धुपासाठी संपर्क क्रमांक: 1) 9004976087 2) 7400473893 3) 9820373281 किंवा या Contact Us पेज वर तुम्ही संपर्क साधू शकता.
शिवावधूत बाधानिवारक धूप हा कसा वापरावा:
🍀 हा धूप पाहिल्यानंतर असं नक्कीच वाटू शकतं की, धूप खूप बारीक आहे. म्हणजे स्लिम आहे. तर हा धूप असा आकारमानाने बारीक असण्याचे कारण असे आहे की, जे बाजारात धूप मिळतात त्यामध्ये मुख्य द्रव्यांसोबत जास्तीत जास्त प्रमाणात धुपाचा आकार वाढवणारी द्रव्यं जास्त प्रमाणात घातलेली असतात. जसे की गायीच्या गोवऱ्यांचा चुरा इत्यादी. तर हा धूप बनवत असताना हे सर्व जास्तीचे बाइंडिंग मटेरियल धुपात मिक्स करणे मी टाळले आहे, म्हणून धूप स्लिम आहे.
🍀 या धुपामध्ये आयुर्वेदातील ग्रंथात सांगितलेली बाधा निवारक द्रव्यं एकत्र करून त्यांचा विशिष्ट योग बनवला आहे. म्हणजेच या वनस्पती द्रव्यांचे नेमके सार म्हणजे एक्सट्रॅक्ट या धूपामध्ये वापरले आहे. इतर फापटपसारा वाढवलेला नाही.
🍀 एका पाकिटामध्ये पंधरा काड्या दिसतील. या 15 काड्यांचे दोन तुकडे केल्यास प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे 30 दिवस हे तुकडे कोणत्याही घरासाठी सहज पुरतात. ज्या घरामध्ये नकारात्मकतेचे त्रास असतील, तिथे धूप लावण्याचे प्रमाण वाढवावे.
🍀 तसेच धुपाच्या वजनाबद्दल अनेकांनी विचारणा केली आहे. धूप बनवत असताना, धुपाच्या टायमिंगवर व या धूपाचा इफेक्ट किती काळ राहू शकतो यावर काम केले आहे. त्यामुळे मी वर सांगितल्यानुसार अर्धी काडी एका दिवसाला परिणाम द्यायला पुरेशी आहे.
🍀 ज्यांनी धूप घेतला आहे, त्यांनी धुपाच्या पाकिटावरील चित्र नीट पाहावे. त्यानुसार मातीवर किंवा राखेवर हा धूप जळत ठेवावा.
🍀 हा धूप नेहमीसारखा एका स्टॅन्ड मध्ये उभा राहणारा धूप नाहीय. एका छोट्याशा मेटलच्या ताटलीमध्ये थोडीशी कुंडीतील झाडांमधील माती पसरावी व त्यावर हा धूप जळत ठेवावा.
🍀 तसेच मातीऐवजी जर घरामध्ये अगरबत्ती किंवा धुपाची राख उरली असेल, तर ती राख या छोट्या प्लेटमध्ये पसरवून ठेवली व त्यावर धूप पेटवून ठेवला तरी चालेल.
🍀 घराच्या कोनाड्यांमध्ये निगेटिव्हिटी थांबून राहिलेली असते. त्यामुळे घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये हा धूप फिरवणं उपयोगी होईल.
बाधानिवारक धुपाची अन्य माहिती
💠 हा धूप पहिल्या दिवशी, पहिल्या घेणार्या व्यक्तीपासून सर्वांना पसंद पडला आहे. हे धूप म्हणजे माझ्याकडील सैन्यच आहे असं मी म्हणेन.
💠 आयुर्वेदातील ग्रंथात बाधानिवारणासाठी काम करतात त्या वनस्पतींवर भाष्य केलेले आहे. अनेक वनस्पतींचे उपयोग तंत्रशास्त्रात अतिप्राचीन काळापासून करत आहेत.
💠 जसा प्रत्येक वनस्पतीचा विशिष्ट उपयोग असतो, तसेच काही वनस्पतींच्या कॉम्बिनेशन्सचे अद्वितीय उपयोग असतात. याला वनस्पतींचा 'योग' म्हणतात. अशाच ग्रंथोक्त बाधानिवारक वनस्पतींच्या अद्वितीय योगामधून हा धूप बनवला आहे.
💠 हा धूप दिसायला स्लीम आहे. पण त्याचं कारण त्याचा आकार मोठा वाटावा म्हणून त्यात झेरॉक्स मालमसाला न टाकता सर्व फक्त सार घेतले आहे. यात केमिकल नसते.
💠 अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, या धुपात यज्ञात आहुती पडणार्या सर्व द्रव्याचं मिश्रण घातलेले असते. म्हणजे तुम्हाला दररोज "यज्ञकार्य" केल्याचं समाधान पण मिळतं.
💠 आता काहीजण विचारतात की, किति वजन याचं? तर त्याचं उत्तर असं आहे की, या धुपाचं जळण्याचं टाईम - याला फोकस केलं आहे, की, तो किती वेळ जळतो आणि त्याचा इफेक्ट किती वेळ राहतो?
💠 त्याचं असं आहे की, ज्या घरात काही नकारात्मकता जास्त नसेल, अशा ठिकाणी या धुपाची अर्धी कांडी तोडून संध्याकाळी जाळली, तर अख्ख्या दिवसाला तेवढा इफेक्ट पुरतो. याच हिशोबाने हे packet वनवले आहे.
💠 मात्र ज्याच्याकडे नकारात्मकतेचा प्रादुर्भाव आहे, तिथे सकाळ-संध्याकाळ मिळून दोन अर्धे तुकडे जाळावेत. हा धूप नकारात्मकता बाधित ठिकाणी, एखाद्याकडे पोहोचतो, तेव्हा नकारात्मकतेबाबत गोष्टी क्लियर समजतात.
💠 याच्या ज्वलनामुळे अडचणी व अडथळे दूर झाल्याची उदाहरणं आहेत. या धुपाचा प्रभाव माईंड, बॉडी, आत्मा, आर्थिक बाजू यांवर जबरदस्त पडतो. घरात कलह चालू असताना धूप लावल्यास भांडण थांबून, मन शांत व स्थिर झाल्याची अनेक उहाहरणं घडली आहेत.
💠 नकारात्मक स्पंदनांना हा धूप घालवतो व मनावर व परिस्थितीवर उत्तम इफेक्ट करतो. मोठमोठया सर्जरी करणारे स्पेशालिस्ट, सतत बिझनेस मिटिंगला जाणारी माणसं, उपचारकर्ता, डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, रोगांच्या तपासणी करणार्या टेस्ट लॅब्स यांना बर्याचदा नकारात्मकतेला सामोरं जावंच लागतं. धुपामुळे या सर्वांना फायदा होतो.
💠 शिक्षण घेणारा विद्यार्थीवर्ग, सतत कामात व्यग्र असलेल्या गृहिणी, हेडेकचे जॉब करणारा कर्मचारी वर्ग, शाळा कॉलेज चे शिक्षक प्राध्यापक, जिमवाला वर्ग, हॉस्पिटल स्थळं व अशा सर्वच ठिकाणी ज्या ज्या अडचणी, नकारात्मकता, आव्हानं येतात, त्यावर उत्तम योग्य इफेक्ट हा धूप देतो.
💠 हा धूप उत्तम सात्विक स्पंदनं निर्माण करणारा असल्याने मंदिरात व धार्मिक स्थळी याचा नियमित वापर होतो. आपण जर दान धर्म करत असाल, तर आपल्या इष्ट मंदिरांना हा धूप घेउन दान करु शकता.
💠 काही जणांची अडकलेली कामं सुद्धा हा धूप सतत वापरल्याने मोकळी झाली आहेत.
💠 तसेच विशिष्ट साधना करणारे साधक (सांसारिक साधक सुद्धा ) यांना ध्यान, साधना यासाठी मनाची जी एकाग्रता लागते ती या धुपाने उत्तम प्राप्त होते.
💠 विशिष्ट साधनेसाठी (देवि, दत्त, शिव, श्रीकृष्ण, गणपती, भैरव, पारायण, अनुष्ठान, व्रते) विशिष्ट योग लागतात, ते सुद्धा एक्स्क्लुझिव्ह धूप मी बनवून देत असते. प्रत्येक देवतेला विशिष्ट गंध प्रिय असतो.
💠 नकारात्मकता दूर करण्याच्या सर्वच 'कामांमध्ये' तर प्रत्येक घरात या धुपाने मेनरोल प्ले केला आहे.
💠 मेनोपॉझ मधील स्त्रिया व साधारण तशाच वयाचे पुरुष व सिनियर सिटिझन्स, यांचं धुपामुळे मन प्रसन्न राहतं.
शिवावधूत वनौषधी धूपाचे उत्तम उपयोग
🌀 घरातील वायुमंडल सर्वार्थांने शुद्ध करतो.
🌀 घरातील प्राणवायुची पातळी वाढवतो.
🌀 पूर्णतः नैसर्गिक हिरव्या वनौषधींपासून, हा धूप बनवलेला आहे. हा पूर्ण विशुद्ध असून, कोणतेही प्रिझर्वेटीव्ह आणि अवांतर बाईंडिंग मटेरियल यात नाहीय.
🌀 या धूपाच्या धुराचा कोणताही त्रास होत नाही. डोळे चुरचुरत नाहीत. श्वासाला कसलाही त्रास होत नाही.
🌀 घरातील बाधा व तत्सम सर्व नकारात्मक स्पंदने दूर करतो, नष्ट करतो. (यात अनेक खास बाधानिवारक वनौषधी वापरल्या आहेत.)
🌀 सध्याच्या वातावरणावर सर्वत्र नकारात्मक, उत्साहविरहीत व उदासवाण्या स्पंदनांचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव नष्ट होतो. चैतन्य येते.
🌀 ज्या घरांमध्ये पेशंट आहेत, ते सर्वजण तर आवर्जून हा धूप घेत आहेत. (त्यांचे मन व सिस्टीम – शांत व प्रसन्न राहण्यासाठी ) कोरोना काळात खूप लोकांनी हा धूप यासाठी घेतला.
🌀 या धूपात सामावलेल्या काही विशिष्ट द्रव्यांमुळे मानसिक ताण, एंझायटी, अस्थिरता दूर होते.
🌀 देवघर, अभ्यासाची जागा, कोणतीही अन्य खोली इथे लावल्यास– त्या त्या कामांमधील फोकस भरपूर वाढतो. (अभ्यासात पूर्ण लक्ष राहते.)
🌀 ज्यांना वेगवेगळे फियर, फोबिया, रागावर व शोकावर कंट्रोल नसणे, ताणतणाव, एंझायटी प्रॉब्लेम आहेत, त्यांचे मन शांत करणारा इफेक्ट हा धूप देतो.
🌀 ज्यांना साधना करायचीय, ध्यानाचा सराव करायचाय, त्यांच्यासाठी हा धूप अतिशय उत्तम आहे. तसेच तुमच्या स्पेसिफिक साधनांसाठी स्पेसिफिक सुगंधाला add करुन पण असा प्रभावशाली धूप मी बनवून देते. (लक्ष्मी, दत्त, नाथपंथी, शिव, भैरव, श्रीविद्या, बगलामुखी, हनुमंत, विविध पारायणे, अनुष्ठाने, मंत्रसिद्धी, वेगवेगळे सण, तंत्र साधना, इत्यादी)
🌀 हा धूप पूर्णतः जळल्यावर, याचे जे भस्म (राख) उरते, ते एका डबीत साठवावे. हे भस्म जमीन पुसताना वापरण्याच्या पाण्यात टाकावे. वास्तु शुद्ध, पवित्र, मंगल होते.
🌀 डॉक्टर्स, हिलर्स (एनर्जी उपचारकर्ता), जनसेवक, समुपदेशक (कौन्सिलर्स), विविध प्रकारचे हेल्थ स्पा, व्यायामशाळा, उपहारगृहे, आध्यात्मिक केंद्रे, ज्योतिषि, विविध कन्सल्टंट्स, उपचार केंद्रे, साधना केंद्र, ध्यान केंद्र, मंदिरे, गुरुकुल, प्रशिक्षण केंद्रे, टॅरो भविष्य केंद्र, या सर्वांसाठी हा धूप अतिशय उपयुक्त आहे.
वरील सर्व उपयोगांचे अनेकांनी अनुभव घेतलेले आहेत. उत्तम फीडबॅक सांगितले आहेत.
-डॉ. सुनेत्रा जावकर
Leave a Reply