संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग तिसरा Hypnotism is Turiya State of The Mind!

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग तिसरा Hypnotism is Turiya State of The Mind!

कारण संमोहित अवस्थेमध्ये मग ती एखाद्य़ा संमोहकाने आणलेली अवस्था असू दे किंवा आत्मंसमोहनातून प्राप्त झालेली अवस्था असू दे “आत्मसाक्षात्कार” हा घडतच असतो आणि जेव्हा व्यक्ती अतिशय खोल गहिऱ्या निद्रेमध्ये म्हणजेच डीप स्लिप मध्ये जात राहतो, तेव्हा तो विश्वात्मा म्हणजेच अखंड अमर्याद ब्रम्हांडाच्या पोटामध्ये हा आत्मसाक्षात्कार लिटरली अनुभवत असतो. ©

या डीप अवस्थेमध्ये तो विश्वातील प्रत्येक कणासोबत, गोष्टींसोबत, प्रसंगांसोबत, व्यक्तींसोबत असलेलं त्याचं स्वत:चं जे कनेक्शन आहे, ते खूप खोलपणे अनुभव शकतो. अनुभवत असतो. ही सर्व प्रक्रिया अतिशय अलगदपणे उलगडत जात घडत असते. अर्थातच संमोहन करणाऱ्याच्या अभ्यास व स्वयंसाधनेवरही बरंच काही अवलंबून असतं. संमोहनाच्या अवस्थेमध्ये म्हणजेच तुरीया अवस्थेमध्ये, आत्मसाक्षात्कार होत नसतो! असं म्हणणाऱ्यांच्या अज्ञानाबद्दल न बोललेलेच बरे!! ©

संमोहनाच्या अभ्यासात आणि उपचार शास्त्रामध्ये मी स्वतः जेव्हा प्रवेश केला, तेव्हा कोणता पल्ला गाठायचे हे नक्कीच तितके स्पष्ट नव्हते परंतु तुरीया अवस्था अनेकदा जसजशी अनुभवास येत गेली, तसतसं बुद्धीचा इंटरफेअरन्स आपोआप कमी होत जाऊन मनाचे उहापोह निवायला सुरुवात झाली आणि तुरिया अवस्थेशी जीवात्म्याची सततची कनेक्टिव्हिटी अनुभवास यायला सुरुवात झाली. समजू लागली. संमोहन विद्येचे बरेचसे आकलन व रहस्योद्धाटण मला तुरीया अवस्थेमध्येच लाभले. ©

अर्थातच इथे स्पेशली मी नमूद करेन की, एखाद्याने शास्त्रज्ञ म्हणून नासाच्या अंतराळ संस्थेत काम करणारा शास्त्रज्ञ म्हणून जन्म घेतला असेल किंवा एखाद्याने कुठल्यातरी सर्वसामान्य शहरात एखाद्या गल्लीबोळात साध्या घरामध्ये जन्म घेतला असेल, तरीही त्यांचा जिवात्मा हा या मनुष्यजन्मात स्वाध्यायाचे (सेल्फ स्टडीचे), स्वयंप्रगतीचे, सदगतीचे (nice speed) विशिष्ट टार्गेट घेऊनच पृथ्वीतलावर आलेला असतो, याची नोंद घ्यावी. ©

माझ्या लेखनात येणारा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य आणि वेगवेगळे संदर्भ यांच्याशी मी पूर्णपणे प्रामाणिक असते. मी हे सगळे अनुभव, खोल जाणिवेपर्यंत अनुभवलेले असतात. तेव्हाच तुमच्यासमोर मांडत असते.

मुख्यत्वेकरून सांगायचं तर, संमोहन अवस्था म्हणजेच तुरिया अवस्था आहे; ही लर्निंग स्टेट म्हणजे ज्ञानाची अवस्था आहे आणि सर्वात मोठा गैरसमज म्हणजे संमोहन अवस्थेचं इंग्लिश भाषेतील हिप्नॉटिझम हे नाव, इंग्लिश भाषेपुरतं मर्यादित आहे. कारण ज्या ठिकाणच्या तज्ञांनी संमोहनाची विशिष्ट प्रणाली विकसित केली, त्यांनी तिकडच्या निद्रादेवीचे नाव या विद्येला किंवा शास्त्राला दिलं. या निद्रा देवीचे नाव होतं ‘हिप्नॉस.’ बरं हे नाव त्यांनी संमोहन विद्येला का दिलं तर त्यांनी संमोहन विद्येला एका प्रणालीमध्ये बद्ध केलं होतं. ©

प्रत्यक्षामध्ये संमोहन विद्या ही आपल्या भारतातीलच मूळ विद्या आहे. हठ योगामध्ये संमोहन विद्येला ‘प्राण विद्या’ म्हणजेच प्राणशक्तीवर काम करणारी विद्या असं नाव आहे. त्यामुळे कसला तरी कृत्रिम बेस असलेली विद्या – हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाकावा आणि वितंडवाद टाळावा. वर लिहिलेलं माझं जे एक विशेष वाक्य आहे की, – संमोहन अवस्था ही तुरीया अवस्था आहे. ©

या वाक्यावर कमेंट्सच्या स्वरूपात आलेल्या प्रतिक्रिया वाचल्यावर अनेकांच्या मनात या विद्येबद्दल असलेला संभ्रम दूर करावा, असं मला ठामपणे जाणवलं.ही सर्व माहिती मी वैयक्तिक संमोहनाबद्दल लिहिली आहे. ज्यामध्ये परासंमोहन व स्वसंमोहन या दोन्ही विषयांचं विश्लेषण केले आहे, कारण तुरीया अवस्थेची व्यवस्थित जाणीव या दोन्ही प्रकारच्या संमोहनामध्ये येतेच. परासंमोहन चा अर्थ एका माणसाने दुसऱ्या माणसाला उपचारार्थ केलेले संमोहन होय.

आश्चर्य म्हणजे काहींनी स्टेजवर मनोरंजनात्मक उद्देशाने केल्या जाणाऱ्या सामूहिक संमोहनाला पण, याच कॅटेगरीमध्ये नेऊन ठेवले आहे, हे पाहिल्यावर माझेही मनोरंजन झाले!! कारण सामूहिक संमोहन करणे, हे इतकं अवघड नाहीय. आपल्या देशात तर देशातील प्रत्येक नेता सामूहिक संमोहनामध्ये नंबर वन एक्सपर्ट आहे हे नक्कीच तुम्हाला पटलं असेल!!

आजवर माझ्याकडे संमोहन उपचारांसाठी वेगवेगळ्या मानसिक त्रासांमधून जाणाऱ्या व्यक्ती येतच असतात. परंतु संमोहन शास्त्र हे फक्त उपचारांसाठी वापरले जाणारे शास्त्र नाहीय. तर व्यक्तिमत्व विकास, मानसिक विकास, एकाग्रता वाढवणे, आत्मविश्वास वाढवणे अशा अनेक विषयांसाठी, संमोहन उपचार घेण्यासाठी व्यक्ती येत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण स्वतःची जेवढी अध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे, तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नाहीय, झाली नाहीय, ती मला साध्य करायची आहे, अशी इच्छा घेऊन येणाऱ्या व्यक्ती सुद्धा संमोहन उपचारासाठी येतात

fourth-dimension

तुम्ही सर्व जाणतच असाल की, प्रत्येक जन्मीची आध्यात्मिकता – येणाऱ्या पुढच्या जन्माला – जोडली जात असते. कोणत्या वेळी कधी आणि कोणत्या निमित्ताने हे फक्त आपल्या बुद्धीला माहीत नसते. परंतु जेव्हा या दोन किंवा अधिक जन्मांच्या आध्यात्मिकतेची कनेक्टिव्हिटी पुन्हा प्राप्त करण्याची वेळ आलेली असते, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनात अशी ओढ निर्माण होते आणि ती व्यक्ती अशी कनेक्टिव्हिटी निर्माण करून देणाऱ्या साधनांच्या शोधकार्यास सुरुवात करते.

कधीकधी या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये प्रसंगांची अशी गुंफण आणि पखरण निर्माण होते की आपली गतजन्मीची आध्यात्मिकता शक्तिशाली स्वरूपामध्ये आत्ताच्या आयुष्याशी जोडण्याची अनिवार्यता आपोआप निर्माण होते. हे वाचल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की मी, विशिष्ट आध्यात्मिक व्यक्तींबद्दल बोलत आहे, तर असं नाहीय. तुमच्या आमच्यासारखं सर्वसाधारण पारिवारिक जीवन जगणाऱ्या माणसांबद्दलच मी बोलत आहे आणि यासोबतच ज्यांचा अध्यात्माकडे ओढा आहे; पण मार्ग नीट सापडत नाहीय किंवा हवी तशी आध्यात्मिक प्रगती होत नाहीय, अशा व्यक्ती आत्मिक विकासासाठी येतात. संसारबंधनात न अडकलेली माणसे सुद्धा संमोहन विद्येचा लाभ घेण्यासाठी येतात. कारण पुन्हा तेच तुरिया अवस्था एक स्थिर अवस्था एक लर्निंग स्टेट ! ©

संमोहन उपचारांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींपैकी कित्येकांचं गुरुतत्त्व अक्षरशः ‘नो कनेक्शन’ अशा अवस्थेमध्ये असतं. या तुरीया अवस्थेला म्हणजेच संमोहन अवस्थेला अनुभवल्यानंतर अनेक व्यक्तींची त्यांच्या स्वतःच्या गुरुतत्त्वाशी कायमस्वरूपी कनेक्टिव्हिटी निर्माण झाली, असे अनेक अनुभव या अनेक वर्षांच्या वाटचालीमध्ये मी घेतले आहेत. थोडक्यात सांगायचं तर संमोहन सत्रांनंतर या व्यक्तींचं त्यांच्या गुरुतत्त्वाशी उत्तम कनेक्शन प्रस्थापित झालेले मी पाहिलेले आहे. गुरुतत्त्व या शब्दाचा अर्थ केवळ देहधारी गुरू असा घेऊ नये. ©

आपल्यात असलेले अनेक दोष, त्रुटी, कमतरता, अभाव, तक्रारी व सर्व प्रकारची नकारात्मकता या गोष्टी म्हणजे फक्त पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर होणारा उथळ खळखळाटच आहे. तुरीया अवस्थेत पोहोचलेला माणूस, म्हणजे हा उथळ खळखळाट थांबून शांत झालेला जलप्रवाह किंवा जलसंचय असतो. या चित्तरुपी पाण्याचा संपूर्ण खळखळाट, तरंग लहरी थांबून गेल्यामुळे, आता या जलाशयाचा आतला तळ अतिशय सुस्पष्ट दिसायला लागतो. ©

त्याप्रमाणेच या तुरिया अवस्थेत पोहोचलेल्या माणसाची स्थिती असते. अत्यंत स्थिर, ज्ञानी, समाधानी अवस्था! No variations at all !! अत्यंत प्रगल्भ साक्षी भाव असलेली अवस्था म्हणजेच ही तुरिया अवस्था. ©

आपल्या अनेक ग्रंथांमध्ये उपनिषदांमध्ये तुरिया अवस्थेचा उल्लेख, वर्णन व विश्लेषण केलेले आहे. या लेखामध्ये मुद्दाम अतिशय सोपी व सहज समजेल अशी भाषा वापरून तुरिया अवस्थेची तुम्हा सर्वांना सहज निदान कल्पना यावी, म्हणून मी असे लेखन केले आहे. अवजड संदर्भ घेतले आहेत.

थोडक्यात काय, तर तुरिया अवस्था हीच संमोहन अवस्था आहे किंवा संमोहित अवस्था हीच तुरिया अवस्था आहे. हीच अखंड ज्ञानामध्ये खोल नेणारी आणि पराकोटीची प्रगल्भ अवस्था आहे. ही तुरिया अथवा संमोहन अवस्था म्हणजेच तुमच्या अनेक सांसारिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक, व्यावहारिक आणि आत्मिक प्रश्नांचं परिपूर्ण उत्तर असलेली अवस्था आहे. या तुरिया अवस्थेपर्यंत पोहोचण्याची माध्यमे वेगवेगळी असतील. परंतु संमोहन हे परिणामकारक माध्यम आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी, सदगतीसाठी आत्म्याने अनेक जन्म जंग जंग पछाडलेलं असतं; या आत्म्यासाठी ही संमोहित अवस्था म्हणजे आनंदाची पर्वणी ठरते. अनेक उच्च कोटीचे महात्मे, उच्च साधक, ही संमोहन विद्या जाणतात. त्याचा योग्य वापर आत्मिक प्रगल्भतेच्या जोरावर करत असतात. हा संपूर्ण लेख स्वानुभवावर आधारित आहे.

“पंथ बिन चलिबा अगनि बिन जलिबा, अनिला तृषा जहटिया। ससंवेद श्री गोरख कथिया, बूझि ल्यो पंडित पढिया॥”
मार्ग के बिना चलना, आग के बिना जलना, वायु से प्यास बुझाना (जहटिया) और स्वसंवेद (अपने अनुभव का ज्ञान), गोरख कहते हैं कि हे शास्त्र पढ़ने वाले पंडित! इसे समझ (बूझि ल्यौ)। (सबदी) ©

महायोगी गोरख कहते है की, मार्ग के बिना चलना, अग्नि के बिना जलना, वायु से प्यास बुझाना, यह केवल अनुभव से जानने योग्य है। यह अपना अनुभव महायोगी गुरु गोरखनाथ ने कहा है …. हे पंडितो इसको समझो (यहाँ जति गोरख कह रहे है कि यह उन तथाकथित पडिंतो को समझना चाहिए जो केवल पढ़ी पढ़ाई या रटि रटाई का बखान करते रहते है जबकी अनुभव मे वह ज्ञान है ही नही । अनुभव ही सार है)

अर्थात अनुभव घ्या. तुम्हाला फक्त शास्त्र जाणणारे पंडित बनायचं नाहीय. तर अनुभवाने समृद्ध झालेला जिवात्मा व्हायचंय. एखाद्या भव्य मॉलमध्ये गेल्यावर गेम्सच्या सेक्शनमध्ये पोहोचल्यावर, अदभुत गेम्सना पाहून, तुम्हाला मोह होतो ना की, आता आपण हे खेळुया. याचा अनुभव घेऊयाच!! मग असे एकमेवाद्वितीय अनुभव घ्यायचेत, तर या जन्मी नाही तर कधी घ्यावे जरा विचार करा.

” पंथ चले चलि पवनां तूटै, तन छीजै तत जाई।१।
काया तैं कछू अगम बतावै, ताकी मूंडूं भाई।२। “

महायोगी गोरख कहते है की, साधक को एकान्त मे स्थिर भावयुक्त होकर परमात्म तत्व का अधिष्ठान करना चाहिए, ज्ञान प्राप्ति के लिये व्यर्थ भटकाव से प्राण शक्ति नष्ट होती है, काया क्षीण हो जाती है, जिससे परमात्म तत्व की प्राप्ति नही हो पाती है। गोरखनाथ जी का कथन है की इस काया से अगम्य तत्व भी कोई नही है (क्योंकी ब्रह्म का निवास तो हमारे शरीर मे ही है, इसी माध्यम से पूर्ण प्राप्ति सम्भव है)। अगर कोई शरीर के बाहर परम तत्व की स्थिति प्रमाणित करता है तो हम उसका ज्ञान सिरोधार्य करने को तत्पर है (यानी काया की अवेहलना करके, अन्यत्र कही तत्व का ज्ञान प्राप्त करना आदि सब मिथ्या बाते है, जिसने भी परम को पाया उसने इसी घट मे पाया है)। गुणी वाचकहो, तुरिया अवस्थेवरील हे तिनही लेख कसे वाटले, ते मला जरुर कळवावे. ©

इथे ही तीन लेखांची लेखमाला संपली. भाग 1, भाग 2 व 3 सर्व लेख वाचावेत. या WORDPRESS वरील सर्व लेखांची मी लेखिका आहे. हे लेख मी स्वत: लिहिलेले आहेत. सर्व लेख copyrighted आहेत, स्क्रीनशॉट किंवा copy paste करु नये. copyright कायदा व कर्म सिद्धांत याचे उल्लंघन करु नये. या लेखाची “लिंक शेअर करु शकता.” ©

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहिला व दुसरा भाग वाचवा –

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग पहिला

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist, Spiritual & Mind blogger.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

2 Trackbacks / Pingbacks

  1. संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा – ज्ञान power
  2. संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान The Fourth Dimension – भाग पहिला – ज्ञान power

Leave a Reply

Your email address will not be published.


*