मानसिक समस्यांचा ‘चकवा’: Hypnotherapy (Deceptive Nature of The Mental Illness!)

Press PLAY and Listen to this article now!

बर्‍याचदा मानसिक आजार एखाद्या चकव्याप्रमाणे काहींच्या आयुष्यात रोल प्ले करतात. ते आजार असतात, पण नसल्याचा अभिनय उत्तमपणे करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ‘आधी मानसिक प्रॉब्लेम होता, पण आता गेलाय बहुधा,’ अशी बरी वाटणारी समजूत, व्यक्ती करुन घेत असतात. कारण nothing is visible in them. त्यांच्या जवळची माणसं सुद्धा गोड गैरसमजात असतात, की, याचं मध्येच कधीतरी बिनसतं. एरवी ठीक असतो.

हे जे ‘ठीक असणं’ आहे, हाच चकवा आहे.

कारण या मानसिक आजारांमुळे मन आणि सोबत शरीर सुद्धा (शारिरीक लक्षणं) प्रभावित होत जातं.

शरीरामधले छोटे छोटे आजार मोठ्ठा ब्रम्हराक्षस बनतात, तेव्हा कधीकधी उशिर झालेला असतो. अनुभवावरुन सांगतेय.

थोडं सोपं करुन सांगते. 

मानसिक उपचारांची आवश्यकता आहे, हे एकदाचं संपूर्णतः कनफर्म झाल्यावर व्यक्ती तशा शोधाला सुरुवात करते की, कुठे व कसे उपचार घ्यावेत. मग फोनवरच्या संभाषणानंतर एखादा थेरपिस्ट डोक्यात shortlist सुद्धा होतो. काहींच्या बाबतीत इथेच कहानीमें ट्विस्ट अवतरतो !!

ज्या थेरपिस्टकडे जावं असं मनोमन ठरवलं जातं, त्याचे संभाषणातील, सकारात्मक व्हायब्रेशन्स आपोआप मनावर फुंकर घालणारे असतात. मग ही जी तात्पुरती रिफ्रेशमेंट मिळालीय, त्याने तात्पुरतं तजेलदार वाटतं आणि मग पिडित व्यक्तीला त्याचं एक मन सांगतं की, ‘मला काय झालंय? काहीच्च होत नाहीय. नको घ्यायला उपचार वगैरे. अब सब CANCEL!

sunetra-javkar

इथेच आहे हा चकवा. मनोराज्यात हुकूमत गाजवणारा बुद्धीचा, विवेकाचा interference !!

आणि होतंय काय की, हा मानसिक आजार / समस्या दाबून टाकली जाते. मन आणि शरीरावरचा परिणाम गहिरा व क्रोनिक बनत जातो. 

मग अतिशय असह्य झाल्यावर परिस्थिती बरीच अस्ताव्यस्त बनलेली असते. एखादा / अनेक शारिरीक आजार या दडपणांमुळे बळावलेले असतात.

दिसत नाही हो मन डोळ्याला; पण सेन्स होतंय ना अहोरात्र? मग हातापायावर जखम झाली की काळजी घेता, तशी त्या मनाच्या ‘अंतर्भागातल्या जखमा’ वेळीच निस्तरायला नकोत का? उत्तर द्या. आपल्या पण आणि आपल्या जवळच्यांच्या पण.

तरी बरं मानसिक आजार कोणालाही असू शकतात; जे उचित उपचारांनी बरे होतात, हा अवेअरनेस तरी समाजात आलेला आहे.

खूपच हायपर अनकंट्रोलेबल सिच्युएशन असेल, तरच मेडिसीन्सकडे वळावं. अन्यथा नो! 

sunetra-javkar

संमोहन उपचार म्हणजेच हिप्नोथेरपी ही औषधविरहित थेरपी आहे. या क्षेत्रात मला स्वत:ला approx 23 वर्षं झालीत. 

मेडिसीन्सचा मारा करुन खूप मेटाकुटीला आलेली अनेक माणसं हिप्नोथेरपीने संपूर्णतः ठीक झाली आहेत. देर ना हो जाए, कही देर ना हो जाए…

वेळीच जागे व्हा. हिप्नोथेरपिस्ट कसली जादूबिदू करत नसतो, तर या हिप्नोथेरपीच्या साहाय्याने तुमचीच, स्वत:चीच 100 पैकी 90 % मानसिक ताकद फुक्कट जात असते, तिलाच तुम्ही वापरु लागता. 

स्ट्रेस, टेंशन, डिप्रेशन कोणाला नाहीय?!! मंदीचा फटका कोणाला बसला नाहीय? पण म्हणून आपला लाखमोलाचा जीव?

असो. बीपी, मायग्रेन, डायबेटीस, कसलेकसले गंभीर आजार डिटेक्ट / attract होईपर्यंत स्वत:ची वाट लावु नका. वेळेवर या मानसिक आजारांच्या चकव्यामधून जागे व्हा.

गुगल अथवा तत्सम कुठेतरी शोधून, किंवा कोणाच्यातरी प्रत्यक्ष अथवा सोशल मिडियावरील सक्सेस स्टोरीतून inspire होउन ज्या व्यक्ती संपर्क करतात, त्यांच्यातल्याच दोन ढोबळ category सांगते. (मानसिक समस्याग्रस्त)

पहिली category ही अशी असते पहा. —

sunetra-javkar

मानसिक समस्येतून बाहेर पडण्याचा पूर्ण निर्णायक विचार करुन, माझ्याकडे direct approach करणार्‍या आणि लवकरात लवकर उपचार घेऊन, बरे होऊन नव्या आयुष्याला सुरुवात करायचीय, हे sureshot ध्येय नजरेसमोर ठेउन लगेचंच ‘मला पहिल्या सेशनची appointment कधीची मिळेल?’ असं विचारणार्‍यांची ही पहिली category असते. यातल्या काही व्यक्ती तर, इथे पोहोचणं शक्य नसताना online counseling घेउन सर्व संपन्न करवून घेतात. 

आणि दुसरी category असते, — ती म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मी दु:खी आहे, मला कोण बाहेर काढणार या सर्वातून? असा प्रश्न मनात लाख वेळा घोळवून मग approach करणार्‍यांची. या सर्व बंधु भगिनींची, अनुकंपा वाटते. ती यासाठी की, यांना भविष्यातले ‘मी पूर्ण बरा / बरी झाले आहे’ हे स्वत:चं रुप imagin ही होत नसतं. (एखाद्या blurred image प्रमाणे दिसत असतं). या व्यक्ती एकदा संपर्क करतील; मग म्हणतील की, मी सांगेन हा नंतर. हा ‘नंतर’ कधी 2 – 3 महिन्यांनी येतो. कधी सहा महिने, तर कधी वर्ष दोन चार वर्षं! याल, तेव्हा खरं!

यात काही विशेष वाटण्यासारखं नाहीय. ‘मेरा टाईम कब आएगा?’ हे स्वत:ला विचारावं आणि निर्णय घ्यावा. रोज सूर्यचंद्रतारे येतजात राहणार आहेत. दुनिया स्वत:मध्ये मशगूल असणार आहे. आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. बरोबर ना?

Donation to dnyan power request
Find more About Us or Contact Us

भारतांतर्गत परराज्यातील व्यक्ती आणि परदेशात राहणार्‍या व्यक्तींसाठी online hypnotherapy  sessions  ची सुविधा आहे. आश्चर्य वाटलं असेल ना वाचून की, एवढ्या लांब अंतरावरील व्यक्ती कसा काय हिप्नोटाईज होईल? होतो. Hypnotherapy साठी काहीच impossible नाहीय! लवकर बरे व्हा. 

– डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 हिप्नोथेरपिस्ट, माईंड कौन्सेलर – महाराष्ट्र (भारत)

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Comment

1 Trackback / Pingback

  1. हिप्नोथेरपी सेशन्सची माहिती वाचा. संमोहन उपचार तज्ञ डॉ. सुनेत्रा जावकर महाराष्ट्र: भाग पहिला Everythi

Leave a Reply

Your email address will not be published.


*