अतींद्रिय शक्तींचे अद्वितीय सामर्थ्य अंतस्थात आहे: भाग दुसरा Invincible Abilities of Transcendental Powers are Nestled Within Us!

अतींद्रिय शक्ती विषयावरील यापुर्वीच्या लेखाच्या शेवटी, मी काही अशा क्षमतांची उदाहरणं आणि विश्लेषण लिहिले आहे. विस्मय वाटला असेल तुम्हाला ते सर्व वाचून!! अर्थात हे सर्व सायन्स आहे. यामध्ये खूप काहीतरी भयानक चमत्कारिक आहे, असं नाहीय. अतींद्रीय शक्ती बद्दल चर्चा करताना, माहिती मिळवताना कितीतरी ठिकाणी प्रत्यक्षात घडलेल्या काही विचित्र व विसंगत घटनांना तुम्ही म्हणता की, काय हा चमत्कार आहे! अथवा किती चमत्कारिकपणे हे सर्व घडले आहे! कारण त्या घटनेतला कंटेंटच असा इंटरेस्टिंग असतो की त्यामध्ये ती घटना घडण्याच्या प्रोसेसमध्ये जणू काही अतींद्रिय म्हणजेच इंद्रियांच्या पलीकडची ताकद लावली गेली आहे, असं तुम्हाला जाणवतं. ही जाणीव खोटी नाहीय, हे आधी समजून घ्यावे.

Listen to this article on Spotify!

उदाहरण द्यायचे झाले तर, मानवेतर प्राण्यांचे व पक्ष्यांचे उदाहरण आपण पाहू शकतो. विशिष्ट वाईट स्पंदनांना रेकग्नाईज करून कुत्रा व तत्सम वर्गातील प्राण्यांनी ओरडणे, अथवा विचित्र वागणे तुम्ही बऱ्याचदा पाहिलेच असेल. निसर्गामध्ये काही काळाने काही आपत्ती येणार असेल, अशावेळी प्राणी व पक्षी यांचे विचित्र वर्तन व विलाप चालू होतो हे अनेकांनी नोटीस केलेले असेल.

मी कोकणात बराच काळ घालवलेला असल्यामुळे, अशा प्रकारचे संकेत निसर्गात दिसल्यावर त्यांचा नेमका अर्थ लावू शकणारे गावकरी पाहिलेले आहेत. खरंतर कोकणात राहणाऱ्या जवळजवळ सर्वांनाच या पशुपक्ष्यांमधली कृमी कीटकांमधली व एकंदर निसर्गामधली अतींद्रीय शक्ती अनुभवायला मिळतेच. अर्थात पिढी दर पिढी हे संकेत व या सूचना ओळखणर्‍यांची संख्या काहीशी कमी होत चालली आहे, ही खंत आहेच. ©

तुमच्या एक्स्ट्रा सेन्सरी जाणिवा खर्‍या आहेत!

तर्कशास्त्रात आकंठ बुडालेल्यांनी या सर्व माहितीमध्ये शिरुच नये आणि लांब राहावे, ही सूचना. 

प्राचीन योगशास्त्रामध्ये आत्म्याची व परमात्म्याची भेट घडवून आणणे, तसेच जीवाला ब्रह्मामध्ये विलीन करणे अशा सिद्धतेसाठी साधना सांगितलेल्या असतात. इथे असा अर्थ नक्कीच काढू नये की, हे सर्व एखाद्या ब्रह्मचारी अथवा संन्यासी माणसासाठीच निर्माण केलेले असते.

असा गैरसमज तुमच्या मनात असेल, तर तो ठेवू नये. कारण हे सर्व जे डिस्कशन सुरू आहे, त्यात मी ज्या अतींद्रीय शक्ती बद्दल बोलत आहे, ती दुरून न्याहाळण्याची किंवा फक्त ज्ञान घेऊन डोक्यात संग्रही ठेवण्याची गोष्ट नसून तिचा उपयोग आपल्याला डे टू डे लाइफ मध्ये नक्कीच होत असतो, याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी. ©

Watch On YouTube

अतींद्रीय क्षमता प्राप्त करण्यासाठी मनुष्य जेव्हा सातत्यपूर्ण प्रयत्न करतो, साधना, अनुष्ठान, जप, तप, खूप मनापासून करतो, तेव्हा तो अनेक दिव्य शक्तीचा स्वामी बनत जातो. त्याच्या आत मध्ये अनेक विलक्षण गोष्टींचा उगम होतो. म्हणजेच ‘अतींद्रीय शक्तींचे प्रगटीकरण’ होते. तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त झाली, असे तुम्हाला आढळते. अशा साधना करणारा योगी अथवा साधक हा आणि अन्य कोणीही मानव, यांच्यात काय बरं फरक आहे? तर हा साधक अथवा योगी डिसिप्लिन्ड म्हणजे स्वयंशिस्त असलेला, कठीण प्रसंगांचा, आव्हानांचा ताकदीने सामना करणारा, न डगमगणारा धीट व धैर्यवान माणूस असतो. आताच्या भाषेत गिव्ह अप न करणारा असतो. ©

 दैनंदिन जीवनात आपल्याला ही एक्स्ट्रा सेन्सरी पॉवर कुठे कुठे अनुभवाला येते, ते मी आता सांगते. एखादी व्यक्ती तुम्हाला भेटणार असते, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखतही नसता, तरी त्या व्यक्तीशी संपर्क होण्याच्या काही  काळ आधी तुम्हाला प्रथमदर्शनीच म्हणजे त्या व्यक्तीला पाहता किंवा न पाहता तुम्हाला असं जाणवायला लागतं की, या व्यक्तीपासून तुम्हाला काहीतरी चांगला लाभ होणार आहे आणि जवळजवळ तसंच पुढे भविष्यकाळात घडतं तसंच कधी कधी एखाद्या प्रसंगी तुम्हाला एखादी व्यक्ती भेटण्याआधीच काहीतरी नकारात्मक फीलिंग्स यायला सुरुवात होतात आणि खरोखरच ती व्यक्ती तशीच दुष्ट स्वभावाची असल्याचे दिसून येते. तुम्हाला जेव्हा असे आतून विचार आलेले असतात व तशा फिलिंग्स जाणवत असतात तेव्हा तुम्ही म्हणता की, ‘माझी अंत:प्रेरणा मला अमुक अमुक सांगत होतीच.’

आता मी तुम्हाला दुसरे उदाहरण देते. एखादी दुर्घटना घडण्याआधी तुम्हाला काही मनात खळबळ निर्माण करणारे, मन डिस्टर्ब करणारे संकेत अगोदरच प्राप्त होत असतात. या अशा प्रकारचे अनुभव तर तुम्ही अनेकांनी, खूप वेळा घेतलेले असतील. अगदी अलीकडेच घडलेली एक दुर्दैवी घटना सांगते. मुंबईहून पुण्याला गेलेल्या एका ढोल पथकातील कोवळ्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला. कार्यक्रमांमध्ये ढोल वाजवून ही मुले घरी यायला निघालेली असताना त्यांना दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताआधीची घटना म्हणजे याच पथकातील एका मुलाला, या सर्व ढोल वादक मित्रमंडळींसोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी जावयाचे होते. पण त्याच्या आईला काहीतरी अंत प्रेरणा होत असल्यामुळे (शंकेची पाल चुकचुकणे) तिने त्याला तिथे जायची परवानगी नाकारली. या मुलाने खूप हट्ट केला; परंतु तिने त्याला ठामपणे नकार दिला आणि त्यामुळे हा मुलगा या ढोल पथकासोबत गेला नाही आणि वाचला. जेव्हा या कुटुंबापर्यंत या भीषण अपघाताची बातमी पोहोचली, त्यावेळेला मुलाने आईला घट्ट मिठी मारली व तो ढसाढसा रडला. ©

अगदी जवळच्या प्रेमाच्या, मायेच्या, नात्यातील अशा प्रकारच्या अंत:प्रेरणेच्या घटना तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवल्या असतीलच. अजून एक उदाहरण सांगते. एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचा एखादं बिजनेस डील अगदी फायनल होणार असते. त्या दृष्टीने सर्व तयारी झालेली असते आणि जेव्हा अंतिम निर्णय किंवा फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची वेळ येऊन ठेपते त्यावेळेला अचानक तुमची अंत:प्रेरणा तुम्हाला थांबवते. अर्थात तुम्ही हे डिल कॅन्सल करता आणि नजीकच्या काळात तुम्हाला दिसून येते की, तुमचा निर्णय योग्य होता. आता त्यावेळी तुम्हाला अचानक असं का वाटलं होतं, याचं तर्कवादी कारण तुम्हाला माहीत नसतं. आता या उलटचा प्रसंग म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या अंतप्रेरणेने सावध करून सुद्धा एखाद्या डील मध्ये तुम्ही पुढे प्रोसिड करता व फसता. ©

तुम्हाला हे सर्व वाचून अतींद्रीय क्षमतांबाबत समजायला नक्कीच सोपं वाटत असेल आणि हा प्रश्नही पडत असेल की प्रत्येकामध्ये ही अतींद्रिय  क्षमता असते का? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अनेकांमध्ये ही अतींद्रिय क्षमता असू शकते. फरक फक्त एवढाच आहे की, काही जणांमध्ये एखाद्या निरंतर अक्षय दिव्याप्रमाणे ही अतिद्रीय शक्ती सतत जिवंत ठेवत राहते; तर काहीजणांमध्ये चमकणाऱ्या विजेप्रमाणे कधी कमी, कधी जास्त, कधी पूर्ण पणे  न्यून अवस्थेमध्ये ही अतींद्रिय शक्ती काम करते.

अचेतन मनाची उत्साहित स्थिती सूचनाग्राहक बनते

आपलं जे कॉन्शस माईंड आहे, म्हणजेच सचेतन  अवस्था आहे, त्याच्या पलीकडे अंतर्मन किंवा त्याला आपण या विषयाच्या बद्दल डिस्कस करताना आंतरचेतना असे म्हणू या. कॉन्शस माईंड म्हणजे सचेतन अवस्थेला शांत, सीमित अथवा मूर्छित  करण्यासाठी ज्या विविध साधना आपण करतो त्याला ध्यान योगाचे प्रकार म्हणतात. ध्यान हे एक ढोबळ नाव मी सांगत आहे यातले बरेच प्रयोग असे आहेत, ज्यामध्ये सचेतन शांत राहते आणि अचेतन म्हणजेच सबकॉन्शस उत्साहित राहते. ही उत्साहित स्थिती जितकी चांगली प्राप्त होईल, एकदाच नव्हे तर अनेकदा प्राप्त होऊ शकत असेल, तर अतींद्रीय क्षमतांच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती आपोआप यशस्वीपणे होत राहील. संमोहन निद्रा ही अवस्था अशाच प्रकारची नैसर्गिक रित्या उत्साही व सूचनाग्राहक अवस्था असते. ©

हळूहळू अंतस्थामध्ये या विषयाचे प्रकटीकरण होण्यासाठी मी काही घडलेली उदाहरणं आता तुम्हाला सांगते. मात्र तुम्हाला विनंती आहे की ही घडलेली उदाहरणं जशीच्या तशी घ्यावीत. त्यांना कोणत्याही धर्म जात पंथ अशा क्रायटेरियामध्ये बंदिस्त करू नये.

1. अनेक देशी परदेशी पर्यटकांनी हिमालयामध्ये राहणाऱ्या स्वामी रामानंद अवधूत यांच्या बद्दल लिहिले आहे की, हे स्वामीजी सूर्यावर तासनतास उघड्या डोळ्यांनी त्राटक करू शकत असत. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा या स्वामींचं वय शंभरहून अधिक होतं. शरीर स्थूल होतं. पण तरीही ते निरोगी होते.

2. रिसेंट पर नावाचा एक ब्रिटिश इतिहास तज्ञ होता. त्याने आपल्या ‘रिलीजस हिस्ट्री ऑफ इंडिया’ या ग्रंथात उज्जैन येथे जो कुंभमेळा झाला होता, तेव्हा तिथे आलेल्या एका हठयोग्याचे वर्णन लिहिले आहे. ते असे की, निर्वस्त्र राहणारा हा हठयोगी स्वतःच्या शरीराला अथवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला एखाद्या फुग्याप्रमाणे फुगवत असे. अशाप्रकारे शरीराला फुगून तो स्वतःच्या शरीराला अनेक पटीने मोठे बनवत असे. लोखंडाची खूप जाडजूड कांब तो हाताने मोडून टाकत असे. शरीराचं हे जे काही तो करत असे, त्यामागे त्याची आत्मशक्ती कार्यरत होती यात वादच नाही.

3. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे एक महान शिष्य स्वामी विशुद्धानंद परमहंस हे सूर्य विज्ञान मध्ये पारंगत होते. काचेद्वारे एखाद्या वस्तूवर सूर्याची किरणे काही प्रमाणात एकत्रित करून व पाडून त्या वस्तूच्या मूळ रूपामध्ये परिवर्तन करणे त्यांना अगदी सहज जमत असे यांच्यावर मी एक विस्तृत लेख लिहिला आहे तो प्रकाशित करेन।

4. सन 1851 मध्ये फारस निवासी सुलेमान सौदागर भारतात आले होते. त्यांनी जे काही लेखन केलेले आहे, त्यामध्ये त्यांनी प्रयाग कुंभमेळ्यामध्ये आलेले अनुभव त्या लेखनात वर्णन केलेले आहेत. या कुंभमेळ्यात आकर्षणाचे केंद्र बनलेला एक साधू होता. उघड्या डोळ्यांनी कित्येक तास सूर्याकडे पहात राहायच। सुलेमान यांना खूप अचंबित करणारा हा प्रकार होता.

5. अतींद्रीय शक्ती हा फक्त साधू योगी साधक यांचाच प्रांत असावा, असं तुम्हाला वाटू नये म्हणून आता अजून एक उदाहरण देते. डॉक्टर बारनेट यांच्याद्वारे एक अतिंद्रीय पर्यवेक्षण प्रसिद्ध झाले. ज्यामध्ये त्यांनी भारतातील एका मिलिटरी मेजर चा उल्लेख केलेला आहे ही घटना 9 सप्टेंबर 1842 ची आहे. त्याचे असे झाले की, हा मेजर सैनिक मुलतान च्या सैनिक शिबिरामध्ये घायाळ अवस्थेमध्ये पडून होता. तो मरणपंथाला लागला होता. मरताना त्याने तिथल्याच आपल्या एका ऑफिसर मित्राला सांगितले की, ‘माझ्या बोटांमधून ही अंगठी काढ आणि ही अंगठी माझ्या पत्नी पर्यंत पोहोचव.’ एवढे उद्गार बोलल्यानंतर हा सैनिक गतप्राण झाला.

आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, फिरोजपुर मध्ये त्याची पत्नी त्यांच्या घरामध्ये झोपली होती. त्यावेळेला तिला हे पतीच्या अंतकाळातील संपूर्ण दृश्य जसेच्या तसे स्वप्नात दिसले आणि शब्द सुद्धा अतिशय क्लियर पणे ऐकू आले. ती घाबरून जागी झाली आणि तिने घरातल्या लोकांना हे स्वप्न सांगितले. तिच्या मनाचा हा भ्रम असेल, असा विचार करून घरातल्या लोकांनी तिला शांत केले आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला असेल असं त्यांना वाटलं नव्हतं. पण तिसऱ्याच दिवशी त्या मृत मेजर सैनिकाचा ऑफिसर मित्र त्याची अंगठी घेऊन त्याच्या घरी पोहोचला; तेव्हा इतकी क्लियरपणे ही घटना कशी काय त्याच्या पत्नीला दिसू शकली, याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटले.

6. शैली नावाचा एक इंग्रजी महाकवी होता. एक आश्चर्य असे होते की, या शैलीला त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब समोर उभे असलेले दिसायचे. शैली स्वतः बोलत असताना हे प्रतिबिंब बोटांच्या आधाराने काही इशारे त्याला सांगत असे. त्याला काही संकेताचे ज्ञान करून देत असे या प्रतिबिंबाने सांगितलेले संकेत जर या शैलीने फॉलो केले तर त्याला अनेकदा काही रहस्यपूर्ण गोष्टींचं ज्ञान होत असे. या शैलीने एकदा असं विचित्र दृश्य पाहिलं की, त्याचे हे स्वतःचेच प्रतिबिंब म्हणजे छाया पुरुष समुद्रकिनारी एका विशिष्ट स्थानी दिसत आहे आणि हे प्रतिबिंब त्या किनाऱ्यावर खड्डा खोदत आहे. ही घटना शैली या कवीने स्वतःच्या डायरीमध्ये नोट करून ठेवली. आता त्यानंतर बरोबर एका वर्षानंतर शैली त्या ठिकाणी काही कामानिमित्त पोहोचला पण काही वेळातच त्याच ठिकाणी तो मृत्यू पावला. ©

असे एक नाही, तर हजारो लाखो प्रसंग आहेत, जे बुद्धी आणि तर्काच्या पातळीवर अर्थहीन वाटू शकतात. परंतु ते तसे अर्थहीन नसून संपूर्णपणे अर्थपूर्ण आहेत, हे नीट समजून घ्यावे. पुढील काही लेखांतून अतींद्रीय शक्ती व क्षमतांचा विषय जसा पुढे जाईल तस तसे मी या सत्य घटना तुम्हाला सांगेनच.

अतींद्रिय क्षमता प्रत्येक क्षणी विकसनशील असतात

हे समजून घ्यावे की, मानवी अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये अनेक असीम क्षमता आणि महान स्वरूपाच्या ताकदी सूक्त अवस्थेमध्ये बीज स्वरूपामध्ये पडून आहेत. यापैकी अशीच बीज फलित होतात, ज्यांच्यावर अभ्यास मेहनत केली जाते. जर आपण उरलेल्या बिजांवर सुद्धा मेहनत घेऊ शकलो, अभ्यास करू शकलो, त्यांना स्वतःसाठी कार्यरत (अ‍ॅक्टिव्हेट) करू शकलो, तर जशा आपल्याकडे बोलण्याच्या विचार करण्याच्या काम करण्याच्या क्षमता आहेत, तशाच याही अविकसित क्षमता या विकसित होऊ शकतात. अतींद्रिय क्षमता म्हणजे काय आहे तर आपल्या इंद्रियांच्या एकंदर ज्या क्षमता आहेत त्यांचा अतिसूक्ष्म पण महत्वपूर्ण भाग आहे. Got it?

तुम्ही या विषयाबद्दल थोडेफार आधीपासून जाणत असालच. काहींना या विषयाची पूर्ण माहिती सुद्धा असेल. तर काही वर्ग असाही असेल ज्यांना विविध कारणांमुळे या विषयापर्यंत पोहोचता आलेले नाहीय. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता उगीचच ट्रकभर ज्ञान सर्वांच्या डोक्यावर ओतून काहीच उपयोग होणार नाहीय. त्यामुळे हा विषय मी विस्तार करून काही भागांमध्ये सांगत जात आहे And as I said earlier, पेशन्स हवेत. थोडे थोडे नाहीत तर भरपूर पेशन्स हवेत.

पहिला भाग तुम्ही वाचला आहेच. हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला, हे मला आवर्जून कळवावे. इतक्या तन्मयतेने या विषयावरचे आणि अन्य विषयांवरचे माझे लेखन तुम्ही सर्व वाचत आहात; व्हिडिओ मध्ये पहात व ऐकत आहात याबद्दल मनःपूर्वक आभार. ©

अतींद्रिय या विषयावरील लेखन पुढेही क्रमश: सुरू राहील. अन्य लेखांप्रमाणेच हा लेख ही मी स्वतः लिहिलेला आहे. हा लेख कॉपीराईटेड आहे. कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये. 

 माझ्या सर्वच लेखांच्या शेवटी संपर्काचा नंबर दिलेला असतो. हिप्नोथेरपी व अन्य कोणत्याही थेरपीसाठी संपर्क करावयाचा असल्यास दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर ‘फक्त मेसेज करावा’ कारण उपचारांचे सेशन्स सुरू असतात. त्यामुळे डायरेक्ट फोन करू नये. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*