्टिकलची लिंक दिलेली आहे. माझी नम्र विनंती की आपण सर्वच आर्टिकलसाठी असेच व्हिडिओ बनवा. धन्यवाद!

  3. हे आर्टकल मी नेहमीच वाचत असतो. ते वाचताना मनात जे चित्र, प्रसंग उभे राहतात अगदी तसेच आणि त्याहीपेक्षा अधिक प्रभावीपणे आपण add केलेल्या YouTube video मधून आपण मांडले आहेत. तसेच YouTube video च्या खाली देखिल आपण या आर्टिकलची लिंक दिलेली आहे. माझी नम्र विनंती की आपण सर्वच आर्टिकलसाठी असेच व्हिडिओ बनवा. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.


*