“आऊ sss तुला माहित आहे का?” पुढे सलग एक रसभरित बातमी! किंवा अनेक बातम्या!! खरंतर ही बातमीच असते असं नाहीय; पण साध्या घडामोडीची बातमी बनलेली असते. एकवेळ घटनास्थळी ब्रेकिंग न्यूज देणारे पत्रकार फिके पडतील; पण आमचे चिरंजीव याच नौटंकीपूर्ण स्टाईलमध्ये साध्या गोष्टींचं वृत्तांकन करणार!! आणि आऊ (म्हणजे मीच!) ला सांगणार.
‘आई’ म्हण, म्हणून भरपूर प्रयत्न केले होते हो, आम्ही सर्वांनी. पण चिरंजीवांनी आपसूकच कुठून हे ‘आऊ’ संबोधन आणलं, माहितच नाही. (छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला आऊ म्हणायचे, इतकंच माहित आहे मला) असो. चिरंजीव अश्शाच स्टाईलमध्ये बातम्या सांगतात आणि मी पण डोळे नि कान विस्फारुन ऐकत असते. हा पहिला प्रसंग. आता दुसरा प्रसंग पहा. ©
मी टेक्निकली शतमूर्ख प्रश्न विचारला (सोशल नेटवर्क, ट्रेंड्स, फॅशन, मॉडर्न सर्वायवल, इत्यादी) की, मुळापासून डायलॉग सुरु! “बाळा, एss बाळा, शांत हो! सांगते मी नीट काय ते, हां” कोण असेल बरं? गेस करा!! चिरंजीवांची लाडकी ताई!! माझी मुलगी! तिची प्रेमळ वॉर्निंग ऐकून आई झाली लगेच हायबरनेट चुपचाप!! हा हा हा !! हा झाला दुसरा प्रसंग. ©
मला वाटतं, दोन्ही प्रसंग थोडेफार फील झाले असतील, म्हणजे कल्पनेत आले असतीलच तुमच्या!! अगदी रुटीनमध्ये घडणार्या घटना आहेत. त्या वाचल्यावर कोणकोणते भावतरंग निर्माण झालेत, हे पहा.
आता एक अजून प्रसंग सांगते. छोटे छोटे लहानगे झरोके. त्यातून सूर्याची किरणं मूर्तीवर पाडणारं मोहक स्थापत्य. किरणोत्सव चाललाय. मी समोर हात जोडून उभी आहे. अष्टभाव दाटलेले. पंचप्राण समेटलेले. अचानक जोडलेले हात, मी तसेच अलगद वर नेते आणि त्या सोनेरी किरणांच्या रस्त्यात, त्या किरणांचा ऊबदारपणा हातावर घेते नि विचार करते की, ही गतिमान प्रकाशकिरणं – माझा नमस्कार स्वत:सोबत, थेट दत्तात्रेयांकडे पोचवतायत आता. वा वा मस्त! समोरच्या दत्तात्रेयांचे स्मित हास्य अजूनच विस्फारित झाल्यासमान वाटले. हा तिसरा प्रसंग झाला. शाब्बास!! तुम्ही किती तंतोतंत नजरेसमोर आणून पहात आहात. ©
साधं सात्विक सौंदर्य असलेली एक तरुण मुलगी हिरवाईने भरलेल्या बागेत बसली आहे. तिच्या मिल्कव्हाईट कलरच्या छान ड्रेसवर काळे डॉट्स आहेत आणि याच ड्रेसवर अधूनमधून सुंदर रेड वेलबुट्टीच्या डिझाईनचे आकाराने मोठ्ठे पट्टे आहेत. तिचा हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. ती खूप छान दिसत होती. तिच्या हातात एक पुस्तक होतं. बहुधा अभ्यासाचंच असावं. ती अधूनमधून पाठांतर केल्यासारखं डोळे मिटून पुटपुटत होती. माझ्यापासून जवळच बसली होती. मला माणसांना ऑब्झर्व्ह करायला आवडतं; मी तिला सहजच निरखून पहात होते. ©
इतक्यात – एक पंख म्हणजे – पारलेजी चं एक बिस्किट, अशा मोठ्ठ्या आकाराचे पंख असलेलं एक अतिशय सुंदर फुलपाखरु तिथे आलं आणि मस्त भरार्या मारत ते तिच्याजवळ गेलं. तिच्या अगदी जवळ जाऊन बसलं. मी अगदी जवळच असल्यामुळे मीही त्याला नीट पाहु शकले; तर काय नि कित्ती कित्ती आश्चर्य!! त्याच्या अंगावर चक्क सेम तीच रंगसंगती आणि सेम तेच डिझाईन होते, जे त्या मुलीच्या ड्रेसवर होते. तिलाही खूप आनंद झाला. ती आनंदित झाली. तो अक्षरशः अवाक करणारा प्रसंग होता. ©
या वर लिहिलेल्या सर्व प्रसंगांना भावांच्या स्वरुपात पहा. थोडं सोपं करुन सांगते. पहिले दोन प्रसंग जे आहेत, त्यात प्रेमपूर्ण भाव प्रसारित होत आहेत. प्रेमाची किरणं प्रसारित होत आहेत. तिसर्या प्रसंगात दत्तात्रेयांच्या देवळातील प्रसंग आहे. तिथे भक्तीरसाची किरणं पाझरत आहेत.
चौथ्या प्रसंगातून निसर्गातून आनंदित करणारी किरणं बाहेर पडत आहेत. ज्यात फुलपाखराचे रंग व डिझाइन ही नैसर्गिक गोष्ट आहे. मुलीच्या ड्रेसचं डिझाइन सेम टु सेम आहे. ते कृत्रिम आहे. पण ते नैसर्गिकतेसोबत संपूर्णतः मेळ खाणारे आहे. आणि या दोहोंचे सेम असणे, यामुळे माझ्या व मुलीच्या मनातून आश्चर्यमिश्रित आनंदाची भाव किरणं प्रसारित होत आहेत. ©
या सर्व प्रसंगांमध्ये मी कशाचं वर्णन करत आहे? तर किरणांच्या प्रसारणाचं. किरणोत्सर्गाचं. इंग्रजीमध्ये रेडिएशन. तुम्हाला फक्त घातक रेडिएशन बाबत बरंच काही ऐकून माहित असेल. तुम्ही त्यावर चिंता व्यक्त करता. जमेल तेवढी काळजी घेता. कधीकधी या रेडिएशनच्या प्रपातापुढे हतबलही होता. बचावात्मक उपायांसाठी प्रयत्न करता. ©
अगदी खरं सांगा. रेडिएशन हा एक जवळजवळ नकारात्मक सामाजिक आणि वैश्विक मुद्दा आहे, असं आहे ना?! पण रेडिएशन क्षेत्रात पूर्ण सक्रिय असणारे तज्ञ सांगतात की, तुम्हाला असं जर वाटत असेल की, तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी, जसं की, रेडिओ रिअॅक्टर्सचं, वेगवेगळी उपकरणं बनवताना होणारे रेडिएशन, अण्वस्त्रातील, सेटेलाइट मधील रेडिओ लहरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील रेडिएशन्स – हे एवढंच रेडिएशन असतं, असं नाहीय. या तज्ञांचं असं म्हणणं आहे, – जे वास्तवाला धरून आहे – ते म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू, गोष्ट, सिच्युएशन ही रेडिएशन निर्माण करत असते अशी कोणतीच गोष्ट या विश्वामध्ये किंवा अंतराळात नाहीये, जी कोणताच किरणोत्सर्ग करीत नाही. ©
हे वाचल्यावर निदान जी एक मोठी भीती आपल्या मनामध्ये किरणोत्सर्गाला घेऊन, घर करून राहिली आहे त्या भीतीला तुम्ही थोडंसं जनरलाइज नक्कीच करु शकता. अर्थातच घातक रेडिएशन होणाऱ्या ठिकाणी तुम्ही निश्चितच काळजी घ्यायला हवी; पण डेली लाईफ मध्ये जे मेंडेटरी रेडिएशन आहेत, असे रेडिएशन, ज्यांना तुम्ही टाळूच शकत नाही आहात, त्या (मोबाईल व अन्य) रेडिएशनची भीती मनात बाळगतानाच, आता हा विचार करा की, जग अजून कोणकोणत्या रेडिएशनने ग्रसित आहे बरं? ©
नीट विचार केलात तर नक्की सापडेल. ज्या घटनांचं मी वर्णन केलं, त्या घटनांमध्ये जी भावांची निर्मिती झाली, ते ते भाव त्या त्या विशिष्ट प्रसंगांमधून – किरण स्वरुपात बाहेर पडतात. रेडिएट होतात. खात्री पटण्यासाठी पुन्हा एकदा ते वरील प्रसंग वाचा. नक्कीच ते प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर येतील आणि त्यातले भाव तुम्हाला समजतील. छोट्या छोट्या प्रसंगाला आपण जर तीव्रतेने समजू शकतो, ती तीव्रता म्हणजे काय, तर त्या भावनिर्मितीतून जी किरणं बाहेर पडतात, त्यांचा किरणोत्सर्ग होय. ©
आज कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या काळजीने, चिंतेने ग्रस्त आहे. काही जणांचे मन नाराज आहे; काही जणांच्या मनात अनिश्चिततेचे भाव सतत घोळत आहेत. काही जण नैराश्यात आहेत. काही जण खचलेले आहेत. अगदी प्रत्येकाची अशी अवस्था नसली, तरी या प्रकारच्या घटना, गोष्टी प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवत असतो आणि त्या त्या प्रकारची किरणं त्या प्रसंगांमधून बाहेर विश्वामध्ये प्रसारित होत असतात. ©
हा विषय व्यापक असून, या विषयावर अजून लेखन मला करायचे आहे. वेळ मिळाला की या विषयावर मी अजून लिहिणार आहे. सध्या तरी लेखामध्ये जे प्रसंग वर्णन केलेले आहेत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अगदी गंभीरपणे नाही, तर निदान विरंगुळा म्हणून तरी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे निरीक्षकाप्रमाणे पहायचा सराव करा. कसं करायचं बरं? खूप सिम्पल आहे. ©
एखादी घटना घडून गेल्यावर सहज चाचपडून पाहण्याचा प्रयत्न करा की, या घटनेतून जो किरणोत्सर्ग झाला आहे, जे रेडिएशन झाले आहे, ते रेडिएशन तुम्हाला कसं फील होत आहे, तुम्हाला नक्की कसं वाटतंय. ©
अशा कोणत्याही प्रसंगाचं तुम्ही निरीक्षण करु शकता. आनंदाचा प्रसंग, भांडण तंटा कलहाचा प्रसंग, अभ्यासपूर्ण चर्चेचा प्रसंग, ज्याच्यातून आपण ज्ञान संपादन करतो असे प्रसंग, असे प्रसंग वॉच करा. जर तुम्ही ध्यान करत असाल तर जेवढा वेळ ध्यानामध्ये मग्न होतात, त्या वेळेला जे रेडिएशन – जो किरणोत्सर्ग तुमच्या अस्तित्वातून बाहेर पडत असेल, त्यालाही ऑब्झर्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ©
तुम्हाला- मला जीवनदान देणार्या सूर्यनारायणालाच आपण उदाहरणादाखल न्याहाळुया. पहाटेचं सकाळमध्ये रुपांतर होत असताना सूर्यकिरणं लालीमा उधळत असतात. अगदी आपल्याला डी व्हिटॅमिन पण रेडिएट करत असतात. जसजशी सकाळ दुपारकडे झुकत जाते, तसतसं हेच रेडिएशन इतकं प्रखर बनतं की, एका ठिकाणी थांबून ते रेडिएशन अनुभवणं देखील तुमच्या अंगाला सोसवत नाही. संध्याकाळ होत जाते, तसा पुन्हा किरणांचा आल्हाददायक खेळ सुरु होतो. ©
आनंदाची, सौहार्दाची, प्रसन्नतेची, भक्तीभावाची, अचिवमेंटची, कधी ‘एकदम भारी’ वाटलं असेल तेव्हाची, जमल्यास प्राणायाम, श्वसनप्रकार करतानाची, तसेच लग्नगाठ जुळणे, नवजात बाळाचं आगमन होणे,प्रमोशन मिळणे या सर्व सर्व वेळची मन व आत्मा सुखावणारी किरणं अनुभवा. ©
एवढं जास्त प्रमाणात विश्लेषण करण्याचे कारण म्हणजे, साधारणपणे हे अनुभव तुम्ही जाणिवेच्या पातळीवर घेऊ शकलात आणि यातलं कोणतं चांगलं आणि कोणत्या तापदायक रेडिएशन आहे हे जरी ओळखू शकलात, तर विश्वात आजूबाजूला होणारं – अनिवार्य रेडिएशन रोखण्याची ताकद किंवा मुभा तुम्हाला नसली तरी सुद्धा तुमच्या सभोवतालचं जे विश्व आहे, तुमचा परिवार आहे, तुमचा समाज आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगातून गोष्टींमधून देवाणघेवाणीतून निर्माण होणार रेडिएशन तुम्ही आपापल्या पातळीवर योग्य प्रकारे नियंत्रित करू शकता.
आयुर्वेदामध्ये ‘काळ दूषित होणं’ हे खूप उत्तम रीतीने समजावून सांगितलेलं आहे. या विषयावरही मी एक लेख मी प्रसारित करणार आहे आज आपण नजीकच्या काळात जी महामारी अनुभवली, जिने पूर्ण जगाला काळवंडून टाकलं होतं आणि आजही त्याचे पडसाद आपण अनुभवत आहोत, या संपूर्ण घटनेला ‘काळ दूषित होणे’ असे म्हणतात. ©
तुम्ही, मी आपण सर्वच जाणतो की, संपूर्ण विश्वात एकंदर होणारं घातक रेडिएशन – हे प्रत्येक एकटा माणूस नक्कीच दूर करू शकणार नाही; परंतु आपल्याकडून बाहेरच्या विश्वामध्ये प्रसारित होणारा मनभंजक किरणोत्सर्ग आपण निश्चितच कंट्रोल करू शकतो. जर तुम्हाला या लेखामध्ये लिहिलेली माहिती संपूर्णपणे समजली असेल, तसेच या लेखाचा उद्देश समजला असेल, तर हा लेख नक्कीच तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना, मित्रांना शेअर करा. जेणेकरून अनेक व्यक्ती या रेडिएशन बद्दल विचार करू लागतील आणि अनेक गोष्टींमधून होणार्या घातक रेडिएशनचा समाजमनावर जो अनिर्बंध परिणाम होत आहे, तो नियंत्रित करायला तुमची आणि माझी मदत होईल.
“पाहिजेत” — या जगाला प्रेम, वात्सल्य, माया, प्रशंसा, निश्चिंतता, आशा (होप्स), डेली कनफर्मेशन्स, धैर्य, जिद्द, कमिटमेंट, निखळ आनंद, स्वच्छ मानसिकता अशा किरणांची गरज आहे. प्रसारित करु शकाल का तुम्ही? And last but not the least, डीप ध्यानामध्ये, तुमच्या अंत:करणातील प्रदीप्त असलेल्या, आत्मज्योतीची किरणं अनुभवायचा मानस मनामध्ये ठेवा. यापेक्षा सुंदर जाणीव ती काय!! संमोहनाच्या खोल गहिर्या अवस्थेमध्येही हा अस्तित्वाचा दिव्य किरणोत्सार अनुभवास येतो. व्यक्ती प्रसन्नचित्त होते.
हा लेख कसा वाटला, ते मला नक्की कळवावे. या लेखांची मी स्वत: लेखिका आहे. हे लेख copyrighted आहेत. copyright कायद्याचे, आणि कर्म सिद्धांताचे, कोणीही स्क्रीनशॉट किंवा copy paste, तत्सम माध्यमातून उल्लंघन करु नये. तुम्हाला लेख शेअर करावासा वाटला, तर या लेखाची ‘लिंक (नावासहित आहे) जरुर शेअर करावी.’ हिप्नोथेरपीतून जीवनातील सर्व समस्या सोडवता येतात. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्रुटी दूर होतात. तुम्ही स्वयंभू बनता. पर्सनल हिप्नोथेरपी सेशन्स साठी संपर्क करावा. तुम्ही दूर राहत असाल, तरी डोण्ट वरी, मी online sessions घेते. धन्यवाद. ©
डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. (या WhatsApp नंबरवर फक्त मेसेज लिहावा. online offline sessions सुरु असतात, डायरेक्ट फोन करु नये, विनंती)
खुप छान समजावून सांगितलं आहे मॅम 👌👌🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🌸🙏🌸
खुप छान.सुर्योदयाचे ऊदाहरण अतिशय सुंदर .मी माझं निरीक्षण सांगतो ,सुर्यादया आधी वा त्या समयी ऊठणारी व्यक्ती सकारामत्त्क विचारांची असते.हे वास्तव .दुसरे ग्रहण समय सिर्य ग्रहण वा चंद्र ग्रहण हा किरणोत्सर्गाचा काल असतो म्हणुनच आपल्या पुर्वजांनी तो काल त्यजित सांगीतलां आहे।
धन्यवाद