कोंबडीचं अंडं, ट्रान्सम्युटेशन आणि मनाची सुसाईड: काय बनवुया मनात आणि शरीरात!! An Egg, Transmutation & Mental Suicide! Which Mindset are you Creating?

transmutation egg dnyan power

मला माहित नाही, तुम्ही कोणत्या चष्म्यातून हा लेख वाचणार आहात ते!! मला फक्त एवढंच माहित आहे की, हा माझा अतिशय फेवरेट टॉपिक आहे – ट्रान्सम्युटेशन. अर्थात मराठी मध्ये – परिवर्तन किंवा रुपांतरण. नाही, बिलकुल बोअरिंग टॉपिक नाहीय !!

1) आधी आपण एक खरोखर घडवून आणलेला जीवशास्त्रीय प्रयोग जाणून घेऊया. या प्रयोगाचं नाव बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन आहे. म्हणजे जीवशास्त्रीय रूपांतरण किंवा परिवर्तन. आणि या सत्य प्रयोगातली नायिका आहे → कोंबडी. एक नाही तर बऱ्याच कोंबड्या. तर त्याचं असं झालं की, शास्त्रज्ञांना ‘बायोलॉजिकल ट्रान्सम्युटेशन’ हे एखाद्या जिवाच्या शरीरात कशाप्रकारे आपोआप निसर्ग प्रेरणेने घडून येतं, याचा व्यवस्थित शोध लावायचा होता.

तुम्हाला सर्वांना माहीत असेलच, कोंबडीचं जे अंडं असतं, त्याचं कवच कॅल्शियमयुक्त असतं आणि त्या आतही कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. या प्रयोगासाठी काही कोंबड्यांना निवडले गेले. या कोंबड्यांना काही दिवसासाठी असे अन्न द्यायचे असं ठरवलं, ज्या अन्नामध्ये कॅल्शियमचे प्रमाण बिलकुलच असणार नाही. त्यांना जे जे अन्न दिलं जाणार होतं, त्या सर्व अन्नामधून कॅल्शियमचा कंटेंट – सहभाग पूर्णपणे वजा केला गेला. काही दिवस या कोंबड्यांना कॅल्शियम विरहित अन्नावरच जगावं लागलं. (कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये मॅक्झिमम कॅल्शिअम असतं; ते बनण्यासाठी त्यांना आहारात एरवी कॅल्शिअम-रिच फुड देतात)

बाकी या कोंबड्यांचं नॉर्मल रुटीन नेहमीप्रमाणे चालू होतं. काही दिवसांच्या अंतराने या कोंबड्यांचं अंडी घालणं सुद्धा सुरू होतं. त्यावेळेला जी अंडी कोंबड्यांनी दिली, त्या अंड्यांचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण केलं गेलं. बराच काळ कॅल्शियमपासून या कोंबड्यांना वंचित ठेवलं होतं. या वस्तुस्थितीचा विचार करता या कोंबड्यांच्या अंड्यामध्ये कॅल्शियम आढळणं शक्य नव्हतं परंतु आश्चर्य म्हणजे जेव्हा कॅल्शियम विरहित अन्न दिलेल्या या काळात या कोंबड्यांनी जी अंडी घातली होती त्या अंड्यांमध्ये कॅल्शियम चे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं!!

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना! असेच काही प्रयोग काही वनस्पतींवर केले गेले; ज्यामध्ये या वनस्पतींच्या पोषणामधून त्यांना दिल्या जाणाऱ्या पाणी व खतामधून काही विशिष्ट मूलद्रव्यं वजा केली गेली, तरी सुद्धा या वनस्पतींच्या अंगामध्ये ठराविक मूलद्रव्यं जशी याआधीही बनत होती तशीच ती या प्रयोगानंतर सुद्धा बनत राहिली होती.

2) आता तुम्हाला मनाची सुसाईड म्हणजे नक्की काय ते समजावून सांगते. ही एक वास्तवात घडलेली सत्य घटना आहे. एका तरुण मुलाची. या मुलाच्या आयुष्यामध्ये लागोपाठ काही वाईट घटना घडत होत्य। त्याला त्यांचा तणाव सहन होत नव्हता आणि मनाला उभारी येईल असं काहीच समोर दिसत नव्हतं आणि घडत सुद्धा नव्हतं. दिवसेंदिवस तो खचत चालला होता. अतिशय यांत्रिकपणे आपण आयुष्य जगतोय, असं त्याला अधिक तीव्रतेने वाटायला सुरुवात झाली होती. असं नव्हतं की, त्याला कोणीच मित्र नव्हते. परंतु काही संकटांचा, प्रॉब्लेम्सचा सामना त्याला एकट्यालाच करावा लागत होता.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

शेवटी तो निर्णायक क्षण आला. एके दिवशी त्यांने मनाशी पक्क ठरवले की, आता आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाहीय. आपण आत्महत्या करायला हवी. हो, ही घटना थोडीशी गंभीर आहे. परंतु यातूनच मानसिकतेचा सिद्धांत तुमच्या समोर प्रसारित होणार आहे. तर या तरुणाने सुसाईड करण्याचं मनाशी ठरवलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा मुलगा त्याच्या ओळखीच्या केमिस्टकडे गेला. हा केमिस्ट त्याचा मित्र होता.

या मुलाने त्याच्या केमिस्ट कडे सहज उपलब्ध होणाऱ्या एका विषाची मागणी केली. ते विष कीटक वगैरे मारण्यासाठीचं होतं. त्याच्या केमिस्ट मित्राने त्याला एक विषारी औषधाची बाटली आणून दिल। ही बाटली घेऊन तो तरुण घरी गेला आणि त्याने ठरल्याप्रमाणे रात्री विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी हा मुलगा मृत अवस्थेत आढळला. त्याला असा अचानक मृत्यू आल्यामुळे साहजिकच पोलीस चौकशी सुरू झाली. पोलिसांनी बऱ्याच गोष्टींचा तपास लगेचच सुरू केला.

त्या मुलाचे तातडीने पोस्टमार्टेम केले गेले. त्याचा रिपोर्ट असा आला की विष प्राशन करून या मुलाचा जीव गेला होता पोलिसांनी साहजिकच पुढचा तपास सुरू केला. जवळपासच्या लोकांची, त्याच्या मित्रांची, मिळणाऱ्या प्रत्येक रेफरन्सची, पोलीस चौकशी सुरू केली.

त्यातीलच एक भाग म्हणून पोलीस जवळच असलेल्या त्या केमिस्ट कडे गेले आणि पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. केमिस्टला जेव्हा सांगितले गेले की, या तरुण मुलाने सुसाईड केले आहे, त्यावेळेला त्या केमिस्टला अतिशय दुःख झाले आणि खूप आश्चर्य वाटले. त्याने पोलिसांना जे सत्य आहे ते सांगितल। तो म्हणाला की, हा तरुण मुलगा माझ्या चांगल्या परिचयातील होता. ज्या दिवशी संध्याकाळी हा मुलगा माझ्याकडे कीटकांना मारण्याचं विष मागायला आला, त्यावेळेला तो अतिशय खिन्न, निराश दिसत होता.

त्याला पाहिल्यावरच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे विष हा मुलगा नक्की कशासाठी नेत असेल, असा प्रश्न माझ्या मनात आला. हे विष कदाचित त्याने स्वतःच घेतले तर, असा विचार मनात आल्यामुळे मी ठरवले की, मला उद्या ओरडा बसला तरी चालेल, याला खरोखरचे विष आपण द्यायचे नाही. एका बाटलीवर POISON असं लिहून मी ती साखरेच्या पाण्याची बाटली त्याला दिली होती.

पुढे त्याने पोलिसांना सांगितले की, आपण ही वस्तुस्थिती चेक करू शकता आणि जर तेच पाणी या तरुण मुलाने विष म्हणून घेतलं असेल, तर तो कसा काय मरू शकेल?? पोलिसांनाही अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्यांनी पुन्हा पडताळणी सुरू केली. त्यानुसार या मुलाच्या शरीरात विष सदृश्य कोणतेतरी द्रव आढळले आणि त्याचबरोबर ही (साखरपाण्याची) रिकामी बाटली त्याच्या खोलीत आढळली जी त्या केमिस्टने त्याला दिली होती. या बाटलीतलं द्रव जेव्हा पोलिसांकडून चेक केले गेले तेव्हा असं कळलं की केमिस्ट खरं सांगत होता.

या बाटलीमध्ये कोणतंही विष नव्हतं ते केवळ साखरेचे पाणी होतं, हे आता प्रयोगशाळेतही सिद्ध झालं होतं. सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. कारण या मुलाने खरोखरचे विष घेतलेच नव्हते. परंतु त्याच्या मनात म्हणजेच अंतर्मनात तयार झालेला आत्महत्येचा निर्धार आणि त्यासाठी विषाच्या बाटलीची सोय हे इतकं खोलवर स्वीकारलं गेलं होतं की, त्याच्या स्वतःच्याच मरण्याच्या निर्धारामुळे साध्या साखर पाण्याच्या सेवनाने सुद्धा त्याला मृत्यू आला. त्याच्या शरीराने साध्या साखर पाण्याचं विषामध्ये रूपांतरण केलं. आणि तो गेला.

आता या दोन्ही घटनांचं विश्लेषण पाहूया. 1) पहिली घटना ही शास्त्रज्ञांनी केलेला प्रयोग आहे. हा प्रयोग एकदा नाही, तर अनेकदा निसर्गातील अनेक गोष्टींवर केला गेला आहे. ज्यामध्ये बेसिक लेवलमधून, म्हणजेच मूळ तत्त्वामधून विशेष घटक हे काढून टाकले, नष्ट केले तरीही त्यातून पुढे वस्तूची जी ग्रोथ होते, त्या ग्रोथ मध्ये तो नैसर्गिक जीव किंवा ती वनस्पती आपल्याला हवी असलेली गोष्ट स्वतः बनवू शकते. म्हणजेच ही वनस्पती अथवा हा जीव त्याला वाढीसाठी मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टी मधून स्वतःच्या कल्याणासाठी पोषणासाठी आवश्यक असलेले कोणतेही द्रव्य स्वतः तयार करू शकतात. किती आश्चर्यकारक आहे हे!!

आणि आता 2) दुसरी घटना पाहू. या घटनेमध्ये, या तरुण मुलाचा दुर्दैवी अंत झाला. परंतु त्याच्या केमिस्टने तो वाचावा, म्हणून साधं साखरेचे पाणी त्याला देऊन सुद्धा, तो मुलगा गतप्राण झाला. कारण त्याच्या मनाने आणि सिस्टीमने त्या बाटलीतल्या द्रवाला, शरीरामध्ये घेत असताना, संपूर्णतः म्हणजे शंभर टक्के विष असल्याप्रमाणे स्वीकारलेलं होतं. (असं की, तू आता विष प्यायला आहेस, आता तू मर ही सूचना) त्यामुळे शरीरावर विष प्रयोग झाल्यानंतर शरीर मरतं, ही तीव्र धारणा सुद्धा मनाने आणि शरीराच्या सिस्टीमने स्वीकारलेली होती. त्यामुळे खरोखरच विष पोटात न जातासुद्धा या मुलाचा मृत्यू झाला कारण त्याच्या ‘मनाने सुसाईड’ घडवून आणले.

ही दोन्ही उदाहरणं आपल्या अस्तित्वाच्या क्षमतांची आहेत आणि आपल्या जीवन शक्तीची ताकद दाखवणारी आहेत. कोंबड्यांच्या पहिल्या उदाहरणांमध्ये कोंबड्यांना आपल्या अन्नातून कॅल्शियम काढून घेतलं आहे हे जरी माहीत नसलं, तरी त्यांच्या शरीराला – आता तुला अन्न मिळालं आहे. आता तू त्याचं पोषण निर्माण कर आणि त्याचा प्रॉपर उपयोग करून घे, ही सूचना आपोआप प्राप्त झाली आणि त्यानुसार त्या कोंबड्यांच्या शरीरात उपलब्ध असलेल्या गोष्टींमधूनच आपोआप कॅल्शियम निर्माण झाले व परीक्षणात आढळले.

म्हणजेच आपल्या अंतर्मनामध्ये आणि शरीराच्या सिस्टीममध्ये किंवा आपण असं म्हणू की, आपल्या अस्तित्वाच्या प्रोग्रामिंग मध्ये मग ते मन असो, अथवा शरीर, स्वतःला हवं असलेलं, स्वतःसाठी घडवण्याची आणि निसर्गानुसार जीवनशक्ती वापरून परफेक्शन साधण्याची क्षमता निसर्गतःच असते.

वर लिहिलेली दोन्ही उदाहरणे, ही हेच दर्शवतात की, आपण आपल्या नैसर्गिक क्षमतांवर अढळ विश्वास ठेवला, तर आपण आपल्याला हवे असलेले बरंच काही प्राप्त करू शकतो.

तुम्ही म्हणाल की, आमचा तोच तर प्रॉब्लेम आहे. हा अढळ विश्वास कसा ठेवायचा, तेच मुळात समजत नाहीय. काही हरकत नाही. तुम्हाला अढळ विश्वास ठेवता नाही आला, तरी विश्वात्म्याकडे मागितलेल्या मागणीवर म्हणजेच तुमच्या संकल्पावर, तुमच्या इच्छेवर सतत डाऊट व्यक्त करू नका, नकारात्मक शक्यतांना पॉसिबिलिटीजना मनामध्ये घोळवत बसू नका. इतके करता आले तरी आपल्यातील अद्वितीय नैसर्गिक क्षमतांचा वापर आणि विकास करणे हे आपल्याला निश्चितच साधता येईल.

संमोहन थेरपी म्हणजे हिप्नोथेरपीतून (तुम्ही ज्याला हिप्नॉटिझम म्हणून ओळखता तेच शास्त्र) तुमच्या अंतर्मनामध्ये आपोआप गेलेल्या किंवा काही प्रसंगांमधून गेलेल्या ‘नकारात्मक सूचनांना’ काढून टाकण्याची अद्वितीय प्रोसेस होते. या नकळत अंतर्मनात गेलेल्या नकारात्मक सूचना म्हणजे तरी काय आहे तर ‘प्रोग्रामिंग मधील एरर’ म्हणजेच प्रोग्रामिंग मधील चूक / त्रुटी. कोणत्याही सॉफ्टवेअरला ऍक्टिव्हेट करणारे प्रोग्रामिंगच जर सदोष, अकल्याण करणारे व वेदनादायी असेल, तर ‘आउटपुट’ सुद्धा – तसेच नकारात्मकच मिळणार ना, इतकं हे समजायला सोपं आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीय. तुम्ही सुद्धा या अंतर्मनाच्या प्रोग्रामिंग मध्ये वर्षानुवर्ष खोल जाऊन बसलेल्या नकारात्मक सूचनांपासून मुक्त स्वत:ला मुक्त करु शकता आणि स्वतःचे हित आणि कल्याण साधू शकता.


तुम्हाला हा लेख कसा वाटला हे जरूर मला कळवा. फीडबॅक सांगा. या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. इतर सर्व लेखांप्रमाणेच हा लेख सुद्धा कॉपीराईटेड आहे. तरी या लेखाचा स्क्रीन शॉट काढून किंवा या लेखाला कॉपी-पेस्ट करून कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये. या लेखाची लिंक तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*