तुमचे अंतर्मनच तुम्हाला सुपर ह्युमन बनवु शकते! Your Subconscious Mind Will Shape You a Superhuman!

तुमचं अंतर्मनच तुम्हाला सुपर ह्युमन बनवु शकते.  विश्वास बसत नाहीय? आजमावून तर पहा  स्वतःच्या अंतर्मनाला.

आधी अंतर्मन म्हणजे काय हे कन्फ्युजन असेल तर नीट समजून घ्या. आपल्याला एकच मन असते. पण एक आतला स्तर (पायरी) असतो, तर एक बाह्यस्तर असतो. आतला स्तर हा अंतर्मन व बाहेरचा स्तर बाह्यमन. अंतर्मन प्रचंड पॉवरफुल असतं आणि या अंतर्मनात ‘फीड’ झालेल्या डेटावर आधारित आपलं प्रोग्रामिंग बनलेलं असतं. कोणतं प्रोग्रामिंग? तर वर्तमान आयुष्याचं. बाह्यमन म्हणजे दोन माणसं एकमेकांसोबत गप्पा मारतात, तेव्हा बाह्यमन activate असतं आणि अमुक एक गोष्ट माझ्या मनात आत पोहोचली किंवा अमुक एक गोष्ट मनाला आत लागली असं आपण म्हणतो ते अंतर्मन. 

कोडिंग च्या भाषेत सांगायचं तर, अंतर्मनात प्रत्येक गोष्टीचं, संपूर्णतः कोडिंग असतं. बेसिक कोडिंगच्या, language मध्ये error आला, तर application मध्ये पण error येतो, तसंच काहीसं अंतर्मनासोबत घडतं. चुकीचा अथवा निगेटिव्ह डेटा फीड होत राहिला तर, output पण निगेटिव्हच येणार ना?

असो. आज आपण हे पाहुया की, आपल्या अंतर्मनाकडे कोणत्या लक्षणीय क्षमता आहेत?

1) आपले अंतर्मन आपल्या शरीराच्या  सर्व महत्वपूर्ण प्रक्रियांचे नियंत्रण करते. (डायजेशन, श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, भावना प्रसारित करणे, निरनिराळ्या प्रेरणा) अंतर्मनाला सर्व समस्यांची आणि प्रश्नांची उत्तरंही माहित असतात.

2) तुमच्या ज्या विशेष इच्छा असतात, त्या झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला सांगून ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी अंतर्मनाकडे विनंती करा आणि मग तुमच्या अंतर्मनाची चमत्कार घडवून आणण्याची ताकद कशी काम करते ते पहा. अंतर्मनाची शक्ती /बळ आपोआप तुमच्या इच्छांना मिळते आणि त्या पूर्ण होतात.

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

3) आपल्याला येणारे नैराश्य हे आपल्या सर्व अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे येत असतं. ज्याला आपण म्हणतो की, माझ्या मनाजोगतं झालं नाही; घडलं नाही. जर तुम्ही कायम अडचणी, विलंब, प्रॉब्लेम्स, अडथळे यांचाच विचार करत बसलात, तर तुमचं अंतर्मन सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देईल आणि मग त्यामुळे तुम्ही स्वतःच स्वतःचे कल्याण किंवा हित होण्यापासून स्वतःला थांबवाल.

4) तुमची आत्ताची समस्या पूर्णपणे सॉल्व झाली आहे आणि हॅप्पी एंडिंग झालंय अशा पद्धतीने विचार करून, लिटरली या हॅपी एंडिंग चा आनंद अनुभवा. हा हॅप्पी एंडिंग चा आनंद तुमचं अंतर्मन स्वीकारेल आणि तुम्हाला भविष्यामध्ये तसाच परिणाम तुमच्या समस्येसाठी प्राप्त होईल. थोडक्यात तुमची एखादी समस्या, अंतर्मनात उत्तम रिझल्टचे विचार आणल्यामुळे पुढील काळात सॉल्व होईल. थोडसं आश्चर्यकारक आहे; पण हे नक्की अनुभवून पहा. कारण तुमच्या अंतर्मनाला भलंबुरं, चांगलं-वाईट हे कळत नसतं. फक्त (अंतर्मनाची सुपर पॉवर) ताकद कोणत्या विचारांना द्यायची, हे त्याला कळत असतं किंवा आपण म्हणू की, अशी ताकद अंतर्मनाकडून आपोआप तुमच्याकडे प्रसारित होत असते. (पॉवर प्रोव्हायडर)

5) तुमच्या अंतर्मनाच्या पटलावर किंवा आपण म्हणू स्क्रीनवर, तुम्ही ज्या विचारांना पाठवत असता किंवा प्रसारित करत असता, असे विचार हे, अनुभव, परिस्थिती आणि घटनांच्या स्वरूपामध्ये व्यक्त होत असतात. म्हणून तुमच्या अंतर्मनात कोणकोणत्या कल्पना आणि विचारांचा प्रवेश होतोय, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. अर्थातच प्रत्येक विचाराकडे सतत लक्ष देणे किंवा अनेक विचारांकडे कायम लक्ष देणे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीय; परंतु आपल्याला विचारांच्या आधी येतं, ते फिलिंग – म्हणजे भावना.

त्या भावनांमुळे आपल्याला हे तरी कळतं की, आपल्या मनात आता नकारात्मक विचार येतोय की सकारात्मक विचार येतोय. जे जे अंतर्मनाच्या डेटामध्ये तुम्ही फीड करत जाल, ते ते पुढे येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्षपणे घडत जाणार आहे. त्यामुळे आपण कोणता विचार करतोय आणि तो खोलवर अंतर्मनात रुजवतोय याकडे नक्कीच तुम्ही लक्ष द्या आणि ज्या विचारांनी, ज्या विचारांनी, मातीमध्ये बीज रुजावं, तसं आत पर्यंत रुजत जाणं, ‘आवश्यकच नाहीय’, ‘अपेक्षितच नाहीय’, अशा विचारांना टाळायला शिका. फेकून द्यायला शिका.

6) “माझा विश्वास आहे की, ज्या अंतर्मनातील प्रेरणेनेच आता माझ्यामध्ये ही पर्टिक्युलर इच्छा निर्माण केली आहे, त्याच अंतर्मनाची शक्ती माझ्या सर्व व्यक्त झालेल्या इच्छा पूर्ण करत राहणार आहे.” असं जेव्हा तुम्ही ठामपणे अंतर्मनाकडे सांगत राहाल, म्हणत राहाल आणि तसे इंटेन्शन (हेतु) मनामध्ये कायम ठेवत राहाल, तर तुमच्या आयुष्याची तत्वं, जीवनमूल्यं अतिशय व्यवस्थित व लयबद्ध रीतीने आणि सुसंवादीपणे प्रवाहित व्हायला सुरुवात होईल. म्हणजेच थोडक्यात तुम्ही जे बोलाल ते ते तसं तसं बऱ्याच अंशी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना तुम्हाला आढळून येईल आणि तुम्ही आनंदी व्हाल.

7) ‘द लॉ ऑफ ॲक्शन अँड रिएक्शन’ हा नियम म्हणजेच – ‘क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा नियम’, हा ग्लोबल आहे. सर्वव्यापी आहे. तात्पर्य असे की, तुमचे विचार ही एक क्रिया आहे आणि त्या तुमच्या विचारांना तुमच्या अंतर्मनाने आपोआप दिलेला प्रतिसाद ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळे विचारांच्या प्रवाहामध्ये वाहत जाताना नेहमी सतर्क रहा, विचारांना पाहायला शिका. त्यांचं  फिलिंग्सच्या स्वरूपात निरीक्षण करायला शिका.

8) आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये बेस्ट रिझल्ट हवेत, हे आपल्या अंतर्मनामध्ये वारंवार बिंबवत राहा. अंतर्मनाला वारंवार सांगत राहा की, मला अतिशय बेस्ट रिझल्ट हवा आहे, तो तू दे. यामुळे काय होईल, तर तुमचं अंतर्मन अगदी प्रामाणिक सेवकाप्रमाणे तुमच्या सवयीच्या विचारांना रिस्पॉन्स देईल आणि काही तशा घटना घडायला सुरुवात होईल.

9) व्वा !! तुमचं हृदय किती मस्त चालतंय! तुमचं फुफ्फुस किती छान चालतं! तुमचा मेंदू उत्तम काम करतोय! तुमचे सर्व अवयव किती चांगले चालतात आणि हे असं घडणं, अतिशय सर्वसाधारण व नैसर्गिक आहे. खूप कॉमन गोष्ट आहे. पण तुमच्या सततच्या चिंता, भीती, काळजी, अनिश्चितता या अशा विषयांच्या विचारांमुळे, या सर्व अवयवांच्या फंक्शनिंग वर खूप लक्षणीय परिणाम होऊ शकतो. थोडक्यात या अवयवांची सुसूत्रता बिघडू शकते. या अवयवांना लवकर थकवा येऊ शकतो.

10) म्हणूनच तुमच्या अंतर्मनाचे, शांततापूर्ण आणि स्वास्थ्यमय विचारांनी पोषण करत रहा. मनाशी, अंतर्मनाशी सुसंवाद साधत राहा. असे केल्यामुळे तुमच्या शरीराची सर्व कार्यं पुन्हा पूर्वीसारखी निसर्गतः व सामान्य होतील. शरीरांतर्गत काय चाललंय, हे नक्कीच तुम्हाला मला कळत नाहीय. परंतु या शरीरावर होणारा वाईट परिणाम – जो आपल्या सततच्या नकारात्मक विचारसरणीने होत राहतो, हा परिणाम रोखणं आणि आपलं शरीर आणि मन यांचं आरोग्य टिकवून ठेवणं, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. 

स्वत:ला लावण्याच्या या सकारात्मक सवयी, फक्त हिप्नोथेरपीने साध्य होऊ शकतात. कारण हिप्नोथेरपी ज्याला आपण हिप्नॉटिझम किंवा हिप्नॉसिस या नावाने ओळखतो, ही थेरपी संपूर्णतः या तुमच्या अंतर्मनावर काम करते. आणि कायमस्वरूपी इफेक्ट देते. तुमच्या बऱ्याच बेसिक गोष्टी ज्या बदलणं किंवा त्यांचं पुन्हा व्यवस्थापन (प्रोग्रामिंग) करणं तुम्हाला आजपर्यंत जमलेच नाही, ते महत्त्वाचं काम या थेरपीमुळे साध्य होतं आणि एकदा असे सकारात्मक व लक्षणीय बदल, तुमच्यामध्ये घडायला सुरुवात झाली की, आयुष्यभर मनाच्या, विचारांच्या, चांगल्या सवयी तुम्हाला कधीच नैराश्य येऊ देत नाहीत आणि प्रत्येक कार्यामध्ये संकल्पपूर्तीचा आनंद तुम्ही कायम घेऊ शकता. आपण संपर्क करावा.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा जावकर 9820373281 हिप्नोथेरपिस्ट, माईंड कौन्सेलर & निसर्गोपचार तज्ञ

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*