मनाची अदभुत शक्ती व संमोहन शास्त्र (Miraculous Powers of The Mind and Hypnotherapy)

संत तुकाराम महाराज म्हणतात की,

‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण॥’

गाथा अभंग २९१

प्रसन्न मनाची सिद्धी म्हणजेच इच्छापूर्ती.

press PLAY and Listen to this Article Right Now!

मानवी मनाचे दोन स्तर असतात, हे आपण मागील लेखात पाहिले. थोडी उजळणी करुया. मनं दोन नसतात! तर मनाचा आतील स्तर हा अंतर्मन, तर बाहेरील स्तर हा बाह्यमन असा असतो. आपण संवाद साधतो, एकमेकांसोबत चर्चा करतो, निवड करतो, (निर्णय घेतो) आणि उपलब्ध माहितीवर आधारित, आता पुढे काय करावयाचे आहे, कसे करावयाचे आहे, प्लॅन्स ची निश्चिती, सर्वकाही करतो. हे सर्व बाह्यमन करीत असतं. थोडं सोपं करुन सांगते. व्यक्ती जेव्हा म्हणते की, मी असं केलं, मी असंअसं ठरवलंय, मी पूर्ण अभ्यास केला, मी कामांची आखणी केली, हे सर्व बाह्यमनच बोलत असते.

अंतर्मन हे डेटा स्टोरेजचं काम अव्याहतपणे करीत असते. अनेक कला, अनेक महत्त्वपूर्ण नोंदी, शिकलेले शिक्षण, वेगवेगळे ज्ञान व अनेक फॉर्म्युले इत्यादी व बर्‍याच (पायाभूत) बेस लेव्हलच्या गोष्टी या अंतर्मनात रेकॉर्ड  केलेल्या असतात. या डेटाच्या आधारावरच तर आपला इंटेलिजन्स दिसत असतो. रुटीन कामं जसे की, आंघोळ, दात घासणे, वस्तु उचलणे, चालत कामावर जाणे, कामं पार पाडणे, झोपायची वेळ झाली, या प्रेरणेने झोपायला जाणे, इत्यादी कामे अंतर्मनाच्या माहितीच्या आधारावर आपण करीत असतो. 

mind-powers

आपण झोपतो, म्हणजे बाह्यमन झोपते. अंतर्मन कधीच झोपत नाही. संशोधन तर असे सांगते की, अंतर्मन 24 तास जागे असते. याचाच अर्थ जागरण, अखंड आयुष्य!! जन्मापासून मृत्युपर्यंतची सर्व नोंद! 

थोडक्यात काय, तुम्ही आम्ही ज्याला मन म्हणून चांगलंच ओळखता, ते बाह्यमन होय. आणि या मनाचा जाणिवेच्या पलीकडचा भाग तो अंतर्मन होय.

किती आश्चर्य आहे ना! मन हा आपल्या अस्तित्वाचा एक असा अविभाज्य भाग, जो त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, निळा, लाल असा दाखवता येत नाही ; पण स्वभाव, सामाजिकता, गुण, दोष, शरीर, इंद्रिये, बुद्धी, क्रियाशक्ती सर्व ठिकाणी या मनाचा सहभाग मात्र सिद्ध होतोच.

आपला आत्मविकास बाह्यमनाच्या माध्यमातून होतो. नकारात्मक व सततचे विचार (ओव्हरथिंकिंग), चिंता, राग, भीती, ताणतणाव, एंझायटी या सर्वांमुळे बाह्यमन दुबळे बनत जाते. या बाह्यमनापेक्षा अंतर्मन अनेक पटीने अधिक सामर्थ्यशाली असते. अंतर्मनाची दारं उघडता आली की, सर्वच ज्ञान, विज्ञान, सुखसमृद्धी, यश आपल्याकडे धावून येतात. मानसिक आजार, दडपणं, विकृती, फोबिया, भीती यांवर मात करता येते.

खरोखरंच असं करता येईल? मनाच्या बंद दाराला आपण उघडू शकतो का? मनाची अमर्याद ताकद याच आयुष्यात आपण वापरु शकतो का? भावभावना मनात दबल्यामुळे, अपमान, भीती, संतापामुळे, शरीरात बळावलेले आजार रिव्हर्स (बरे) होतील, का?

याचं उत्तर आहे, होय. 

बाह्यमनाला चांगले वाईट (हित व अहित) समजतं. अंतर्मनाला स्वतंत्र विचार करण्याची क्षमता नाही आहे.  बाह्यमनाचं कार्य थांबल्यावर अंतर्मन सक्रिय होतं. सूचनाग्राहकता हा अंतर्मनाचा महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे. साध्या सूचना नव्हे; प्रभावी सूचना असलेली सकारात्मक वाक्ये.

वाचकांना नक्कीच वाटत असेल, की अशा सूचना तर चिक्कार असतात. त्यांचं काय विशेष? तर वर विचारलेल्या अनेक प्रश्नांचं उत्तर ज्या शास्त्रात (सायन्स) मध्ये आहे, त्या उपचार शास्त्राची माहिती मी तुम्हाला देत आहे. 

हे असे मनाचे शास्त्र आहे, ज्यात या अंतर्मनाचा अधिकतम उपयोग करवून घेता येतो. मानवाला कोणत्याही औषधयोजनेशिवाय समाधानी व शक्तिशाली आयुष्य जगता येतं. सर्वच क्षेत्रांत व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो.

याचे नाव आहे संमोहन उपचार शास्त्र. हिप्नोथेरपी अथवा हिप्नॉसिस. हे आपल्याच मातीत निर्माण झालेले, प्राचीन भारतीय योगविद्येचे अंग असलेले व परदेशी नाव धारण केलेले एकमेव शक्तिशाली शास्त्र आहे. तुमच्याच मनाची संकल्पशक्ती व इच्छाशक्ती वापरुन तुमचा कायापालट करणारे हे औषधविरहित (ड्रगलेस) शास्त्र  आहे.

अंतर्मनाच्या मदतीने कल्पनांवर (इच्छा, ध्येय) लक्ष केंद्रित करुन त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये कल्याणकारी प्रोग्रामिंग घडवून त्याचा व्यक्तिमत्त्व विकास करणे, त्याच्या व्याधी बर्‍या करणे, हे संमोहन उपचारांनीच शक्य आहे.

लक्षात घ्या. कोणतीही बाह्य ताकद नाही, तर तुमच्याच मनाची अमर्याद ताकद तुम्ही वापरु शकता. जीवन सुसह्य, निरोगी व समाधानी करु शकता. आजवर अनेक मानसिक व शारिरीक आजारांनी ग्रस्त व्यक्ती पाहताना लक्षात येतं की, शरीराची सुरळीत घडी, मनाने पार विस्कटवून टाकलेली असते. दु:ख, विवंचना अडथळे अनेक जणांच्या आयुष्यात येतात. मनावर होणारे आघात थांबवु शकणारे आपण कोण? मात्र आपण स्वत:च्या मनाला कायमचे स्ट्राँग बनवु शकतो. चिवड्याप्रमाणे औषधी गोळ्या खाणारी माणसं पाहिली की, मन विषण्ण होतं.

अंतर्मनाची द्वारंच जर उघडी नसतील, तर सकारात्मक वाक्यं वाचून, बोलून, पाठांतर करुन विशेष उपयोग कसा काय होणार? व्हायरसचा संसर्ग झाल्यावर ॲप अथवा सॉफ्टवेअर हॅंगच होत राहणार! कॉम्प्युटर दुसरा घ्याल हो, पण या वर्तमान आयुष्याचं काय? लाईफ मेंबर्स बनलेल्या औषधांच्या डब्याचं काय?

मनाची कधीही न थांबणारी नकारात्मक विचारांची मालिका संपतच नसेल आणि काळवंडलेल्या चक्रव्युहातून बाहेरच पडता येत नसेल, तर सुखाचा सदरा कसा अनुभवता येईल, हो ना ! लेख आवडल्यास जरुर कळवावे.

– डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 डोंबिवली. Hypnotherapist & mind counselor & Naturopath

Be the first to comment

Leave a Reply