‘आमलकी एकादशी’: विशेष आध्यात्मिक महत्त्व | Spiritual Significance of Amalaki Ekadashi

‘आज इस रुपमें आकर नारायण मिल जाएंगे।’

विशिष्ट दिवशी म्हणजेच तिथीला एखाद्या झाडाचं, फळाचं नाव दिलेलं असतं. त्यादिवशी सृष्टीतील एक विशेष महत्त्वपूर्ण तत्त्व, त्या झाडात उतरलेलं असतं. एखादं औषध बनवायचं असतं, तेव्हाही आधी त्या ठिकाणी जाऊन आवाहन केलं जातं; मग विशेष योगाच्या दिवशी विधिवत त्या झाडाचा भाग (पंचांग : मूळ, साल, पान, फूल, फळ) काढला जातो.

आमलकी एकादशीचे महत्त्व:

आज ‘आमलकी एकादशी’ आहे. ही वर्षातुन एकदाच येते. ‘फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात’ येते. या दिवशी या झाडात विष्णु तत्त्व, अत्यंत प्रभावीपणे या आवळा वृक्षात उतरलेलं असतं. जसं नऊ रात्रींमध्ये ‘देवी तत्त्व’ प्रभावी असतं. शिवरात्रीला शिव तत्त्व प्रभावी असतं.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवासाठी बेलवृक्षाचे जसे महत्त्व असते, तसेच विष्णुसाठी आवळा प्रिय आहे. आवळ्याचे औषधी गुणधर्म तर आपण जाणतोच. पण या झाडाला साधनेच्या अनुषंगाने, आध्यात्मिक बाजुही आहे. कदाचित आपण हे जाणतच असाल.

आमलकी एकादशी ला आवळा वृक्षाखाली बसून विशेष साधना केल्यामुळे साधनेचे विशेष फल प्राप्त होतात. अर्थात शहरांमध्ये असे वृक्ष सहज सापडणं कठीण असेल! तरीही या दिवशी आपण विष्णुप्रिय आवळ्याचे नक्की पूजन व सेवन करावे. आमलकी एकादशीस आवळ्यामध्ये विष्णु चा निवास असतो. वृक्ष मिळाल्यास तुमच्या मनाने, भक्तीभावाने पूजा करा.

तर आज ही “आमलकी एकादशी” आहे. मी लहान असताना, एकदा बाबांनी मराठी कॅलेंडर आणायला सांगितलं आणि आमलकी एकादशी कधी आहे पहा, म्हणाले. आमलकी एकादशी हा कसा विशेष योग आहे, ते समजावून सांगितलं. तेव्हा खूप विस्मय वाटला होता!
आवळा त्रिदोषनाशक (कफ, वात, पित्त) आहे, हे सर्वज्ञात आहे. आजच्या दिवशी संपूर्णतः आवळा वृक्षाला आध्यात्मिक महत्त्व आहे.

थोडी विशेष माहिती:

आवळ्याच्या झाडामध्ये निरनिराळ्या देवदेवता वास करतात. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे असे मानले जाते. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो, म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात.

भोजनापूर्वी झाडाला श्रीफळयुक्त अर्ध्य देऊन झाडाखाली श्रीविष्णूची यथासांग पूजा करतात. काही भागात आवळ्याच्या झाडाच्या चारही बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. या सोहळ्याला ‘आवळी भोजन’ म्हणतात.

आवळ्याचे वैशिष्ट्य:

विषय निघालाच आहे, तर आवळ्याचे काही उपयोगही सांगते. बीपी, डायबेटिस, पचनविकार, स्मरणशक्ती कमी, वजन वाढणे, केसांच्या समस्या, डोळे विकार, स्त्रियांचे मासिक संबधित विकार, त्वचाविकार, इत्यादींवर आवळा कार्य करतो.

असो. तर आमलकी एकादशी च्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख होऊन बसून ‘ॐ धात्र्यै नम:’ मंत्र जपावा. विशेष सिद्धीसाधना, जप, मंत्रोच्चारण, एकदिवसीय अनुष्ठान इत्यादी आज आवळा वृक्षासन्निध बसून करावे.

अनेक रोगांवरील औषधांमध्ये आवळा कार्य करतो, हे आपण जाणतोच. शरीरशुद्धी करणारे त्रिफळा चूर्ण (आवळा-हरडा-बेहडा) तर तुम्हा सर्वांना माहितच असेल! तर या आवळ्याचे आध्यात्मिक महत्त्वही आपण समजून घ्यावे व पूजन करुन औषधी उपयोगांबद्दल कृतज्ञताही व्यक्त करावी.

॥ नारायण नारायण ॥


लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*