
एखादी गोष्ट रोज, शांतपणे आणि न थांबता करत राहिलो तर सुरुवातीला साधारण वाटणारी मेहनत हळूहळू excellence मध्ये रूपांतरित होते. हे यश अचानक मिळत नाही, तर ते दररोजच्या छोट्या प्रयत्नांची साठवण असते. रुजवण असते आणि जेव्हा ते फुलतं, तेव्हा ते नक्कीच celebrate करण्यासारखं यश असतं. ©️
या चित्रामध्ये दिसणारा कठीण, अभेद्य वाटणारा दगड आणि त्यातून जिद्दीने वाट काढत वर आलेलं ते छोटंसं बीज यापासून बनलेले रोपटे – हे केवळ एक दृश्य नाही, तर सातत्याचा जिवंत धडा आहे. त्या बीजाकडे ना साधनं होती, ना सोयी, ना अनुकूल परिस्थिती… तरीही त्याने हार मानली नाही.

थेंबाथेंबाने ओल साठवत, शोषत, कणाकणाने जागा निर्माण करत, ते दगडालाच हळूहळू झुकवत पुढे पुढे सरकत राहिलं. आणि शेवटी, जिथे काहीच शक्य नाही असं वाटत होतं, तिथेच एक कोमल, सुंदर, कणखर रोप उगवलं – इतकंच नाही तर त्या रोपाने सुंदर फुल उमलवून स्वतःचं अस्तित्व जगासमोर ठामपणे सिद्ध केलं. ©️
निसर्ग जणू आपल्याला सांगतो—परिस्थिती कितीही कठीण असो, सातत्य असेल तर अशक्यही शक्य होतं; आणि जिथे सातत्य जिवंत असतं, तिथेच चमत्कार जन्म घेतात Miracles!! ⚡⚡
लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Leave a Reply