अतींद्रिय शक्ती- इंद्रियातीत क्षमता: भाग पहिला ESP: Extrasensory Transcendental Powers Part 1

extra-sensory-perception-we-all-possess-the-power-esp 1

माणसांमध्ये कार्यशक्ती आणि विचारशक्ती असते. ढोबळमानाने या दोन्ही शक्तीच्या समन्वयाने अनेक प्रकारच्या कला व कौशल्य माणसांमध्ये वाढत असतात. आपला चरितार्थ चालवण्यासाठी काम करणे आणि वेगवेगळ्या संधी प्राप्त करण्यासाठी मेहनत घेणे, यामध्ये या शक्तींचा अथवा क्षमतांचा उपयोग माणूस करत असतो. समृद्धी – वैभव – श्रीमंती यामध्ये जे भव्य दिव्य दिसून येते, ते कधी कधी आपल्याला मिरॅक्युलस वाटते. या सर्वांच्या प्रेरणास्थानी व्यक्तीच्या अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता काम करत असतात.

Listen to this article on Spotify.

याव्यतिरिक्त क्षमतांबाबत जेव्हा विषय येतो, तेव्हा या रुटीन शक्ती आणि क्षमतांपेक्षा वेगळी आस व ध्यास व्यक्तीच्या आत मध्ये उत्पन्न व्हायला सुरुवात होते. याला तुम्ही व्यक्तीची महान विभूती बनण्याकडे होणारी वाटचाल म्हणू शकता. मात्र या अवस्थेला तुम्ही पोहोचत असतानाच्या प्रोसेस मध्ये परमात्म्याची ( सुप्रीम पॉवर) अनुकंपा खूप महत्त्वपूर्ण आहे. याला तुम्ही कृपाप्राप्ती अथवा पवित्र शक्ती तुमच्या पाठीशी असणे असे म्हणू शकता.

रिद्धी सिद्धींचा हाच तर प्रांत आहे. विविध प्रकारच्या तपस्या, योगाभ्यास, भक्ती, योग, साधना मार्ग, विविध अनुष्ठान, तंत्र साधना यांचा आधार घेऊन सातत्यपूर्ण या मार्गात पुढे जाण्याचे ध्येय ठेवून अतिरिक्त शक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकतात.

या चैतन्य विषयावर भरपूर गहिरा अभ्यास केला गेलेला आहे. त्यातून हाच निष्कर्ष नेहमी निघत असतो की, हे चैतन्य प्राप्त करणे म्हणजे भौतिक व व्यावहारिक बाह्य प्रक्रिया नसून हे तर आंतरिक उत्थान आहे. नेमके हेच शब्द समर्पक असल्यामुळे तुम्हाला समजायला थोडे कठीण वाटू शकतात! वरील वाक्य मी सोपं करून सांगते. अतिरिक्त शक्ती म्हणजेच अतींद्रीय शक्ती – म्हणजे स्वतःमध्ये शक्ती विकसित करण्याची प्रक्रिया ही बाह्य पातळीवर होत नसून ती अंतरात्म्याच्या सहभागातून घडणारी आंतरिक प्रक्रिया आहे.

| WATCH ON YOUTUBE |

अतींद्रीय शक्तीवर भाष्य करणारे हे लेखन, शक्य तितके सोपे करून समजावण्याचा मी प्रयत्न करत आहे. कदाचित हा विषय अनेक भागांमध्ये चालू राही। या विषयाबद्दल माहिती मिळवायची, तर पेशंस हवेत. थोडेथोडके नव्हे, तर भरपूर पेशंस हवेत. शांतचित्ताने वाचल्यास हळूहळू अतींद्रीय शक्ती बद्दल आकलन व्हायला सुरुवात होईल.

पहिले तर हे समजून घ्यावे की, हे ईश्वरी सत्तेचे कार्यक्षेत्र आहे. मानवी सत्तेचा सहभाग या विषयांमध्ये आहेच. परंतु कमी प्रमाणात आहे जसजसं या विषयांमध्ये तुम्ही प्रवेश कराल तस तसं समजत जाईल की मानवरुपी डायमेन्शनच्या (मिती) गहिऱ्या पातळीवर, गहिऱ्या अंतरंगामध्ये कितीतरी संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटीज दडून बसलेल्या असतात.

एक सोपे उदाहरण सांगते. जमिनीच्या वरच्या पृष्ठभागाचा आपण ज्या विचार करतो, तेव्हा त्या जमिनीला पाहून ती जमीन किती उपजाऊ असेल व त्यात धान्याची बीजे कशी पेरल्यानंतर नवं झाड निर्माण करण्याची क्षमता असेल, याची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी आपल्याला सहज लक्षात येत असते. जमिनीवर नजर टाकली, तर काही धुळीचे डोंगर, काही लहान मोठे दगड, अस्ताव्यस्त पडलेले आपल्याला दिसतात. हे सर्व जमिनीच्या वरच्या पातळीला बघून आपल्याला सहज संपूर्ण जमिनीची कल्पना येत।

पण आता जर याच किंवा अशाच जमिनीमध्ये आपण खूप खोल खोदत गेलो, जास्तीत जास्त आत खोदत गेलो, तर आपल्याला अनेक प्रकारची खनिजे, धातू, कधीकधी सोने तर कधी कधी तर रत्ने सापडतात. एका सर्वसाधारण दिसणाऱ्या जमिनीच्या पोटात इतक्या महत्त्वपूर्ण बहुमूल्य गोष्टी असतील, हे आपल्यासाठी खूपच आश्चर्यकारक असते आणि जोपर्यंत जमीन खोदलेली नाही तोपर्यंत या सत्याची आपल्यापैकी कोणालाही जाणीव नसते.

या उदाहरणाप्रमाणेच तुमच्या शरीराची जी श्रमाची शक्ती असते आणि मनाची जी विचार करण्याची, चिंतन करण्याची शक्ती असते, यांच्या पलीकडे जाउन, संशोधित विचारांनी तुमच्या अंतरात्म्यामध्ये जेव्हा तुम्ही उतरता, अगदी आत जाता तेव्हा तुम्हाला या अतींद्रिय क्षमतांचे अस्तित्व दिसू लागते. अथवा काही प्रमाणात जाणवू लागते. यांना आपण अतींद्रीय असं का म्हणतो, तर आपली जी ज्ञात असलेली ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिै आहेत, यांचे जे कार्य अविरतपणे चालू असते आणि आपण जगरहाटी मध्ये रममाण असतो, याहीपेक्षा वेगळ्या इंद्रियांच्या पलीकडील क्षमता जेव्हा जाणवतात तेव्हा त्यांना अतींद्रीय क्षमता अथवा अतींद्रिय शक्ती असे संबोधले जाते. कधी कधी याला दैवी ताकद असेही म्हणतात परंतु आपण अतींद्रीय हाच शब्द घेऊन पुढे विश्लेषण करणार आहोत. अतींद्रीय शक्तीला transcendental power (ट्रान्सेन्डेण्टल पॉवर) असं म्हणतात. आणि या power च्या आपल्याला होणार्‍या संवेदनांना Extra Sensory Perception (एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन) असं म्हणतात.

तेव्हा प्रथमतः हे लक्षात घ्यावे की, या विशिष्ट क्षमता तुमच्यातच सामावलेल्या असतात. Believe me, त्या तुमच्याच विशिष्ट शक्ती व उच्चस्तरीय सामर्थ्य असतात. याची जाणीव जरी सहजपणे आता होत नसली, तरीही या क्षमतांना प्रयत्नपूर्वक जागृत व विकसित केले जाऊ शकते.

पाश्चात्य देशातल्या सायकॉलॉजिस्टनी ज्या अतींद्रीय क्षमतांचा शोध लावला, त्यांना त्यांनी भागांमध्ये कॅटेगराईज केले आहे. त्यातला पहिला प्रकार आहे – क्लेयरवॉयन्स अर्थात परोक्ष दर्शन. म्हणजेच वस्तू किंवा घटनांची अशाप्रकारे माहिती होणे, जी सर्वसामान्य सोर्सेसचा आधार न घेता प्राप्त झालेली असते.

ESP is within you

दुसरा प्रकार आहे – प्रिकॉग्नीशन अर्थात भविष्य ज्ञान. म्हणजेच कोणताही पुरावा अथवा डेटा नसताना भविष्यातील घडामोडींचे आपोआप ज्ञान होणे.

तिसरा प्रकार आहे – रेट्रोकॉग्निशन. अर्थात भूतकालीन ज्ञान म्हणजेच कोणताही पुरावा मिळालेला नसताना, व्यक्तीच्या माहीत नसलेल्या भूतकाळाबद्दल, त्यावेळेच्या घटनांबद्दल आपोआप ज्ञान होणे / माहिती प्राप्त होणे.

चौथा प्रकार आहे – टेलिपथी. अर्थात विचार संप्रेषण म्हणजेच कोणत्याही आधुनिक यंत्राचा अथवा उपकरणाचा सिस्टीमचा आधार न घेता आपल्या मनातील विचार – इतरत्र असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत – मनाच्या माध्यमातून पोहोचवणे – तसेच या दूर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील विचार जाणणे व ते ग्रहण करणे.

हे जे वर्गीकरण तुम्ही आता वाचलेत त्यांचे अजून व्यापक विश्लेषण आता तुम्हाला सांगते.

1. कम्युनिकेशनचे, संपर्काचे, किंवा ज्या साधनाने माहिती मिळवता येईल अशी साधने नसताना देखील दूर अंतरावरील घडणाऱ्या घटनांची माहिती प्राप्त होणे किंवा करणे.

2. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीबद्दल व परिस्थितीबद्दल आपोआप माहिती प्राप्त होणे.

3. भरपूर काळ आधीच भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा पूर्व आभास किंवा बोध होणे.

4. ज्यामध्ये गतआत्म्यांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा किंवा परिचय प्राप्त होऊ शकेल, अशा प्रकारे त्या गतआत्म्याशी चर्चा व संवाद साधण्याची आणि कधीकधी त्यांचे संदेश डिकोड करण्याची क्षमता असणे.

5. OBE = अर्थात आऊट ऑफ बॉडी एक्सपिरीयन्सच्या अनुभूती वरचेवर अगदी सहजपणे येत राहणे. आणि विशेष म्हणजे त्या स्मरणात राहणे.

6. कधीकधी काही मुले, युवक किंवा कोणीही व्यक्ती त्यांच्या पूर्व जन्मातील घटना आठवून सांगू लागतात. त्या वेळेला त्यांच्या वर्तमानातील परिस्थितीशी या सांगितलेल्या माहितीचा काय संबंध आहे याचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे.

7. कधीकधी काही व्यक्ती अगदी सहजच आपलं असं ज्ञान आणि अनुभूती म्हणजे स्वतःचे असे अनुभव व्यक्त करतात, जे त्यांच्या आत्ताच्या वर्तमान व्यक्तिमत्व व क्षमता यांच्याशी संबंध असलेले वाटत नाही आणि कधी कधी तर ते ज्ञान ‘उच्च श्रेणीतील’ असते. असे असल्यास या व्यक्तीला अतींद्रीय शक्ती आहे असे समजावे.

8. कधी कधी एखाद्याला, मरणांतिक अवस्था आलेली असताना- नियर डेथ एक्सपीरियंस (NDE) घेतलेला असतो. पुढच्या आयुष्यात ही व्यक्ती बरी झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये काही अतींद्रिय क्षमता अथवा शक्ती यांची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. हे मी ‘काही केसेस बद्दल’ बोलत आहे. प्रत्येक मरणांतिक अवस्थेमध्ये असेच घडेल असे नाही, याची नोंद घ्यावी.

TRANSCENDENTAL POWER

9. एखाद्या मध्ये अतीन्द्रिय शक्ती अथवा क्षमता आहे हे ओळखता येण्याचं प्रमाण म्हणजे या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना प्रभावित करेल, अशी उत्तम स्फूर्तीयुक्त सकारात्मक ऊर्जा एखाद्या व्यक्तीमध्ये असल्याचे लक्षात येते.

10. कधीकधी आपण असे पाहतो की, एखाद्या व्यक्तीमध्ये इतके प्रचंड प्रमाणात मनोबल असते की, त्यांच्यासमोर एखादा असाधारण वाटणारा, खूप साहसी प्रसंग उभा राहिल्यावर, थोडक्यात जिथे प्रचंड डेरिंग लागेल असा प्रसंग उभा राहिल्यावर जराही न डगमगता ती व्यक्ती अतिशय सर्वसाधारणपणे आणि ‘चुटकी का खेल’ वाटावा तसे लीलया अशा प्रसंगाला सामोरी जाते व तारुनही नेते हे, पाहून आपण अचंबित होतो.

11. कधीकधी काही व्यक्ती महाकठीण प्रसंगामध्ये स्वतःची तत्परता वापरून अद्भुत पराक्रम करतात असे दिसून येते.

12. एखाद्या व्यक्तीने अदृश्य शक्ती स्त्रोताच्या संपर्कातून सहायता व सहयोग प्राप्त करून, एखादे कष्ट साध्य काम पार पाडणे, हे अतींद्रिय क्षमतेमुळेच घडते.

13. अतिन्द्रिय क्षमतेतून बाहेर पडलेले शाप व वरदान, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये अतितीव्र शब्दप्रहारांच्या शक्ती यांचा आजूबाजूच्या एलिमेंट्सवर दीर्घकालीन प्रभाव राहतो. (हे वाचून शाप देणार्‍या कोणालाही उठसूठ अतींद्रिय शक्तीवाला समजू नये!!)

या सर्व विश्लेषणावरून हे लक्षात आलेच असेल की, अतींद्रिय अवस्था किंवा क्षमता किंवा शक्ती म्हणजे आपल्या माहितीच्या रुटीन जगात आपल्या इंद्रियांचा जे कार्य चालू असते, त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजेच त्या लिमिटच्या पलीकडे जाऊन ताकद प्राप्त होणे. काहीतरी थ्रिल वाटावे म्हणून या विषयावरील वाचन अथवा लेखन निदान मी तरी करीत नाही कारण ज्या अतींद्रिय क्षमतांबद्दल मी विश्लेषण लिहायला सुरुवात केलेली आहे, त्यांच्याबाबत दोन महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्यावेत. पहिला म्हणजे – या क्षमतांचा उपयोग तुमच्या व माझ्या रुटीन लाईफ मध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर होतो आणि दुसरा पॉईंट म्हणजे – या अतिन्द्रिय क्षमता व्यक्तीच्या आत असतात, फक्त त्या विकसित कराव्या लागतात.

अर्थातच इथे स्पष्ट उल्लेख करावासा वाटतो की, माध्यमांनी व न्यूजपेपर्स यांनी ज्याप्रमाणे अतींद्रिय शक्ती या विषयाला हाताळले आहे आणि अतिरंजित करून दाखवले आहे, ती म्हणजे अतींद्रीय शक्ती नव्हे. सुपर पॉवर प्राप्त झालेल्या एखाद्या पिक्चर मध्ये पाहिलेल्या, एखाद्या किंग कॉंग प्रमाणे जग तुडवायला निघणे म्हणजे अतींद्रिय शक्तीचा वापर करणे असे नव्हे. हे सर्व गैरसमज आजच मनातून काढून टाका. ही शक्ती तुमच्या उत्थानासाठी विकसित होते. लोकांना तुडवायला नाही!!

अतींद्रिय या विषयावरील लेखन पुढेही क्रमश: सुरू राहील. आता नेहमीची विनंती — हा लेख आवडल्यास जरूर कळवा. अन्य लेखांप्रमाणेच हा लेख ही मी स्वतः लिहिलेला आहे. हा लेख कॉपीराईटेड आहे. कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये.

माझ्या सर्वच लेखांच्या शेवटी संपर्काचा नंबर दिलेला असतो. हिप्नोथेरपी व अन्य कोणत्याही थेरपी साठी संपर्क करावयाचा असल्यास दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर ‘फक्त मेसेज करावा’ कारण उपचारांचे सेशन्स सुरू असतात. त्यामुळे डायरेक्ट फोन करू नये. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

4 Comments

  1. लेख आवडला.अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published.


*