संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा Hypnotism is Turiya State of The Mind!

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग दुसरा Hypnotism is Turiya State of The Mind!

तुम्हाला ही तुरिया मिती नीट समजावी म्हणून चाकाचे उदाहरण घेऊया. जे चाक आहे त्याचा मध्यभाग जसाच्या तसा एकाजागी थांबतो आणि त्याचा जो परीघ आहे तो सतत फिरत असतो एक तर स्वतःभोवती फिरतो आणि त्याचबरोबर वाहनाला पुढे नेण्याचं काम करत असतो पुढे पुढे चाक जात राहतं. परंतु चाकाचा जो मध्यबिंदू आहे तो तसाच आपल्या जागी राहतो.

हा जो साक्षी भाव आपण डिस्कस करत आहोत, हा साक्षी भाव सुद्धा किंवा ही तुरिया अवस्था सुद्धा इकडे तिकडे न जाणारी, एका जागी स्थिर असलेली एक अवस्था आहे एक अशी अवस्था जिथे काहीही इकडून तिकडे जात नाहीय. तर सर्व गोष्टी स्थिर आहेत.

आता तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल की तुरीया अवस्था म्हणजे कुठूनतरी आणण्याची, प्राप्त करण्याची किंवा ध्येय ठेवण्याची अवस्था नाहीय. तर ती आतमध्ये असलेली एका अवस्था आहे ते मनुष्याचे एक असं रूप आहे जे सर्वसाधारण मनुष्याच्या अस्तित्वा पेक्षा पुष्कळ जास्त शक्तिशाली आणि अत्यंत ज्ञानी रूप आहे. हे सगळं वाचल्यावर आपल्याला नक्कीच अशी ओढ लागते की आपण तुरीया अवस्थेत बद्दल ऐकलं पाहिजे. तुरीया अवस्थेला स्वतःमध्ये जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

हे द्वंद्व आपल्या मनामध्ये सुरू होतं. या द्वंद्वातून मार्ग काढायचा असेल तर सद्गुरु तत्त्वाकडून जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि सद्गुरु तत्त्वाकडून संपूर्ण साक्षी भाव कसा ठेवायचा म्हणजेच तुरिया अवस्था कशी अनुभवायची याची माहिती व्यवस्थित अभ्यासपूर्ण पद्धतीने मिळवणे गरजेचे आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावर आरशामध्ये ज्याप्रमाणे आपलं प्रतिबिंब दिसतं त्याप्रमाणे आपण संपूर्णतः तुरिया अवस्थेत जाण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच केवळ संपूर्ण दृष्टा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर बनत जातो. धर्मशास्त्रांच्या संशोधनाचं सार हेच आहे की एका अशा अवस्थेला पोहोचणे जिथे काही सांगायला / ऐकायला उरत नाही आणि जे काही उरतं ती फक्त तुरिया अवस्था..

साक्षी भाव असलेली दृष्टा अवस्था ही तुरिया अवस्था एक अशी अवस्था आहे जिथे शरीर उरत नाही मन उरत नाही बुद्धी ची ढवळाढवळ उरत नाही उरते ती फक्त एक परम ज्ञानी अवस्था जिथे सर्वकाही आपापल्या जागी मुळातच अस्तित्वात आहे पूर्ण अवस्थेमध्ये आहे. ना गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, ना नर्मदा नदी आहे, ना सरस्वती नदी आहे परंतु मनुष्य म्हणजे तोच जिवात्मा संपूर्ण अखंड ज्ञानाने परिपूर्ण आहे

हे लक्षात ठेवा की, साक्षीभावाच्या विरुद्ध भाव कोणताच नाहीय. कारण साक्षी भाव हे एक मात्र शाश्वत तत्व आहे अशा तुरीया अवस्थेला आपण संपूर्णतः जाणून घेतो. त्या वेळेला अंत:सूर्याचा उदय होतो. सर्व प्रकारचा अंधार संपून जातो आणि एक नवी सकाळ आपल्या आयुष्यामध्ये होते. इतक्या गंभीरपणे या अवस्थेचं वर्णन आणि विश्लेषण करणे गरजेचे होतं. आता थोडी वेगळी माहिती मी सांगणार आहे, ज्यातून तुरीया अवस्थेबाबत अजून चांगली उकल होईल. आपण सर्व अथर्वशीर्ष जाणतो. मी गणपतीचे अथर्वशीर्ष याबाबत बोलत आहे.

” त्वं अवस्थात्रयातीत: “
हे आपण गणपतीला म्हणतो, म्हणजे काय तुम्ही जाणतच असाल. तर गणपती जाग्रत-स्वप्न-सुषुप्ती या तिन्ही थ्री डायमेन्शनल अवस्थांच्या पलीकडचा आहे. म्हणजेच गणपती त्या पलीकडचा असून तो चौथ्या मिती मध्ये कायम स्थिर असतो आपण चौथ्या मीतिचं थोडं विश्लेषण पाहिलेलेच आहे चौथी मिती ही पूर्णपणे स्थिर आणि ज्ञानाची अवस्था (higher consciousness) आहे. इथे ज्ञान मिळवण्याची, काही जाणून घेण्याची, काही करण्याची पराकाष्ठा करावी लागत नाही तर ही मिती ज्ञानाने युक्त आहे. ही उपजत ज्ञानाची अवस्था आहे तर गणपती हा या चौथ्या मिती मध्ये म्हणजेच तुरिया अवस्थेमध्ये कायम स्थिर असतो. त्यामुळे आपण गणपतीची विशेष आराधना विविध चतुर्थीच्या दिवशी करतो.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपण सर्वजण गणपतीला बुद्धीची देवता म्हणून मानतोच. गणेश ही बुद्धीची देवता आहे, म्हणजेच तुरिया इंटेलिजन्सच्या मितीतील देवता आहे. गणपती म्हणजे बुद्धीचा लख्ख प्रकाश आहे. याचं कारण आता हळूहळू तुमच्या लक्षात येत असेलच. प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला आपण गणपतीचे नाव घेतो. गणपतीला प्रणाम करतो आणि कार्याची सुरुवात करतो, यामागे सुद्धा हेच विज्ञान आहे की, बुद्धीची देवता गणपतीला नमस्कार केल्यावर इथेतिथे पळणारं आपलं लक्ष (ध्यान) ताबडतोब समोर, थोड्याच वेळात केल्या जाणाऱ्या – विशिष्ट कार्याकडे अथवा शुभकार्याकडे एकवटलं (assimilate) जावं, म्हणून गणपतीचं नाव सुरुवातीला घेतलं जातं.

अर्थात आरंभी गणेशपूजन करण्याचं, अजुनही एक प्रयोजन आहे, जे आपल्या व सृष्टीच्या मुलाधार चक्राशी संबंधित आहे. पण त्याबद्दल पुढे कधीतरी सांगेन. चतुर्थी ही स्थिर ज्ञानाची अवस्था असल्यामुळेच गणपती बुद्धीची ज्ञानाची देवता आहे. गणपतीची भक्ती, पूजा, आराधना इत्यादी आपण करतो म्हणजेच या चतुर्थ मितीची जाणीव स्वतःमध्ये नकळतपणे निर्माण करतो किंवा स्वतःला या साक्षीभावासोबत कनेक्ट करतो.

या तुरीया अवस्थेबद्दल मला विशेष बोलावेसे का वाटते, ते सांगते. संमोहनाच्या गहिऱ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर व्यक्तीला तुरिया अवस्था प्राप्त होते. यालाच साध्या भाषेमध्ये म्हटले जाते की, माणसाच्या अंतर्मनाचा दरवाजा संमोहित अवस्थेमध्ये उघडला जातो. (अंतर्मन आणि अंतरात्मा एकमेकांहून निराळे नाही.)

एखाद्या व्यक्तीला समजावून सांगण्याची गोष्ट, साध्या सरळ शब्दांमध्ये सांगितल्यावर, समजत नाहीय, कारण त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये त्या विशिष्ट गोष्टीबाबत चुकीची माहिती (wrong डेटा अथवा चुकीच्या सूचना मनात पोहोचणे) किंवा नकारात्मक माहिती आधीपासूनच फीड झालेली आहे. ही माहिती कुठे फीड झाली आहे तर ही चुकीचे आउटपुट देणारी माहिती अंतर्मनामध्ये किंवा व्यक्तीच्या अंतरंगामध्ये फीड झालेली आहे. मग अशी फीड झालेली माहिती, जर चुकीची (misleading) असेल, तर त्या माहितीवर आधारित ज्या घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडत असतात, त्या घटना त्या व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्या असतात. मग त्या व्यक्तीमध्ये आमुलाग्र बदल घडवायचा असेल, तर त्या व्यक्तीच्या अंतस्थ अवस्थांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. हीच ती संमोहित म्हणजे तुरीया अवस्था होय.

ती व्यक्ती स्वत: पीडित असल्यामुळे या तुरिया अवस्थेपर्यंत – सुधारण्याच्या – विशिष्ट उद्देशाने पोहोचण्याचा मार्ग त्या व्यक्तीकडे उपलब्ध नसतो. त्यामुळे विशिष्ट संमोहित सूचना, संमोहकाच्या मदतीने संमोहन अवस्थेमध्ये म्हणजेच, संमोहित अवस्थेमध्ये दिल्या जातात. संमोहनाला म्हणजेच संमोहित अवस्थेला ज्ञानाची अवस्था असे म्हटले जाते. म्हणजेच जागेपणी जे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला अपार कष्ट घ्यावे लागतात, कधीकधी आपली प्राणशक्ती प्रचंड प्रमाणात वाया जाते, आपण आजारी अवस्थेलाही पोहोचू शकतो, आपला आत्मविश्वासही खिळखिळा होऊ शकतो अशा दुर्दैवी अवस्थेवर उपचारक ठरणार्‍या ज्ञानाचे ग्रहण तुरीया अवस्थेमध्ये म्हणजेच संमोहित अवस्थेमध्ये लीलया संपादन केले जाते. आपोआप आत्नसात होते.

Also Read: गणपती बाप्पाची आरती (पारंपारिक) | Traditional Aarti Shri Ganesh

जीवात्म्याला तुरीया अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी संमोहन विद्येची उत्कृष्ट मदत होते. ही तुरीया अवस्था म्हणजेच संमोहित अवस्था, स्वतःच्या प्रयत्नाने आत्मसंमोहन, या प्रक्रियेतून सुद्धा मिळवता येते. यासाठी स्वतःचे अथक, कठोर परिश्रम व स्वयं अभ्यास करणे गरजेचे असते. आता मी लिहिलेले एक वाक्य तुम्हाला सांगते.

“संमोहन ही तुरिया अवस्था आहे. चैतन्याच्या मितीमधील संपूर्ण जागरण आहे. विश्वात्म्याच्या गर्भातील आत्मभेट आहे.”

हे वाक्य मी अनेकदा माझ्या सोशल मीडिया वॉल वर पोस्ट करत असते. हे वाक्य साहित्यिक किंवा फिलॉसॉफिकल वाक्य नसून तुरिया अवस्था म्हणजेच संमोहित अवस्थेचे परफेक्ट यथोचित वर्णन आहे. संमोहन ही तुरीया अवस्था कशी आहे, हे तर मी समजावून सांगितलेलं आहे. ‘चैतन्याच्या मिती’ म्हणजे काय, तर जी चैतन्यपूर्ण डायमेन्शन आहे म्हणजेच चैतन्यपूर्ण मिती आहे, याचा अर्थ पवित्र प्राणशक्तीने संपन्न – असा जो आतला प्रकाश आहे, त्या आतल्या प्रकाशापर्यंत – संमोहित व्यक्ती सहज पोहोचलेली असते आणि मुख्य म्हणजे डोळे जरी मिटलेले असले तरीही ती जागृत सुद्धा असते.

म्हणजेच ही अवस्था ‘झोपणे व जागे होणे’ या सामान्य अवस्थांमधली जागृती नसून, अखंड अनादिकाल असणारी प्रकाशमय जागृती आहे आणि यात लिहिलेले शेवटचे शब्द – विश्वात्म्याच्या गर्भातील आत्मभेट – आहे यावरून अनेकांना प्रश्न पडला की संमोहमाने संमोहित अवस्थेमध्ये नेले म्हणजे कृत्रिम क्रिया घडली तर मग याला आत्मभेट म्हणजेच आत्मसाक्षात्कार कसे म्हणावे? या प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी भरपूर मोठं पाल्हाळ लावणारं विश्लेषण मी करू इच्छित नाही.

कारण संमोहित अवस्थेमध्ये मग ती एखाद्य़ा संमोहकाने आणलेली अवस्था असू दे किंवा आत्मंसमोहनातून प्राप्त झालेली अवस्था असू दे “आत्मसाक्षात्कार” हा घडतच असतो आणि जेव्हा व्यक्ती अतिशय खोल गहिऱ्या निद्रेमध्ये म्हणजेच डीप स्लिप मध्ये जात राहतो, तेव्हा तो विश्वात्मा म्हणजेच अखंड अमर्याद ब्रम्हांडाच्या पोटामध्ये हा आत्मसाक्षात्कार लिटरली अनुभवत असतो. इथपर्यंत तुरिया अवस्थेबद्दलचा हा लेख कसा वाटला, मला जरुर कळवावे.

क्रमशः — भाग 1, भाग 2 व 3 सर्व लेख वाचावेत. या WORDPRESS वरील सर्व लेखांची मी लेखिका आहे. हे लेख मी स्वत: लिहिलेले आहेत. सर्व लेख copyrighted आहेत, स्क्रीनशॉट किंवा copy paste करु नये. copyright कायदा व कर्म सिद्धांत याचे उल्लंघन करु नये. या लेखाची लिंक शेअर करु शकता.

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहिला व तिसरा भाग वाचवा –

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग पहिला

संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग तिसरा

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist, Spiritual & Mind blogger.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

2 Trackbacks / Pingbacks

  1. संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान Fourth Dimension – भाग तिसरा – ज्ञान power
  2. संमोहन ही तुरीया अवस्था: गणपती चौथ्या मितीत विराजमान The Fourth Dimension – भाग पहिला – ज्ञान power

Leave a Reply

Your email address will not be published.


*