आयुष्याचं संगीत बिघडवणारे मनाचे ज्वालामुखी ‘राग’ Raging Violence that Disrupts The Harmony of Life!

तुम्ही स्वप्नरंजन करता का? गोंधळून जाउ नका. मनातच उत्तर शोधा !! नक्कीच हो, उत्तर असेल. फक्त सुख स्वप्नांचंच स्वप्नरंजन नाही, तर सर्व गोष्टींचं.

मी त्या स्वप्नरंजनाचं बोलतेय, जे प्रत्येक गोष्टीचा रिस्पॉन्स म्हणून मनात चाललेलं असतं, visualise करुन, म्हणजे मनातल्या मनात फायटिंग वगैरे? असं सर्व चालतं ना मनात?! आपण त्याबद्दलच चर्चा करत आहोत. आजवर तुमच्या कल्पनेत तुम्ही, मनातल्या मनात काल्पनिक वाघनखांनी अनेकांचे कोथळे काढले असतील. कल्पनेत शिरच्छेद केला असेल!

मनातून शांत आपल्याला होता येतं का? याचं उत्तर मॅक्झिमम वेळा ‘नाही’ असंच सापडतं. एखाद्या माणसाबरोबर माझं सतत वाजतं, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा वस्तुतः विचार केला तर या प्रत्येक दोन ‘वाजण्याच्या’ (भांडणाच्या) प्रसंगांमध्ये एक टाईम स्पॅन तर होता ना? म्हणजे नक्कीच शांत व्हायला संधी होती. मग पुन्हापुन्हा कसं बरं त्या व्यक्तीसोबत भांडण होतं?

कारण तुम्ही actual भांडण संपल्यानंतरही भांडत राहिलात. कुठे बरं? ‘मनातल्या मनात’. मनातंच कधी कोणावर रागावता, कोणाचा मत्सर, कोणाचा द्वेष तर कधीकधी एखाद्यावर प्रेम सुद्धा मनातल्या मनात करता. हे पचवायला कठीण असणारं वास्तव आहे. आता तुम्हाला समजलं असेलच, मी कोणत्या स्वप्नरंजनाबद्दल बोलतेय!

घराच्या बाल्कनीत अथवा भोवतालच्या बागेत झाडं जोपासावीत, अगदी तस्संच द्वेष, द्वंद्व, मत्सर, प्रेम, राग ही झाडं आतमध्ये वाढत असतात. काल्पनिक मारामारी, वे लिहिल्याप्रमाणे कल्पनेमध्येच एखाद्याचा कोथळा बाहेर काढणे, खरोखरीचे भांडण चालु असताना हाताने चपराक देता आली नाही म्हणून कल्पनेत दोन लगावून देणे, मत्सर (जेलसी) वाटल्यामुळे त्या व्यक्तीला मनातल्या मनात तिच्या कमजोरींबद्दल फाडफाड (मनातल्या मनात!) बोलणं, प्रेम प्रत्यक्ष व्यक्त करता आले नाही, म्हणून मनात त्याची पूर्तता करणारा प्रसंग चित्रित करणं, इत्यादी आपण करतच असतो.

या गोष्टी प्रत्यक्षात कधी घडतात; कधी घडतही नाहीत. पण त्या दरम्यान मनात दिवसरात्र फोफावणार्‍या या ‘झाडांचं’ काय? अपल्या द्वेषासंबंधित व्यक्ती अथवा संदर्भ समोर आले की, तुमच्या भावना उसळून येतात आणि तुम्ही प्रतिक्रिया देता.

तुम्ही जर मनातून शांत होउ शकत नसाल, तर आजुबाजुचं सर्व विश्वच तुम्हाला अशांत भासणार आहे, हे लक्षात असू द्यावे. आणि आतून शांत असाल, तर सर्वकाही ठीक वाटणार आहे. रागाने बेभान झालेला माणूस काय करतो? तर वाट्टेल तसं बोलून आजुबाजूचं वातावरण बिघडवतो. हे असं वागणं योग्य आहे का? रागाने बेभान झालात, म्हणून एक घाव दोन तुकडे, असा तो व्यक्त करणे योग्य आहे का?

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही म्हणाल की, मग काय गपचूप कोपर्‍यात पडून राहायचं का राग आल्यावर? not needed. काहीच आवश्यकता नाहीय. अजून काही प्रसंग सांगते. कधी कोणी चुकून धक्का मारतो. कधी मुद्दामहून  मारतो. कधीकधी कोणी आपला शत्रु मुद्दामहून आपला अपमान होइल असं वागतो. मग तुम्ही म्हणता की, ‘अमुकअमुक माझ्या न, डोक्यात गेला. मला काही स्वाभिमान आहे की नाही?’ म्हणून तुम्ही जळजळीत रिस्पॉन्स देता. तर कधीकधी राग दाटून आला, तरी मनातच त्या माणसाला अद्वातद्वा बोलून स्वत:च्या मनात मुव्ही सीनप्रमाणे मारामारी पण करता. आपण काही करु शकत नाही, असं मनातल्या मनात म्हणून तुम्ही चरफडता.

तर या सर्वांचं उत्तर असं आहे की, रागाचा वापर करु नये असं नाही; तर संयमित वापर करणं गरजेचं आहे. माईंड मॅनेजमेंट करायची, तर राग नियंत्रणाबाहेर जाणं, सार्वजनिक ठिकाणी त्याचं प्रदर्शन करणं, अनेकदा तर या सर्व प्रेमद्वेषाच्या सर्वच भावनांचं सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणं, आपला बॅलन्स घालवणं हे सर्व टाळायला हवं. तुम्ही म्हणाल की, माझा स्वभावच असा बनलाय; ही लोकं पण सतत डोक्यात राग देतात. स्वभाव!??

स्व + भाव. स्वत:च्या भावभावना.

बिनधास्त रागवा. पण वर सांगितलेल्या गोष्टींचं भान ठेउन वागायला काहीच हरकत नाहीय. आक्रमक होणंसुद्धा गरजेचं नाही आणि अगतिक होउन सुद्धा अश्रू ढाळणं योग्य नाहीय. बॅलन्स ठेवावा. तुमच्या हे लक्षात येतंय का की, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल भांडण 5 % असेल, पण 95 % ऊहापोह मनाच्या आत चालला आहे. Do’s & Don’ts चं युद्ध डोक्यात सुरु!!

आपण चालताना भटकी ओरडणारी जनावरं पाहतो. एखादा कुत्रा मला पाहून हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक भुंकत बसलाय, म्हणून तिथे थांबून आपण त्या कुत्र्याला शिव्या घालत बसतो का? तर नाही. राग आल्यावर प्रतिक्रिया जरुर द्या. पण संयम असु द्या.

हा संपूर्ण लेख हा राग आलेल्या माणसांचे सामाजिक वर्तन या मुद्द्यावर नाहीय. तर ती रागीट व्यक्ती जर तुम्ही असाल, तर चिंता करण्याजोगी गोष्ट आहे; कारण तुम्ही स्वत:चंच नुकसान करुन घेत आहात. खरं तर कोणीतरी काही बोलावं, आणि तुम्ही बेचैन, अस्थिर, तणावग्रस्त व्हावं हे चुकीचंच नाही का? तुमचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. तुमच्या आतल्या आणि बाहेरच्या रिअ‍ॅक्शन्स, तुमचाच र्‍हास करत आहेत, हे ध्यानात ठेवा.

तुमचा अनेक ठिकाणी उफाळून येणारा त्सुनामी राग, तुमचं भलं करणं तर सोडाच, पण तुमचं हायलो बीपी, हायलो शुगर, मायग्रेन, अ‍ॅसिडिटी, आमवात, हार्मोनल इम्बॅलन्स, ह्रदय विकार, मानसिक विकार –  हे सर्व भेटस्वरुप देत असतो. आणि मग माहित आहे का, ती सर्व ‘डोक्यात जाणारी’ माणसं व तशाच सिच्युएशन्स एका बाजुला राहतात आणि तुम्ही मात्र तुमच्या बिघडलेल्या शरीर-मनाला न्याहाळत हतबल होऊन दुसर्‍या कोपर्‍यात खिन्नपणे बसता. कधीकधी शरीरमनाची सिच्युएशन रिपेअरेबल असते; तर कधीकधी क्रिटिकल.

बघा रस्त्यावरचे कुत्रे सुद्धा थकल्यावर शांत झोपी जातात. आपल्या शत्रुंचंही तसंच आहे. तेही असेच शांत झोपी जातात. तुमच्या आत मात्र वणवा पेटत राहतो. आणि सरतेशेवटी तुम्ही स्वत:च बळी पण पडता. रागीट माणूस सुखी असतो का? त्याने आंतरिक शांतता अनुभवलेली असते का? तर नाही. प्रतिशोधाची भावना, जळफळाट, तिरस्कारयुक्त भावना ही विकारग्रस्त मनाची लक्षणं आहेत.

रागाच्या आणि आततायीपणाच्या आगीत होरपळून जाण्यापासून स्वत:ला वेळीच वाचवा. स्वत:ची काळजी घ्या. कोणी काही बोललं किंवा तुमच्या दृष्टीने तुमच्यासोबत चुकीचं वागलं, तर तुमच्या शरीरातील एखादा तुकडा गळून पडला का? मनात चरफडत बशल, तर मात्र नक्कीच पॅनक्रिआ, मेंदू, ह्रदय, यकृत……. इथे मनोराज्यातल्या लढाया खेळूनखेळून तुम्ही हॉस्पिटलात जाल आणि ज्याच्या नावाने शंख करत बसलाय, तो मात्र स्वत:च्या घरी सुखाची भाकरी तोडत असेल. लॉस कोणाचा झाला?

ज्या भावांवर (तत्सम विचारांवर) तुम्ही जोर द्याल, तेच भाव तुमच्यात दृढ बनत जातील. खोल घर करतील. वासना, लिप्सा, जेलसी मनात घोळवाल तर ते सर्व प्रबळ होतील आणि त्याऐवजी एखादा चांगला विचार मनात घोळवत बसाल, तर तो सुद्धा प्रबळ बनेल आणि समाधान देईल.

Read related: 25 Positive Affirmations to Start your Day with!

जगरहाटी तुमच्या हातात नाहीय, पण मनात चालणारं हे नकारात्मक द्वंद्व वेळीच थांबवणं, तुमच्या फायद्याचं आहे. माझ्याकडे अशा चिवट झालेल्या स्वभावदोषाच्या अनेक समस्याग्रस्त व्यक्ती येतात. सुदैवाने ‘हिप्नोथेरपी’च्या साहाय्याने या दोषांवर मातही करता येते. अंतर्मनातून (सबकॉन्शस मधून) नकारात्मकता बर्‍यापैकी घालवता येते. लहान हट्टी मुलाचे लाड पुरवतात, तसे हट्टी बनलेल्या या नकारात्मक आयडेंटीटीला वेळीच तडीपार करा व आपले लाखमोलाचे आयुष्य शांततेत घालवा. तुमच्या परिवारजनांनाही शांतता अनुभवु द्या. तुम्हाला जगण्यासाठी निसर्गतः प्राप्त होणारी ‘प्राणशक्ती’ तुमच्या वर्तमानासाठी मिळत आहे; तुमच्या आत चालणार्‍या नकारात्मक वेब सिरिज साठी नाही!! 

हिप्नोथेरपी सेशन्स साठी संपर्क करावा.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 हिप्नोथेरपिस्ट, माईंड कौन्सेलर व निसर्गोपचार तज्ञ

Be the first to comment

Leave a Reply