पर्सनल कौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपीद्वारे मनाचे रिप्रोग्रामिंग : मनाच्या आरोग्यासाठी नवा प्रकाश! Reprogram Mind with Personal Counseling & Hypnotherapy

  • सामूहिक कार्यक्रम, ध्यान शिबिरं या समूह उपायांचे मर्यादित परिणाम :
    जिथे पर्सनल कौन्सिलिंग ची गरज आहे तिथे, मनात खोलवर रुजलेले घाव, दुःख आहेत, तिथे, मोठा मोटिवेशनल प्रोग्राम अटेंड करून, युट्युब वरील किंवा इन्स्टा वरील विविध चांगले व्हिडिओज पाहून, विविध प्रकारचे ध्यान शिबिर अटेंड करून, अथवा केवळ ग्रुप हीलिंग प्रोग्राम अटेंड करून विशेष फायदा होत नसतो. अर्थातच प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. तसे याही गोष्टीला काही अपवाद असतील.
  • पर्सनल कौन्सिलिंगची आवश्यकता :
    शेवटी पर्सनल कौन्सिलिंग म्हणजे वैयक्तिक, व्यक्तिगत मार्गदर्शन, हे जिथे आवश्यक आहे, तिथे केवळ या, वर उल्लेख केलेल्या प्रोग्रामस् वर अवलंबून न राहता वेळीच मानसिक आरोग्यासाठी हेल्प घ्यावी आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे सुधारावे.
  • वेळेवर उपाय न केल्याचे परिणाम :
    कारण असे वेळेवर न केल्यामुळे मनाचा परिणाम शरीरावर होत जातो. वागणुकीवर होत जातो. नोकरी धंद्याच्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती जरी, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत असेल तर संपूर्ण परिवाराच्या हसत्याखेळत्या वातावरणावर, एकंदर बॉण्डिंग वर परिणाम होतो. कधीकधी अनाकलनीय मतभेद, मतमतांतरं होतात. काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही.
  • मनातील वेदना व्यक्त करणं :
    कधी कधी मनातली वेदना बोलून दाखवणं हेच पहिलं औषध असतं. अनेक वेळा व्यक्ती स्वतःचं दु:ख बोलून दाखवायला तयार असतो, पण त्याला कुणीतरी समजून घेणारं, दोष न देणारं, शांतपणे ऐकणारं आणि अर्थातच सोलुशन देणारं, हवं असतं. यासाठी माईंड कौन्सिलरशी संवाद साधणं हे अत्यंत प्रभावी ठरतं.
  • समस्या लपवणं म्हणजे धोका :
    समस्या लपवून ठेवणं म्हणजे त्यांना वाढवण्यास खतपाणी घालणं. हे एखाद्या दबलेल्या बलून प्रमाणे असतं. अनेक वेळा लोक “हे काही फार मोठं नाही”, “आपोआप ठीक होईल”, असं म्हणत गंभीर भावनिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतात. पण हेच दुर्लक्ष, शरीर आणि नातेसंबंधांवर खोल परिणाम करतं, आणि तेव्हा कधी कधी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते.
  • कौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपीचा परिणाम :
    पर्सनल कौन्सिलिंग आणि हिप्नोथेरपी म्हणजे केवळ सल्ला देणं नाही, तर बदलाची सुरुवात असते. हा बदल साधासुधा बदल नसून, मनाचे केलेलं कायमस्वरूपी रीप्रोग्रामिंग असतं. योग्य मार्गदर्शन, सुरक्षित संवाद, आणि सततचा सपोर्ट मिळाल्यास व्यक्ती स्वतःच्या खोल मनात उतरून खऱ्या जखमा शेअर करू शकते आणि त्या बऱ्या करण्यासाठी सक्षम ठरते. हे मनाचं रिप्रोग्रामिंग हीच मानसिक आरोग्याचं खरी पुनर्बांधणी आहे.
  • मानसिक आरोग्याबद्दलचे गैरसमज :
    आपल्या समाजात अजूनही मानसिक आरोग्याबाबत अनेक गैरसमज आहेत. “त्यात काय मोठं काही दिवसांनी होईल सर्व व्यवस्थित!”, “हे सर्व तर सगळ्यांनाच होतं”, “तू खूप विचार करतोस”, “असा कसा वेड्यासारखा विचार करतेस?” अशा प्रतिक्रिया आजही ऐकायला मिळतात. पण ही लक्षणं दुर्लक्षित केल्यास ती मानसिक आजारांचे मूळ ठरू शकतात – आणि अशावेळी डीप पर्सनल कौन्सिलिंग ही खूप मोठी गरज असते. हे समजून घ्या.

Read other Articles in Daily Digest Series

  • मनाचा आवाज ऐका :
    आपल्या मनाचा आवाज ऐकायला शिका – ते मनच खरी गरज सांगते. मन थकलेलं असेल, सतत चिंता, अस्वस्थता जाणवत असेल, सतत रडू येतं आहे, मन, बुद्धी पूर्ण नकारात्मक झाली आहे असे वाटत आहे, पण कारण सापडत नसेल, कोणाशी संवाद साधावासा वाटत नसेल – तर हा इशारा आहे की, आता वैयक्तिक मार्गदर्शनाची वेळ आली आहे. ही वेळ ओळखली, तरच खरा बदल भविष्यात घडू शकतो.
  • कुटुंबावर परिणाम :
    थोडक्यात काय, एका सदस्याचे मानसिक आरोग्य डिस्टर्ब असेल, तर संपूर्ण परिवारावर त्याचा परिणाम होतो. वेळीच विचार करा व वेळीच संपर्क करा आणि हेल्प प्राप्त करून समस्यामुक्त व्हा. सध्या एकंदरच समाज मनोशारीरिक आजारांमुळे त्रस्त आहे. (मनोशारीरिक आजार म्हणजे मानसिक ताणामुळे निर्माण होणारे आणि बळावत जाणारे शारीरिक आजार) 🦚🦚✨
  • मनाचं बळ म्हणजे सर्वकाही आहे :
    मन जर बलवान असेल, तर संपूर्ण दुनियेशी डील करता येतं!! पण जर मन पूर्णपणे कोसळलेल्या अवस्थेत असेल, तर हीच दुनिया आपल्या डोक्यावर राक्षसाप्रमाणे नाचते!
  • ऑनलाइन व ऑफलाइन मदतीची उपलब्धता :
    तुम्ही प्रत्यक्ष भेटून कौन्सिलिंगसाठी हेल्प घेऊ शकताच. तसेच तुम्ही कितीही दूर अंतरावर राहत असाल, तरी ही हेल्प घेऊ शकता. ऑनलाइन सेशन्स द्वारे सुद्धा समस्यामुक्त होता येते. भारतातील व्यक्ती हेल्प तर घेतातच, आणि परदेशात राहणारी लोकं ऑनलाइन पद्धतीने हेल्प घेतात, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. 9820373281

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 94 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply