तुम्ही हिप्नोटाईज होता म्हणजे नेमकं काय होतं: पूर्वार्ध भाग What Happens When You’re Hypnotized: Part 1

“डॉक्टर, मी जर हिप्नोटाईज झालो, आणि जर तसाच तिथेच राहिलो तर? मग काय करणार?”  भाबडा प्रश्न!

कोणी खाल्लीय ही माती? बोला. तुम्हाला माहितीय का? माध्यमांनी!!  या सोशल माध्यमांनी हिप्नॉटिझम म्हणजे एक मोठा बागुलबुवा बनवून ठेवला आहे.

मानसिक आरोग्यासाठीचं – इतकं परफेक्शनिस्ट शास्त्र – दुसरं कोणतंच नाहीय. कारण तुमचा प्रॉब्लेम फक्त गोळ्या- औषधं आणि एनर्जी हिलिंग वगैरेने सॉल्व्ह होणारा नसतो. तुमची आजच्या तारखेची नामुष्की (सर्व प्रॉब्लेम्स) ही तुमच्याच भूतकाळातून ओढवलेली असते. कधी जाणतेपणी, तर कधी नकळतपणे. एक नाही तर अनेक गुंतागुंतीची कथानकं, उपकथानकं या आजच्या तुमच्या समस्याग्रस्त अवस्थेच्या पार्श्वभूमीवर असतात. फक्त गोळ्या औषधांनी हा प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह होणार? copyrighted

कारण मनाच्या गाभाऱ्यात जे सर्व दडलंय, ज्या खोल जखमा कधी आत्म्याला, तर कधी मनाला झाल्यात, त्यांचं मूळ तिथेच म्हणजे मनात तसंच पडून राहतं. यावर इलाज म्हणून केमिकलयुक्त औषधं जेव्हा घेतली जातात, तेव्हा फक्त काही काळासाठी तुमचा मेंदू रिलॅक्स होतो. पण तो तसा रिलॅक्स झाल्यामुळे तुमच्या आत दडलेल्या अनेक किंवा आपण म्हणू प्रत्येक प्रश्नचिन्हाचं उत्तर कसं तयार होणार?

hypnosis

थोडक्यात सांगायचं म्हणजे, आतमध्ये ज्या प्रश्नार्थक ऊर्जा आहेत, त्यांना आणि काळानुरूप  होत गेलेल्या ज्या जखमा आहेत, अनुत्तरीत व  अनाकलनीय कोडी आहेत, त्यांना कोण, कधी व कसं सोडवणार? बरं करणार?? या गोष्टी केवळ औषधं घेऊन कशा बर्‍या होणार? नक्कीच इथे,  तेच शास्त्र कामी येणार, जे या मनाच्या गाभाऱ्यात साचलेल्या या पेनफुल गोष्टींना स्पर्श करू शकेल; नुसता स्पर्श करणे नव्हे, तर त्या प्रत्येक समस्येचं उत्तर अंत:करणात पोचवून देऊन, मनाला खऱ्या अर्थाने बरं करणाऱ्या शास्त्राची  म्हणजेच आधुनिक भाषेत विशिष्ट (मनासाठीच्या) सायंटिफिक थेरपीचीच इथे अनिवार्य गरज आहे.

सुरुवातीला तुम्ही वाचलं असेल की, माध्यमांनी माती खाल्ली!! त्याबाबत तुम्हा सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल की, माती खाल्ली म्हणजे काय?! तर या वाक्याचा अर्थ असा आहे की, मनोरंजनाची जी वेगवेगळी माध्यमं आहेत किंवा ज्ञानसंवर्धनाची विविध माध्यमं आहेत, त्या बहुसंख्य माध्यमांनी हिप्नोथेरपी या शास्त्रावर अथवा  हिप्नोथेरपीवर प्रकाश टाकणं तर दूरच परंतु बहुसंख्य प्रमाणात चुकीची व अर्धवट माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली आहे.

त्यामध्ये कोण कोण येतं ते पाहूया. सर्व सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म म्हणजे वर्तमानपत्र (न्यूज पेपर), वेगवेगळे टीव्ही चॅनल्स, डेली प्रेक्षक मिळवणाऱ्या मनोरंजक सिरीयल्स, टीआरपीला आसुसलेली न्यूज चॅनल्स, तसेच व्यावसायिक दृष्ट्या चित्रपट चालावा म्हणून  सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली, त्यात मिळेल तो मसाला टाकून लोकांसमोर सादर होणारे मुव्हीज या सर्व ठिकाणी या हिप्नॉटिझम म्हणजे  संमोहन शास्त्राची पूर्णपणे “चुकीची इमेज” लोकांसमोर निर्माण केलेली आहे. नव्हे, खिल्लीच उडवली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

अनेकांनी या शास्त्राला अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहिले आहे काहींनी तर कहर म्हणजे या शास्त्रालाही बुवाबाजीच्या कॅटेगरीमध्ये नेऊन ठेवले आहे. कोणी कोणी या शास्त्राचा उल्लेख वशीकरण असा सुद्धा करतात हे सर्व काही चुकीचे आहे आणि  कपोलकल्पित आहे; म्हणजे नुसतेच इमॅजिनरी आहे प्रत्यक्षात मानसिक आरोग्यासाठी, या हिप्नोथेरपी इतके प्रभावी शास्त्र दुसरे कोणतेच अस्तित्वात नाही आहे.

बरं, या हिप्नोथेरपी शास्त्राबद्दलचे जनमानसामध्ये काय गैरसमज आहेत, याबद्दल एक विस्तृत लेख मी लिहिलेला आहे. तोही मी लवकरच प्रसारित करत आहे. आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी कळावी, म्हणून या शास्त्राबाबतचे कोणते गैरसमज आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहेत.

आपला इथे विषय असा आहे की, तुम्ही हिप्नोटाईझ होता, म्हणजे नक्की काय होता? या हिप्नोटाइज अवस्थेची माहिती तुम्हाला नीट कळावी म्हणून तुमची मनोभूमिका बनण्यासाठी मी आधी गैरसमजांबद्दल डिस्कशन केलं आहे. असो. लेखाच्या सुरुवातीला जो प्रश्न मी लिहिला आहे, तो प्रश्न अनेक माणसांच्या मनामध्ये असतो. पूर्वीपासून असायचा. एक लक्षात घ्या, जगातील कोणताच हिप्नोथेरपिस्ट तुमच्या मनाविरुद्द अथवा तुमच्या संमतीशिवाय तुम्हाला जबरदस्ती हिप्नोटाईज करु शकत नाही. हिप्नॉटिझमची स्लीप (संमोहन निद्रा) ही “अलर्ट स्लीप” असते. “लर्निंग स्टेट ऑफ माईंड असते.

mind-hypnosis

परंतु सुदैवाची आणि आनंदाची बाब म्हणजे हिप्नॉटिझमबद्दल पूर्वीच्या काळामध्ये जितका अवेअरनेस नव्हता, तो गेल्या दहा वर्षात बराच वाढला आहे. आता लोकांना कळून चुकले आहे की, हिप्नॉटिझम हे एक प्युअर सायन्स आहे. ही कोणतीही अंधश्रद्धा नाहीय. तसंच हिप्नॉटिझम हे नाव जरी आधुनिक असलं तरी हे भारतीय उपचार पद्धतींपैकीच मूळ असलेलं हे एक शास्त्र आहे. (हठयोग – प्राणविद्या)

आता आपण विषयाला सुरुवात करूया. तुम्ही हिप्नोटाइज होता म्हणजे काय होतं? प्रथम तर हिप्नोटाईज करून उपचार का केले जातात, हे समजून घेऊया. मी या आधीच्या अनेक लेखांमध्ये मनाच्या दोन स्तरांबद्दल अगदी व्यवस्थित विस्तृतपणे डिस्कशन केलेलं आहे. ते आपण या लेखाच्या आधी वाचू शकता. म्हणजे मनाचे जे दोन स्तर आहेत – अंतर्मन आणि बाह्यमन, या दोघांची काय कामं आहेत, याबद्दल भरपूर माहिती या आधीच्या लेखांमध्ये लिहिलेली आहे, ती तुम्ही जरूर वाचा.

तुम्हा सर्वांनाच समजायला सोपं जावं, म्हणून आपण कॉम्प्युटरचं उदाहरण घेऊया आणि आता आपण हार्डवेअर व सॉफ्टवेअर दोन्हीच्या अनुषंगाने या विषयाची उकल करूया. आपल्या घरामध्ये कॉम्प्युटर असतो, जो सर्वजण वापरत असतात. हल्ली प्रत्येकाकडे मोस्टली लॅपटॉप असतो. काही वर्षांपूर्वी प्रत्येकाकडे फक्त पीसी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर असायचा.

आता आपण जेव्हा नेटवर काम करतो, तेव्हा घरातला प्रत्येक माणूस त्या कॉम्प्युटरवर / लॅपटॉपवर आपापल्या सुविधेसाठी ॲप डाऊनलोड करत असतो. किंवा आपण वाटल्यास असे समजू की, जर एकच माणूस कॉम्प्युटर वापरत असेल, तरी तो सुद्धा त्याच्या आवडीचे आणि अभ्यासासाठी अथवा कामासाठी उपयोगी पडणारे निरनिराळे एप्लीकेशन्स, सॉफ्टवेअर्स या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करत असतो. कधी कधी मग असं लक्षात येतं की, आपला कॉम्प्युटर हा खूपच स्लो चालतोय, मध्ये मध्ये रखडतोय. कधी कधी तर हँग सुद्धा होतोय.

अशा वेळेला कॉम्प्युटर एक्स्पर्टला बोलावलं जातं. तो एक्सपर्ट आपल्या पेशंटला म्हणजे कॉम्प्युटरला बघतो! नीट न्याहाळतो. प्रायोरिटीने त्याच्या लक्षात येतं की, या कॉम्प्युटरमध्ये अशा भरपूर गोष्टी डाऊनलोडेड आहेत, ज्यांचा नेहमीच्या कामांमध्ये काहीच उपयोग नाहीय. तरीसुद्धा त्या गोष्टी  कॉम्प्युटर मध्ये पडीक आहेत आणि त्यांच्यामुळे कॉम्प्युटरच्या चालण्यावर परिणाम होतोय.

मग तो  एक्सपर्ट तुम्हाला विचारतो की, तुम्ही नीट यामध्ये तपासून पहा की, तुम्हाला या सर्व ॲप्लीकेशन आणि सॉफ्टवेअरपैकी नक्की काय काय हवंय आणि कोणत्या गोष्टी अननेसेसरीली या कॉम्प्युटरमध्ये पडून आहेत. मग तुम्ही त्याला सांगता की, बाबा रे, यातल्या या गोष्टी हव्यात आणि बाकीच्या गोष्टी काढून टाकल्या तरी चालणार आहेत. मग तो तुम्हाला सांगतो की, कदाचित मला तुमच्या कॉम्प्युटरला फॉरमॅट करावं लागेल. त्यावेळेला सेफेस्ट थिंग म्हणजे यातला हवा असलेला डेटा आणि इतर गोष्टी तुम्ही तुमच्याकडे हार्ड डिस्कवर सांभाळून ठेवा. उरलेल्या या सर्व काही गोष्टी मी उडवून टाकणार आहे.

तुम्ही लगेच त्याचे इंस्ट्रक्शन्स फॉलो करता आणि मग त्याच्या ताब्यामध्ये कॉम्प्युटरला सोपवता.  ऑब्व्हीअसली, तुमचा कॉम्प्युटर खूप छानपणे रन व्हायला सुरुवात होते. पहिल्यासारखाच, एखाद्या नवीन कॉम्प्युटर प्रमाणे तो अगदी मस्त चालू लागतो. तुम्ही खूप खूष व समाधानी होता. हिप्नॉटिझम दरम्यान काय होते किंवा हिप्नॉटिझमला थेरपी म्हणून जेव्हा वापरले जाते तेव्हा नेमके काय घडते हे समजण्यासाठी मी हे टेक्निकल उदाहरण तुम्हाला दिले आहे. 

भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींचा परिणाम झाल्यामुळे, आयुष्यातील काही घटनांमध्ये अतिशय वेदना सोसाव्या लागल्यामुळे, काही आपत्तीजनक व्यावहारिक अडचणींमुळे, स्वभावामध्ये कायमस्वरूपी एखादी त्रुटी राहिल्यामुळे, आजूबाजूच्या समाजाकडून – अगदी घरातले व्यक्ती अथवा नातेवाईक यांच्याकडून सतत अवहेलना, आगपाखड झाल्यामुळे – इत्यादी गोष्टींचे परिणाम स्वरूप तुम्ही कोणत्या ना कोणत्या मानसिक त्रासाला सहन करत असतात आणि या मानसिक त्रासाचा बऱ्याचदा उद्वेग होतो, तेव्हा मानसिक आजार निर्माण होतात. शारीरिक आजार उद्भवतात किंवा त्यांची तीव्रता वाढते. कधी कधी चार जणांना होत नाही असे शारीरिक अथवा मानसिक आजार होतात आणि या सर्वाचा परिणाम आपल्या वर्तमान आयुष्यावर झालेला असतो. copyrighted

तुम्ही हिप्नोथेरपी साठी जेव्हा येता, तेव्हा काय काय कारणे घडली असतील, याचा मी फक्त एक ढोबळ अंदाज तुम्हाला वरच्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलेला आहे. खरं सांगायचं तर माझ्याकडे मानसिक आरोग्य संबंधी समस्या घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती व त्या व्यक्तीची कहाणी जवळजवळ एखाद्या पुस्तकाप्रमाणे नवीन असते. 

बहुसंख्य वेळा या व्यक्ती (99.99 %) सर्व डॉक्टरी इलाज (मेडिसीन्स, गोळ्या, इतर महागड्या ट्रिटमेंट) करून थकलेल्या असतात. आयुष्य कसेबसे ढकलत असतात. कर्तव्य जमेल तशी पार पाडत असतात.   तर कधी (बऱ्याचदा) या व्यक्ती निराश झालेल्या असतात.  कधी कधी त्यांना घरच्यांचा पूर्ण सपोर्ट असतो. तर कधी कधी घरच्यांना त्यांचं हे मानसिक दुखणं प्रश्न निर्माण करणार असतं. कधी कधी तर घरच्यांचा रोषही परवडतो. पण मानसिक आजारांकडे सततचे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना गंभीर शारीरिक आजारांना तोंड द्यावं लागतं यापेक्षा दुसरं अधिक पेनफुल ते काय?! copyrighted

माझे सेशन्स कसे असतात, त्या सेशन्सचे स्वरूप मी एका आर्टिकल मध्ये यापूर्वी स्पष्ट केलेले आहेच आता उपचारांचं थोडक्यात स्वरूप सांगते.

जे काही तुमच्या पास्ट मध्ये घडलेलं आहे,  तीव्र असू दे, मध्यम असू दे किंवा सर्वसाधारण असू दे, आजच्या तारखेला तुम्ही जर तो प्रॉब्लेम घेऊन आलेले आहात, तर त्याला स्पेशल मार्गानेच हॅण्डल करणे गरजेचे असते.

इंट्रोडक्टरी सेशन झाल्यानंतर जी चार मुख्य हिप्नोथेरपी सेशन्स चालू होतात त्यात हिप्नोकौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपीची स्लिप म्हणजे संमोहनाची निद्रा यांचा समावेश असतो. आजच्या तारखेला तुमच्या आयुष्यात जे काही मनाविरुद्ध घडतंय व तुम्ही स्वतः बाबत जे काही असमाधानी आहात त्याची ट्रीटमेंट अशी घडते की, वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये जसा अनवाँटेड कचरा साचलेला आहे, तो कचरा म्हणजेच सायंटिफिक भाषेमध्ये अंतर्मनात साचलेल्या, नको असलेल्या व मारक ठरणाऱ्या डीमोटिवेट करणाऱ्या अशा सर्व  निगेटिव्ह सूचना म्हणजेच तुमच्या मनाच्या सॉफ्टवेअर मधील एरर्स आहेत.

एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये एरर्स असल्यावर जसं एखादं आऊटपुट, मनाजोगतं मिळत नाही, तसेच कधीकधी तर अतिशय चुकीचं आउटपुट मिळतं, त्याचप्रमाणे हा भूतकाळाने केलेला इम्पॅक्ट (भूतकाळातील घटनांचा मनावर झालेला परिणाम)  तुमचं आयुष्य बिघडवत असतो. हिप्नोथेरपी मध्ये तुम्हाला स्लिप मध्ये नेले जाते. म्हणजेच या गहिऱ्या निद्रेमध्ये म्हणजेच संमोहनाच्या स्लिप मध्ये अंतर्मनात (तुमच्या भूतकाळातील) गेलेल्या चुकीच्या सूचना काढून टाकल्या जातात व त्या जागी नवीन कल्याणकारी सूचनांना तिथे पोहोचवलं जातं. संमोहन निद्रेतून बाहेर आल्यावर जेव्हा तुम्ही नॉर्मल आयुष्य जगता, त्यावेळी या सूचनांचा प्रभाव म्हणजेच त्या सूचनांप्रमाणे आयुष्यात घडून येणे, सुरू होते. यात कोणताही चमत्कार नाही आहे. तर अंतर्मनावर प्रोसेस झाल्यामुळे हा कल्याणकारी बदल साध्य होतो. तुमचे प्रॉब्लेमही संपून जाता। कारण तुमच्या अनेक कल्याणकारी क्षमता विकसित झालेल्या असता. तुमचे व्यक्तिमत्व सकारात्मक बनलेले असते. copyrighted

तुम्हाला वाटत असेल की, हे सर्व मेकॅनिकली कसं काय होत असेल? तर यात कोणतंही मेकॅनिझम नाहीय. यामध्ये अंतर्मनाच्या शक्तिशाली सायन्सचा वापर करून घेतलेला असतो. आपण जे काही वागतो बोलतो, चालतो, काम करतो, योजना करतो, त्या राबवतो, तसेच निरनिराळ्या प्रेरणा आपल्यात निर्माण होतात त्या सर्व आपल्याच अंतर्मनातील अनेक वर्षाच्या डेटावर आधारित पार पाडल्या जातात.

तुम्ही हिप्नोटाईज होता म्हणजे नेमकं काय होतं: उत्तरार्ध भाग What Happens When You’re Hypnotized? Part 2

एका गोष्टीसाठी मला तुम्हा सर्वांच विशेष कौतुक करावसं वाटतं की, आपले मानसिक आरोग्य सध्या बिघडलेले आहे किंवा नकारात्मकतेच्या प्रभावाखाली आहे, आणि ते रिपेअर होणे अनिवार्य आहे, ही जाणीव तुम्हाला वेळेवर होत आहे आणि याच अवेअरनेस मध्ये या संमोहन उपचारांसाठी तुम्ही माझ्याकडे विचारणा करीत आहात आणि उपचार घेऊन पूर्ण बरे होत आहात. यानंतरच्या काही लेखांमध्ये मी – हिप्नोथेरपी सेशन्स मध्ये मला आलेले अनुभव – यावर लेखन प्रसिद्ध करणार आहे.

संमोहन उपचारांबद्दल माहिती देणारा हा लेख कसा वाटला, हे मला जरूर कळवावे. या सर्व लेखांची मी स्वतः लेखिका आहे आणि यात लिहिलेले सर्व लेखन म्हणजे माझे स्वानुभव आहेत. हे सर्व लेख कॉपीराईटेड आहेत. या लेखांचा कोणताही गैरवापर करू नये या लेखांचा स्क्रीनशॉट काढणे किंवा कॉपी-पेस्ट करणे असे काहीही करू नये. कॉपीराईट कायदा व कर्म सिद्धांत याचे उल्लंघन करू नये. तुम्ही या “लेखाची लिंक कुठेही शेअर करू शकता.”

अजून एक नेहमीचीच सूचना, म्हणजे इथे या लेखासोबत जो मोबाईल नंबर मी दिलेला आहे, तो WhatsApp चा नंबर आहे. तुमची ओळख व समस्या, तुम्हाला जी माहिती हवी आहे, त्या संदर्भातील मेसेज, तसेच तुमच्या समस्येचा उल्लेख करणारा एक सलग मेसेज, तुम्ही WhatsApp वर पाठवू शकता. या नंबर वर डायरेक्ट फोन करू नये; आधी मेसेजच पाठवावा. त्याप्रमाणे first appointment plan केली जाईल. हा विषय नीट समजावा म्हणून विस्तृत व दोन भागांमध्ये लिहिला आहे.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

1 Trackback / Pingback

  1. हिप्नोथेरपी सेशन्सची माहिती वाचा. संमोहन उपचार तज्ञ डॉ. सुनेत्रा जावकर महाराष्ट्र: भाग पहिला Everythi

Leave a Reply