अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers: भाग तिसरा: उत्तरार्ध

खूप पूर्वीच्या काळापासून भारताच्या इतिहासात, असे अनेक उपचार कर्ता महापुरुष होऊन गेले आहेत, हे तर आपण सर्वच जाणतो. अनेक सिद्धी जाणणारे हे महापुरुष होते. त्यांनी आत्म्यासहित त्यांच्या मनावरही विजय मिळवला होता आणि त्याचबरोबर शरीरातील चुंबकीय शक्तीचा आणि चैतन्य शक्तीचा उपयोग व्याधी निवारण करण्यासाठी कसा करावा, याचे अतिशय उच्च प्रगल्भ ज्ञान या सर्वांना होते. त्यांना त्यांच्या भूत भविष्य व वर्तमानाचे उत्तम ज्ञान, ज्याला आपण त्रिकाल ज्ञान म्हणून ओळखतो, ते ज्ञान होते. ही सर्व मंडळी अतींद्रिय शक्तीचे विज्ञान पूर्णपणे जाणणारी होती. त्यांनीही तो साठा, स्वतःमध्ये फक्त साठवून ठेवला नाही, तर त्याचा वेळोवेळी उत्तम वापर केला.

आता आपण पाहू की, मेस्मरचं अतींद्रीय शक्ती बद्दल काय म्हणणं होतं. डॉक्टर मेस्मर म्हणायचे की, आपल्या स्वतःच्या मनाला – अनावश्यक गोष्टींचा संग्रह करणे व तुच्छ क्षणिक इंद्रिय भोगांमध्ये रममाण होणे – यांपासून जर डिटॅच करता आले, तर आपले मन आणि इंद्रिय अतिशय शक्तिशाली आहेत, हे आपल्याला सिद्ध करता येते. असे मन अशा विलक्षण शक्तींनी युक्त बनतं की, त्याच्या क्रियाशक्तीने सामान्य माणूस अचंबित होऊ शकतो. या प्रभावशाली अतींद्रिय शक्तींना उच्चस्तरीय ध्येयाकडे तुम्ही नेऊ शकत असाल, तर तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग प्रशस्त बनतील. दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींमध्ये तुमची आत्मिक प्रगती होतच जाईल.

मन आकाशामध्ये भ्रमण करू शकते. मन आकाशात भ्रमण करत असताना अनेक चमत्कृतीपूर्ण घटनांना, प्रसंगांना, गोष्टींना ग्रहण करू शकते. या अशा गोष्टी असतात, ज्यांना तुमची ज्ञानेंद्रियं ग्रहण करू शकत नाही आणि तुमची तर्कशक्ती तिथे काम करत नाही. अमेरिकेतील एक विद्वान डॉक्टर जे. बी. र्‍हाइन यांनी – आपलं पुस्तक ‘न्यू फ्रंटियर्स ऑफ द माईंड’ यामध्ये – अतींद्रिय शक्ती बद्दल भाष्य करणाऱ्या अनेक घटनांचं वर्णन केलेलं आहे. तेही असं म्हणतात की, चिंतन, मनन, स्वअभ्यास (स्वाध्याय) या सर्वांमधून मनाला आणि मनाच्या विचार पद्धतीला सामान्य – पासून – असामान्य बनवले जाऊ शकते. तसेच अभ्यासाने भूतकाळ भविष्यकाळ या दोन्ही मधील घटनांची माहिती प्राप्त केली जाऊ शकते. नित्य जीवनामधील प्रगल्भता वाढू शकते.

अंतस्थ आकाशात हळुवारपणे उतरा. किती गहन शांतता!!

आतापर्यंत या विषयावर जी, वेगवेगळी संशोधने झाली आहेत, त्यामधून शास्त्रज्ञ मंडळी या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहेत की, शरीराच्या प्रत्येक कोशिका मध्ये एक मन कार्यरत असतं. अशा अनेक मनयुक्त कोशिका – म्हणजे त्यांच्या सर्व मनांचा एक समुदाय आहे, ज्यातून सामुदायिकरित्या एक मन निर्माण होते. म्हणूनच अध्यात्म शास्त्रामध्ये मनाला वस्तू न मानता, याला मनोमय कोष असे संबोधले आहे. शरीराचे सर्व अंग, अवयव, भाग याच मनोमय कोषाच्या प्रणालीमध्ये काम करतात. याचेच व्यवस्थापन व अनुशासन यांच्या अंतर्गत हे सर्व अवयव काम करतात.

खरं सांगायचे तर, मनाची कार्यक्षमता इतकी प्रभावशाली आणि प्रचंड असते की, शरीर आणि सभोवतालचा परिसरच नाही, तर अनेक योजने दूर असलेल्या सर्व प्रदेशांची माहिती, मन क्षणात प्राप्त करण्यास समर्थ आहे. या संदर्भात बोलताना शास्त्रज्ञ म्हणतात की, ज्याप्रमाणे ध्वनी तरंगांना कॅच करण्यासाठी, रेडिओमध्ये विशिष्ट प्रकारचे क्रिस्टल्स बसवले जातात, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये किंवा ‘शरीराचा क्रिस्टल म्हणजे मन’ आहे.

संशोधक सांगतात की, आपण बोललेले शब्द ब्रह्मांडातील ईथर मध्ये समाविष्ट होतात. परंतु त्यांची प्रवाह गती (वाहण्याची गती) खूप सावकाश असते. याच शब्द तरंगांना, जर विद्युत तरंगांमध्ये परिवर्तित केले गेले, तर यांची शक्ती आणि गती अतिशय प्रचंड रूप धारण करतात आणि मग ते तरंग चारी देशांना अतिशय वेगाने पसरु लागतात. याच शब्द तरंगांना रेडिओ किंवा तत्सम उपकरण कॅच करून घेते आणि मग कितीतरी दूर अंतरावर आपण त्यांना ऐकू शकतो, हे जसे आपल्याला माहित आहे, त्याचप्रमाणे मनाचेही कार्य आहे. मन सुद्धा या सकल ब्रम्हांडामध्ये घडत असलेल्या घटनांची माहिती प्राप्त करू शकत।

मन म्हणजे सर्व सिग्नल्स कॅप्चर करणारा शरीराचा क्रिस्टल आहे.

डॉक्टर हार्ट लाईन यांनी इलेक्ट्रोरेटीनोग्राम मध्ये नेत्रकोशिकांमध्ये उत्पन्न होणारे विद्युत आवेग दर्शवले होते. त्यात त्यांनी सांगितले की, प्रत्येक नेत्रकोषामध्ये, नेत्रबिंबाची संपूर्ण बारीक डिटेल्स, रंग रूप सामावलेले असतात. ही माहिती सेकंदाच्या एक कोटीव्या भागामध्ये लगेच पुढील कोषामध्ये पाठवली जाते. अशा प्रकारे बिंबाकडून पाठवलेली सूचना, प्रकाशाच्या वेगाने मेंदूच्या दृश्यमान स्थानापर्यंत लगेच पोहोचते. अशाच पद्धतीने आपल्या शरीराच्या कोषामध्ये, भरलेली सर्व माहिती मनामध्ये सतत पोहोचत राहते. किती इंटरेस्टिंग आहे ही माहिती, हो ना!!

First Half: अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers – भाग तिसरा – पुर्वार्ध

ऊर्जेचे रूपांतरण प्रकाशामध्ये होणं, ही एक गुंतागुंतीची प्रणाली आहे. परंतु शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, एखादी ऊर्जा जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये प्रवेश करते, तेव्हा त्या वस्तूचे परमाणु उत्तेजित होतात आणि हे उत्तेजित परमाणु जेव्हा शांत होतात आणि स्वतःच्या स्थानी परत जातात तेव्हा त्यांनी जी ऊर्जा शोषलेली असते, त्या ऊर्जेचे रूपांतरण प्रकाशामध्ये होते. या क्रियेला “संदीप्ती” असे म्हणतात. हा गुण या विश्वातील प्रत्येक पदार्थ आणि प्राणीमात्रांमध्ये आढळून येतो.

आपण मन आणि विचार यांच्या काही गोष्टींना प्रत्यक्ष जाणत नाही. म्हणून नीट उमगत नाही. परंतु शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, दार्शनिक, मनोवैज्ञानिक यांचं हे म्हणणं नक्कीच खरं आहे की, माणूस जो विचार करतो आणि ज्या क्रिया करतो त्या लपून राहत नाहीत. कारण सूक्ष्म प्रकाशाचे तरंग माणसाच्या विचारांना आणि क्रियांना बाहेर प्रसारीत करत राहतात. जर आपण या सतत बाहेर पडत असलेल्या प्रकाश तरंगांपेक्षाही सूक्ष्म असलेले प्रकाश तरंग बाहेर पाठवण्यात वेळोवेळी यशस्वी झालो, अथवा आपण याच गोष्टीचा अभ्यास केला, तर अतिशय सहजतेने आपण दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट विचार तसेच भविष्यात घडणाऱ्या संभाव्य घटना आणि आगामी योजना यांची माहिती प्राप्त करण्यात नेहमी यशस्वी होऊ शकू.

हे जे तथ्य लिहिले आहे, या तथ्याचा पुरस्कार श्रीमती जे सी टोस्ट यांनी आपल्या ‘अणु और आत्मा’ या नावाच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणून घेणे किंवा भविष्यकाळातील घडणाऱ्या घटनांचे संकेत समजणे यासाठी अतीन्द्रिय क्षमतांना विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे. मनाची एकाग्रता वाढवणे. तसेच मनाला शिस्त लावणे. असे केल्याने नक्की काय होईल? तर असे केल्याने मनाच्या ऊर्जेला इतस्ततः विखुरण्यापासून आपण थांबवू शकू.

मनाची ऊर्जा उगीचच इतस्ततः कशाला पसरवायची?

मानसिक समस्येने ग्रस्त व्यक्तीसाठी दोन प्रकारचे संमोहन उपचार असतात. एक आध्यात्मिक उपचार म्हणजेच ‘स्पिरीच्युअल हिप्नोसिस’ व दुसरे भौतिक उपचारांवर आधारित असलेले ‘क्लिनिकल हिप्नोसिस’ या दोन्हीपैकी स्पिरिच्युअल हिप्नोसिसचा वापर मी मानसिक आजार बरे करण्यासाठी सुरुवातीपासून वापरत आहे. ‘स्पिरिच्युअल हिप्नोसिस’ वापरल्यामुळे व्यक्तीचे समस्या निवारण तर होतेच. त्याचबरोबर व्यक्तीच्या माईंड बॉडी सोल, म्हणजेच मन शरीर व आत्मा यांसोबतच सामाजिकता व व्यक्तिमत्व या सर्वच बाबींचा विकास होतो. हे संमोहन उपचार म्हणजेच हिप्नोथेरपी अगदी अतिसूक्ष्म स्तरापर्यंत जाऊन चोख कार्य करू शकते. त्यामुळे व्यक्ती औषधांच्या आधाराशिवाय बरी होते.

नाही. नक्कीच मी आपला आत्ताचा विषय विसरलेले नाहीय. अतिंद्रिय क्षमतांच्या विकासामध्ये संमोहन शास्त्राचा रोल खूपच महत्त्वाचा आहे. मी यापूर्वी ज्या डॉ. मेस्मर च्या मेस्मेरिजम या उपचारपद्धती बद्दल तुम्हाला सांगितलं, त्याचंच पुढील व्हर्जन म्हणजे ‘हिप्नॉटिझम’, ज्याला मराठीमध्ये संमोहन शास्त्र असे म्हणतात. दोन्हीचं मूळ एकच आहे. व्यक्तीच्या अंगातील चुंबकीय प्राण शक्ती प्रभावित करणे. फक्त दोघांच्या प्रणाली वेगळ्या आहेत. एकामध्ये हातवारे (पासेस), विशिष्ट अंगबोलीचा वापर, तर दुसरीकडे संमोहित सूचनांचा वापर. हिप्नॉटिझम चे अनेक प्रयोग संपन्न केल्यावर हिप्नॉटिस्टची स्वत:ची चुंबकीय प्राणशक्ती वृद्धिंगत होत जाते.

अतिंद्रिय क्षमतांच्या बद्दल जी माहिती मी लिहायला सुरुवात केली आहे, त्यातील हा तिसरा भाग आहे. या क्षमतांबद्दलची अजून इंटरेस्टिंग माहिती अशीच क्रमशः काही भागांमध्ये चालू राहणार आह। तुम्ही ती जरूर वाचा व लिंक मित्र परिवारामध्ये शेअर करा. तुम्हा सर्वांना अतींद्रिय शक्तींबद्दलचे हे लेख व अन्य सर्व लेख आवडल्याचे मेसेज व फोन मला येत आहेत. अभिप्राय सांगून मला लिखाणास प्रेरणा दिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.

या तिसऱ्या भागामध्ये लिहिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते मला जरूर कळवा. ही सर्व माहिती तसेच या ठिकाणचे सर्व लेख मी स्वतः लिहिलेलं आहेत. हे सर्व लेख कॉपीराइटेड आहेत. कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये. या लेखाचे स्क्रीन शॉट किंवा कॉपी-पेस्ट करू नये धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

1 Trackback / Pingback

  1. अतींद्रिय क्षमता मनाच्या अतिसूक्ष्म आण्विक स्तरातून उगवते- Great psychic powers – भाग तिसरा – पुर्वार्ध

Leave a Reply

Your email address will not be published.


*