‘पंचकर्म अ‍ॅट होम’ – स्वत:च्या घरी स्वत:च स्वत:चे पंचकर्म संपन्न करा. (DIY ‘Panchakarma At Home’)

⦿ अमेझिंग गुड न्यूज !!! आता तुम्ही सहजतेने स्वत:च स्वत:साठी घरच्याघरी पंचकर्म करु शकता.

⦿ योग्य जीवनशैली, संतुलित आहारविहार व उत्तम रोगप्रतिकारकशक्ती असलेलं शरीर हीच आपली खरी #संपत्ती आहे. माणूस आजारी पडतो. पण बरं व्हायला वेळ लागू लागला की, परिस्थिती वेदनादायी बनते. जे शरीर अंतर्बाह्य स्वच्छ असते, ते स्वत:च स्वत:ला लवकर बरं करतं.

⦿ अनेकांना वाटतं की, शरीर स्वच्छ करणे म्हणजे फक्त एखादे विरेचन घेणे. असं नसतं. शरीर संपूर्ण स्वच्छ आणि शक्तिशाली करायचे असेल तर, शरीराचे काही काळाच्या अवधीनंतर पंचकर्म करणे अनिवार्य आहे.

⦿ आपल्या शरीरात वात पित्त कफ असे तीन दोष असतात. या त्रिदोषांचे बऱ्याचदा असंतुलन होत असते. हे त्रिदोष वाढल्यामुळे शरीर अनेक व्याधींना आकर्षित करते. शरीराच्या अंतर्भागामध्ये साचणारा मळ फक्त आतड्यांमध्येच असतो, असे नव्हे; तर तोंडातून निघणाऱ्या अन्न मार्गापासून ते उत्सर्जन मार्गापर्यंत अनेक ठिकाणी, तसेच शरीरातल्या अन्य अवयवांमध्ये सुद्धा बऱ्याच काळापासून साचलेला मळ पडून असतो. घरात एखाद्या कोपर्‍यात चुकून राहिलेलं अन्न जसं सडू लागतं, त्यातून घातक वायु व अ‍ॅसिड्स बनतात, तसेच पोटात पोहोचलेल्या अन्नाचे आहे.

⦿ सर्व ठिकाणचा मळ पंचकर्माद्वारे निघाल्यानंतर एखाद्या नवीन महायंत्राप्रमाणे शरीर सुव्यवस्थितपणे चालू लागतं. ही पाच कर्मं म्हणजे – स्नेहन स्वेदन वमन विरेचन व बस्ती. यालाच आयुर्वेदामध्ये शरीर शोधन असेही म्हणतात.

वरील माहितीमध्ये फक्त स्नेहन (सर्वांगास तेल लावणे) या एकाच कर्माचे (पंचकर्मांपैकी) फोटोज् दर्शवलेले आहेत.

⦿ पंचकर्म केल्यामुळे काय उपयोग होतात?
1.पंचकर्मामुळे शरीर पूर्णपणे विषद्रव्य विरहित बनतं,

2. पंचकर्मामुळे अवयव व शरीरातील विविध सिस्टिम्स धुतल्याप्रमाणे स्वच्छ होतात,

3. त्यामुळे शरीराची एकंदरच कार्यक्षमता वाढीस लागते,

4. अवयवांची झीज भरुन येते,

5. उपयुक्त द्रव्यांचे पोषण नीट होउ लागते,

6. अतिरिक्त वात पित्त कफ निघून जातात,

7. मुख्य म्हणजे ज्या अग्नीच्या कार्यावर आपण जगतो, तो पोटातील अग्नी सुव्यवस्थित होतो,

8. पाचनतंत्र व चयापचय सुधारते,

9. शरीराच्या किचकट हानीकारक प्रवृत्ती बदलतात,

10. शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जाते,

11. शरीरात मुरलेले चिवट आजार जातात,

12. येणाऱ्या काळात कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालेच, तरी ते लवकर रिकवर होते,

13. गंभीर आजार असतील तर त्यांची तीव्रता कमी होते,

14. पंचकर्माने पचन सुधारते, असलेला आजारपणं कमी होतात. स्वास्थ्य मिळते,

15. मन- बुद्धी- इंद्रियांची कार्यक्षमता वाढते,

16. शरीराची कांती (त्वचा) सुधारते. चेहरा तेजस्वी, तजेलदार व सुंदर दिसू लागतो.

17. शारिरीक व मानसिक बल वाढते,

18. मैथुनशक्तीत सुधारणा होते.

19. वृद्धत्वाकडे जाण्याची गती मंदावते व तुम्ही चिरायु बनता,

20. विशेष म्हणजे शरीरात आमुलाग्र बदल झाल्यामुळे, मनही प्रसन्न व सकारात्मक बनतं,

20. गमावलेली नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती पुन्हा प्राप्त होते.

⦿ आदर्श पंचकर्म सर्वसाधारणपणे बारा दिवसांचे असते. शरीरातील घाण जाऊन शरीराचे पुनर्वसन व्हायला सलग 12 दिवस पंचकर्म क्रिया संपन्न करावी लागते.

पंचकर्म झाल्यानंतरचा उत्तम रिजल्ट

⦿ पंचकर्म कोणी करावे?
1. निरोगी व्यक्तींनी सुद्धा करावे,

2.जे कपल्स बाळ होण्यासाठीचं प्लॅनिंग करत आहेत, त्यांनी करावे. (अशी शरीरशुद्धी येणाऱ्या बाळासाठी खूप सकारात्मक ठरते),

3. संधिवात, आमवात, डायबेटिस, निद्रानाश, अतिआलस्य रुग्ण, नपुंसकत्व, पोषक द्रव्य खात असुनही ज्यांच्या अंगाला लागत नाही, असे रुग्ण,

4. वेट लॉस अथवा वेट गेन चे इच्छुक,

5. सतत अ‍ॅसिडिटी, मळमळ,

6. रक्तदोष असल्यामुळे त्वचा विकार झालेले रुग्ण,

7. प्रत्येक ऋतुमध्ये करावे. 8. वयात आल्यावर, तसेच मेनोपॉज लक्षणं दिसू लागल्यावर (अनिवार्य आहे) पंचकर्म करावे,

9. दमा रुग्ण,

10. हायपर व हायपो थायरॉइड विकार,

11. सोरायसिस,

12. वेगवेगळया अ‍ॅलर्जी

13. मानसिक विकारग्रस्त

14. मायग्रेन

15. वंध्यत्व

16. लैंगिक दुर्बलता व अनास्था

17. नुकतेच मोठ्या आजारातून रिकव्हर झालेले रुग्ण (विशिष्ट ताप, व व्हायरल इन्फेक्शन)

⦿ आता हे सर्व उपयोग कळल्यावर, अनेकांना वाटत असेल, की हे सलग बारा दिवस केंद्रावर ये-जा करण्यासाठी वेळ कसा मिळणार? बारा दिवस नोकरी व्यवसाय सांभाळून हे कसे साध्य होणार? तर डोण्ट वरी. मी तुमच्यासाठी बारा दिवसाचे “पंचकर्म अ‍ॅट होम” पॅकेज आणले आहे. हे पंचकर्म तुम्ही घरच्याघरी स्वत:चे स्वत: पूर्ण करु शकता.

⦿ आमच्या सेंटरला रोज विजिट करण्याची गरज उरणार नाही. या “पंचकर्म अ‍ॅट होम पॅकेज” मध्ये ताज्या वनौषधी वापरल्या जातात. यांत कोणतेच केमिकल वापरावेच लागत नाही.  त्यामुळे उत्तम रिजल्ट प्राप्त होतो.

⦿ विशेष सूचना: आपल्या स्वास्थ्याबाबत आपल्यासोबत चर्चा करुन मगच पंचकर्म कधी व कसे करावे हे सांगितले जाईल. पंचकर्म वारंवार उगीचच करावे लागत नाही.

डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 निसर्गोपचार तज्ञ व लाईफ कोच.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply