सुधारा स्वत:ला लवकर! बस्स झाला आता ब्लेम गेम! Stop This Blame Game, Right Now! Enough is Enough!

किती किती म्हणून दूषणं द्यायची आणि नावं ठेवायची दुनियेला? ब्लेम गेम खेळायचेत? जरा अपनी गिरहबान में झाको।

असं तर दुनियेभरची affirmations गोळा करुन त्याचा ग्रंथ बनवून ठेवलेला आहे. (affirmations म्हणजे positive sentences) या वर्क करतात हे कुठेतरी ऐकल्यामुळे या सुचना, जमवजमव जमवल्या आहेत!! पण वर्कच होत नाहीत, ही सततची तक्रार. का असं होतंय? प्रेरणा मिळुनही पुन्हा पुन्हा बॅकफूटला का? फेल्युअर्स का?

Press PLAY and Listen to this article NOW!

या निराशेला कारणीभूत ठरते, ती व्यक्तीची पिछाडलेली, बुरसटलेली विचारसरणी. तसेच भावभावनांवर ज्यांना नियंत्रण नाहीय, तेही सकारात्मकतेचे बॅड फॉलोअर ठरतात. 

भय, मत्सर, द्वेष आणि खिन्नता या सारख्या विपरीत भावना यामुळे जीवनामध्ये बरीचशी अपयशं व वैफल्यं येत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये चुंबकत्व असतं हे आपल्याला आता अगदी व्यवस्थित माहित आहे. याला चुंबकत्व म्हणा, बेसिक तत्व म्हणा किंवा एखादी अदृश्य शक्ती म्हणा, या चुंबकत्वाच्या किंवा अदृश्य शक्तीच्या कार्यकारण भावावर आपल्या विरोधी भावनांचा परिणाम होत असतो.

blame-partner

तक्रारी करताना आपण हा विचार करतच नाही की, ज्या गोष्टी आयुष्यात घडून याव्या म्हणून आपण इच्छा व्यक्त केल्यात, कधी जाहीरपणे, तर कधी मनामध्ये, त्या ‘स्वतःच्याच इच्छांना आपण आपल्या विपरीत भावना भेटस्वरूप’ देत असतो.  तुम्ही म्हणाल, हे काही आमच्या हातात नाही. पण असं नाहीय. हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. आयुष्यात काहीतरी चांगलं घडू द्या ना! मनात किती किल्मिषं आणणार, मनात किती राग आणणार, किती मत्सर निर्माण होऊ देणार?

न टळणार्‍या त्रासदायक गोष्टी, पेनफुल मोमेंट्स, कसलातरी ससेमिरा, किंवा कलह, क्लेश यांच्या मागेसुद्धा आपल्या मनातीत भीतिंच्या (fears & phobias) भावना असू शकतात. इथे विचारात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, व्यक्तीला येणारे विविध अनुभव, व्यक्तीची भावनात्मक मनोवृत्ती आणि तिचा चित्तस्वभाव (म्हणजेच Moods) यांचं सादरीकरण (प्रेझेंटेशन) वेगवेगळं असू शकतं. ‘सर्व व्याधींचं मूळ हे व्यक्तीच्या भावनात्मक वैफल्यात (emotional failure) दडलेलं असतं.’  भावनात्मक वैफल्य म्हणजे सतत अपयशाशी संबंधित विचार मनामध्ये घोळवणे किंवा तशा भावना सतत मनामध्ये येत राहणे.

A human is a result of his own emotions, thoughts and visualization.

आपल्या जीवनातील परिस्थिती किंवा मानहानी, अपयश, आनुवंशिकतेतून होणारे आजार / आघात, एकंदर surrounding मधील किंवा विविध संधीची दुर्मिळता याकरीता इतरांना दूषणं (ब्लेम)  देण्याकडे अनेक व्यक्तींचा कल असतो. परंतु ह्या त्यांच्या कृतीमुळे त्यांचे स्वत:चे दुःख किंवा यातना दूर होऊ शकत नाहीत. झाल्यात का? सांगा. पुढील दोन पॅरेग्राफ मध्ये दोन वास्तव माहित्या दिल्या आहेत.  तुमचं काम हे आहे की ह्या दोन्ही माहित्या एकापाठोपाठ एक किंवा कोणत्याही क्रमाने वाचा; पण प्रत्येक पॅरेग्राफचा सेपरेटली विचार करा.  त्यावर मंथन करा; त्याचा अर्थ नीट समजून घ्या.

1) तुमच्या शरीरात सतत बदल होत असतात. मनुष्याचं शरीर हे लयबद्ध रीतीने सतत कंपायमान होत असतं. विश्वातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे आपलं शरीरसुद्धा लयबद्ध (व्हायब्रेशनल) नियमांच्या नियंत्रणाखाली असतं. अवकाशातील प्रत्येक अणू हा अंतर्मनाच्या लयीप्रमाणे नृत्य करीत असतो. ” वैश्विक मनात नसतील, इतकी असंख्य कंपने व्यक्तीच्या अंतरंगात उगम पावत असतात.

blame

आपण जी प्रत्येक वस्तू पहात असतो, ती स्पंदन पावत असते. म्हणजेच निसर्गातील कोणतीही वस्तू संपूर्णपणे विश्रांति घेत नसते. फक्त अंतर्मन मात्र अचल असते. ‘भोवतालचा निसर्ग ही अंतर्मनाची क्रियाशीलता असते.’ अनेक मार्गांनी अंतर्मन प्रकट होत असते. वस्तूचे निरनिराळे आकार आपणास जगात दिसतात; परंतु त्यातही बदल होत असतो आणि निरनिराळ्या आकारात त्या वस्तू आपणास दिसत असतात.

2) आकार म्हणजे केवळ वस्तूचे स्वरूप. हे आकार येतात आणि जात असतात. याप्रमाणे माणसाच्या शरीरांत सतत बदल होत असतो. मेडिकल संशोधनांनुसार शरीरांतील पेशी या सतत नष्ट होत असतात आणि त्यांच्या जागी नव्या पेशी निर्माण होत असतात. माणसाने त्याच्या विचारांना सकारात्मकतेचे वळण लावले, तर त्याच्या शरीरातील पेशी नवीन स्वकल्याणकारी विचार आत्मसात व प्रसारित करू लागतात. 

सेकंदस् अणि मिनिटस् यांच्या परस्परसंबंधामुळे सुद्धा शरीरात रासायनिक बदल घडून येत असतात आणि हा बदल एवढ्या मोठ्या प्रमाणात घडून येत असतो की, तुमच्या शरीराला आवश्यक असणारा अणू (Atom) किंवा विद्युत परमाणू (Electron ) तुमच्या शरीराकडून, काही महिन्यातच नवनिर्माण होत असतो. सर्व वस्तू कंपायमान असल्यामुळे, हा सतत होणारा बदल विश्वाला व्यापून टाकीत असतो. ज्याप्रमाणे सागराच्या भरती-ओहोटीमध्ये लय असते, त्याप्रमाणे तुमच्या हृदयाच्या स्पंदनामध्ये सुद्धा विशिष्ट लय असते.

Read Related: Nurturing Love and Happiness: The Power of Positive Thinking in Relationships

partner-fight

थोडं सोपं करुन सांगते. पृथ्वी एक माणूस आहे असं समजुया. त्याच्या अंगावर वेगवेगळे प्रवाह वाहत असतात. (समुद्र, लाटा, वारे, प्राणीपक्षी, अग्नी, ढग, एकंदर वातावरण) त्या स्पंदन लहरींचा परिणाम विश्वावर होत असतो आणि स्वत: पृथ्वीवर पण परिणाम होतो. Same with us. आपण आणि पृथ्वीचं अस्तित्व यांचा परस्परसंबंध पण असाच असतो. तर प्रतिक्षणी नवनिर्माण घडणार्‍या आपल्या अस्तित्वाला – आपण ‘जर्जर होत चाललंय’, ‘नैराश्याने व दु:खाने काळवंडत चाललंय’, असं समजतो, हे निश्चितच चुकतंय.

तात्पर्य काय की, ब्लेम गेम बंद करा. आणि individual प्रयत्नांनी स्वत:ची प्रगती साधा. कोणी कोणाचं वाकडं करण्याचा विडा उचलेला नाहीय. समस्या येतात नि जातात. उगीचच याला त्याला निशाण्यावर घेउन उपद्रव माजवु नका. शब्द कठोर वाटतील, पण प्रॅक्टिकल वास्तव सांगतेय. स्वभावातला हा निगेटिव्हनेस, कडवटपणा आणि ब्लेमिंग attitude संपूर्णतः घालवता येतो. Don’t worry. हिप्नोथेरपी म्हणजे संमोहन उपचारांनी सर्वकाही साध्य होतं. Mind Body आणि Soul या सर्वांवर काम करता येतं. अवश्य संपर्क करावा. अनेकांनी लाभ घेतलेला आहे. लेख आवडल्यास जरुर कळवा. जमल्यास फीडबॅक लिहावा. आणि मित्रांकडे शेअरही करा नक्की !

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

1 Comment

Leave a Reply