लाखोलीवाले लाख रुपये Dr. Sunetra Javkar, July 23, 2026July 30, 2026 एवढ्या लहान मुलीच्या शिवराळपणामध्ये निरागसता शोधून टाळ्या पिटायच्या❓❓ इतका बुद्धीभ्रंश झाला आहे⁉️एका 🔺वैदू 🔺नावाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती तोंड विचित्र बनवून, आयाबहिणींवरच्या शिव्या घालताना दिसत आहे. यामध्ये तिची कसली स्टाईल, लोकांना आकर्षक वाटली माहित नाही. तिला मध्यवर्ती ठेवून, एक काकू या रील्स बनवतात. एका व्हिडिओमध्ये अर्वाच्य शिव्या घातल्यामुळे ती लहान मुलगी रातोरात फेमस झाली आणि अर्थातच ती प्रोफाइल ज्या काकू बनवतात, त्यांना भरपूर व्ह्यूज मिळाले. आणि ती मुलगी रातोरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. ©️इतकी फेमस झाली की, जणू काही मोठं कर्तृत्व आयुष्यामध्ये केलं आहे, संकटावर मात करून काही मिळवले आहे किंवा आयुष्यात काहीतरी हुशारी दाखवली आहे. एबीपी माझा, झी 24 तास, पुढारी वगैरे चॅनेल ने तिच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. तिच्या त्या निरागस बालपणाचे वगैरे काय ते वाटोळे झालेले दिसतच आहे!! त्यावर वेगळं काही बोलायची गरजच नाही. मुळातच इतकी लहान मुलगी असूनही, निरागस वगैरे काही जाणवतच नाही. बेफिकीरपणा, बेदरकारपणा दिसतो, असे दुर्दैवाने बोलावे लागेल!सोशल मीडियावर काहीही वायरल होऊ शकतं, हे खरे असले, तरी सुद्धा अतिशय खराब शिव्या असलेले संवाद बोलणारी एक लहान मुलगी – ही अशाप्रकारे फेमस होण्याची गोष्ट आहे असे वाटणे, आणि त्यानंतर तिच्या भरभरून मुलाखती घ्यावेसे – अनेक चॅनल्सना वाटणे, आणि तिला पुरेपूर प्रसिद्धी मिळवून देणे, मी समाजाची अधोगती नाहीतर दुसरे काय?आपल्या भारतामध्ये शहरात, खेडोपाडी अनेक असामान्य बुद्धिमत्ता असलेली मुलं आहेत, ज्यांनी काही लहान मोठ्या स्तरावर संशोधन करून काही गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. बनवल्या आहेत.©️ही फक्त पुस्तकी गुणवत्ता आणि साचेबद्ध बुद्धिमत्ता नाही आहे; तर अभ्यासाव्यतिरिक्त (पोषक वातावरण नसताना किंवा असताना) स्वतःच्या मेंदूचा वापर, उत्तम पद्धतीने करून केलेली अद्वितीय कामगिरी आहे. या शोधांबद्दल त्यांची पाठ थोपटणे, त्यांच्या त्या इन्वेंशन बद्दल चर्चा करणे, त्यांना लोकांसमोर आणणे, हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे. चॅनल वाल्यांनो, ते का नाही लोकांसमोर आणत❓❓अर्थातच यामधून मला असं म्हणायचं नाहीय की, एक्टिंग म्हणजे अभिनय या क्षेत्रामध्ये कोणतेच इंवेंशन होत नाहीत. आणि सहज वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, वेगवेगळे क्रिएटिव्ह चांगले व्हिडिओ सुद्धा आहेत, हेही मान्य आहे. या शिवराळ भाषा बोलणाऱ्या लहान मुलीचा व्हिडिओ आपोआप व्हायरल झाला, यात दुमत नाही. ©️पण त्यानंतर, ती कोणीतरी आदर्श व्यक्ती असल्याप्रमाणे, सर्व चॅनल्स तिची मुलाखत घेत सुटले आहेत, हे खूपच भडक आणि चुकीचे पायंडे समाजापुढे निर्माण करणारे आहे.देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आयुष्यात शूरवीर ठरलेली अनेक मुलं आहेत. आयुष्यात किती संघर्ष झेलत ही मुलं, पुढे चालत आहेत. न्यूज चॅनलनी त्या मुलांना कव्हर करावे. या चॅनल्स ना जास्त संशोधन वगैरे अजिबात करायचं नसतं. आयत्या फेमस झालेल्या गोष्टींना आळशासारखे उचलायच्या आणि त्यांच्या मागेपुढे गोंडा घोळवत बसून TRP साठी वाटेल ते हेडिंग टाकून बातम्या आणि व्हिडिओ बनवायचे. इतकी हीन दर्जाची पत्रकारिता झाली आहे. ©️Dr. Sunetra Javkar 9820373281 ©Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.Share this: Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Tweet Share on Telegram (Opens in new window) Telegram Email a link to a friend (Opens in new window) Email Related Daily Digest marathi