विचित्र टायटल नि गंभीर विषय?!! काय चाललंय हे मॅडम!! काही नाही हो. ही मुद्रा तुमच्या आपसुक लक्षात राहावी, म्हणून मनमोकळा प्रयत्न फक्त! नाहीतर पुराणातली वांगी तश्शीच पडून राहतात ना तिथेच!!
सर्वप्रथम मी अगदी संक्षिप्तमध्ये सांगते की, मुद्रा म्हणजे काय आहे. माधुरी को कौन जानता नही? तिच्या बाकी अंगबोलीचा इथे विषय नाहीय. पण तिचं हस्तलालित्य पाहिलं आहेत ना तुम्ही? तिची बोटं भावना फेकतात!! तिच्या हस्तमुद्रांनी ती अभिव्यक्त होते. हा विषय नृत्याचा व देहबोलीचा झाला. नृत्यात या सर्वच्या सर्व उपचारक मुद्रा वगैरे नसल्या तरीही, त्या मुद्रा ब्रम्हांडात प्रसृत (present) केल्या जातात, संवाद साधण्यासाठी. अनेक भारतीय नृत्य प्रकार पाहताना – या हस्तमुद्रांमार्फत जिवंत संवाद – तुम्ही व कलाकार यांच्यात साधला जातो. किती अमेझिंग आहे ना?
आता थोडा यातलाच ओळखीचा विषय. तो म्हणजे न्यास. रसिकहो अब यह करन्यास क्या है? न्यास म्हणजे स्थापना करणे. एखादी साधना, मंत्र जप किंवा एखादे अनुष्ठान सुरू करण्याआधी वेगवेगळे न्यास केले जातात. त्यामध्ये करन्यासाला विशेष महत्त्व आहे. या विविध ज्ञासाच्या कृतींमधून हे सर्व पवित्र कार्य सुरू करण्याआधी तुमच्या स्थूल देहामध्ये सूक्ष्म स्वरूपातील मंत्रदेवतेचे अथवा साधना देवतेचे आवाहन करून न्यासाद्वारे या देवतांची तुमच्या आंतरिकतेत स्थापना केली जाते. ‘न्यास’ हा विषय अतिशय महत्त्वाचा व विशाल आहे. त्याबद्दल एका लेखामध्ये मी विस्तृत माहिती देईन. धार्मिक विधींमध्ये विशिष्ट करन्यास केले जातात. हस्तमुद्रांच्या विज्ञानाबद्दल मी एक अन्य लेख लिहिला आहे तो आपण वाचावा.
या लेखामध्ये मी माझ्या विशेष आवडत्या सुरभी मुद्रेबद्दल जितकी शक्य होईल, तितकी विस्तृत माहिती देत आहे. कारण माझ्या दृष्टीने ही सुरभी अथवा कामधेनु मुद्रा विशेष लाभदायी व एकमेवाद्वितीय हस्तमुद्रा आहे. आध्यात्मिक व्यक्ती, साधनारत असलेले योगी आणि त्याचबरोबर सांसारिक व व्यावहारिक जगात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी वरदान असलेली ही सुरभी मुद्रा आहे.
तर हस्तमुद्रा म्हणजे काय? हाताच्या बोटांच्या विशिष्ट रचनेद्वारे मुद्रा करणे म्हणजे शरीरातील मूळ तत्वांचे नियंत्रण करणे, व्यवस्थापन करणे, म्हणजेच मुद्रा विज्ञान किंवा मुद्रा शास्त्र. या मुद्रेचे नाव कामधेनु मुद्रा असं का ठेवलेलं आहे, तर कामधेनू चा अर्थ तुम्ही जाणताच. कामधेनु म्हणजे आपल्या मनात असलेल्या मनोकामना पूर्ण करणारी पवित्र गाय.
असं काय विशेष आहे या मुद्रेमध्ये, जी केल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात? शरीराच्या आणि तत्त्वांच्या अनुषंगाने आपण विचार करूया. शरीरामध्ये तीन दोष असतात. कफ, वात आणि पित्त. हे तीन दोष आपल्या अखंड आयुष्यामध्ये कायम कमी जास्त होताना आपल्याला जाणवत असते. अगदी जाणवत जरी नसेल तरी, या तीन दोषांचं कमी जास्त होणे, याचे कितीतरी परिणाम शरीरावर होताना आपण अनुभवत असतो. अमर्याद ब्रम्हांडाप्रमाणेच आपले शरीर पाच तत्त्वांनी युक्त आहे.
पंचतत्त्वे : आकाश, वायु, तेज, पृथ्वी, जल. आपल्या हातापायाचं प्रत्येक बोट प्रत्येक तत्वाला रिप्रेझेंट करतं. जलतत्व – करंगळी, पृथ्वीतत्व – अनामिका, आकाश तत्व – मध्यमा, वायु तत्व – तर्जनी आणि अग्नी तत्व – अंगठा. हात व पाय या दोन्हीसाठीचे हे जरी सत्य असलं तरी, मुद्रा या फक्त हातांच्या केल्या जातात. (आपण नृत्यमुद्रांबाबत बोलत नाही आहोत)
मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणेच ब्रम्हांडामध्येही सर्व गोष्टी पाच तत्वांशी निगडित आहेत शरीरामध्ये जसं तीनही दोषांचं संतुलन साधणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे या पाच तत्वांचं संतुलन सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण हेच सर्वस्वी संतुलन बिघडले की, शरीरामध्ये विविध व्याधी निर्माण होतात व आपण आजारी पडतो. ©
तर सुरभी मुद्रेचं हे विशेष आहे की, सुरभी मुद्रा केल्यामुळे मुख्य फायदा हा होतो की, शरीरातील पाच तत्वं आणि तीन दोष यांचं व्यवस्थित संतुलन व्हायला सुरुवात होते, तसेच शरीरात काही काळापासून साचलेली सर्व विषद्रव्यं नाहीशी व्हायला सुरुवात होते. नियमित सुरभी मुद्रा केल्यामुळे तुमचे नाभीचक्र व तुमची पचनशक्ती चांगली व्हायला सुरुवात होत। तुमचे चयापचय चांगले होत. सुरभी मुद्रा करत राहिल्यामुळे आपल्या शरीराचा हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित होतो. शरीरातल्या विविध ग्रंथींचे कार्य सुधारत। शरीराच्या मूळ तत्वांची ताकद वाढते. ©
आता आपण पाहू की, सुरभी मुद्रेने मनावर काय परिणाम होतो किंवा मनाला काय फायदा होतो? ही सुरभी मुद्रा केल्याने तुमचं मन शुद्ध होतं. तुमच्या मनात चांगले विचार व सकारात्मकता निर्माण व्हायला सुरुवात होते. सुरभी मुद्रा जर आपल्या सरावांमध्ये असेल तर मानसिक शांतता लाभते. एकाग्रतेत वाढ होते आणि मेंदूची एकंदर क्रिएटिव्हिटी उत्तम व्हायला सुरुवात होते. थोडक्यात असे की, अतिचंचल मनाला स्थैर्य लाभते. (शरीरातले त्रिदोष सुद्धा मनाच्या चंचलतेला काही अंशी कारणीभूत असतात.) सुरभी मुद्रेमुळे चित्त निर्मळ बनते. प्रसन्न होते. ©
आता असा प्रश्न पडू शकतो की, या सर्व शारीरिक आणि मानसिक लाभांमुळे या मुद्रेला कामधेनू मुद्रा हे नाव कसे काय सार्थ ठरू शकते? तर याचे उत्तर असे आहे की, सुरभी मुद्रा सतत करत राहिल्याने आपल्या अस्तित्वासोबत या मुद्रेचे कन्फिगरेशन आपोआप होते. या मुद्रेमुळे मनाची चंचलता दूर होत असल्यामुळे तुमच्या संकल्पनांना लागणारी किंवा हवी असलेली ताकद आपोआप निर्माण व्हायला सुरुवात होते. मनाची चंचलता आणि अनिश्चितता, तसेच मनाची नकारात्मकता बऱ्याचदा तुमच्या संकल्पनांना काडी लावण्याचे काम करत असतात.
माझा स्वतःचा या मुद्रांबाबतचा अभ्यास असं सांगतो की, जेव्हा आपण विशिष्ट हस्तमुद्रा काही विशिष्ट उद्देशाने करतो, त्यावेळेला आपली प्राणशक्ती व ब्रह्मांडात पसरलेली प्राणशक्ती या दोघांमध्ये या विशिष्ट रचनेमधून एक विशिष्ट गुणोत्तर आपोआप बनते आणि त्यातूनच इच्छित परिणाम मिळून आपल्याला बरे वाटते. तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करताना एका वेळेला सलग दहा मिनिटे हातांची ही मुद्रा करून ठेवा. ©
सुरभी मुद्रा चित्त शांत करत असल्यामुळे आणि मनाची चंचलता आटोक्यात आणत असल्यामुळे ही मुद्रा योगीजनांची, साधकांची आवडती मुद्रा आहे. ही मुद्रा शरीरातला साचलेला मळ, तसेच मनातील साचलेला कटूतारुपी मळ काढून टाकत असल्यामुळे योग्यांना व साधकांना स्वतःची जी एकंदर शुद्धीक्रिया करावी लागते, त्यामध्ये ही सुरभी मुद्रा महत्त्वाची भूमिका बजावते.
म्हणजे नीट विचार केला तर तुम्ही कल्पना करू शकता की, अनेक मार्गाने करण्याच्या इतर शुद्धीकरणाच्या क्रिया प्रक्रिया आणि दोन हातांनी एक विशिष्ट मुद्रा केल्यामुळे आपोआप होणारे शरीराचे शुद्धीकरण ही क्रिया यामध्ये कितीतरी फरक आहे. गुरु- शिष्य परंपरेमध्ये गुरु जेव्हा शिष्याला शुद्धीकरणाचे अनेक मार्ग शिकवत असतात तेव्हा ही सुरभी मुद्रा शिकवणे व शिष्यांकरवी करून घेणे हा विशेष अभ्यासाचा भाग आहे. ©
चित्रामध्ये पाहून सुरभी मुद्रा कशी करावी हे आपल्याला समजेल. सुरुवातीला कदाचित बोटांना सवय नसल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. आठवडाभरामध्ये ही मुद्रा तुम्हाला सहज जमायला लागेल. मी स्वतः या सुरभी मुद्रेची फॅन व पुरस्कर्ती आहे प्रदीर्घ काळापासून मी स्वतः ही मुद्रा करत आहे आणि या मुद्रेची प्रचिती घेत आहे. तुम्ही आजपासूनच या मुद्रेचा सराव सुरू कर। जेव्हा ही मुद्रा जमायला लागेल, त्यानंतर सतत सरावाने तुम्हाला काय काय फायदा झाला, याचा फीडबॅक मला जरूर द्यावा. या लेखाच्या खाली कमेंट्स मध्ये आपण सुरभी मुद्रेचा फीडबॅक लिहू शकता.
अर्थातच हस्तमुद्रांवरून उपचार हा विषय निश्चितच असा नाहीय की, इथे बटन दाबलं की ताबडतोब आपल्याला रिझल्ट मिळतो आणि याचा अर्थ असाही नाहीय की, मिळणारा रिझल्ट अनिश्चित आहे. हस्त मुद्रांचे रिझल्ट्स मिळतात. (अनेक वर्षांच्या सरावामुळे मला लगेच रिजल्ट मिळतात) परंतु जर तुम्ही जास्त आजारी आहात किंवा तुम्हाला अतिशय तातडीने उपचारांची आवश्यकता आहे अशा वेळेला उपचार शास्त्रातील अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे सहाय्य घ्यावे लागते.
अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे ताप आल्यावर गोळी घेतली, बरं वाटलं ताप गेला, पुन्हा ताप आला, पुन्हा गोळी घेतली आणि ताप येणे एके दिवशी पूर्णपणे बंद झाले. अशा पद्धतीने कोणतीही यौगिक क्रिया हाताळू नये. समस्या निवारणामध्ये जेव्हा आपल्याला या विशिष्ट उपचार पद्धतीचा किंवा योगाचा उपयोग होतो, तेव्हा ती पद्धती कायमस्वरूपी आपल्या रुटीन चा भाग म्हणून असायला काहीच हरकत नाहीय. मला सांगा तहान लागल्यावर लिटरली आपल्याला विहीर खणून पूर्ण करून, त्यातलं पाणी मिळणं शक्य आहे का?? तर नाही. तर रसिकहो सुरभी मुद्रा काय आहे? काय आहे सुरभी मुद्रा, याचे उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालं असेल. ©
तुम्ही सांसारिक असाल किंवा आध्यात्मिक साधक असाल किंवा दोन्हींचा समतोल राखून पुढे जाणारे असाल, सुरभि मुद्रा इज दि बेस्ट फॉर यु.
आता नेहमीची सूचना म्हणजे लेख आवडल्यास नक्की कळवावे हा लेख सुद्धा कॉपीरायटेड आहे या लेखाची लेखिका मी स्वतः आहे कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये. ©
डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Life Coach, Past Life Regression Therapist & Crystal Healing Therapist. ©
Good
ताई ! ही मुद्रा कोणत्या वेळेत करावी ! जेवणाआधी की नंतर !! आणि ध्यान करताना आपण करू शकतो का.
ही मुद्रा कधीही करु शकता. एकतर ही मुद्रा उष्णता किंवा शीतलता निर्माण करत नाही. शरीर डिटॉक्स करते. सकाळी प्रातर्विधीला जाण्याआधी पण करु शकता. मग शरीर व्यवस्थित उत्सर्जन करतं. आणि exact ध्यानाला बसल्यावर ही मुद्रा करता येणार नाही, कारण दोन हातांची आहे. ध्यानाआधी करावी.
आणि लेख मनापासून वाचल्याबद्दल धन्यवाद 🙏
आजारी, झोपून असलेली व्यक्ती ने ही मुद्रा करावी का?
कसे ईफेक्ट मिळू शकतात? चांगले की वाईट कृपया सांगा
नमस्कार समिधा,
आजारी झोपून असलेली व्यक्ती सुद्धा ही मुद्रा करू शकते. परंतु पुढे असं आहे की, ही मुद्रा केल्यानंतर आपल्या अंगात साचलेला कफ वात पित्त हे रिलीज होत असतं.
त्यामुळे आजारी व्यक्तीला वॉशरूम ला जायची भावना होऊ शकते. त्यामुळे ती प्रोव्हिजन योग्य असावी. आजारी व्यक्तीला ही उपयोग होतो. झोपून ही मुद्रा केली तरी इफेक्ट मिळतोच.
वेळ मिळेल तसा सराव करावा. कधीकधी मलमूत्र विसर्जनास जावे लागते. घरी असताना करा. ध्यान करताना कशी करणार? नाही करता येणार
रोज दहा मिनिटे….सलग दहा मिनिटे …. दोनवेळा पाच मिनिटे चालेल..का
हो चालेल
मुद्रा चा फोटो clear येत नाहिये तेवढा properly फोटो काढला असला तर कृपया post करा 🙏🏼
आता पोस्ट अपडेट करून व्हिडिओ स्वरूपात मुद्रा पोस्ट केली आहे..