“शांभवी मुद्रा” कॉन्शसनेस मजबूत करणारी व तेजस्वी बनवणारी अभ्यासकांची मुद्रा (शंभुकी शांभवी) Shambhavi Mudra: Powerful Consciousness Strengthening Mudra

शांभवी मुद्रा कॉन्शसनेस मजबूत व तेजस्वी बनवणारी अभ्यासकांची मुद्रा Shambhavi Mudra: Powerful Consciousness Strengthening Mudra

आज जरा वेगळ्या पण महत्त्वपूर्ण विषयावर मी माहिती देत आहे. हा विषय आहे – शांभवी मुद्रा. ही मुद्रा माझ्या अनेक आवडत्या मुद्रांपैकी एक मुद्रा आहे. आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी करण्याची ही मुद्रा आहे. शांभवी मुद्रेचे अनेक सकारात्मक लाभ आपल्याला होतात. लहानांपासून अगदी वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच शांभवी मुद्रेचा लाभ होतो.

तसं पाहता ‘शांभवी’ शब्दाचा अर्थ – शंभुला जी प्रिय ती शांभवी. शंभूची शांभवी म्हणजे कोण, तर प्रकृती – निसर्ग – जगदंबा, आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे तीच ही आणि मुद्रा या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट एका ठिकाणी लॉक करणे अथवा थांबवणे. म्हणजेच शांभवी मुद्राचा अर्थ असा की, आपली वेगवेगळ्या कृतींमधून, विचारांमधून, मार्गांतून फुकट जाणारी नैसर्गिक प्राणशक्ती, नजरेच्या एका विशिष्ट locking क्रियेने फुकट जाऊ न देणे व आपल्यामध्ये थांबवणे हीच शांभवी मुद्रा.

अर्थात आपण या शब्दशः अर्थाचा विचार करण्याऐवजी ही मुद्रा कशी केली जाते, तिचे काय उपयोग आहेत ते जाणून घेऊया. ही मुद्रा कशी केली जाते ते आपण पाहूया :

प्रथम एका स्वच्छ जागी सुखासनामध्ये (आसन अंगाखाली घेउन) बसावं. त्यानंतर पाठीचा कणा व्यवस्थित सरळ ठेवावा; म्हणजेच तुमच्या शरीराचा शेप इंग्रजी कॅपिटल ‘एल लेटर L’ सारखा होईल. म्हणजेच साईडने 90° मध्ये शरीर बैठक दिसेल, असं बसावं.

त्यानंतर दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करून, आपल्या दोन्ही गुडघ्यांवर मांडी घालून बसलेल्या अवस्थेमध्ये ज्ञानमुद्रेतील हात टेकवावेत. त्यानंतर आधी डोळे अलगद बंद करावे. आता हे डोळे अलगद उघडत न्यावे. डोळे उघडत असताना नाकाची जी मध्यरेष आहे, तिथे प्रथम दोन्ही डोळ्याची बुब्बुळं न्यावीत आणि हळू हळू जसजशा डोळ्यांच्या पापण्या उघडत आहेत, तसतशी ही बुब्बुळं सुद्धा वरच्या दिशेला न्यावेत. असं करत असताना तुमची नजर दोन डोळ्यांच्या मध्यभागी केंद्रित होत आहे, असं पाहावं.

shambhavi mudra eyes mudra

नीट लक्षात घ्यायचेय, भुवयांच्या मध्यभागी तुम्ही दोन्ही डोळे जवळ आणून पाहायला सुरुवात केलीत, त्यावेळेला आधी सहज हलकेपणाने पाहत आहात आणि नंतर मात्र जसं एखाद्या समोर असलेल्या वस्तूला किंवा बिंदूला तुम्ही रोखून पाहता, त्याचप्रमाणे दोन भुवयांमधील मध्यबिंदूला रोखून पाहायला सुरुवात करायची. म्हणजेच तुमच्या या बघण्याची तीव्रता व प्रखरपणा हळूहळू वाढवावा.

मनामध्ये अशी कल्पना करायचीय की, दोन भुवयांची जी मध्य रेष आहे, म्हणजे कपाळाच्या मध्यभागी जी मध्य रेष आहे, त्या मध्यरेषेमध्ये जो भ्रूमध्य बिंदू आहे, त्याला तुमची प्रखर नजर भेदत आहे. एखाद्य़ा बाणाप्रमाणे पार खोल आत जात आहे. 

सुरुवातीच्या काळामध्ये ही एवढीच प्रॅक्टिस पाच ते सात मिनिटं करावी. हीच वेळ हळूहळू पाचावरून दहा मिनिटांवर आणली तरी चालेल किंवा सातच मिनिटं ठेवली तरी चालेल. दोन्ही बुब्बुळं भूमध्याकडे केंद्रित केलेली असल्यामुळे तुम्हाला भौतिक जगातील बाकीच्या कोणत्याही गोष्टी दिसणार नाहीत. परंतु तरीही मनातून साधला गेलेला दोन भुवयांमधील भूमध्य बिंदू पहात राहणं सोडायचं नाहीय.

बस, फक्त एवढीच क्रिया काही काळ, काही दिवस करत राहायची आहे. कोणतंही वाक्य मनाशी बोलण्याची गरज नाहीय किंवा कोणत्याही affirmations मनामध्ये घोळवण्याची गरज नाहीय. लक्ष फक्त भ्रूमध्याकडे केंद्रित करणे आणि तो मध्यबिंदू आपण सतत साधत आहोत, भेदत आहोत असा विचार मनामध्ये घोळवणे, हे करत राहावे.

यौगिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या शांभवी मुद्रेचा हा खूप सर्वसामान्य सराव, मी तुम्हाला सोपा करुन सांगितलेला आहे. ज्ञानमुद्रा फोटोमध्ये दाखवलेली आहे. तसेच शांभवी मुद्रा कशी करायची, याचाही फोटो दाखवलेला आहे. ©

आता आपण शांभवी मुद्रेचे फायदे कोणकोणते आहेत ते पाहूयात. आधी मी तुम्हाला शांभवी मुद्रेचे तुमच्या वर्तमान आयुष्यामध्ये काय फायदे होतात ते सांगते.

शांभवी मुद्रेचे भौतिक लाभ किंवा फायदे :

1) शांभवी मुद्रा केल्यामुळे हृदय मेंदू व मन यांना शांतता लाभते. नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की, माझं हृदय एक सांगते आणि माझं मन एक सांगते किंवा कधी कधी असं म्हणतो की, माझी बुद्धी साथ देते किंवा साथ देत नाहीय. हे जे गोंधळ आहेत, हे गोंधळ बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला शांभवी मुद्रेचा उपयोग होतो. अमेझिंग आहे ना! ©

2) शांभवी मुद्रेमुळे आपल्या मेंदूचा ताळमेळ व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमताही परफेक्ट व्हायला सुरुवात होते.

3) शांभवी मुद्रेमुळे व्यक्तीची मानसिक क्षमता वाढते. व्यक्तीची मेमरी म्हणजेच स्मरणशक्ती चांगली होते.

4) शांभवी मुद्रा केल्यामुळे सुखाची झोप लागते. व्यक्तीचा तणाव दूर करायला शांभवी मुद्रेचा उपयोग होतो. शांभवी मुद्रेमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.

आता आपण पाहू की, शांभवीमुद्रेने कोणकोणते आध्यात्मिक लाभ होतात. आध्यात्मिक लाभ किंवा आध्यात्मिक प्रगती याचा अर्थ व्यक्तीची मानसिक शारीरिक, सामाजिक व आत्मिक प्रगती मुळापासून साधली जाणे:

1) शांभवी मुद्रा केल्यामुळे भूमध्याची जागा म्हणजेच आज्ञाचक्र जागृत व्हायला मदत होते. आज्ञाचक्र जागृत होणं, म्हणजे सूचनाग्राहकता (सजेस्टिबिलिटी) वाढणं.

2) वेगवेगळ्या गोष्टींमधून, घटनांमधून, अभ्यासांमधून जे सिग्नल्स म्हणजे संदेश आपल्याला येतात, हे संदेश आत मध्ये ग्रहण करण्याची ताकद आज्ञा चक्रामध्ये असते. हे आज्ञाचक्र शांभवी मुद्रेमुळे जागृत होतं.

3) आपण भूतकाळाने व्यथित होतो आणि भविष्यकाळाच्या चिंतेत असतो. या ज्या आपल्या अगतिकता आहेत, वेदना आहेत, काळजी आहेत या सर्व गोष्टी शांभवी मुद्रा केल्यामुळे जनरलाइज होतात. म्हणजेच शांभवी मुद्रा अंतकरणाला आणि अंतरात्म्याला शांत आणि संयमी बनवते. ©

जसजसा या मुद्रेचा अभ्यास तुम्ही करत जाल, तसतशी ही मुद्रा तुम्हाला प्रिय होत जाईल. गंमत म्हणजे शांभवी मुद्रेमध्ये बुबुळं वरच्या दिशेला झालेली असताना आपण उघड्या डोळ्यांनी निद्रा सुद्धा घेऊ शकतो. खूपच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे ना! पण खरोखर शांभवी मुद्रेमध्ये असे घडते. ©

तुम्ही शांभवी मुद्रा करत असताना काही दिवसांच्या सरावाने पापण्या पूर्ण उघड्या राहिल्या आहेत आणि पापण्यांमध्ये बुब्बुळं दिसत नसून ती वरती टेकलेली आहेत, अशा अवस्थेत तुम्ही, समोरच्या माणसाच्या नजरेस पडालच. हे काय विचित्र डोळे केलेत, असं समोरुन पाहणार्‍याला वाटू नये म्हणून शांभवी मुद्रेचा अभ्यास करीत असताना, तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींना याची कल्पना द्यावी. ©

शांभवी मुद्रेचा सराव करत असताना महत्त्वाची सूचना ही आहे की, डोळ्यांना खूप ताण येईल, अशा पद्धतीने जास्त वेळ शांभवी मुद्रा करू नये. तसेच खूप त्रास होईपर्यंत प्रखरतेने भ्रूमध्याला पाहण्याचा अट्टाहास करू नये. अतिशय सर्वसाधारण संयमित पद्धतीने हळूहळू बुब्बुळं वर नेत रोज पाच ते सात मिनिटं शांभवी मुद्रेचा सराव करावा. नियमित डोळ्यांना रिलॅक्स करणारे डोळ्यांचे सौम्य व्यायाम करावेत.  ©

शांभवी मुद्रा करत असताना श्वासाचा काही विशेष प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. सर्वसाधारण श्वास चालू ठेवावा. एक विशेष गोष्ट सांगते. ही शांभवी मुद्रा तुम्हाला खूप गहन अवस्थेमध्ये घेऊन जाऊ शकते. तुमच्या ज्ञानेंद्रियांचा चांगला विकास करण्याची ताकद या शांभवी मुद्रेमध्ये आहे. शांभवी मुद्रा करून झाल्यावर डोळ्यावर साध्या पाण्याच्या मऊ कापडी पट्ट्या ठेवून काही काळ झोपून राहावे. डोंट वरी! अर्थातच हे असे सुरुवातीला करावे लागते. कारण हा एक प्रकारचा डोळ्यांना दिला जाणारा व्यायामच आहे. ©

या शांभवी मुद्रेमुळे जे आज्ञाचक्र प्रभावित होते किंवा जागृत होते असे आपण जाणले आहे, त्याचा अर्थ समजून घेऊया. आज्ञाचक्र काय कार्य करत असतं, ते पाहू.

आपल्या शरीराची निम्नस्तरीय चेतना आणि ब्रम्हांडाची उच्चस्तरीय चेतना यांना जोडण्याचं कार्य आज्ञाचक्र करीत असते. अर्थातच ऍक्टिव्हेट झाल्यानंतर! या शब्दांचा अर्थ प्रॅक्टिकली काय आहे, हे तुम्ही शांभवीमुद्रेच्या काही दिवसांच्या सरावानंतर अनुभवू शकाल. एकंदर शांभवीमुद्रेच्या सरावामुळे ‘विश्वस्तरीय चैतन्याशी कनेक्टिव्हिटी’ काही प्रमाणात का होईना, निर्माण झाल्यामुळे आपली सकारात्मकता वाढीस लागते. Personal consciousness connecting to the Multidimensional Supreme Consciousness. ©

मेंदूची सिग्नल यंत्रणा व मेंदूचे वेगवेगळे कंट्रोल्स यावर शांभवी मुद्रेचा खूप सकारात्मक प्रभाव पडतो. विद्यार्थ्यांना, आयटी तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार्‍यांना, अभ्यासकांना, विविध साधना करणाऱ्या साधकांना संशोधकांना अतिशय लाभदायी ठरणारी ही शांभवी मुद्रा आहे. आपल्या नेहमीच्या आयुष्यातील कामे असो किंवा आपल्या भौतिक आयुष्यातील, करिअरमधील आव्हाने असो, सर्वच ठिकाणी शांभवीमुद्रेचा सराव उपयोगाला येतो. ©

मी या लेखामध्ये मुद्दामच शांभवी मुद्रेला सोपे, सुकर करून सांगितले आहे. योगाभ्यास व साधना तसेच आध्यात्मिकता यांच्या अनुषंगाने शांभवी मुद्रा ही अतिशय महत्त्वपूर्ण मुद्रा आहेच. परंतु व्यावहारिक जगतामध्ये समाजात वावरत असताना, परिवारामध्ये गृहस्थ आयुष्य जगत असताना या शांभवी मुद्रेचा आपण किती उत्तम उपयोग करू शकतो, हे साधे सोपे करून तुमच्यापर्यंत पोहोचवावे, असे मला वाटले. त्यामुळे तुम्हाला उपयोगी पडतील असेच सर्वसाधारण मुद्देच या लेखामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत. ©

तुम्हा सर्वांना शांभवी मुद्रा करताना जेवढे मुद्दे आवश्यक आहेत ते सर्व मुद्दे या लेखांमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे वेगळा सर्च करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि असा सर्च करत न बसता सरळ सरळ मनाशी संकल्प करून आजच शांभवीमुद्रेच्या अभ्यासाला किंवा सरावाला तुम्ही सर्वांनी सुरुवात करा आणि अतिशय महत्त्वाचा सल्ला म्हणजे या शांभवीमुद्रेच्या सरावांमध्ये सातत्य ठेवा. तसेच काही दिवस हा सराव केल्यानंतरचे तुमचे अनुभव मला आठवणीने कळवा.


या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. हे लेख copyrighted आहेत. copyright कायद्याचे, आणि कर्म सिद्धांताचे, कोणीही स्क्रीनशॉट किंवा copypaste, तत्सम माध्यमातून उल्लंघन करु नये. हा लेख शेअर करताना, या लेखाची लिंक (नावासहित आहे) शेअर करावी. धन्यवाद. ©

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Yog Meditation teacher, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*