आयुष्यातील चार भन्नाट व महत्त्वपूर्ण नियम | Follow These 4 Simple Rules in Life

follow these 4 simple rules in your life

If you don’t go after what you want, you’ll never have it

तुम्हाला जे मिळवण्याची इच्छा आहे त्याचा पाठपुरावा तुम्ही केला नाहीत, तर ते तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही :
आपण बऱ्याचदा मनातल्या मनात आपली ‘टू डू लिस्ट’ काढत असतो. म्हणजेच ‘मला हे हे करायचंय’ याची यादी काढत असतो. परंतु काही काळानंतर लक्षात येतं की, ती यादी आता अस्तित्वातच नाही आहे. कारण ती एक तर विखुरली गेली आहे आणि दुसरं म्हणजे त्यात विचार केलेल्या गोष्टी या आजच्या तारखेला फक्त मनात येऊन गेलेले विचारच ठरल्या आहेत. असं करून आपल्याला कसे चालेल? त्यापेक्षा एक एक इच्छा अथवा संकल्पना मनामध्ये नीट ठरवून त्या प्रत्येक इच्छेचा अथवा संकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बरोबर ना.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

If you don’t ask, the answer is always no

हे काय तुम्ही साधं विचारायला पण पुढे नाही गेलात? मग उत्तर फक्त नाही, हेच असणार आहे :
मनात प्रश्नांचे मोठमोठे इमले (इमारती) रचून काय उपयोग होणार आहे? फक्त नुसता रोज विचार करत बसलात की, मी हे विचारू का? असं होईल का? असं करता येईल का? मला हे जमेल का? मी हे करू की नको? — या सर्व प्रश्नांचे उत्तर नेहमी ‘नाही’ असंच असणार आहे. का बरं असं? कारण तुम्ही तुमची भीड चेपून प्रश्न विचारायला पुढाकारच घेतला नाहीत.

If you don’t step forward, you’re always in the same place

तुम्ही आपल्याला हवा असलेल्या रिझल्टच्या दिशेने अथवा ध्येयाच्या दिशेने दोन चार पावले पुढे गेलातच नाही तर तुम्ही कायमचे एकाच ठिकाणी थिजून जाणार आहात :
‘हा चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे; पण मग मला जमणार आहे का? मला पूर्ण करता येईल का? आणि मला काहीच मदत मिळाली नाही तर, मी या प्रोजेक्टचं काय आणि कसं करु पुढे? जाऊ दे काय कळतंच नाही, तर कशाला करायचा हा प्रोजेक्ट?’ असे विचार सतत प्रत्येक कामाच्या वेळी करत असाल तर पुढे कधी जाणार? बसा मग बोंबलत!

If it’s not gonna matter in 5 years, don’t spend more than 5 minutes being upset about it

जी गोष्ट पाच वर्षात घडली नाही आहे, या गोष्टीचा आपल्याला काहीही फरक पडलेला नाही, असं असेल तर पाच मिनिटं सुद्धा नैराश्यामध्ये घालवु नका :
अरे, पाच वर्षं तर सपासप निघून गेली आहेत, आणि एखादी गोष्ट झालीच नाही, याचा काहीही फरक या पाच वर्षात पडलेला नाहीय. तर तुम्ही काय आता करणार आहात? तुम्हाला आता नक्कीच हे समजलं पाहिजे की, या मॅटर न झालेल्या या बिनमहत्त्वाच्या गोष्टीसाठी, पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ डोकं बडवून घेणं, हे मूर्खपणाचे ठरेल. थोडक्यात कमी महत्त्वाच्या गोष्टींबाबत व्यर्थ काथ्याकूट करणं आणि उदास देवदास होणं, सोडून द्या!

छोटेसे आर्टिकल आहे. आवडले का तुम्हाला? फीडबॅक जरुर कळवावा. या लेखातील सर्व माहिती copyrighted आहे. मी स्वत: ही माहिती लिहिली आहे. तुम्ही एकच काय, तर हजारो मित्रांकडे या ‘लेखाची लिंक’ शेअर करु शकता. पण स्क्रीनशॉट अथवा copypaste ला परवानगी नाही आहे. कायद्याचे उल्लंघन करु नये.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*