।।शीर्यते प्रतिक्षणं शरीरं।। From Decay to Renewal Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 30, 2026 ‘शीर्यते प्रतिक्षणं शरीरं’ ही शरीराची परिभाषा आहे. ‘जे प्रतिक्षण बदलत राहते, ते शरीर होय.’ आपल्या शरीरातील अणुरेणुंचे कण नित्य अवकाशात विरत असतात आणि अवकाशातले नवीन बाह्य कण आपल्या शरीरातील रिक्त जागी येत असतात. संपूर्ण जगही आपल्या शरीराप्रमाणे बदलत असतं. मी हा कायम अस्साच आहे, मी ही नेहमी अश्शीच असते, हे असं खरं तर नसतंच!! बदल तर सतत होतच असतो. आणि प्रत्येक बदल हा स्वागतार्ह आहे.💫’परिवर्तन संसार का नियम है।’शीर्यते प्रतिक्षणं शरीरं’ हे अगदी सखोल सत्य आहे.’“जे प्रत्येक क्षणी तिन्ही त्रिकाळ जीर्ण होते, तेच शरीर आहे” हे भारतीय दर्शन शास्त्र आणि आयुर्वेदामध्ये शरीराची हीच व्याख्या सांगितली आहे. या शाश्वत सत्याचे काही मुख्य पैलू पहा :🌿सतत बदल: आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रत्येक क्षणी नवीन निर्मिती आणि जुन्या पेशींचा नाश (चय-अपचय किंवा Anabolism and Catabolism) होत असतो.🌿नश्वरता: जन्म झाल्यापासूनच हा भौतिक देह सतत क्षीणतेकडे वाटचाल करत असतो. हा निसर्गाचा नियम आहे.🌿तात्विक दृष्टिकोन: शरीर प्रतिक्षणी घडणारा जीवन-मृत्यू हे अंतिम सत्याचा (आत्मा/चैतन्य) अनुभव घेण्याचे एक साधन आहे. या जाणिवेमुळे माणूस नश्वरतेकडून शाश्वत सत्याकडे जाण्याचा मार्ग शोधू शकतो.Dr. Sunetra Javkar 9820373281 ©Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Related Daily Digest affirmationmarathimindpowertraining