
होय, आपण पॉपकॉर्न बनत आहोत!! गरम तव्यावर टाकल्यावर धान्याच्या लाह्या बनतात, तसं काय ते वाटतंय ना सध्या!! पुढील टिप्स वाचा आणि उन्हाळा सुसह्य होईल!! काही टिप्स तर महापालिकेने सुद्धा सांगितल्या आहेत.
१. वसंत ऋतू (कफ प्रकोप)
चैत्र – वैशाख (मध्य मार्च – एप्रिल – मध्य मे)
“कफश्चितो हि शिशिरे वसन्तेऽर्कांशुतापितः ।
हत्वाऽग्निं कुरुते रोगान् अतस्तं शीघ्रम् अपहृत्येत् ॥”
- अष्टांग हृदय (सूत्रस्थान, ऋतुचर्या)
अर्थ: शिशिर ऋतूत साचलेला कफ वसंत ऋतूमध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे द्रव होतो, तो जठराग्नी मंद करून रोग निर्माण करू शकतो.
२. ग्रीष्म ऋतू (उष्णतेचा परिणाम)
ज्येष्ठ – आषाढ (मध्य मे – जून – मध्य जुलै)
“आदित्यानुगतो वायुर्घर्मेणात्यर्थपीडितः ।
शोषयत्योजसो देहं ग्रीष्मे सर्वप्रयत्नतः ॥”
- अष्टांग हृदय (ऋतुचर्या वर्णन)
अर्थ: ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे शरीरातील ओज व द्रव घटक कमी होतात, त्यामुळे थकवा व कोरडेपणा वाढतो.

उन्हाळा टिप्स:
हे करा:
- घरातून बाहेर पडण्यापूर्वी ताक, लिंबूपाणी, नारळपाणी, कोकम सरबत किंवा पन्हे यांसारखी नैसर्गिक पेये घ्या.
- आहारात कलिंगड, खरबूज, काकडी, दही, ताक, रसयुक्त फळे यांचा समावेश करा.
- दुपारच्या वेळी हलका सुपाच्य आहार घ्या, जड, झणझणीत व तेलकट पदार्थ कमी खा.
- बाहेरून आल्यावर हात-पाय आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.
- दिवसभरात शक्य असल्यास एक-दोन वेळा आंघोळ करा, शरीर थंड राहते.
- लहान मुले आणि वृद्ध यांना उष्णतेची लक्षणे (गरगरणे, डोकेदुखी, थकवा) दिसत आहेत का, ते लक्ष ठेवा.
- घरात हवेशीर व्यवस्था ठेवा आणि खिडक्या सकाळ-संध्याकाळ उघड्या ठेवा.
- बाहेर जाण्यापूर्वी हलका सनस्क्रीन किंवा त्वचेचे संरक्षण करणारे उपाय वापरा.
- शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून थोड्या-थोड्या वेळाने द्रवपदार्थ घ्या.
- उन्हाळ्यात पुरेशी झोप घ्या, कारण उष्णतेमुळे शरीर लवकर थकते.
- ओआरएस (ORS) किंवा मीठ-साखर पाणी कधी कधी उपयोगी ठरते.
- शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हलका व्यायाम / चालणे करा.
- पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
- हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
- उन्हात जाताना टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.
- पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा.
- ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करु नका :
- दीर्घकाळ रिकाम्या पोटी उन्हात फिरू नका.
- खूप तिखट, तेलकट आणि जड पदार्थ वारंवार खाऊ नका.
- एकदम खूप थंड पाणी किंवा बर्फाचे पदार्थ वारंवार घेऊ नका.
- जास्त वेळ थेट सूर्यप्रकाशात उभे राहू नका.
- शरीरात घाम खूप झाल्यावर लगेच थोड्या थंड पाण्याने अंघोळ करू नका.
- उन्हातून आल्यावर ताबडतोब एसीसमोर बसणे टाळा.
- बंद, हवेशीर नसलेल्या खोलीत जास्त वेळ राहू नका.
- डिहायड्रेशनची लक्षणे (डोके हलके होणे, तोंड कोरडे पडणे) दुर्लक्षित करू नका.
- दिवसभर फक्त जंक फूड किंवा पॅकेज्ड स्नॅक्स खाणे टाळा.
- लहान मुले, वृद्ध किंवा आजारी व्यक्तींना दीर्घकाळ उन्हात ठेवू नका.
- शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
- कष्टाची कामे उन्हात करु नका.
- किती सुरक्षित यंत्रणा असली तरी, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
- गडद रंगाचे, जाड कापडाचे, तंग कपडे वापरु नका.
- उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाकघर व्यवस्थित हवेशीर ठेवा.
- पॅकेट ज्युसेस, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स टाळा.
- शिळे अन्न खाऊ नका.
- वर लिहिलेल्या सर्व टिप्स सोडून अजून काही महत्त्वपूर्ण परफेक्ट टिप्स पहा :
Heat Stroke म्हणजे उष्माघात टाळण्यासाठी टिप्स :
हे करा :
- बाहेर जाण्यापूर्वी शरीर पूर्णपणे हायड्रेटेड ठेवा; पाणी, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारखे द्रव घ्या.
- शक्यतो सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर जाणे कमी करा, कारण ही सर्वाधिक उष्णतेची वेळ असते.
- दीर्घकाळ उन्हात राहावे लागल्यास दर २०–३० मिनिटांनी सावलीत विश्रांती घ्या.
- बाहेरून आल्यावर कपाळ, मान आणि हातावर थंड पाण्याचे शिंतोडे मारा.
- काम करताना डोक्याचे संरक्षण (टोपी, हॅट, स्कार्फ) वापरा.
- उष्णतेमुळे थकवा जाणवल्यास ताबडतोब विश्रांती घ्या.
- शरीरात मीठाची कमतरता होऊ नये म्हणून कधी कधी ORS किंवा मीठ-साखर पाणी घ्या.
- उन्हाळ्यात हलका, पचायला सोपा आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला – ज्यूस, सूप, पेज असा आहार घ्या.
- लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांना उष्णतेपासून विशेष संरक्षण द्या.
- घरात हवा खेळती ठेवण्यासाठी पंखे, कुलर जमल्यास एसी, एक्झॉस्ट फॅन किंवा योग्य वायुविजन (व्हेंटिलेशन) ठेवा.
हे करू नका :
- खूप वेळ सलग उन्हात उभे राहू नका किंवा काम करू नका.
- डिहायड्रेशनची लक्षणे दुर्लक्षित करू नका (गरगरणे, मळमळ, डोकेदुखी).
- उन्हातून आल्यावर एकदम बर्फाचे थंड पाणी मोठ्या प्रमाणात पिऊ नका.
- अतिशय जड, तेलकट आणि मसालेदार अन्न वारंवार खाऊ नका.
- शरीर खूप गरम झाल्यावर ताबडतोब एसीच्या थंड हवेत बसू नका.
- लहान मुलांना गाडीत किंवा बंद जागेत एकटे ठेवू नका.
- अति कॅफीन असलेली पेये (जास्त चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक) जास्त प्रमाणात घेऊ नका.
- शरीर खूप थकलेले असताना कठीण व्यायाम करू नका.
- घाम खूप झाल्यानंतर पाणी न पिता राहू नका.
Heat Stroke ची सुरुवातीची लक्षणे :
- खूप गरगरणे
- डोकेदुखी
- मळमळ किंवा उलटी
- जास्त घाम येणे किंवा काही वेळा घाम बंद होणे
- शरीर खूप गरम वाटणे
- कमजोरी किंवा गोंधळल्यासारखे वाटणे
- शरीर काळवंडल्यासारखे वाटणे
उन्हाळ्यात जवळ ठेवावीत अशी सर्वसामान्य प्रथमोपचार औषधे/साहित्य :
हे जवळ ठेवा :
- ओआरएस पावडर (मीठ-साखर द्रावण)
- मीठ आणि साखर – गरज पडल्यास मीठ-साखर पाणी बनवण्यासाठी
- लिंबू – लिंबूपाणी करण्यासाठी
- ताक / छाछ
- नारळपाणी
- ग्लुकोज पावडर
- ओला टॉवेल / रुमाल – शरीर थंड करण्यासाठी
- थंड पाण्याची बाटली
- कापसाचे कापड किंवा पट्टी
- जमल्यास थर्मामीटर (ताप मोजण्यासाठी)

एखाद्या व्यक्तीला Heat Stroke उष्माघात आल्यास काय करावे :
हे करा :
- व्यक्तीला ताबडतोब उन्हातून सावलीत किंवा थंड जागेत आणा.
- घट्ट कपडे सैल करा किंवा हलके करा.
- व्यक्तीला झोपवा आणि डोके थोडे उंच ठेवा.
- कपाळ, मान, बगल आणि पायांवर थंड पाण्याचे ओले कपडे ठेवा.
- शक्य असल्यास पंखा किंवा हवा द्या.
- व्यक्ती शुद्धीत असेल तर थोडे-थोडे पाणी, ओआरएस किंवा लिंबूपाणी द्या.
- शरीराचे तापमान कमी करण्यासाठी हातापायांवर थंड पाणी शिंपडा.
- लक्षणे वाढत असल्यास ताबडतोब डॉक्टर किंवा रुग्णालयात घेऊन जा.
हे करू नका :
- बेशुद्ध किंवा अर्धबेशुद्ध व्यक्तीच्या तोंडात पाणी किंवा द्रव जबरदस्तीने ओतू नका.
- व्यक्तीला चालायला किंवा उभे राहायला जबरदस्ती करू नका; पूर्ण विश्रांती द्या.
- अचानक खूप बर्फ किंवा अतिशय थंड पाणी थेट शरीरावर टाकू नका, त्यामुळे शरीराला धक्का बसू शकतो.
- चहा, कॅफीन किंवा सॉफ्टड्रिंक देऊ नका.
- लक्षणे कमी होण्याची वाट पाहत वेळ घालवू नका; गंभीर स्थितीत त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
- घट्ट किंवा जाड कपडे परत घालू नका; शरीराला थंड होऊ द्या.
अशा रीतीने अति उन्हाळ्याला अजिबात न घाबरता, सामोरे जावे. ही सर्व माहिती आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा. आपण सर्वजण, आता सुरू झालेला उन्हाळा, योग्य ती खबरदारी घेऊन नक्कीच एन्जॉय किंवा सुसह्य करू शकतो!
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Leave a Reply