तुम्ही हिप्नोटाईज होता, म्हणजे नेमकं काय होता, या विषयावरील लेखाचा हा दुसरा भाग आहे. अंतर्मनात जतन होणारा डेटा काय घडवतो आणि काय बिघडवतो, हे आपण पाहत आहोत.
एक सर्वसाधारण उदाहरण देते. लहान असताना आपण दात घासायला शिकतो. रोज रोज तेच तेच शिकून का होईना, आपल्या अंतर्मनामध्ये आपोआप ‘दात घासण्याचा प्रोग्राम फीड’ होतो. या फीड झालेल्या प्रोग्राम मधून इतक्या सहजपणे आपण पुढील आयुष्यात दात नेहमी घासत असतो की, आपल्याला त्याचं विशेष वाटत नाही. रोज कोणी आपल्याला समजावावे लागत नाही की, तू दात घास किंवा दात घासणे किती गरजेचे आहे, हे रोज रोज कोणाला आपल्याला सांगावे लागत नाही.
जसा लहानपणी फीड झालेला हा → दात घासण्याचा प्रोग्राम पुढील आयुष्यात ‘रोज दात घासणे’, ही क्रिया सहजतेने घडवून आणतो, त्याचप्रमाणे अनेक घटनांमधून, गोष्टींमधून किंवा व्यक्तींच्या थ्रू आपल्या अंतर्मनात काही ‘सूचना’ खोलवर गेलेल्या असतात. यातील ज्या सूचना सकारात्मक असतात, कल्याणकारी असतात, त्यांचे चांगले परिणाम आपल्याला खूप चांगले मिळतच असतात.
जसे की तुमच्या चांगल्या सवयी, शालेय वयामध्ये शिक्षकांकडून व वरिष्ठांकडून शिकलेल्या चांगल्या गोष्टी किंवा ऑब्झर्वेशनमधून शिकलेल्या चांगल्या गोष्टी, काही विशिष्ट कला, नैपुण्य हे सर्व आयुष्यभर आपले चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदतगार ठरतात.
त्याचप्रमाणे आजूबाजूला घडणाऱ्या (जाणतेपणी व अजाणतेपणी) नकारात्मक गोष्टी, घटना, तीव्र स्पंदनं यांचा डायरेक्ट परिणाम तुमच्या मनावर होत असतो. जसे शिक्षक मुलांना सूचना देतात, त्याप्रमाणे हे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम मनामध्ये म्हणजेच अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन बसतात.
आता कळलं का की, सॉफ्टवेअर मध्ये एरर कसा येऊ शकतो ते! हे जर वेळीच आपल्याला उमगलं नाही, म्हणजे रियलाईज झालं नाही, तर तुमच्याशी संबंधित भावनिक, मानसिक, शारीरिक, आणि या सर्वांच्या अनुषंगाने व्यावहारिक व सामाजिक गुंतागुंत वाढतच जाते.
अंतर्मनात साचलेले हे चुकीचे संदर्भ काढणं गरजेचं असतं हे फक्त आणि सर्वसाधारण कौन्सिलिंगने सॉल्व्ह होणं शक्य नसतं; तर ते संमोहित अवस्थेमध्ये अंतर्मनामध्ये प्रभावशाली पद्धतीने इम्प्लँट करणं गरजेचं असतं. कारण काय असेल, माहित आहे का? तुम्हाला काय वाटतं? अंतर्मनातील गुंते सोडवणं हे सोपं नाहीय. याचं महाकारण म्हणजे या गुंत्यांची डेप्थ (गहिरेपणा अथवा खोली) तुमच्या विवेकाला व बुद्धीला माहितीच नसते. जे समजतच नाहीय, ते आतून बाहेर काय 🔔 निघणार??!! चिवड्यासारख्या गोळ्या खाऊन तरी कसं निघणार?!!
डिप्रेशन, एन्जायटी, प्रचंड ताणतणाव, याने पीडित झालेली व्यक्ती जेव्हा माझ्याकडे येते, तेव्हा माझा एक प्रश्न असा असतो की, या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न केले आहेत का? स्वत:ला इलाजाची गरज आहे, हे ज्यांना थोडे पर्सेंट का होईना माहीत असतं, त्यांनी असे प्रयत्न करून झालेले असतात. वेगवेगळे उपचार ट्राय करून झालेले असतात. मोटिवेशनल लेक्चर्स, युट्युब वरील प्रेरणादायक व्हिडिओ वगैरे पाहून झालेले असतात. त्यांना घरातल्या अनेक किंवा काही सूज्ञ व्यक्तींनी समजावून झालेले असते. यातले काही जण तर अतिशय अगतिकपणे, मार्ग न मिळाल्यामुळे अंधारात चाचपडत (lost) असतात. तर काहीजणांनी स्वतःवर भरपूर पद्धतीने प्रयोग केलेले असतात. तर काही जण आत्महत्येच्या विचारांनी झाकोळलेले असतात. ईश्वरकृपेने अशा आत्महत्येचा ठाम विचार मनात तयार झालेल्या व्यक्तींना वाचवण्यात मला यश आले आहे. एक चांगले, समाधानी व चैतन्यपूर्ण आयुष्य ते जगत आहेत.
या सर्वांमध्ये कॉमन फॅक्टर हा आहे की, कळतंय पण वळत नाही! का बरं असं? या सर्वांना का बरं स्वतःहून मार्ग काढता येत नाही? तर सर्व प्रकारच्या नकारात्मकतेच्या फ्रिक्वेन्सी व ऊर्जा त्यांना आजही अक्षरशः त्रास देत असतात. हिप्नॉटिझमच्या स्लिप मध्ये म्हणजेच हिप्नोथेरपीच्या सेशनच्या डीप स्लिप मध्ये या सर्वांच्या प्रोग्रामिंग मध्ये खूप चांगले बदल (transformation) घडवून आणले जातात. त्यांचे जे काही ट्रिगरिंग पॉईंट्स आहेत, ट्रॉमा लेव्हल्स आहेत. या सर्वांच्या व्हायब्रेशन्स ना फ्रिक्वेन्सीज ना न्यूट्रल केले जाते.
थोडक्यात सांगायचे म्हणजे, तुमच्या कोणत्याही मेमरीला हिप्नॉटिझम अथवा हिप्नोथेरपी डिलीट करत नाही. तर त्या सर्वांचा तुमच्यावर असलेला खोल प्रभाव काढून टाकला जातो. परिणाम स्वरूप विशिष्ट गोष्टींना ट्रिगर होणं, एन्झायटीमुळे अस्वस्थ होणे बंद होतं, मनाचा चंचलपणा कमी होतो, मेंदू शांत होतो एकंदरच नकारात्मकता कमी होते.
आणि या सोबतच तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम वर सोल्युशन ठरतील, अशा अल्टिमेट व सायंटिफिक सूचना (म्हणजेच नव्या कल्याणकारी फ्रिक्वेन्सीज समजूया) अंतर्मनामध्ये फीड केल्या जातात.
अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे हिप्नोथेरपीचा अनुभव घेणारे अनेक व्यक्ती सांगतात की, या संमोहन निद्रेमध्ये आम्ही इतके रिलॅक्सेशन ( माईंड बॉडी आणि सोल सर्व लेवल वर)अनुभवले आहे, जितके आम्ही आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीच अनुभवले नव्हते.
थोडक्यात काय, तर ज्या मानसिक क्षमता वाढवण्याचा तुम्ही आयुष्यात बऱ्याच वेळा प्रयत्न करून झालेला असतो वेगवेगळे उपाय आजमावून झालेले असतात ती मानसिक क्षमता वाढल्यानंतर कसे एनर्जेटिक फील होते हा अनुभव तुम्हाला हिप्नोथेरपीच्या निद्रेमध्ये आपोआप येतो. म्हणून हा अनुभव तुम्ही नक्की घ्यावा कारण या थेरपीने तुमच्यात आमूलाग्र बदल घडणार आहे. ‘आमूलाग्र बदल घडणार आहे’ या वाक्याचा अर्थ असा की, तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून हिप्नोथेरपी घ्यायला आलेले असता, तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होतोच; पण त्यासोबतच तुमचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी बनतं आणि तुमच्या अनेक क्षमता उत्तम रीतीने विकसित होतात. एक सकारात्मक व्यक्ती, नुसतीच सकारात्मक नव्हे, तर जीवनाला पॉवरफुली हाताळण्याची ताकद असणारी एक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून तुम्ही विकसित होता. हट्टी, चिवट (stubborn) वाटणारे नकारात्मक मानसिक पॅटर्न्स बदलतात. तेही मनाच्या ताणविरहीत संमोहित अवस्थेत घडते. हे दोन दिवसाचं प्रोग्रामिंग नव्हे; तर कायमचं पुनर्वसन आहे.
जेव्हा संमोहन केले जाते, म्हणजेच हिप्नोथेरपिस्ट तुम्हाला संमोहित करतो, म्हणजेच तुमचे बाह्यमन काही काळासाठी तो शांत करतो. म्हणजेच बाह्यमनाची लुडबुड थोड्या वेळासाठी थांबवली जाते आणि तुमच्या अंतर्मनाला पूर्णपणे ओपन केले जाते नीट लक्षात घ्या → या प्रक्रियेमध्ये तुमची बुद्धी बंद नसते. परंतु काही काळासाठी अंतर्मन पूर्णपणे ऑन कंडीशन मध्ये असते. त्यामुळे सर्वसाधारण गप्पांमध्ये किंवा कौन्सिलिंग मध्ये जे साध्य करता येत नाही किंवा कष्टसाध्य आहे, ते कितीतरी पटीने प्रभावी असलेल्या या अवस्थेत, अंतर्मनात खोल जाणाऱ्या सूचना देऊन साध्य करता येते.
जे मानसिक आजार मेडिसिनने बरे करता येणे कठीण असते, ते हिप्नोथेरपीच्या माध्यमाने बरे होतात आणि ही थेरपी “ड्रगलेस थेरपी” आहे. म्हणजेच संमोहन निद्रेसाठी कोणतेही औषध दिले जात नाही. तर सायंटिफिक बेसयुक्त प्रभावी सूचनांच्या माध्यमातून व्यक्तीला संमोहनात नेले जाते व पुन्हा जागे केले जाते. हे लक्षात असू द्या की, संमोहन निद्रेची अवस्था ही डीप स्लिप ची अवस्था आहे. निद्रा म्हणजे झोप किंवा बेशुद्धी नव्हे!! फक्त ही झोप नॉर्मल झोपेहून वेगळी झोप आहे; ही तर एक “अलर्ट स्लीप” आहे. ही तुमच्या मनाची शिकण्याची अवस्था म्हणजेच ‘लर्निंग स्टेट ऑफ माईंड’ आहे.
मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच माध्यमांनी व वेगवेगळ्या मीडियाने संमोहन शास्त्राला खूपच कुप्रसिद्ध केले आहे. एका चॅनलच्या एका रहस्यमय सिरियल मध्ये तर एक अभिनेत्री, संमोहनात टाकून परकायाप्रवेश वगैरे करताना आणि रस्त्यावर चालणार्या तिच्या ओळखीच्या माणसाला ती स्वत:च्या घरात बसून संमोहित करते, असंही दाखवलं होतं. शुद्ध मूर्खपणा आहे हा! हे अशा अतिरंजित व धादांत खोट्या गोष्टींचा संमोहन उपचारांसोबत काडीचाही संबंध नाहीय, याची नोंद घ्यावी. संमोहन उपचार शास्त्र हे लोककल्याणकारी शास्त्र आहे. घात करणारं नाही.
तुम्ही अशा बातम्याही वाचत असाल की, हिप्नोटाइज करून लुटले किंवा अमुक माणसाने अमुक समूहाला हिप्नोटाइज केले. अमुक फॅमिलीला हिप्नोटाईज केल. हे असं काहीही खरं नाहीय. हिप्नॉटिझम किंवा हिप्नोथेरपी ही तुमची स्वतःची मानसिक व शारीरिक ताकद व आत्मिक बळ पुनरुज्जिवीत करून देणारी एक अद्वितीय थेरपी आहे. या थेरपीचा लूटमार किंवा वशीकरण या विषयाशी काहीही संबंध नाही. तसेच लेखाच्या सुरुवातीला जे वाक्य लिहिले आहे त्याचेही उत्तर देते की, ‘कोणीही हिप्नोटाइज अवस्थेमध्ये तसाच पडून कायमचा रहात नसतो.’ या उलट तो माणूस कमालीचा रिलॅक्स होतो.
हिप्नोथेरपी ही विशिष्ट प्रणालीमध्ये बांधलेली एक सायंटिफिक थेरपी आहे. हिप्नॉटिझम शो म्हणून जो शब्द तुम्ही नेहमी ऐकलेला असेल, त्याचा वापर मुख्यत्वेकरून स्टेज हिप्नोसिस मध्ये होतो. मात्र जेव्हा हेच हिप्नॉटिझम उपचारांसाठी वापरले जाते, तेव्हा त्याला “हिप्नोथेरपी” असे म्हणतात. आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की, या हिप्नोथेरपीच्या अद्वितीय आणि अल्टिमेट सकारात्मक परिणामांबाबत समाजामध्ये बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. त्यामुळे बरीच मानसिक समस्याग्रस्त माणसे हिप्नोथेरपी करून घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहे. हिप्नोथेरपी या नावानेच भुवया उंचावणं आता बंद झालं आहे.
एका गोष्टीसाठी मला तुम्हा सर्वांचं विशेष कौतुक करावसं वाटतं की, आपले मानसिक आरोग्य सध्या बिघडलेले आहे किंवा नकारात्मकतेच्या दारुण प्रभावाखाली आहे, आणि ते रिपेअर होणे अनिवार्य आहे, ही जाणीव तुम्हाला वेळेवर होत आहे आणि याच अवेअरनेसमध्ये या संमोहन उपचारांसाठी तुम्ही माझ्याकडे विचारणा करीत आहात आणि उपचार घेऊन पूर्ण बरे होत आहात. यानंतरच्या काही लेखांमध्ये मी – हिप्नोथेरपी सेशन्स मध्ये मला आलेले अनुभव – यावर लेखन प्रसिद्ध करणार आहे.
संमोहन उपचारांबद्दल माहिती देणारा हा लेख कसा वाटला, हे मला जरूर कळवावे. या सर्व लेखांची मी स्वतः लेखिका आहे आणि यात लिहिलेले सर्व लेखन म्हणजे माझे स्वानुभव आहेत. हे सर्व लेख कॉपीराईटेड आहेत. या लेखांचा कोणताही गैरवापर करू नये या लेखांचा स्क्रीनशॉट काढणे किंवा कॉपी-पेस्ट करणे असे काहीही करू नये. कॉपीराईट कायदा व कर्म सिद्धांत याचे उल्लंघन करू नये. तुम्ही या “लेखाची लिंक कुठेही शेअर करू शकता.”
अजून एक नेहमीचीच सूचना म्हणजे इथे या लेखासोबत जो मोबाईल नंबर मी दिलेला आहे, तो WhatsApp चा नंबर आहे. तुमची ओळख व तुम्हाला जी माहिती हवी आहे, त्या संदर्भातील एक सलग मेसेज, तसेच तुमच्या समस्येचा उल्लेख करणारा एक सलग मेसेज, तुम्ही WhatsApp वर पाठवू शकता. या नंबरवर डायरेक्ट फोन करू नये; आधी मेसेजच पाठवावा. त्याप्रमाणे first appointment plan केली जाईल. हा विषय नीट समजावा म्हणून विस्तृत व दोन भागांमध्ये लिहिला आहे.
डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.
अतिशय सुंदर लेख हिप्नॉटिझम संदर्भातील सर्व गैरसमज लोकांचे दूर होतील व त्यांना एक शांत व स्वच्छ मनाचे जीवन जगता येईल आपले मार्गदर्शन असेच सुंदर सुंदर लेख लिहून सुरू ठेवावे.
फीडबॅक बद्दल धन्यवाद 🙏