पूर्ण जीवनासाठीची पितृ गाथा: पितृदोष लक्षणे व उपाय (पितृलेख – भाग 2)

purna jeevanasathichi pitru gatha pitrudosh nivaran

“मातृदेवो भव” “पितृ देवो भव” “आचार्य देवो भव” हे पूर्णपणे अनुसरणारी आपली सनातन भारतीय परंपरा आहे. ज्यांनी आपल्याला शिकवले त्या गुरुजनांचा देह जरी इहलोकातून निघून गेला, तरी त्यांच्या शिकवणी व प्रबोधन आपण कायम अनुसरत असतो. त्यांची आठवण काढत असतो. नेमके हेच येथे सांगायचे आहे की, आपल्या घराण्यातील गत पितृ परिवार यांना आपण जरी भेटलेलो नसलो, तरी आपल्या वाडवडिलांना याच पितृ परिवाराने अनंत कष्ट व हालअपेष्टा सहन करून लहानाचे मोठे केलेले आहे. मग आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. बरोबर ना?

मागील लेखामध्ये आपण पाहिलं की, मॅक्झिमम जनतेला पितृ दोष आहे. फक्त पूर्णपणे घालवायला जरी जमले नाही तरी, तो सौम्य करता येतो. (कधीकधी पितृदोष पूर्ण नष्ट होतो).

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

 आपल्या सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर करण्याचे जे पारंपारिक विधी आहेत,  ते विधी टाळण्याची बंडखोर वृत्ती आता सर्वत्र फोफावत आहे. आणि हे पितृदोषाचे मेजर कारण आहे. हे विधी व्यवस्थित पूर्ण केल्यामुळे, मृत्यू झालेला आत्मा संतोष पावून  पुढच्या गतीला जातो.

जाणाऱ्या माणसाची एखादी इच्छा किंवा आपल्याला माहीत नसले विचार अपूर्ण राहिले असतील, तर त्याला गती प्राप्त होणे कठीण असते.

त्यांना गती मिळण्याच्या दृष्टीनेच आपल्या सनातन धर्मामध्ये हे विधी निर्माण केलेले आहेत. तर्पण करणे, अन्नदान करणे, गाईला, नदीला जेवणाचे पान ठेवणे. हे सर्व फक्त प्रतीकात्मक असं नसून त्या मागचा उद्देश खरोखर जे गत झाले आहेत, त्यांना तृप्त व समाधानी करणे, यासाठी असते.

कोणालाही सहज प्रश्न पडेल की, हे पान खायला कोणी  खरंच येतं का? तर गेलेले पितृ हे आता देह स्वरुपात नसल्यामुळे, दृश्य स्वरूपातलं अन्न डायरेक्ट उचलून खात नाही. तर भावनेच्या रूपातून ते ग्रहण करतात.

याबाबतीत झालेले संशोधन तर असे सांगते की, ज्यांचे पुत्र पौत्र त्यांच्या मृत्यूनंतर पितृ साठी जेवणाचे पान ठेवतात, त्यांना ग्रहण करण्यासाठी त्यांचे पितृ तर येतातच; त्यासोबत हे पितृ त्यांच्या सोबत असलेल्या इतरही पितृ आत्म्यांना घेऊन तिथे येतात आणि भावनेने अन्नग्रहण करतात. हे सोबतचे पितृ आत्मे कोण, तर असे पितृ आत्मे, ज्यांचे पुत्र पौत्र किंवा पुढच्या कोणत्याही पिढ्या त्यांना या विधीद्वारे अन्न अर्पण करत नाहीत.

हे शेवटचे वाक्य आपण पुन्हा एकदा वाचावे. पूर्वीच्या काळी पितृ च्या नावाने पान ठेवणे हे खूप सहजरीत्या केले जायचे. त्यात फक्त माहीत असलेले पितृच नव्हते, तर त्या घराण्यामध्ये गत झालेल्या सर्व पितृ साठी पान ठेवले जायचे. व हे विधी करण्याची प्रेरणा सुद्धा घरातूनच मिळायची.

आज जेव्हा मी माझ्याकडे थेरपी साठी आलेल्या लोकांना सहज प्रश्न विचारते, (नवीन पिढीतील जोडपी व त्यांची मुलं) की तुम्ही हे विधी करता का? त्याचे उत्तर बऱ्याचदा ‘नाही’ असेल तर आणि त्याही पुढचं उत्तर येत की, आमच्या घरी आमची आई व बाबा सुद्धा कधी करत नाहीत. मग आम्ही कशाला करू?

तर ही अनास्था योग्य नव्हे. हे विधी व्यवस्थित पार न पाडल्यामुळे अनेक अडचणींना हे कुटुंब तोंड देत असतात. पण तरीही त्यांना ही पितृसेवा करणे तितकसं रुचत नसतं.

पितृसेवा न केल्यामुळे जे अनेक पितृदोष निर्माण होतात, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट मनावर होत असतो. म्हणजे या स्पंदन लहरींचा परिणाम मनावर होतो.

पूर्वीच्या काळी माणूस कितीही गरीब असला तरी आत्ताच्या या युगामध्ये असलेले, विचित्र ताणतणाव त्याला फेस करायला लागत नव्हते. गरिबाचं घर असेल अथवा श्रीमंताचं पूर्वीच्या काळी विरोध न करता पितृसेवा केली जायची. आता सर्वच धर्म परंपरांना विरोध करण्याचे फॅड निर्माण झाले आहे.

तुम्ही तुमचा कुलधर्म सोडला. कुळाचार सोडला. पितृसेवा सोडली. तुमच्या आयुष्यात पैसा असूनही अनेक प्रॉब्लेम्सना सुरुवात झाली. सततच्या कटकटी सुरू झाल्या. पैसा पाण्यासारखा खर्च होत गेला, या गोष्टी नीट नोटीस करावे.

पितृदोष शंभर टक्के जातो का, याचं खरं उत्तर तर नक्कीच हो असायला हवं. परंतु आवश्यकता आहे ती तुम्ही न कंटाळता पितृसेवा कंटिन्यू करण्याची आणि स्वतः प्रत्येक पितृसेवेच्या कर्माला, विधीला न कंटाळता स्वतः हिरीरीने ते पूर्ण करण्याची गरज आहे.

असा कोणता मोठा आयुष्यातला तुमचा वेळ, या पितृसेवेमध्ये फुकट जातोय, याचा विचार करा. दिवसातल्या 24 पैकी 15 ते 16 तास आपण जर ऍक्टिव्ह राहत असू, तर अनेक ठिकाणी आपला वेळ कुठे ना कुठे फुकट जातो. तर पितृसेवा करायला काही तासनतास लागत नाही पण सातत्य असावे लागते.

पितृसेवेतल्या वर्षाला ज्या चार गोष्टी करायला लागतात, त्या न कंटाळता पूर्ण कराव्यात. सांसारिक कामांमध्ये वेळ फुकट गेला, ही सबब बाजूला ठेवून पितृसेवा करणे गरजेचे आहे.

रोज अगदी आपल्याला काही मोठं काम इतर सेवा म्हणून करायचं नाहीये काही ठराविक दिवशी पितृतत्व प्रभावी होतं, तेव्हा तुमच्याकडे हे पितर आशेने पाहत असतात. तुमच्या कृतीकडे यांचे लक्ष असते.

फक्त पितृपक्षामध्येच पितरांची आठवण काढावी असे नाहीये आणि अगदी दिवस- रात्र 365 दिवस आठवण काढली पाहिजे, असेही नाही. पण आठवण मात्र राहायला हवी. दोष लागेल म्हणूनच नव्हे, तर ते तुमचे स्वतःचे आप्त पितर आहेत म्हणून.

वर्षात दोन वेळा पितृंचे तत्व खूप प्रभावशाली असते. एक म्हणजे पितृपक्ष आणि दुसरे म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. असे काही दिवस पूर्ण वर्षात येत असतात. ज्यांना हा दोष नसेल किंवा खूप कमी असेल त्यांनी भरपूर विधी करण्याची आवश्यकता नाही. पण ज्यांना त्रास आहे त्यांनी पितृ सेवा करणे अनिवार्य आहे. दर अमावस्येला नैवेद्य करणे गरजेचे आहे. तुपाचा दिवा लावून पितृ स्तोत्र वाचावे.

असं केल्याने पितृ आत्मा स्वरूपात असले तरी ते प्रसन्न होऊन, आशीर्वाद देतात.

आता मी एकदा सर्व काही सोपं करून सांगते. कोणत्याही गोष्टीला आपण जेव्हा दोष असं नाव ऐकतो, अथवा देतो त्यावेळेला ते काहीतरी नकारात्मक असावे, असे भाव मनामध्ये येतात.

तर पितृ या विषयाचे तसं नाहीय. आपण पितृ दोष असं जरी म्हणत असलो, तरी पितृ सेवेमध्ये दोन मुख्य पितृ कोणते, ते समजून घ्या. काही पितृ पुराणकाळात असे असतात, ज्यांच्याकडून कळत नकळत काही चुका अथवा अपराध झालेले असतात. तर काही जण एखाद्या दुर्दैवी प्रसंगाला बळी पडलेले असतात. ही जशी एक सर्वसामान्य कॅटेगरी झाली, तशीच आपल्या घराण्यामध्ये पूर्वीच्या काळी होऊन गेलेले काही असे पितृ असतात, जे अक्षरशः पुण्यात्मे असतात.

देवाची खूप आराधना, प्रार्थना पूजा अर्चा त्यांनी केलेली असते.

तर आपल्याला त्यांचे वंशज म्हणून काय करायचे असते, तर सर्वसाधारण कॅटेगरीतील सर्व पितरांना गती लाभावी, म्हणून पितृ सेवा व प्रार्थना  करावी. तसेच दुसऱ्या कॅटेगरीतील सर्वच पुण्यात्मे मग पितृचे आशीर्वाद तुमच्या पिढीला व पुढील अनेक पिढ्यांना मिळणे गरजेचे असते. थोडक्यात त्यांची ऊर्जा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते.

हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच लक्षात आले असेल की पितृ सेवा, ही केवळ पितृदोष आहे म्हणून करावयाची एक उदासीन कृती नसून त्यामध्ये संपूर्ण तन मन, आत्मा इन्व्हॉल्व करून हे सर्व पितृ चे विधी पूर्ण करावेत. त्यांच्या अडकलेल्या गतीचे अनेक दुष्प्रभाव, जे तुमच्या वर्तमान आयुष्यावर आजही आहेत. ते हळूहळू आपोआप आशीर्वादांमध्ये सुद्धा बदलतील ही गोष्ट ध्यानात ठेवून पितृसेवेला सकारात्मक आणि संवेदनात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

विषय अजून सोपा बनवुया. एका आई-वडिलांनी आपल्या काही मुलांना वाढवले, ते पूर्ण मोठे होईपर्यंत त्यांना सर्व प्रकारची सुविधा प्राप्त करून दिली, त्यांचे हाल होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही म्हणून स्वतःच्या जीवाचे रान केले आणि त्यानंतर ही मुलं मोठी झाल्यावर कुठेतरी लांब दूरवर स्वतःचा गोतावळा घेऊन निघून गेली.

तर आपल्याला समाजात कितीही, वरवर पाहता असे दिसत असले की, वृद्ध आई-वडील आक्षेप घेत नाहीत किंवा खेद व्यक्त करत नाहीत, तरी तुम्ही सर्वांनी एक त्रयस्थ म्हणून विचार करून पहा की, त्या आई-वडिलांना खरंच आपली मुलं आपल्याजवळ असावीत, असं वाटत नसेल?

त्या मुलांसोबतच्या घालवलेल्या क्षणांना आठवण करुन, त्यांचे हृदय भरून येत नसेल? त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या वेळी आपली मुले जवळ असावी, असे त्यांना वाटत नसेल? हे वाचताना जसे भाव तुमच्या मनामध्ये येत आहेत, अगदी तसेच भाव तुम्ही आपल्या पितरांचा विचार करताना मनामध्ये आणून तर पहा.

मग तुम्हाला पितृ सेवा करणे हे डोईजड वाटणार नाही. तर त्यातली अनिवार्यता तुम्हाला अगदी व्यवस्थित खोलवर समजेल आणि प्रिय वाचकहो, अगदी कळकळीची विनंती अशी आहे की, आज मी लिहीत आहे आणि तुम्ही वाचत आहात किंवा कोणीतरी अन्य लेखक या पितृविषयावर लिहीत असतात आणि तुम्ही वाचत असता, ही लिहिणारी आणि वाचणारी पिढी जेव्हा या जगातून निघून जाईल, त्या वेळेला जी पुढची आधुनिक पिढी असेल त्या पिढीला त्यांच्या कटकटी, विवंचना, त्रास, वेदना, अनिश्चितता, तणाव यातून बाहेर पडण्यासाठी जे पारंपारिक शास्त्र कामाला येते, त्या सर्वांची माहिती तुमच्या मुलाबाळांना त्यावेळेला असणार तरी आहे का?

एक सर्वसाधारण उदाहरण सांगते कुठच्यातरी एखाद्या इतरांच्या पिढीमध्ये एखाद्या स्त्रीची म्हणजेच मातेची तिच्या बाळापासून निर्दय हृदयाने ताटातूट केली असेल किंवा तिच्यावर अत्याचार केले गेले असतील, तिचं बाळ हिरावून घेतलं गेलं असेल, तर अशा आईचे शाप पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये नकारात्मकता निर्माण करतात आणि ज्यांना ही घटना माहीतही नाही असे सर्व पुढचे वंशज यातून निर्माण झालेले त्रास निमूटपणे सहन करतात.

आता आपण पाहू की, पितृदोषावर उपाय म्हणून काय काय गोष्टी सांगितल्या आहेत :

1) पितृदोष निवारक धूप (जो आम्ही बनवत असतो) तो कायम वर्षभर जाळायलाही हरकत नाही. त्यात सर्व मंगल द्रव्येच आहेत.

2) प्रत्येक अमावास्येला व विशेष करून सोमवती अमावस्येला गोवऱ्यांवर आग पेटवून त्यामध्ये खिरीची आहुती द्यावी, पितृभोग देणे.

3) सर्वच पितरांच्या स्मरणार्थ सर्वपित्री अमावस्येला पितरांना जेवणाचे पान देणे. तसेच त्या दिवशी दान धर्म करणे.

4)  रोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाला दूध पाणी व काळे तीळ एकत्र करून वाहने व दिवा पेटवणे.

5) ज्यांची तिथी माहित आहे, त्यांच्या तिथीला त्यांचे श्राद्ध पितृ पक्षात करावे.

6) दर बुधवारी विष्णुसहस्रनामावली वाचावी.

7) योग्य गरजू मुखी अन्न मिळेल, असे अन्नदान करावे.

8) ‘पितरांसाठी जेव्हा घरात भोजन बनवलेले जाते’, तेव्हा भोजन जेवत असताना मौन राहून जेवावे. त्यावेळी भोजनाची प्रशंसा करत बसू नये. मौनात जेवण करत असताना पितृ आनंदाने (भावना रुपात) जेवत असतात.

9) श्राद्धाच्या दिवशी वस्त्रदान व दक्षिणा दान करावे.

10)  पितृ पक्षातील पितृ साठी केलेले भोजन असे श्राद्ध कार्य दिवसाचं करावे. संध्याकाळी अथवा रात्री नव्हे.

11) श्राद्धाचे जे काही भोजन असेल, त्यामधून गाय, कावळा, कुत्रा, जमिनीवरील मुंग्या कीटक तसेच विविध देवता या सर्वांसाठी अन्न बाजूला काढून अर्पण करावे.

12) आपल्या घराण्यातील सर्व गतपत्रांना सद्गती लाभू दे, अशी प्रार्थना आपल्या कुलदेवतेकडे व परमेश्वराकडे करावी.

हे असं नित्यनेमाने करत राहिलात की, पितरांची उत्तम कृपा, आपल्या संपूर्ण घराला, परिवाराला, मुलांना लाभते.

मन:शांती पुन्हा प्राप्त होते. आपली बरीचशी अडकलेली कामं व्हायला सुरुवात होते. आर्थिक परिस्थिती व्यवस्थित बॅलन्स होते. प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित होते. वंशपरंपरेमधील अडथळे दूर होतात.

मुख्य म्हणजे पहाडासारखी अनाकलनीय संकट येणं बंद होतात. सर्वात शेवटी माझं असं तुम्हा सर्वांना सांगणं आहे, ही पितृसेवा म्हणून जे कराल ते शुद्ध भावनेने, संवेदनशील हृदयाने आणि आपल्या गत पितरांबद्दल मनात आदर व प्रेमभाव ठेवून ही सर्व कार्य संपन्न करावीत आणि अनेक प्रश्नांची समाधानकारक प्रॅक्टिकल उत्तरे मिळवावीत.

कृतज्ञ भावनेतून केलेले श्राद्ध हे सर्व पितरांना शांतता व चांगली गती मिळवून देणारे नक्कीच ठरेल, यात कोणतीच शंका नाही. प्रसन्न मनाने श्राद्ध करा पितृ सेवा करा आणि तुमच्या मुलाबाळांनाही याचे महत्त्व पटवून त्यांच्याकडूनही पितृसेवा घडवून आणावी.

या लेखातील सर्व माहिती copyrighted आहे. मी स्वत: ही माहिती लिहिली आहे. तुम्ही एकच काय तर हजारो मित्रांकडे या लेखाची लिंक शेअर करु शकता. पण स्क्रीनशॉट अथवा copypaste ला परवानगी नाही आहे. कायद्याचे उल्लंघन करु नये. अलख निरंजन

पितृदोष निवारक धूप (वर्षभर सुद्धा) व कुलदेवता, विशिष्ट देवता, साधना वाले धूप तुम्ही मागवू शकता. संपर्क करावा. हा आमचा WhatsApp group आहे. तो तुम्ही join करु शकता.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*