पितृ गाथा: पितृदोष असल्याची मुख्य लक्षणे व कारणे यावर प्रकाशझोत: भाग 1 Pitru Saga: Signs and Causes of Pitru Dosh

Preface

श्रद्धा हा हिंदू धर्माचा मेरुदंड आहे. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द बनतो. श्रद्धापूर्वक केलेल्या कार्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धातून श्रद्धा जिवंत राहते. श्राद्धकार्यामध्ये भावना व कृतीच्या माध्यमातून आपली श्रद्धा प्रदर्शित केली जाते. आपल्या गतपितरांच्या प्रति कृतज्ञता प्रगट करण्यासाठी, काहीतरी निमित्त असायला हवेच. हे निमित्त म्हणजेच आपण पितरांची विविध मार्गाने केलेली पितृसेवा असते.

पितृसेवेतून कृतज्ञता व्यक्त करून आपण आपल्या संस्कृतीतील महानता प्रदर्शित करत असतो या पितृसेवेमध्ये आपण जे जे पदार्थ अथवा वनस्पती अथवा अन्य काही, साधन म्हणून वापरतो, त्या अर्पण-तर्पण- हवन यातून आपले श्रद्धा भाव पितरांपर्यंत पोहोचत असतात. इथवर विषय नीट समजून घेऊन आता पुढील माहिती वाचावी.

एक सूचना मी या लेखाच्या सुरुवातीलाच देत आहे. ती म्हणजे या लेखाचा विषय पितृदोष म्हणजे काय हे समजावं असा घेतला आहे. त्यामुळे पुढे लिहिलेली माहिती ही मन नाराज करण्यासाठी नसून वस्तुस्थिती समजून घेऊन स्वत:ला स्ट्राँग करण्यासाठी आहे हे लक्षात ठेवावे.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

भाग 1: आपल्याला पितृदोष आहे हे कसं कळतं? त्याची मुख्य कारणं व लक्षणं  काय आहेत?

1) आवक कितीही असली तरी खर्च जास्त असतो. म्हणजे एक लाख येत असले तर एक लाख दहा हजार रुपये खर्च येणार  म्हणजे किती पैसे आले तरी सगळे काही ना काही खर्चामध्ये संपून जाणे. सर्व पैसे खर्चून कुठे गेले, काही डोकं चालत नाही.

2)  घरात एक्सीडेंटल गोष्टी घडणे. माणसांच्या बाबतीत,  फिजिकल, संसारिक अथवा फायनान्शिअल लॉस अचानक येणे. खड्ड्यात पडल्याप्रमाणे खुप नुकसान होणे.

3) घरातली माणसं व्यसनी होण।

4) मुलाबाळांच्या वैवाहिक लाईफची वाताहत होणे.

5) संतती न होणे आणि संतती होण्यामध्ये खूप त्रास होणे आणि झाली तर त्या संततीला प्रॉब्लेम असणे म्हणजे खूप त्रास खूप शारीरिक पीडा ज्याला होते, असं मूल जन्माला येणे.

6) वैवाहिक आयुष्याबद्दल त्या मुलांना म्हणजेच त्या पुरुषांना काही धड इंटरेस्ट नसणे.

7) एखादा मुलगा/ मुलगी समजा हातीपायी धडधाकट असलाच, त्याचं सर्व व्यवस्थित असलं तरी, उगाचच वाईट मार्गाला लागणे, व्यसनाधीन होणे, नशाखोरी करणे, व्यभिचारी चारित्र्यहीन बनणे.

8) तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत म्हणजे नातेवाईक, पाहुणे यांच्यासोबत कायम संबंध बिघडलेले असणे, त्यांच्याशी सतत वादविवाद होणे, नाते न टिकणे. तुमचं नाव नातेवाईकांमध्ये व समाजामध्ये खराब असणे bad fame कुप्रसिद्धी होणे.

9) अपमृत्यू होणे. म्हणजे सर्वसाधारण वृद्ध होऊन न मरता, लवकरच्या वयात मरण येणे.

10) सहजासहजी बरे न होणारे असाध्य आजार होणे.

11) अपघातामध्ये शरीराची क्षती होणे, म्हणजे पाय, हात, डोकं फुटणे, काहीतरी जोरदार लागणे.

12) घरातल्या फॅमिली मेंबर्सचा एकमेकांशी सतत वाद कलह चालू असणे, साध्या क्षुल्लक कारणावरून कटकट, चिडचिड सतत सुरू असणे, म्हणजेच एकमेकांवर पिसाळलेले असणे.

12) घरातल्या माणसांना एकमेकांबद्दल जराही रिस्पेक्ट नसणे. एकमेकांशी अतिशय तुसडेपणाने, दुश्मन असल्यासारखे वागणे, सतत घालून पाडून बोलणे.

पितृदोष निवारक धुपाचा पितृपक्षातील फोटो!

13) घरातल्या स्त्रियांना अतिशय हीन दर्जाची, तुच्छ वागणूक मिळणे किंवा देणे.

14) कुटुंबात कधीच एकमत नसणे. ज्या घरात पितृदोष असतो, त्या घरातील माणसे, विशेषतः पुरुष मंडळी सतत कसल्यातरी मानसिक त्रासामध्ये असतात. ज्याला आपण unknown त्रास असे म्हणू शकतो. ही मंडळी सतत तणावाखाली वावरत असतात.

15) येणारे कमावलेले पैसे गमावले जातात. सर्व खर्च आ वासून उभे राहत असतात.

16) धंद्यामध्ये लॉस होणे (सर्व प्रकारचे फायनान्शिअल लॉसेस) धंद्याच्या ठिकाणी सतत काही ना काही संकटं उभे राहणे.

17) कामाच्या ठिकाणी सतत अपमानित होणे किंवा सहकाऱ्यांकडून टिंगलटवाळी किंवा असहकार प्राप्त होणे.

18)  देवधर्माची आवड नसणे. उगीचच काहीतरी फालतुगिरीकडे जास्त लक्ष असणे. (मनातून देवधर्माला, धार्मिक शास्त्रीय परंपरांना विरोध)

19) आपल्या स्वतःच्याच कुळाचा कुळधर्म- कुळाचार करण्याची कसलीच आवड नसणे, कुळाचार टाळण्यासाठी सबबी सांगणे.

20) हे सर्व पितृदोषासंबंधीचे मॅक्झिमम पॉईंट आहेत. त्यातला प्रत्येक एक पॉईंट कमी जास्त असू शकतो.

‘चार महिन्यापूर्वी आमच्याकडे एक अपघात झाला, अलीकडेच आमच्या पत्नीचे मिस कॅरेज झाले, कोणाची तरी चांगली नोकरी अचानक गेली, अचानक काहीतरी मोठा खड्डा पडला आणि तिकडे पैसा भरायला लागला’, हे सर्व सांगणाऱ्या व्यक्तींना पितृदोष आहे, असे समजावे.

21) बऱ्याचदा आत्ताची सध्या परिस्थिती काय याबद्दल लोकं बोलतात, परंतु गेल्या अनेक वर्षांच्या जीवन काळामध्ये काय काय क्षती झाली, काय काय भोगावं लागलं, व्यवस्थित त्याबद्दल सांगणे बऱ्याचदा लोक करत नाहीत.

22) जास्त प्रमाणात कर्जबाजारी होणे आणि कर्जातून डोके वर काढण्याची संधी न मिळणे.

23) आता हे पुढचं वाक्य नीट लक्षात घ्या की, हे सर्व जे त्रास सांगितले, यातला एकमेव त्रास फक्त असेल तर त्याला पितृदोष आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे एखाद्याला बाहेरच्या ठिकाणी वर सांगितलेला कोणता तरी त्रास आहे तो एकच त्रास आहे आणि घरच्या ठिकाणी कोणताच त्रास नाही सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे, तर त्या वेळेला या त्रासाला पितृदोषाचा त्रास असे म्हणता येणार नाही.

” ॐ नमो नारायणाय “

24) म्हणजेच एखादं लक्षण आहे म्हणून तिथे दोष आहे असं कन्क्लुजन काढणं योग्य नाही. पण या सर्व लक्षणांमधली ऍव्हरेज लक्षणे जर तुमच्याकडे आढळत असतील तर पितृदोष आहे असे समजावे.

25)  या लक्षणांपैकी काहीच घडलेलं नव्हतं असेल आणि अचानक काहीतरी अतिशय वाईट प्रसंग घडला जो सहनशक्तीच्या बाहेरचा असेल ते मात्र पितृदोष या विषयात येत नाही ती ‘तुमच्या हितशत्रूंनी केलेली नकारात्मक कृती’ असू शकते मला काय म्हणायचे ते तुम्हाला नीट समजलं असेलच

 26)  सर्व काही अतिशय सुरळीत आणि चांगले चाललेले असताना अचानक होणाऱ्या गोष्टी या पितृदोष नसतात. तर ती कोणीतरी मुद्दाम घडवून आणलेली नकारात्मक कृती असते. त्यासाठी महत्त्वाचं काय जेव्हा तुम्ही स्वतःच्या समस्येला मांडत असतात त्यावेळेला अनेक वर्षांचा व्यवस्थित आराखडा समोर मांडायला हवा. मग या घटना पितृदोष या विषयात येतात की अन्य विषयात येतात हे समजू शकते.

27) पितृदोष संबंधित काही गोष्टी इतक्या क्लिष्ट असतात की, त्यांच्यातून संपूर्णतः सुटका करून घेणे, याला काही काळ, तर कधी कधी बराच काळ लागू शकतो. पण इथे हिंमत सोडून चालत नाही. जी पितृसेवा अथवा कुलाचार आखून दिलेला आहे तो करत राहावा.

28)  पितृदोष सौम्य करत आणणे ही प्रोसेस एका दिवसाची एका महिन्याची, सहा महिन्याची, वर्षाची असू शकते. तसेच ओवरनाईट कोणतेच मिरॅकल घडत नसते.

28) म्हणून इथे मार्गदर्शकाकडे हट्ट करत बसू नये की, आम्ही एवढे रिच्युअल केले, एवढा काळ केले, मग आता पितृदोष ताबडतोब गेलाच पाहिजे. तर तुम्ही सांगितलेल्या उपचारक गोष्टी किंवा आपण त्यांना पितृसेवेतील गोष्टी बराच काळापर्यंत आणि कायमच्या करत राहणं गरजेचे असते.

29) तुम्हाला जी पितृसेवा सांगितलेली असते, ती तुम्ही तुमच्या पितरांच्या सद्गतीसाठी करत असतात आणि तुमच्या आयुष्यातील अडकलेले स्त्रोत किंवा पितृदोषाने प्रभावित झाले स्त्रोत मोकळे व्हावे, म्हणून करत असतात हे तुम्हीच करू शकता; रादर ते तुमचेच काम आहे.

30) वर्षभरामध्ये विविध काळानुसार सांगितलेल्या गोष्टी करत राहणे त्यात खंड न काढता आनंदी मनाने, भक्तीभावाने, श्रद्धेने ते सुरू ठेवणे हे तुम्हाला करावेच लागते

31) यातून तुमचं नक्कीच चांगलं होईल. कल्याण होईल आणि पितृदोषाची तीव्रता खूप स्वामी होत जाईल. जर उत्तम सातत्य ठेवले, तर या पितृदोषाच्या प्रखर प्रभावातून तुम्ही वर्ष दोन वर्षात अगदी पूर्णपणे बाहेर याल. तुमच्या जीवनाची जी गाडी मायनस ला चाललेली होती ती पितृ सेवा केल्याने कुळाचार पूर्ण केल्याने पुन्हा एकदा प्लस मध्ये जायला सुरुवात होते.

32)  काही घरांमध्ये एखाद्या फॅमिलीला महिन्याचे दहा हजारच घेत असतात. परंतु ती फॅमिली खाऊन पिऊन सुखी असते त्यांना कसल्या कटकटी नसतात. मुख्य म्हणजे ते फक्त सुखीच नाही; तर समाधानी असतात.

33) मग तुम्हीच विचार करा – एवढ्या महागाई मध्ये अशा कमी अर्थाचे नसलेल्या फॅमिलीचं चांगलं कसं चालतं आणि लाखो रुपये कमावणाऱ्या उच्चशिक्षित श्रीमंत माणसाचं काही ना काही कसं अडत राहतं. (यातली गरीब आणि श्रीमंत ही फक्त टोकाची उदाहरणे म्हणून दिलेली आहेत.)

हाच आहे तो पितृदोष निवारक दिव्य धूप

34) तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे करत जाईल तर हळूहळू टप्प्याटप्प्याने पितृदोषांमधून तुम्ही बाहेर पडत जाल आणि एकंदर फॅमिली ची परिस्थिती – मानसिक, आर्थिक, सामाजिक, शारीरिक, सुधारायला सुरुवात होईल.

35)  स्त्रीला पितृदोष किती कॅरी फॉरवर्ड होतो इथे स्त्री म्हणजे मला म्हणायचे की लग्न झालेली मुलगी जी माहेराहून सासर कडे गेलेली आहे, ज्या मुलीबद्दल ज्या स्त्रीबद्दल इथे उल्लेख केला आहे, तिच्या आजोबांना बाबांना जर पितृदोष असेल, तर तो तिच्यासोबत कॅरी फॉरवर्ड होतो. सेवन जनरेशन पर्यंत याचा अर्थ या स्त्रीची पिढी सुद्धा पहिली दुसरी तिसरी पाचवी असू शकते पण हा पितृदोष सात पिढ्या चालतो.

36) समजा त्या मुलीच्या पिढीमध्ये ती मुलगी आणि मुलगा किंवा अजून त्याची भावंड असतील तर त्या पिढीचा मागाहून चालत आले ना पत्र दोष हा डिस्ट्रीब्यूट होत नसतो तर सर्वांना सेम प्रमाणात जेलायला  लागतो सर्वांना इक्वली त्रास होत असतो सर्वांची तीव्रता तेवढीच असते. म्हणजे मुलगा आई-वडिलांसोबत राहिलाय आणि मुलगी सासरी केली तर ती मुलगी तिच्या सोबत इथला पितृदोष त्रास घेऊन गेले तिच्या मुलांनाही त्रास सहन करावा लागतो आणि त्याचबरोबर हा मुलगा त्याची पत्नी, मुलं यांनाही पुत्र कशाचा त्रास होत असतो सेम होत असतो (तरीही हे लक्षात ठेवा की पितृदोष अगदी सौम्य सौम्य करता येतो)

37) या सर्व गोष्टींना फेस करण्याची तुमची तयारी असायलाच हवी आणि पितृदोषाला सौम्य करण्याचे उपाय आहे, नित्यनेमाने करायला हवे.

38) अजिबात वाईट वाटून घेउ नका. तुम्ही एकटेच नाही आहात अधिकतम जनता पितृदोषाने ग्रसित झालेली आहे. कारण अनेकांनी कुळाचार कुलधर्म सोडून दिलेला आहे. आचरण पूर्णपणे बदलले आहे.

39) पितृदोषाची स्पंदनं जेव्हा एखाद्या काळात अतिशय तीव्र होतात, तेव्हा काहीतरी दुर्दैवी प्रकार आयुष्यामध्ये घडतो. म्हणून ही  तीव्र की सौम्य हा विचार न करता आपल्याला पितृदोष याचा इफेक्ट माइल्ड करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावे लागतात.

40) अजून काही भाग हा विषय चालू राहणार आहे आणि पितृदोषातून उद्भवलेल्या समस्यांचं निराकरण करायचं असेल, तर तुम्हाला हे सर्व भाग वेळ काढून वाचावेच लागतील.

अजून माहिती पुढील भागात क्रमश: लिहिणार आहे. 

या लेखातील सर्व माहिती copyrighted आहे. मी स्वत: ही माहिती लिहिली आहे. लेखाची लिंक शेअर करु शकता. पण स्क्रीनशॉट अथवा copypaste ला परवानगी नाही आहे. कायद्याचे उल्लंघन करु नये. अलख निरंजन!

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*