हिप्नोथेरपी सेशन्सची माहिती वाचा. संमोहन उपचार तज्ञ डॉ. सुनेत्रा जावकर महाराष्ट्र: भाग पहिला Everything About Hypnotherapy Sessions by Dr. Sunetra Javkar

नमस्कार. आज नमस्काराने सुरुवात!! हो. कारण ब्लॉग प्लॅटफॉर्म वर कोणतं वादळ लेख लिहितंय, अनेकांना माहित नाहीय!! तसंच माझ्या क्लिनिकलाही कोणकोणते उपचार व अन्य उपक्रम चालतात, त्याची माहितीही अनेकांना जाणून घ्यायचीय, ती माहिती सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच. माझी ओळख सांगण्याआधी हे सांगते की, जे आहे ते ईश्वराचंच आहे. माझं नाही.

माझं नाव डॉ. सुनेत्रा जावकर. गेली जवळजवळ 23 वर्षँ मी संमोहन उपचार म्हणजे (हिप्नोथेरपी) आणि निसर्गोपचार या क्षेत्रात काम करत आहे. सर्व मानसिक आजार, मनोशारिरीक आजार, शारिरीक आजार यावर मी उपचार देते. (निसर्गोपचार अंतर्गत) वनौषधी ची औषधं बनवून देते. (विदाउट प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स) बाकी माहिती ओघाओघाने सांगतच राहीन. पण तातडीने हा लेख लिहायला घेतला; कारण माझे ब्लॉग आर्टिकल्स वाचून अनेक नविन मंडळी अ‍ॅप्रोच करत आहेत. त्यांना या लेखाची लिंक मला शेअर करता येईल. 1 + 4 pattern मध्ये माझे online आणि one to one जे हिप्नोथेरपी सेशन्स असतात, त्याबद्दल सांगते.

असो. FAQ नुसार आता माहिती देते. एका गोष्टीची जरा नोंद घ्या: या लिंक्सना क्लिक करा. हिप्नोथेरपीबद्दल उत्तम माहिती आहे — भाग 1 व 2

मराठीत पहिल्यांदाच हिप्नोथेरपीची इतकी विस्तृत माहिती: “तुम्ही हिप्नोटाईज होता म्हणजे नेमकं काय होतं – दोन भाग. हिप्नॉटिझमद्वारे (संमोहन) उपचार कसे केले जातात, त्यावर भाष्य करणारे हे दोन लेख आहेत. वाचा आणि नक्की फीडबॅक सांगा. 

1) कोणी हिप्नोथेरपी उपचार करुन घ्यावेत? ही यादी पहा. – डिप्रेशन, एंझायटी, निगेटिव्ह थिंकिंग, स्ट्रेस, आत्मविश्वास अभाव, व्यसने, वाईट सवयी, सुसायडल टेंडन्सी, एकाग्रतेचा अभाव, OCD, PTSD, वेगवेगळे फोबिया, न्यूनगंड (inferiority complex), स्टेज फिअर, ह्रदय धडधडणे, बीपी वॅरिएशन्स, पेप्टिक अल्सर (आश्चर्यकारक आहे, पण खरं आहे. भावनिक ताणामुळे हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड वाढून पेप्टिक अल्सर होतो), दमा, काही अ‍ॅलर्जीज्, डोकेदुखी,वात, डायबेटिस, निद्रानाश (इनसोमनिया) यासारखे अनेक आजार असतील, तर हिप्नोथेरपी घेण्यासाठी संपर्क करा. तसेच रिलेशनशिप इश्यूज, वैवाहिक जीवन समस्या यांवरही हिप्नोथेरपी वर्क करते. ©

वर लिहिलेले सर्व आजार गेल्या तेविस वर्षात हाताळले आहेत. मानसिक आरोग्य (mental health) या विषयांतर्गत जे काही विकार, आजार, समस्या येतात, ते सर्व हिप्नोथेरपीने दूर करता येते.

2) एक बाब लक्षात घ्या. हिप्नोथेरपी फक्त आजारी व्यक्तीसाठीच केली जाते असे नाहीय. व्यक्तिमत्त्व विकासांतर्गत ज्या गोष्टी येतात, (सर्वच क्षेत्रातील) त्या सर्व गोष्टींवर हिप्नोथेरपी पॉवरफुली वर्क करु शकते. स्पर्धापरीक्षा व करियर संबंधित ग्रोथसाठी अनेक जण येत असतात. ©

3) हिप्नोथेरपी सेशन्सचं स्वरुप काय? पहिलं असतं Introductory session. याचा अवधी असतो 50 mins. यामध्ये काय असतं? तर या 50 मिनिटांमध्ये काही चर्चा केली जाते. अर्थातच या 50 मिनिटांमध्ये तुम्हाला खूप डीप मध्ये तुमची कहाणी सांगण्याची काहीएक गरज नसते. कारण या 50 मिनिटांमध्ये मी तुमच्याशी निगडित अनेक गोष्टींचं निरीक्षण व अभ्यास करत असते. अनेक लेवलला तुमचं परीक्षण करत असते आणि त्यानुसार तुमच्या केसचा अथवा तुमच्या प्रॉब्लेमचा मला व्यवस्थित अंदाज येतो. हे 50 मिनिटाचे सेशन कधी कधी पाच दहा मिनिटे लांबतं; इट्स ओके. या सेशनमध्ये मी तुमची सजेस्टिबिलिटी (सूचनाग्राहकता) सुद्धा चेक करते. पुढील दोन / तीन दिवसांनंतर तुम्हाला फोन केला जातो. यात पुढच्या सर्व सेशन्सबाबत डिस्कशन केलं जातं. पुढचं शेड्युल काय आहे, कसं आहे, त्यात किती दिवसांची गॅप द्यावी, इत्यादी गोष्टी डिस्कस केल्या जातात. ©

4) आता पुढच्या मेन हिप्नोथेरपी सेशन्सबद्दल माहिती सांगते: हे पुढचे सेशन्स टोटल 4 असतात. माझी वेळ आणि शक्य तितका तुमच्या वेळेचा कन्व्हिनिअन्स या दोन्हीचा समन्वय साधून त्याप्रमाणे पुढचे सेशन्स डिझाईन केले जातात. या 4 मधील प्रत्येक सेशन 100 मिनिटांचं असतं. बऱ्याचदा हे 100 मिनिटांचं सेशनसुद्धा पुढची पंधरा-वीस मिनिटं लांबतं. एकंदर विचार करता हे सर्व सेशन्स कम्प्लीट होण्यासाठी टोटल दीड महिना लागतो. म्हणजेच तुमच्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन किंवा तुमची समस्यामुक्ती दीड महिन्याच्या हिप्नोथेरपी सेशन्सच्या माध्यमातून संपूर्ण केली जाते. ©

5) म्हणजे संपूर्णतः बरे होण्यासाठी नक्की किती टोटल सेशन्स असतात? याचे उत्तर आहे, 1 + 4 pattern. पहिलं इंट्रोडक्टरी सेशन आणि नंतरचे 4 मेन सेशन्स असं मिळून या हिप्नोथेरपीचा हा 1 + 4 पॅटर्न आहे. आता थोडी माहिती मी या मेन चार हिप्नोथेरपी सेशन्सबद्दल देते. या चार सेशन्सचे स्वरूप असे असते – हिप्नोकौन्सिलिंग व हिप्नोथेरपीच्या स्लिपची ही 4 सेशन्स असतात. (म्हणजेच संमोहन निद्रा) ©

6) सर्वांसाठी हाच सेम पॅटर्न असतो का की काही बदल सुद्धा होतात? – या प्रश्नाचे उत्तर असं आहे की, मी वर जी माहिती दिलेली आहे, ती माहिती उपचारांसाठी आलेल्या कोणत्याही ‘जनरल’ उपचार उत्सुक व्यक्तीसाठीची माहिती आहे. “यामध्ये बदल होऊ शकतो.” तो असा की, जर मानसिक उपचारांसाठी आलेली व्यक्ती ही अतिशय किंवा काही प्रमाणात हायपर ऍक्टिव्ह असेल, तिची लक्षणं सिवियर असतील, तसंच तिचा हा आजार / प्रॉब्लेम अतिशय क्रॉनिक झालेला असेल, तसेच ही व्यक्ती अनेक वेळा यापूर्वी केमिकल औषधांचा प्रयोग स्वत:वर बराच काळ करून झालेली असेल, अशा व्यक्तींसाठी या सेशन्सचं स्वरूप बदलू शकते. हा बदल म्हणजे 1+4 या हिप्नोथेरपी पॅटर्नमध्ये 5th किंवा 6th सेशन ॲड केलं जाऊ शकतं आणि अर्थातच या सेशनची संख्या या पर्टिक्युलर व्यक्तीच्या बरं होण्याच्या रिस्पॉन्सवर सुद्धा अवलंबून असते. ©

7) आता जरा थोडक्यात हिप्नोथेरपी सेशन्सचं स्मॉल डिस्क्रिप्शन सांगा: तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माझ्या सेंटरला होणाऱ्या हिप्नोथेरपी सेशन्सचा पॅटर्न 1 + 4 असा आहे आणि साधारणपणे या प्रोसेसला दीड महिना लागू शकतो. ©

8) हिप्नोथेरपी सेशन्ससाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तीसाठी काय नियम आहेत? ज्यांना हिप्नोथेरपी स्वतःसाठी हवी आहे, त्यांच्यासाठीचे नियम असे आहेत की, तुम्हाला माझा जो नंबर प्राप्त झालाय, तो व्हाट्सअपचा नंबर असून, तुमचा प्रॉब्लेम थोडक्यात एका सलग मेसेजमध्ये लिहून तो व्हाट्सअप वर पाठवावा. तुटक भरपूर मेसेजेस करु नयेत आणि या मेसेजच्या आधी तुमचं संपूर्ण नाव व्हाट्सअप मेसेज मध्ये लिहून पाठवावं. तुमचा व्हाट्सअप मेसेज मिळाल्यानंतर आवश्यकतेनुसार तुमच्याशी फोनवर पाच ते सात मिनिटाचं संभाषण केले जाईल. या संभाषणात तुमच्यासाठी जे इंट्रोडक्टरी सेशन अरेंज करायचे आहे, त्याची अपॉइंटमेंट तारखेसहित तुम्हाला दिली जाईल. ©

9) इथे कधी कधी असं घडतं की, ज्याने फोन केलेला असतो किंवा मेसेज केलेला असतो त्या व्यक्तीला स्वतःला ही हिप्नोथेरपी ट्रीटमेंट नको असते; तर त्याच्या परिचित व्यक्तीला किंवा नातेवाईक व्यक्तीला ही हिप्नोथेरपीची ट्रीटमेंट हवी असते. अशा वेळेला पुढील गोष्ट अनिवार्य आहे, याची नोंद घ्यावी. – ज्या व्यक्तीला तुम्ही हिप्नोथेरपीसाठी आणणार असाल किंवा जिच्यासाठी तुम्ही चौकशी करत असाल, त्या व्यक्तीला आपण अपॉइंटमेंटच्या दिवशी कुठे जाणार आहोत, कशासाठी जाणार आहोत, याची संपूर्ण कल्पना द्यावी. ©

10) कोणतीही जोर जबरदस्ती करून व्यक्तीला हिप्नोथेरपीसाठी आणू नये. पीडित व्यक्तीने हिप्नोथेरपी साठी येण्यासाठी होकार द्यावा, म्हणून व्यवस्थित वेळ घेऊन प्रयत्न करावे. ही सूचना सांगण्यामागचं कारण असं आहे की, हिप्नोथेरपी ही ड्रगलेस थेरपी आहे. कोणतंही औषध देऊन हिप्नोथेरपीची स्लिप आणली जात नाही. सर्व काही मानसिक पातळीवर निर्माण होणाऱ्या कनेक्टिव्हिटी वरच घडत असते. त्यामुळे ज्या व्यक्तीला संमोहन उपचार म्हणजे हिप्नोथेरपी हवी आहे, त्या व्यक्तीचा जर प्रचंड विरोध असेल, अशा वेळेला हिप्नोथेरपी केली जात नाही, याची नोंद घ्यावी. So take your time thoroughly. ©

11) तुमच्याकडून पुढची रिक्वायरमेंट अशी आहे की, तुम्ही जेव्हा हिप्नोथेरपी सेशनसाठी क्लिनिकमध्ये येणार असाल, त्यापूर्वी त्या दिवशी अथवा आदल्या दिवशी तुमची झोप व्यवस्थित पूर्ण झालेली असावी किंवा जर झोपेचा प्रॉब्लेम घेऊन येत असाल, तरी निदान शरीराला थोडाफार आराम दिलेला असावा.

12) ज्याला हिप्नोथेरपीची ट्रीटमेंट घेऊन स्वतःला बरं करायचं आहे, अशी व्यक्ती जर हिप्नोथेरपी क्लीनिक पासून बऱ्याच लांब अंतरावर राहत असेल जिथून वेळोवेळी थेरपीसाठी येण शक्य नसेल किंवा त्या व्यक्तीची शारीरिक अथवा मानसिक कंडिशन क्लिनिक मध्ये पोहोचण्यासारखे नसेल किंवा हिप्नोथेरपी साठी उत्सुक असलेली व्यक्ती (राज्याबाहेर / देशाबाहेर) दूर अंतरावर राहत असेल, त्यांच्यासाठी सोयीची बाब म्हणजे, मी सर्व हिप्नोथेरपी सेशन्स ऑनलाइन सुद्धा घेते.©

13) आजवर अनेक वर्षं असे ऑनलाइन हिप्नोथेरपी सेशन्स मी घेत आहे. काही जणांना मनात असा विचार येतो की, भारतात एका ठिकाणी क्लिनिक मधील हिप्नोथेरपिस्ट भारताबाहेरील दूर अंतरावरच्या देशातील व्यक्तीला हिप्नोटाईझ करून कसं काय बरं करू शकणार? तर या प्रश्नाचे उत्तर आहे की, कितीही लांब अंतरावर हिप्नोथेरपी उत्सुक व्यक्ती राहत असेल, तरीही अशा व्यक्तीचे सर्वच्या सर्व हिप्नोथेरपी सेशन्स online घेता येतात आणि तेही तितकेच सक्सेसफुल होतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे लांब अंतराची चिंता सोडावी! ©

14) वर लिहिल्यापैकी कोणत्याही विषयासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. स्वत:ची लक्षणं वेळीच ओळखायला शिका. सुदैवाने तुम्ही अशा काळात वावरत आहात, जिथे मानसिक समस्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन निरोगी आहे. या मानसिक समस्यांचा कसा ‘चकवा’ असतो, हे मी याच WORDPRESS वरील एका लेखात स्पष्ट केले आहे. आता पुढील लेखात हिप्नोथेरपी ने सोल्युशन मिळेल, अशा गोष्टींबाबत माहिती देणार आहे. ©

हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल; पण अन्य कोणालातरी या माहितीची नितांत गरज असू शकेल. आपल्या कमेंट्स चं स्वागत आहे. हा लेख कसा वाटला, ते मला नक्की कळवावे. या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. हे लेख copyrighted आहेत. copyright कायद्याचे, आणि कर्म सिद्धांताचे – कोणीही स्क्रीनशॉट किंवा copypaste, तत्सम माध्यमातून उल्लंघन करु नये. तुम्हाला लेख शेअर करावासा वाटला तर या लेखाची लिंक (नावासहित आहे) शेअर करावी. धन्यवाद. ©

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. Spiritual & Mental Health Blogger.

6 Comments

    • खूप छान माहिती मिळाली मला उपचार करून घ्यायचे आहेत.फी किती आहे

    • खूप छान माहिती मिळाली.मला उपचार करून घ्यायचे आहेत फी किती होईल

Leave a Reply