
पैठणी हा जो साडीचा प्रकार आहे, तो पूर्णपणे नखशिखांत स्त्रियांच्या प्रांतातला आहे. पैठणीचं ते जे काही पारंपारिक स्वरूप आहे ते स्त्रियांनाच खुलून दिसतं. वेगवेगळ्या वयातील स्त्रियांसाठी त्या पैठणीचे ड्रेस, छोटे फ्रॉक, लांबलचक गाऊन, इत्यादी बनणे समजू शकते. ( पैठणीचा लहानपणीचा प्रॉब्लेम एका मराठी अभिनेत्रीने पण घातला होता एकदा!!😀😀🫣)
ते सगळं ठीक आहे हो, पण पैठणीच्या डिझाईनचे पुरुषांसाठी, तरुणाईसाठी कुर्ते, सदरे बनवतात, हा नक्की काय कन्सेप्ट आहे, समजत नाही!! मध्यंतरी गृहस्थ वयाच्या तीन-चार पुरुषांनी तर चक्क स्वतः पैठणी साड्या नेसून, अभिमानाने (❗) फोटोशूट केलं होतं!! (अरे देवा!) 🤔✨

आता अलीकडेच आलेल्या एका नवीन ट्रेंड बद्दल बोलू. Co-ord या आधुनिक नावाने हल्ली बरेच ड्रेस बाजारात आलेले आहेत. हे कॉर्ड म्हणजे एकाच कपड्याच्या ताग्यामध्ये कुर्ता आणि पायजमा बनवले जातात. आता ही पद्धत वर्षानुवर्ष, नाईट ड्रेस च्या बाबतीतच होती! हा कॉर्ड म्हणून असलेला ड्रेस जेव्हा बाजारात आला, तेव्हा बघता क्षणीच हेच वाटलं की यात नवीन काय, हा तर झोपताना परिधान करण्याचा, नाईट ड्रेस दिसतोय!! 🍂🌿
आश्चर्य म्हणजे लोक्स, या ड्रेसला इतकी वेडी झालेली आहेत, की समारंभांना सुद्धा असा ड्रेस घालून लोकं फिरायला लागलेली आहेत. लोक्स म्हणजे बायका हो! 💃🏼💃🏼
या कॉर्ड ड्रेस ला, आपण कितीही सुंदर इंग्लिश नाव धारण करून मिरवत बसलो, तरीही आपण ‘नाईट ड्रेस’ अशा ध्यानामध्ये फिरत आहोत, 😱 अशी उपरती कोणालाच कशी होत नाही?!! क्लिक करून बघा हां, फोटो दोन्ही!! 🔵 साडी नेसून पुरुष फोटो
Co-ord dress हे नाव google वर टाईप करून नक्की बघा!! म्हणजे ज्यांना मी जे लिहिलं आहे, त्याचा अर्थ कळत नसेल, त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल!! ✨✨

आज सोशल मीडियावर अशाच अर्थाची चर्चा वाचायला मिळाली, म्हणून आज हिमतीने हे सर्व लिहिलं आहे!! 🤗 फॅशन म्हणून आपण नक्की काय काय करत आहोत, आणि ते आपल्याला काय आणि कसं सूट होत आहे, याचा विचार नक्कीच करायला हवा!! 🫠😊 फोटोमध्ये मुलीचा ड्रेस हा कॉर्ड Co-ord आहे आणि मुलाचा ड्रेस पैठणीचा कुर्ता !

Dr. Sunetra Javkar 9820373281 ©
Hypnotherapist, Mind Counselor, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist. QUANTUM HOLISTIC HEALTH.

Leave a Reply