सुपरह्युमन बनता बनता ‘विंचू चावला’! पॉवरफुल विचार: Thoughts Create The Reality!

Press PLAY and Listen to this article for free!

आपल्याला उभ्या आयुष्यात हवा कशी दिसते, हे माहीतच नाहीय. तरीसुद्धा हवा आहे, हे सत्य आपण सहजतेने स्वीकारतो. या विश्वामध्ये अनेक सूक्ष्म शक्ती कार्यरत आहेत. त्यांना जरी आपण नजरेने पाहू शकलो नाही, तरी त्यांचे अस्तित्व आपण स्वीकारत असत।

उष्णतेमुळे उकळणाऱ्या पाण्यातून बाहेर पडणारी वाफ आकाशाकडे जाताना आपल्याला दिसत नाही. पण तरीही आपल्याला या वाफेचे अस्तित्व मान्य असतं आणि ते अस्तित्व सर्व संमतही आहे. त्याचप्रमाणे विचारांना उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. पण पाणी, धूर किंवा वाफ यांच्याप्रमाणेच विचारांचे तरंग नेहमी आसमंतात वाहत असतात. विचारांच्या तरंगांमध्ये ही अद्वितीय ताकद असतेच. ज्यामुळे ते विचार आपल्यासारख्याच अन्य अनेक विचारांना अतिशय शीघ्रतेने व सहजतेने एकत्रित करू शकतात.

तुम्हाला मी एक गंमत सांगू का, जर तुमच्या डोळ्यात विचारांच्या तरंगांना पाहण्याची शक्ती असली असती, तर तुम्हाला दिसलं असतं की प्रत्येक मनुष्याच्या डोक्यामधून विजेचे वायुसारखे दिसणारे असंख्य तरंग आकाशामध्ये प्रसारित होत आहेत!! रंगीबेरंगी, वाकड्यातिकड्या, नागमोड्या, कधी मोकळ्या, तर कधी गुंतागुंत झालेल्या लाखो करोडो विचारलहरी!!!

Watch on YouTube!

एक उदाहरण सांगते. नजरेसमोर पहा हां. दिवसा एखाद्या ठिकाणी पालापाचोळा एकत्र करून आग लावलेली असते. ती आग पेटत असताना जो धूर वरती चाललेला असतो. त्याच्या आरपार जेव्हा आपली नजर जाते, तेव्हा आपल्याला जणू काही पाठीमागील दृश्य नागमोडी हलताना दिसते ना, अगदी तस्संच वर सांगितलेले इमॅजिनेशन आहे.

तर असा विचार करा की, समोरच्या व्यक्तीचे हे सर्व विचार तुम्हाला त्याच्या डोक्यामधून बाहेर पडताना दिसतात. अशा वेळेला मनुष्य जेव्हा स्वतःचे विचार बदलतो, त्यावेळेला बाहेर पडणाऱ्या या तरंगांचे रंगरूप सुद्धा बदलत असते. उदाहरणार्थ, त्या मनुष्याच्या मनात दयेचे मायेचे करुणेचे विचार येत असतील, तर तेव्हा त्या वेळेला आतून बाहेर पडणारे तरंग, विशिष्ट रंगाचे असतील; तर जेव्हा त्या व्यक्तीच्या मनात कपटाचे, जेलसीचे विचार येत असतील, त्या वेळेला या विचार तरंगांचा रंग बदललेला असेल. म्हणजेच वेगवेगळ्या भावभावनांनी युक्त विचारांच्या तरंग लहरी या अक्षरशः वेगवेगळ्या रंग रूपाच्या असतात.

एकाच विषयाचा विचार वेगवेगळी माणसं करत असतील तर मात्र त्यांचे ( विचार लहरींचे ) रंगरूप एकसारखे दिसू शकते. या विचार लहरी सेम टू सेम असल्याकारणाने त्या एकमेकांना जाऊन भेटतात. अनेकदा ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, विचारांमध्ये सुद्धा आकर्षणाची शक्ती असते. एक विचारलहर सेम विषयाच्या दुसऱ्या विचार लहरीला आकर्षित करत असते.

आपल्यापासून कित्येक योजने दूर असलेल्या विचारलहरी, अक्षरशः काही सेकंदात आपल्या विचार लहरींना येऊन भेटू शकतात. सम्मिलित (एकत्र होणे) होऊ शकतात. इतका विचारांचा वेग विलक्षण असतो. अवकाशात तरंगणाऱ्या वेगवेगळ्या अशा विचार लहरी, ज्या काळाच्याही मापामध्ये बांधल्या गेलेल्या नसतील, अशा विचार लहरी आणि तुम्ही आता स्वतः मधून प्रसारित करत असलेल्या विचार लहरी – यांचा विषय जर सेम असेल, तर त्याही एकत्र मिसळून जातात आणि तुम्हाला कळतच नाही की, तुम्ही अधिकाधिक नकारात्मक किंवा निराशावादी बनत जात आहात.

जेव्हा माणसं वाईट स्वरूपाचे विचार करतात, तेव्हा त्या विचार लहरी अधिकाधिक तीव्र व वाईट स्वरूपाच्या बनत जातात. एका महापुरुषाचे बोल सांगत। ते असे की, जेव्हा तुम्ही म्हणता, ‘मी जीव आहे, तेव्हा तुम्ही एक जीव असता आणि जेव्हा तुम्ही म्हणता, ‘मी शिव आहे.’ तेव्हा तुम्ही शिव असता. त्यांच्या बोलण्याचं तात्पर्य हेच आहे की, तुम्ही जे स्वतःला समजता, त्याप्रमाणे त्या दर्जाचे विचार तुम्ही करत असतात आणि तुम्ही तशाच टाईपचे बनत असता.

चांगले व सकारात्मक विचार करा.

सायकॉलॉजीच्या एक अभ्यासक श्रीमती मेरी कोरली यांनी त्यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकात नैराश्य, भित्रेपणा आणि उदासीनता यांनी भरलेल्या नकारात्मक विचारसरणीबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्या कथेमधील एका पात्राचं नाव हरलँड आहे. ही मुलगी आपल्या आजाराबद्दल एका माणसाला सांगत असते, तेव्हा ती म्हणते की, जेव्हा मला पाहून कोणालातरी दुःख होतं, त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि ते लोक हे सहानभूती प्रकट करतात, तेव्हा मला खूप छान फील होतं. मला नेहमी असं वाटतं की, कोणीतरी मला सतत सहानुभूती द्यावी आणि मला धैर्य वाढवणाऱ्या गोष्टी सांत्वन करतात, तशा सांगत राहाव्यात. (pampering of negativeness) माझ्या हृदयात नेहमीच चिंता, अनिश्चितता आणि दुःखाचे विचार येत असतात.

जेव्हा मी या दुनियेचा विचार करते, तेव्हा माणसांबद्दल मला नेहमी असंच वाटतं की, हे संपूर्ण जग दु:खी माणसांनी भरून गेलेलं आहे. कितीतरी माणसं ही अश्शीच दु:खी, कमनशिबी आहेत आणि एका ठिकाणी गोळा होऊन पडलेली आहेत. बरीच दुःख भोगत आहेत. जेलमध्ये आपल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणारे कैदी आहेत. हॉस्पिटलमध्ये असहाय, लाचार अवस्थेत पडलेले रुग्ण आहेत. अनेक ठिकाणी भुकेने कळवळणारे, तहानेने तडफडणारे लोक आहेत. दरिद्री अवस्थेमध्ये भटकणारे भिकारी आहेत. दुःखाने विलाप करणारी माणसं आहेत. हे सर्व सर्व मला नेहमी जाणवत असतं आणि मला वाईट वाटतं, म्हणून मी रडत बसते. मला नेहमी असं वाटतं की, हे जीवन म्हणजे दुःखाचा एक महासागर आहे. पूर्ण जगात सुखाचा लवलेशही नाही आहे.

अगदी खरोखर सांगा, हे सगळं वाचल्यावर तुम्हाला स्वतःला कसं फील झालं? ही सर्व वाक्यं तुम्ही वाचलीत, त्यात एकही वाक्य चांगलं फिलींग देणार नाहीय. अस्संच वाटलं, बरोबर ना? सगळी वाक्यं दुःखाने, निराशेने, वेदनेने भरलेली दिसत आहेत.

खरोखरच या हरलँड नावाच्या मुलीला वाटत होतं की, आपण का बरे होत नाही होत? पण खरं सांगायचं तर तिच्या या दुःखाने ओतप्रोत भरलेल्या विचारांमध्येच तिच्या सततच्या आजारपणाचे रहस्य दडलेलं होतं. हे वाक्य पुन्हा एकदा वाचावे.

या विचारांचं कसं असतं माहितीय का? जेव्हा तुम्ही विचार करत असता, तेव्हा हे विचार आधी एक स्वरूप धारण करतात आणि हे जे काही स्वरूप (आकार म्हणू शकता) धारण केलेलं असतं, त्याचा परिणाम सर्वात प्रथम ज्यांनी त्यांना जन्माला घातले (तुम्ही स्वत: जन्माला घातले) त्यांच्यावरच प्रथमतः करत असतात. थोडक्यात विचार तुम्ही करत आहात, तर तुमचे विचार सर्वात आधी तुमच्यावर परिणाम करत असतात.

अति गंभीर होतंय हे राव!! ओके ओके, फाईन. आता मी एकदम परफेक्ट उदाहरण सांगते. तेही प्राणीजगतातलं उदाहरण. ज्याला यातलं काहीसुद्धा कळत नाही, अशा प्राण्याचं. विंचवाचं. तुम्हाला याबद्दल नक्कीच माहीत असेल. बरं काय माहिती आहे विंचू बद्दल? एवढेच की विंचू खूप विषारी असतो आणि त्याच्या डंखामुळे जीवही जाऊ शकतो. विंचवाबद्दल अजून काय माहिती आहे तुम्हाला?

जेव्हा विंचवाच्या पिल्लांचा जन्म होतो, त्यावेळी ही सर्व पिल्ले सर्वप्रथम आपल्या आईचं मांस खाऊन टाकतात आणि त्यानंतरच ते स्वतःचं भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. OMG फॅक्ट!! किती दुःखद आहे ना!! ज्यांना हे फॅक्ट माहित नव्हतं असेल, त्यांना नक्कीच खेद वाटला असेल आणि ज्यांना हे ऑलरेडी माहित होतं, त्यांना वाटत असेल की, या वास्तवाचा इथे काय संबंध आहे? तर आहे, नक्कीच संबंध आहे.

ज्या विचारांना तुम्ही भीती, काळजी, कपट, जेलसी पोटी जन्माला घालता, ते विचार काही वेळातच एक पॉवरफुल रूप धारण करतात आणि ते सर्वात प्रथम आपल्याला जन्म देणाऱ्याला म्हणजेच तुम्हाला इजा पोहोचवतात. आता सांगा बरं, आपल्या स्वतःच्याच विचारांनी आपलं काय होऊ शकतं, हे तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने या आधी कोणी समजावून सांगितलं होतं का? हं??

या जगामध्ये सर्वात शक्तिशाली वस्तू कोणती आहे? तर ती विचार आहे. असा कोणताही विचार नाहीय, ज्याचा चांगला किंवा वाईट प्रभाव पडत नाही. जेव्हा आपल्या हृदयात घृणेचे, जेलसीचे, कपटाचे विचार यायला सुरुवात होते, तेव्हा तुमच्या आतून, तुम्ही विषाचे तरंग बाहेर टाकत असता. हे तरंग आसमंतामध्ये पसरतात आणि तुमच्यासकट, जवळपासच्या सर्वांचे नुकसान करतात. कलियुग आहे हो!! त्यामुळे पहिल्यांदा नकारात्मक विचार तरंगाचंच विश्लेषण सांगावं लागतं!!

जेव्हा तुमच्या हृदयात, मनात प्रेम, कृपा, आनंद, हर्ष, करुणा, ममता अशा भावांचे विचार उगम पावतात, तेव्हा त्या विचार लहरी आजूबाजूच्या आसमंतामध्ये शांततेचा, समाधानाचा, आनंदाचा फैलाव करतात. फलश्रुती हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेलच ना. तुमच्या प्रत्येक विचारांमध्ये या फलश्रुतीची इतकी पावरफुल शक्ती दडलेली आहे, जितकी शक्ती या विश्वात दुसऱ्या कोणत्याच गोष्टींमध्ये नसेल.

श्री. रॉल्फ वॉल्डो ट्राईन नावाचा एक थोर विचारवंत, तत्वज्ञानी निसर्गप्रेमी अभ्यासक होता. एकदा असं झालं की, त्याचा एक मित्र दु:खी होता व तो त्याला सांगत होता की, ‘माझे वडील नेहमी चिंताग्रस्त असतात.’ त्यावर श्री. रॉल्फ ताबडतोब म्हणाले की, हो. मला माहितीय, त्यांची तब्येत ठीक नाही आहे. ते नेहमी अशक्त, निरुत्साही आणि दुःखी राहतात.’ मित्र त्यांच्याकडे बघतच बसला.

हे उत्तर ऐकल्यावर त्या मित्राला खूप आश्चर्य वाटलं त्याने विचारलं की, तुम्ही तर माझ्या वडिलांना ना कधी पाहिलं, ना कधी त्यांचा आवाज ऐकला, मग तुम्हाला कसं कळलं की, ते नेहमी आजारी असतात त्यावर विचारवंत रॉल्फ हसला व त्याने असं उत्तर दिलं की, जो माणूस सतत काही ना काही कारणाने चिंताग्रस्त असतो, तो कधी ना कधी आजारी पडतोच. तो दुःखी होत असतो आणि अशक्त हे असतो.

आज छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाला माहित आहेत. अतिशय लहान जीवन काळामध्ये त्यांनी गाजवलेलं महान कर्तृत्व जगासाठी कायम आदर्श निर्माण करणारं आहे. प्रथमतः स्वगृहीच्या मोजक्याच, पण शक्तिशाली पाठबळावर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले आणि संख्येने अतिशय कमी असलेल्या परंतु निष्ठावान व शूरवीर पराक्रमी असलेल्या मावळ्यांच्या सैन्याला हाताशी धरून, शिवाजी महाराजांनी अनेक दैदिप्यमान पराक्रम केले. स्वराज्याची स्थापना केली. अनेक शक्तिशाली व तेजस्वी ऊर्जेने भरलेले, तसेच आपल्या ध्येयाला निश्चितपणे गवसणी घालणारे, सकारात्मक विचार सतत मनाशी बाळगल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपले ध्येय गाठू शकले आणि फक्त लोकांचा लाडका राजा म्हणूनच नव्हे, तर “जाणता राजा” म्हणून महाराजांचे नाव अजरामर झाले. पहा बरं, स्टॉंग विचार काय काय करु शकतात ते!!

तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला सूक्ष्मदर्शकातून दिसतात, तेवढेच जंतू वातावरणात फिरत असतील? तर नाही, सूक्ष्म डोळ्यांना दिसत नाही, असं बरंच काही जंतुंच्या स्वरूपात आजूबाजूला आहे. (thought beings) द्वेष, घृणा, नैराश्य, जेलसी, पापी विचार तरंगांमध्ये एक प्रकारचे जीवघेणे सूक्ष्मजंतू (germs) असतात. हे जीवघेणे जंतू माणसाच्या जीवनशक्तीला खाऊन टाकतात.

ज्यामुळे मग माणसं आजारी पडतात. दु:खी राहतात. कधी कधी तर लवकर मृत्युला कवटाळतात. याउलट प्रेम, उदारपणा, परोपकारी वृत्ती असणार्‍या, प्रसन्न राहणाऱ्या, तसेच चांगले विचार करणाऱ्या व्यक्ती अधिकतम निरोगी असतात. आणि स्वतःच्या चांगल्या विचारांमधून चांगल्या गुणांमधून ते आजूबाजूच्या समाजावर सुद्धा चांगले परिणाम करत असतात.

चांगले विचार केले, तर शरीर सुद्धा नैसर्गिकरित्या शुद्ध होत राहील. मन सुद्धा ताकदवान बनेल. मर्कट बनणार नाह। बुद्धी आणि विवेक शक्ती निर्मळ बनेल. बुद्धी इतकी पवित्र व स्वच्छ बनेल की, थोड्याशा प्रयत्नांनीही अशी व्यक्ती ज्ञान संपादन करू शकेल.

ज्यांच्या उपचार पद्धतीमध्ये अथवा चिकित्सा पद्धतीमध्ये आध्यात्मिक उपचार समाविष्ट आहेत त्यामध्ये काय घडते? तर या उपचार कर्त्याच्या मनामध्ये जे दिव्य, चांगले, मायेचे, परोपकाराचे, उत्साहाचे, आशेचे विचार तरंग सतत निर्माण होत असतात, ते तरंग रोगी अथवा पीडित व्यक्तीच्या शरीर, मन व आत्म्यामध्ये आपोआप पोहोचत असतात. त्यामुळे त्याच्या शरीरालाही लवकर बरं होण्याची प्रेरणा मिळते. त्याचे अवयव सुद्धा हळूहळू रिपेअर होतात आणि मनालाही अनेक काळापासून लाभली नसेल, इतकी शांतता प्राप्त होते. हे अशक्य नाहीय. संमोहन उपचारांमध्ये सर्व काही शक्य आहे. नकारात्मक विचारसरणीतून बाहेर पडायचं तर औषधं गोळ्यांनी काही होणार नाही. हिप्नोथेरपी नेच फरक पडेल. नुसतंच कौन्सेलिंग करुन उपयोग होत नाही. तर संमोहित अवस्थेत हे उपचार व्हायलाच हवेत. हा एकच मार्ग आहे.

आता एवढं सगळं विश्लेषण वाचल्यानंतर, नुसतं इमॅजिन करून बघा की, ज्या व्यक्ती प्रगती, परोपकार, आनंद, उन्नती, दान, सामंजस्य या संदर्भातील विचारांची कल्पना अथवा मनन- चिंतन करत असतील, त्या व्यक्तींच्या आतून किती उत्तम प्रकारच्या कल्याणकारी विचार लहरी बाहेर प्रसारित होत असतील!! म्हणजेच नकळतपणे अशा व्यक्ती या विश्वाची किती सुंदर रीतीने सेवा करत आहेत!! तेही अगदी कोणताही पैसा संपत्ती यांचा खर्च न करता हे सर्व त्यांना साध्य झाले आहे.

लेख कसा वाटला, हे जरुर मला सांगा. अन्य लेखांप्रमाणेच हा लेख ही मी स्वतः लिहिलेला आहे. हा लेख कॉपीराईटेड आहे. कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये.

माझ्या सर्वच लेखांच्या शेवटी संपर्काचा नंबर दिलेला असतो. हिप्नोथेरपी व अन्य कोणत्याही थेरपीसाठी संपर्क करावयाचा असल्यास दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर ‘फक्त मेसेज करावा’ कारण उपचारांचे सेशन्स सुरू असतात. त्यामुळे डायरेक्ट फोन करू नये. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

Be the first to comment

Leave a Reply