संपूर्णतः व्यसनमुक्ती हवी आहे, तरच हा लेख वाचा व शेअर करा! Want to Lead an Addiction-Free Life?

Addiction Recovery Herbal powder

‘ताई, तुमची व्यसनमुक्ती ची माहिती वाचली. म्हणून फोन केला होता. अनेक उपाय करुन थकलो आहोत आम्ही. दारु सुटायचं नाव घेत नाहीय. आम्हाला त्या व्यसनमुक्ती च्या वनौषधी बद्दल माहिती सांगा.’

-बायको.

‘माझे भावोजी भरपूर वर्षापासून खूप ड्रिंक करतायत. तंबाखू खात आहेत. त्यांचं शरीर खंगायला लागलंय. नशेत कधीकधी तर मारझोड पण करतात. माझी बहिण दु:खात आहे. मार्ग काय’

— एक भाऊ.

‘ मॅडम, माझा नवरा जवळजवळ रोज पार्टी करत असतो मित्रांसोबत. रोजचं ड्रिंक, आणि स्मोकिंग. तब्येतीच्या बर्‍याच तक्रारी सुरु आहेत. काय करु समजत नाहीय. मार्ग सांगा.’

– बायको

‘केंद्रात ठेवलं होतं, पण पुन्हा काही दिवसांनी सुरुवात केली. काय करावं, कळतच नाही हो आम्हाला”

– मुलगा

हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच वाटत असेल, काय व्यसनमुक्ती चं केंद्र वगैरे बनवलंय की काय? तर नाही. तसं नाहीय. पण तरीही माझ्या क्लिनिकला व्यसनमुक्ती चा मार्ग मिळतो. अगदी संपूर्णतः व्यसनमुक्ती. टोटल मुक्ती. असो. ती सर्व माहिती शेवटी सांगते. आधी व्यसनाची माहिती करुन घेऊया.

व्यसनाचे एक नाही, हजारो प्रकार आहेत. 1) दारु 2) तंबाखू 3) अमली पदार्थ 4) गांजा 5) गुटखा 6) हुक्का पिणे 9) केमिकल हुंगणे इत्यादी.

व्यसनाच्या आहारी जाणे अथवा पुर्णत: बळी पडणे म्हणजे व्यसनाधीनता. व्याख्या सांगणं जितकं सोपं आहे, त्याच्या कैक पटीने व्यसनाधीन माणसासोबत वेदनादायी व नैराश्यपूर्ण सहवास सहन करणं, कुटुंबाला कठीण जात असतं. आपलं माणूस रोज तीच तीच चूक करतोय, स्वत:च्या शरीराची दुर्दशा करतोय, सर्वांसोबत रागाने, फटकारून वागतोय, घरात, संसारात, स्वत:च्या रुटीनमध्ये विचित्र व विक्षिप्त वागतोय, आणि व्यसन मात्र सुटायचं नाव घेत नाहीय, हे निराशाजनक आयुष्य काही परिवारातील सर्वजण जगत असतात. या व्यसनाधीन माणसाचं ना स्वत:च्या शरीराकडे लक्ष असतं; ना नित्य रुटीन कडे. कधीकधी तर दिवसाच्या वेळांकडेही लक्ष नसतं.

व्यसनाची सुरुवात कशी होते, ती पाहुया

1.पार्टी करायची ठरली, मग आपण प्यायलं नाही तर कसं चालेल : अनेक बेवड्यांसोबत आपलं पण नाव व्हावं, असं पिणार्‍याला वाटतं. याला तो सुरुवातीला ऑकेजनल ड्रिंकिंग असं जरतारी नाव पण देतो. नंतर ड्रिंक पार्टी करण्यासाठी बहाणे निर्माण केले जातात. मित्रांसोबत वीकएंड, मंथएन्ड, पिकनिक प्रोग्राम मजा करायला आयोजित करतात.

2. पार्टीत ड्रिंक ठेवले / घेतले नाही तर प्रतिष्ठेचा शोऑफ कसा होणार? प्रेस्टीज इश्यूला फाजील महत्त्व दिले जाते.

3. डिप्रेशन आलं आहे म्हणून पितात. ते हिंदी गाणं आहे बघा, ‘मुझे पीनेका शौक नही, पिता हूं, गम भुलानेको’ असले फालतु एक्सक्युजेस सांगून बाटल्या रिचवायच्या, सिगारेटी फुंकत बसायच्या.

4. निव्वळ हिरोगिरी करण्यासाठी दारु पिणे, तंबाखू खाणे, पानमसाला, गुटखा खाणे, पोरापोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी हुक्का पार्लरवर नोटा उधळणे असं हे सुरु होतं.

5. नशेच्या पदार्थांची, अमली पदार्थांची तर अजून भयाण अवस्था. जवळचाच कोणीतरी अहितचिंतक नशेची फुक्कट अरेंजमेंट करतो. आणि एकदा का ती फालतू झिंग पाहिली की, सुसंकृतपणा बाजुला पडतो आणि चांगल्या घरातील चांगला मुलगा / मुलगी व्यसनाधीन होतो.

6. एंझायटी, डिप्रेशन, खूप स्ट्रेस, नकारात्मक थिंकिंग पॅटर्न, मानसिक वेदना, प्रेमभंग, बेकारी, जेलसी यातून ड्रिंकिंग सुरु होतं. मग ते व्यसन या माणसाला क्रूरकर्मा आणि गुलाम बनवते.

7. व्यसनाधीन व्यक्ती नंतर, विवेकबुद्धी वारलेला माणूस बनतो.

विविध व्यसनांमुळे होणारं नुकसान:

1. व्यसनाधीन माणूस आपली नोकरी, आपलं जीवन, आपलं सर्वस्व गमावून बसतो.

2. मद्यपान किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेमुळे आयुष्यावर प्रचंड परिणाम होतो. मेंदुच्या सिग्नल यंत्रणेमध्ये व मेंदूतील रसायने यावर परिणाम होतो. म्हणजे ‘गम भुलाने के लिए’ वगैरे फालतु कारणाने प्यायला सुरुवात होईल आणि व्यसनामुळे डोक्यातील डेटाच (स्मृती) डिलीट होत राहील!

3. व्यसन हे व्यक्तीच्या नर्व्हस सिस्टीमला डाऊन करते. दीर्घकाळ च्या व्यसनामुळे त्या व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होतो. 

4. व्यसनी व्यक्तीची बुद्धी, विचारशक्ती, भावना आणि रोजचे वागणे बदलू शकते. सतत आणि जास्त प्रमाणात व्यसन केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे वागणे पूर्णपणे बदलू शकते. यामुळे, त्याच्या स्नायू आणि संभाषण, शारिरीक चलनवलन यामधील संतुलन देखील बिघडू शकते. थोडक्यात तो ज्यावेळी व्यसनातून ब्रेक घेत असेल, तेव्हाही तो व्यसनाधीन असेल, म्हणून सहज ओळखता येतो.

5. मेमरी लॉस: अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे एखाद्या व्यक्तीला शॉर्टटर्म मेमरी लॉस (स्मरणशक्ती) हा त्रास होऊ शकतो.

6. व्यसनामुळे ह्रदयविकार ही उद्भवु शकतो.

7. जास्तीत जास्त वेळ थकवा जाणवू लागतो. 

8. डोळयांची क्षमता व पॅनक्रिआ डॅमेज होऊ शकतात.

9. व्यसनांमुळे डायबेटिस वाढुही शकतो.

10. दारु प्यायल्यामुळे मज्जासंस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात. यात डिमेंशिया, संभ्रमावस्था किंवा अनऑर्गनाईज्ड विचार करणे यासारख्या समस्या समाविष्ट आहेत. 

ज्ञान पॉवर WhatsApp channel फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.

11. हाडे ठिसूळ होणे: नवीन हाडांच्या निर्मितीमध्ये दारुमुळे समस्या उद्भवू शकतात. यामुळे, हाडे बारीक होण्याची किंवा जास्त फ्रॅक्चर होण्याची समस्या सुरू होऊ शकते. 

12. अपघात: मद्यपान केल्यामुळे, एखाद्या व्यक्तीला खाली पडल्यामुळे, इजा होण्याचा धोका – रस्ते, रहदारी अपघात लक्षणीय प्रमाणात वाढतो. 

13. मद्यपान केल्यामुळे बर्‍याच प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. ज्यामध्ये तोंड, गॉयटर, यकृत, मोठे आतडे, गुद्द्वार, ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि उदर या प्रकारच्या कर्करोगाचा समावेश आहे. 

14. व्यसनी माणसाचे अनेक अवयव हळूहळू नादुरुस्त व्हायला लागतात. होय, नादुरुस्त हाच शब्द योग्य आहे.

15. दारूच्या प्रभावाखाली पत्नीशी  गैरवर्तणुक, मुलांशी गैरवर्तन आणि शेजार्‍यांशी भांडणं, समाजात कुप्रसिद्धी हे खूप वेळा होऊ लागते. 

16. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी खूप समस्या येऊ शकतात.

17. मद्यपान न करणार्‍यांपेक्षा मद्यपान करणार्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण खूपच जास्त आहे. 

18. व्यसनाधीन माणसाचे वैवाहिक संबंध ग्रासलेले असतात. शारिरीक दुर्बलता येते. पतीपत्नी संबंधांचा बट्याबोळ होतो. नपुंसकत्व विकसित होत असते.

19. दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे काय होऊ शकते, हे वेगळे समजावायलाच नकोय.

20. थोडक्यात काय, तर दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, इ. या व्यसनांच्या द्वारे तुम्ही स्वतःचा प्रत्येक अवयव उष्णतेच्या भट्टीमध्ये फेकून देताय याची जाणीव ठेवा.

आता हे इतकं लिहिलंय, तरी अजूनदेखील व्यसनांचे दुष्परिणाम सांगायचे राहिलेच आहेत.
तर तुम्हीच बघा की, हे व्यसन आपला काय भयानक माणूस बनवतो ते!

आता अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर फोकस टाकुया. या सर्व प्रकारच्या व्यसनांवर कार्य करुन, संपूर्णतः व्यसनमुक्ती करु शकेल, असं वनौषधी मिश्रण औषध मी बनवत असते. त्याचे फिचर्स (गुणधर्म) कायकाय आहेत ते पाहुया.

वनौषधी युक्त व्यसनमुक्ती औषध

1. प्रत्येक दिवशी घेण्याचे डोस असतात. 2 किंवा 3 (मी सांगेन)

2. हे व्यसनमुक्ती चं वनौषधी औषध, गोळ्यांच्या स्वरुपात असतं. या गोळ्या सहज चुरगाळता येतात.

3. हे मेडिसीन भोजनातून द्यावे. ज्यांना डायरेक्ट खायचं असेल, ते तसं घेऊ शकतात.

4. या वनौषधी गोळ्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत. (उलट्या, मळमळ, गरगरणे, पोट ढवळणे, इत्यादी) 

5. रिजल्ट लवकरच दिसू लागतो. 

6. प्रत्येक एका महिन्याचं मेडिसीन मिळते. असे तीन महिने सलग घ्यायचे आहे.

7. संपूर्णतः माहिती मी फोनवर सांगेन.

8. दिलेल्या WhatsApp नंबरवर व्यसनमुक्ती असं टाईप करा. 

9. रिजल्ट परफेक्ट आहे, म्हणून तर एवढा लांबलचक लेख लिहिलाय ना मी!!

शरीराची काळजी घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. वेळ हातात आहे, तोवरच सकारात्मक निर्णय घ्या. शरीर वाचवा. आपल्या परिवारामध्ये व समाजात आपलं स्थान परत मिळवा. व्यसनाचं प्रमाण लहान असो, किंवा जास्त व्यसन ते व्यसनच आहे!
या लेखाच्या खाली सुद्धा तुम्ही कॉमेंट करून ऑर्डर साठी विचारू शकता. या लेखाचा अनेकांना उपयोग होईल, म्हणून अनेक ठिकाणी या ‘लेखाची फक्त लिंक’ फॉरवर्ड करावी. धन्यवाद.

लेख आवडल्यास जरुर कळवावे. लेखाचे copyrights फक्त माझ्याकडे आहेत. copyright चा भंग करु नये. म्हणजेच कोणताही स्क्रीनशॉट काढू नये. तसेच copy paste करू नये. या लेखाची लिंक तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 © Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

About Dr. Sunetra Javkar 83 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*