मानवी मन: अंतर्मन व बाह्यमन (The Human Mind: Conscious and Subconscious Mind)

the human mind: conscious and sub conscious

‘चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्।।’
-अर्जुन उवाच.

Bhagavad Gita: Chapter 6, Verse 34

अर्थ: हे कृष्णा, मन हे अतिचंचल, स्वच्छंदी, उत्छृंखल व महाबलाढ्य आहे. त्याला वश करायचं मह्णजे वायुला नियंत्रित करण्यासमान आहे.

यावर श्रीकृष्ण म्हणतात की, 

‘बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः।’
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्।।

Bhagavad Gita: Chapter 6, Verse 6

अर्थ: ज्याने मनाला जिंकले आहे, त्याचे मन हे उत्तम मित्र होते. त्याच्या अंत:करणात समत्व येते. तो बुद्धीच्या पलीकडे जाऊनही विचार करु शकतो. तो मनाचा गुलाम नाही आहे. ज्याने मनाला जिंकलेले नाही, त्याचे स्वत:चे मनच त्याचा शत्रु बनते. वैरी बनते. 

Press PLAY and Listen to this Article Now!

मन किती सूक्ष्म असते, आणि तरीही ते किती ताकदवान असते, हे आपण मागील लेखात पाहिले. मन समजण्यासाठी, अगदी प्रत्येकाला मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज नाही आहे! आत्मविश्वासपूर्ण, अभ्यासपूर्ण विचार सुद्धा याच मनात येतात आणि कल्याणकारी प्रेरणांना पायदळी तुडवणारे, विवेकाचा कडेलोट करणारे (कधीकधी तर आत्मघातकी विचार) विचार सुद्धा याच मनामध्ये येतात. 

मन जरी दाखवता येत नसले, तरी त्याचे अस्तित्व आपल्याला निश्चितच जाणवते. ‘मला मनात आतमध्ये असं जाणवतं, माझं एक मन असं म्हणतं, तर दुसरं मन तसं !’ हे असं आपण दैनंदिन जीवनात बर्‍याचदा बोलत असतो.  

एखाद्या आर्किटेक्ट चं उदाहरण पाहुया. एका बांधकामाचा तोच सर्वेसर्वा (बिल्डर, इंजिनिअर) आहे, असं समजुया. आर्किटेक्ट काय करतो, तर बिल्डिंगसाठीची जागा, त्यावर उभी राहू शकणारी संरचना, त्याचं आकारमान, लोड बेअरिंग (वजन पेलवणे) क्षमता, परिसरातील परिस्थिती, बांधकाम साहित्य, इत्यादी सर्व गोष्टींचा चित्रात्मक, रचनात्मक विचार करुन एक योजना पेपरवर साकारली जाते. (अथवा डिजिटल वर)

Podcast: मानवी मन : अंतर्मन व बाह्यमन

या उदाहरणाप्रमाणेच आपल्या आयुष्यात जी गोष्ट (प्लॅन) साकारली जाणार असते, ती साकारताना आपण, आत मनामध्ये कल्पना आणि चित्र साकारतो आणि  मग प्रक्रियेला (प्रोसेस) सुरुवात करतो.

थोडक्यात, बांधकामाच्या उदाहरणात बांधकामात प्रत्यक्ष काम करणारे बाह्यमन आणि प्रेरणा व आराखडा बनवणारे अंतर्मन असते. ही दोन मनं कुठली बुवा!?

मनं दोन नसतात; तर मनाचे दोन स्तर असतात. एक आतील स्तर अंतर्मन; दुसरा बाहेरील स्तर बाह्यमन. आपला आयुष्यभराचा संपूर्णतः डेटा अंतर्मनात रेकॉर्ड झालेला असतो. एक महासॉफ्टवेअर म्हणू !! हा अंतर्मनात साठवलेला डेटा चांगला / वाईट असं लेबल लावलेला नसतो. ती फक्त ‘माहिती’ असते. त्या डेटा वर आधारित बर्‍याच गोष्टींवर, बाह्य मन प्रत्यक्ष प्रक्रिया करायला, प्रेरणा देत असते. 

पण मग मनाविरुद्ध घडतं, म्हणजे काय घडतं आणि मनासारखं घडतं म्हणजे काय घडतं? हे सर्व तर भावभावनांवर अवलंबून आहे.

1. माझी भरभराट झाली, अमक्याला दारिद्र्य आलं या फक्त भावना ( फिलिंग्स) आहेत. वस्तुस्थिती नव्हे; 2. कारण माझी ‘भरभराट’ – हे – तुलनात्मक दृष्टीने एखाद्या गडगंज श्रीमंताच्या दृष्टीने ‘दारिद्र्य’ असू शकतं. 

म्हणजेच पहिल्या सिच्युएशन मध्ये मी आनंदी असू शकते आणि दुसर्‍या सिच्युएशन मध्ये मी दु:खी असू शकते. (फक्त उदाहरण!) आणि अंतर्मनाकडील डेटा-  माझ्याकडे अमुक धन आहे, याचीच फक्त नोंद ठेवतो. त्याचवेळी माझं व्यावहारिक बाह्यमन मात्र सुखी किंवा दु:खी असतं.

mind

म्हणजेच अंतर्मनात जतन केलेल्या डेटावर प्रोसेस करुन, मनाजोगत्या गोष्टी घडवून आणणं हे आपल्या अखत्यारीत असते. मनातील विचार (थॉट्स) आणि मनातील भावभावना (फिलिंग्स) यांना कोणताही ‘गोल’ सेट करुन दिलेला नसल्यामुळे, आपण दिशाहीनतेने भरकटत असतो. आणि अनेक ऊहापोहांमध्ये मनाची शक्ती वाया घालवत असतो. सूर्याची पसरलेली किरणं, भिंगाच्या साहाय्याने, कागदाच्या एका बिंदूवर एकत्रित झाली की, उष्णतेने कागद जळतो, ना! अगदी तस्साच मनाच्या ताकदीचा उपयोग करता येतो.

इथवर हे तर लक्षात आलंच असेल की, अंतर्मनातील डेटावर आधारित सर्वकाही घडत असतं. या डेटावरील प्रोसेसिंग उत्तम करता आलं की, आयुष्यात मॅक्झिमम गोष्टी मनासारख्या घडवता येतील. यातूनच संशोधक, यशस्वी उद्योजक, उत्तम खेळाडू, गायक, वादक, वक्ते, कुशल कारागीर, विद्यार्थी, अभ्यासक, थोडक्यात महत्त्वाकांक्षी माणूस घडू शकतो. 

अंतर्मन व बाह्यमन हे केवळ तत्वज्ञान किंवा कल्पनाविलास नसून, वास्तव आहे. लेखाच्या सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे मनाला अभ्यासाने जिंकता येतं आणि जे हवं आहे, ते साध्य करता येते. 100 तक्के मानसिक ताकदीमधील, 10 टक्केच जेमतेम वापरली जाते. अजून 10 टक्के जरी वापरता आली, तरी बेहतर आहे ना! आता पुढच्या वेळी, तुम्हाला जर कोणी सांगितलं की, उपयोगात आणण्यासाठी तुमच्याकडे भरपूर सामर्थ्य आहे, तर दुर्लक्ष करु नका! अतिप्रगत आधुनिक तंत्रज्ञानापेक्षाही अधिक कार्यक्षम तुम्ही स्वत: आहात. सामर्थ्यवान तुम्हीच आहात. लेख आवडल्यास जरुर कळवावे. 

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*