मानवाची डायनॅमिक चैतन्य विद्युत शक्ती: Electricity of the Human Mind

“उजियारा हूं, इसलिए रोशन हूं तेरे जगत में,
वर्ना बुनियादी तो अंधेरा ही पहचान रह जाती।”

या धरित्री व आकाशामध्ये कार्यरत असलेल्या दृश्य अथवा अदृश्य शक्ती स्वतःमध्ये (एकाकी अणु स्तरावर) कधीच पूर्णपणे स्वयंभू नाहीत. शक्ती एकमेकांच्या संयोगाने, समन्वयाने एकत्रित योगदानाने बनलेल्या आहेत. अणुचे जे गुणधर्म आपण पाहतो, ती काही अणुची एकट्याची मिळकत नाहीय. अणुच्या गुणधर्मांमध्ये फक्त जमीनच नाही, तर इतरही अनेक स्तरांचं अद्भुत योगदान समाविष्ट असतं आणि असे नसते तर आण्विक क्रिया या फक्त हालचालच बनून राहिल्या असत्या. त्यातून काही चैतन्यपूर्ण किंवा उत्साहवर्धक फ्रिक्वेन्सीजची निर्मिती झालीच नसती.

हे असंच माणसाच्या व्यक्तिमत्व व अस्तित्वासोबत असते. जीवशास्त्रीय शरीराच्या सोबतच काही विशिष्ट शक्ती किंवा मदतगार स्त्रोतांचा अंतर्भाव या माणसाच्या व्यक्तिमत्वात नसता, तर मानव सुद्धा अतिशय लहान सूक्ष्म कृमी कीटकांच्या पलीकडे काहीच विशेष नसला असता.

तुम्हाला माहितीच असेल की, अणु सतत नृत्य (चलायमान व गतिशील) करत असतात. अणुच्या या गतीमुळे एक प्रकारची विद्युत ऊर्जा सतत उत्पन्न होत असते. या अणुंमध्ये निर्माण होणारे हेच चैतन्य आपल्या जीवनामध्ये विविध क्षमता, वैशिष्ट्ये यांचा आविष्कार करत असते.

तुम्हाला हे माहिती आहे का, पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रामध्ये सतत चुंबकीय वादळं निर्माण होत असतात आणि या सततच्या वादळामुळे ‘अरोरा बोरेलिस’ (aurora borealis) हे तेजोवलय कायम पसरलेलेले असतात. याचा फोटो मी सोबत जोडलेला आहे. अरोरा बोरेलिस केव्हा बनतं? तर इलेक्ट्रॉन व प्रोटॉन चे उत्साही विद्युतभारित कण जेव्हा पृथ्वीच्या वरच्या वायुमंडळामध्ये आदळत असतात, तेव्हा या छोट्याछोट्या चकमकींमधून फटाक्यांच्या रोषणाई प्रमाणे, चमचमणारा प्रकाश दिसू लागतो. याला तुम्ही मॅग्नेटिक डिस्को डान्स म्हणू शकता!!

धृवीय प्रदेशातील चुंबकलहरींचा नयनरम्य प्रकाश रंगाविष्कार

याला आपण पृथ्वीच्या आजूबाजूला असलेले ग्रह व पृथ्वी ग्रह यांच्या एकमेकांसोबतच्या इंटरॅक्शन मधून निर्माण झालेली स्पंदनं म्हणू शकतो. जसे दोन मित्रांमध्ये इंटरॅक्शन असते; मैत्रीपूर्ण घडामोडी घडत असतात किंवा काही ना काही क्रिया प्रतिक्रिया घडत असतात, त्याचप्रमाणे पृथ्वी व अन्य ग्रह यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घडामोडी घडत असतात आणि त्यातून काही ना काही नवीन गोष्टी जन्माला येत असतात या नवीन गोष्टी या चैतन्य विद्युत ने भारलेल्या असतात. हे सायंटिफिक उदाहरण सांगायचं कारण म्हणजे, तुम्ही आम्ही या निसर्गाचाच भाग आहोत. आपण या पृथ्वी चुंबकावर राहत आहोत. आपणांतही आपापसात चुंबकीय वादळं निर्माण होत असतातच.

समुद्राचं खारट पाणी जेव्हा धातूपासून बनलेल्या जहाजांवर आदळत असतं, तेव्हा त्यात सुद्धा विद्युत स्पंदनं निर्माण होतात, जे नौकाविज्ञान जाणतात, त्यांना हे अगदी सहजरीत्या आणि साहजिकपणे होणारे विद्युत उत्पादन माहीत असते आणि त्यामुळेच त्यामधून म्हणजे या विद्युत निर्मिती मधून होणार्‍या हानिकारक किंवा लाभकारक प्रतिक्रियांकडे ते कायम सावध राहून लक्ष ठेवून असतात.

ही जशी बाहेरच्या विश्वातली उदाहरणे झाली, तसेच आता मानवाच्या शरीराबद्दल जाणून घेऊया. मानवाच्या शरीरातले जिवाणू व कण सुद्धा इथर वर आणि सभोवतालच्या वायुमंडळात भरलेल्या विद्युत प्रवाहावर आदळले जात असतात. त्यामुळे सतत विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. आपल्या सर्वांच्या शरीरातून ही विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. आपल्या शरीरात असे धातू – रसायन असतात, जे वातावरणातील विद्युत आघातांनी उत्तेजित होतात. शरीरामध्ये आपोआप विद्युत निर्मिती होतच असते. हेच कारण आहे की, ज्यामुळे मानवाच्या शरीरात फक्त एक उष्णतेचा प्रवाह वाहत नसतो, तर अनेक प्रकारचे प्रवाह अनेक स्तरावर वाहत असतात.

वरील परिच्छेदामध्ये आपण पृथ्वीचंआणि इतर ग्रहांचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन याबाबत जाणून घेतलं. जर पृथ्वी या ग्रहांमध्ये चुंबकत्व आहे आणि एका ग्रहमालेमध्ये अनेक ग्रहांसोबत चुंबकत्वामुळे पृथ्वी विराजमान आहे तर अगदी ठामपणे माणसांमध्ये हे चुंबकत्व असणारच; हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतोच. मानवी चुंबकत्व विश्वव्यापी चुंबकत्वाशी अदृश्यतंतूंनी कायम जोडलेलं राहतं.

श्रीविष्णूच्या नाभीमधून कमळाची उत्पत्ती होणे आणि या कमळ पुष्पावर ब्रह्म अवतरणे हे चित्र आपण पाहतो किंवा ही गोष्ट आपण वाचतो. हे खरंतर आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये जे सूत्र जोडलेलं असतं, त्या सूत्राचं किंवा धाग्याचं अलंकारिक चित्रण केलेलं आहे.

श्री विष्णुच्या नाभीमधून सूत्र निघून त्यातून ब्रम्हाचा जन्म

गर्भामध्ये असलेल्या बालकासाठी आईचे गर्भाशय हे तात्पुरतं विश्व असतं. गर्भजलामध्ये बाळ तरंगत असताना त्याच्या नाभी पासून निघालेल्या नाळेद्वारे त्याचं संपूर्ण पोषण होत असतं. ही नाळ आईशी जोडलेली असते, जिला नंतर बाळाच्या जन्मानंतर कापून अलग केले जाते.

ही संपूर्ण चर्चा आपल्यामध्ये आणि विश्वामध्ये असलेल्या इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण करत आहोत. विद्युत बद्दल आपण जाणून घेत आहोत. चुंबकीय शक्तीवर आणि विजेवर आधारित अनेक उपकरणं आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी यांच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. परंतु काही विशिष्ट तज्ञ (specialised) अभ्यास सोडले, तर सर्वसामान्य माणसाला स्वतःमध्ये, आजूबाजूच्या सृष्टीमध्ये, पृथ्वी ग्रहांमध्ये तसेच अनेक ग्रहांनी आणि सूर्यताऱ्याने बनलेल्या आकाशगंगेमध्ये ही इलेक्ट्रिसिटी कशी काम करते याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.

लहान असताना शाळेमध्ये तुम्ही चुंबकाबद्दल जाणून घेताना मी पुढे सांगत असलेला कागदाचा प्रयोग नक्कीच केला असेल. एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर मध्यभागी चुंबक ठेवला जातो आणि त्या कागदापासून वरती, काहीशा उंच अंतरावरून लोहकण अलगद खाली सोडले जातात. त्यावेळेला चुंबकाभोवती या लोहकणांच्या वेगवेगळ्या आकारातील रेषा तयार होतात. म्हणजेच हे लोहकण त्या चुंबकाचं चुंबकीय क्षेत्र स्पष्ट दर्शवतात.

माणूस सुद्धा याच प्रमाणे एक चुंबक आहे, जो त्याच्या वरती असलेल्या आकाशामधून बरसणाऱ्या – चांगल्या वाईट स्पंदनांना, आपल्या स्वतःच्या आंतरिक स्थितीनुसार म्हणजेच ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार स्वीकार करतो किंवा अस्वीकार करतो. हे जसे कार्य नकळतपणे माणूस सतत करत असतो, त्याचप्रमाणे या माणसाचे स्वतःचे चुंबकत्व बाहेरच्या सृष्टीमध्ये, विश्वामध्ये चुंबकीय लहरी प्रसारित करत असते. सूक्ष्म धारा प्रवाहातून या चुंबकीय लहरी प्रसारित होत असतात.

म्हणजे आता हे जे लिहिलं आहे ते जर दृश्य स्वरूपात डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर असे जाणवते की, वेगवेगळ्या आवडत्या नावडत्या किंवा अनिवार्य स्पंदन लहरी आपण आत ग्रहण करत आहोत आणि त्याच वेळेला आपण आपल्या अस्तित्वामधून वेगवेगळ्या चुंबकीय स्पंदन लहरी (भावनात्मक, क्रियात्मक, विचारस्वरूपी, आनंद- दुःखयुक्त, प्रेरणादायी, विरोधात्मक, मलूल, उदासवाण्या) बाहेरील विश्वामध्ये फेकत असतो. लेट मी रिपिट, हे सायन्स आहे; तत्वज्ञान नाही.

आपल्या मनातल्या भावभावना, आपले वेगवेगळे रिस्पॉन्सेस आपल्या तेजोमंडळावर किंवा तेजोवलयावर किंवा ऑरावर वेगवेगळे परिणाम दर्शवत असतात. शारीरिक आणि मानसिक स्थितीच्या अनुरूप तेजोवलय बनत असते. एखाद्या व्यक्तीचा ऑरा म्हणजे काय हे सांगण्याची गरज नक्कीच नसावी. शारीरिक अथवा मानसिक स्थिती बदलली की आपल्या तेजोवलयातील प्रकाश पुंजक्यांची स्थिती बदलते.

इतकंच नव्हे तर माणसाचा बदलता स्वभाव किंवा तो सध्या करत असलेलं चिंतन अभ्यास यांनुसार सुद्धा, प्रकाश पुंजक्यांची स्थिती सतत बदलत असते. त्यामुळे माणसाची इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विज यामध्ये सतत परिवर्तन होत असते. आताच्या युगात अनेक अशी उपकरणं अस्तित्वात आहेत, ज्यामधून हा प्रकाश पुंजक्यांचा खेळ आपण पाहू शकतो. ही यंत्रे आपल्या या मनस्थितीच्या स्पंदनांना रंगांमध्ये दाखवू शकतात.

कोणत्या मनस्थितीनुसार कसे रंग असतात, याची काही ढोबळ उदाहरणं मी सांगते. शांतता आणि सज्जनपणा असलेली मनस्थिती निळ्या रंगाच्या लाईट शेडमध्ये दिसते. व्यक्तीचा विनोदी स्वभाव, त्याची कामुकता, तो वैभवशाली, सत्ताधीश असणे, त्याचा विशुद्ध व्यवहार, कौशल्यपूर्ण बुद्धी मनोभूमिका पिवळ्या रंगांमध्ये दिसते. अहंकारी, निष्ठुर, क्रूर, क्रोधी, स्वार्थी, हट्टी आणि मूर्ख मनुष्य नेहमी लाल रंगाच्या तेजोवलयामध्ये दिसून येतो. तेजोवलयातील हिरव्या रंगाचा प्रकाश – व्यक्तीची सृजनात्मक आणि कलात्मक प्रवृत्ती दर्शवतो.

शरीरातून बाहेर पडणार्‍या व शरीराकडे येणाऱ्या
मॅग्नेटिक स्पंदनलहरी

अतिशय धार्मिक, पापभीरु, सदवर्तनी व ईश्वरभक्त व्यक्तीच्या तेजोबलयामध्ये केसरी रंग जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात यातील काहीच स्थिर नाहीय. यात मी फक्त स्वभाव वैशिष्ट्यानुसार ज्या रंगांचं प्राबल्य तेजोवलयात असतं, त्याबद्दल सांगितलं आहे. पण हे प्रकाश पुंजके नेहमीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींसोबत सतत बदलत असतात. तेजोवलय कधीही एकाच एका रंगाचे असे स्थिर नसते. व्यक्तीच्या मनोभूमिकेमध्ये जे जे परिवर्तन होते, त्यानुसार हे प्रकाश रंग बदलत असतात.

जसं मी वरच्या पॅरेग्राफमध्ये हे सर्व तेजोगलयातील रंग ओळखणाऱ्या उपकरणांचा उल्लेख केला, त्याचप्रमाणे ज्यांना दिव्यदृष्टी म्हणजे क्लेअरवॉयन्स प्राप्त आहे, त्या व्यक्तींना साध्या डोळ्यांनी सुद्धा हे अन्य व्यक्तीच्या (अथवा कोणाच्याही) तेजोवलयामधले किंवा एखाद्या वस्तूच्या गोष्टीच्या तेजोवलयामधील विद्युत प्रकाश रंग सहज ओळखता येतात (जेव्हा मी हे असे निरीक्षण व अभ्यास करायला सुरुवात केली होती, तेव्हा मलाही हे तेजोवलयातील बदलणारे रंग पाहून आश्चर्य वाटायचे. उत्तरोत्तर निरिक्षण वाढवत नेले.)

माणसाचं अस्तित्व नक्कीच श्रेष्ठ आहे. परंतु ते या विशाल ब्रम्हांडासोबत विविध संयोगाने जोडले गेलेले आहे. हेही तितकेच खरे आहे. ज्याचा यावर विश्वास नाहीय, त्याचेही अस्तित्व जोडले गेले आहे!! ज्याप्रमाणे विश्व परिवारासोबत (अंतराळ) विलग झाल्यास पृथ्वीचे अस्तित्व उरणार नाही, त्याप्रमाणेच पृथ्वीतून अलग होऊन माणसाचेही अस्तित्व उरणार नाही हे सर्व एकत्र जोडून ठेवणारी विश्व चेतना एक महान चुंबकीय शक्ती आहे. पृथ्वीला आपण भौगोलिक सायन्स च्या माध्यमाने जाणून घेतले आहे आपल्यासारखे पृथ्वीला हात पाय नसले, तरीही ती या विशिष्ट चुंबकीय चैतन्याने सतत चलायमान आहे. म्हणजे अखंड जिवंतच ना!! तुमच्या शरीरातल्या पेशी मेल्या तरी तुम्ही जिवंत राहताच ना!!

मग साधा सोपा एक विचार करून पहा की, पृथ्वीच्या शरीरावर चुंबकीय शक्ती घेऊन वावरणारे आपण तिच्या एकंदर चुंबकीय शक्तीवर किती वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असतो. काही भौगोलिक गोष्टी निश्चितच आपल्या बुद्धीने चालवता येत नसतील; तरीही आपल्या अस्तित्वात सामावलेली चुंबकीय शक्ती आपल्या ग्रहणक्षमतेतून आणि बुद्धी- भावना- क्रिया यांच्या सुसूत्र वागणुकीतून नक्कीच उत्तम रित्या हाताळू शकतो. याकडेही तुम्ही सायन्स म्हणून नक्कीच पाहू शकता हेही फक्त तत्त्वज्ञान नाहीय.

तुमच्या हेही लक्षात असू द्या की, या दिव्य विद्युत शक्तीचा पुरेपूर आणि विशिष्ट कार्यांसाठी वापर करणारी माणसं, हे याच पृथ्वीवर राहणारे तुम्हाआम्हासारखे सर्वसाधारण मानवच होते व आहेत. काहीतरी भव्य दिव्य आणि कल्याणकारी प्रेरणादायी घडवायचे म्हणजे तडक उठून अरण्यात जाण्याची आवश्यकता असते, असे नाही. तर याच माणसांच्या जंगलात राहून स्वतःच्या अद्वितीय इलेक्ट्रिसिटीला नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही नक्कीच वापरू शकत।

तुमचं जे काही नाव असेल —- अजय, विजय, उमा सुमा, विक्रम, सीता, गीता.. इमॅजिन केलंत का, की, मी हा असा विजय आहे, ज्याच्या अंगातून विजप्रवाह वाहतायत. सतत, अखंड, अविरत. विजय चालतोय, पळतोय, उड्या मारतोय, गातोय, नाचतोय, गाडी चालवतोय, अभ्यासाला बसलाय, नि शरीरात काय आहे? विद्युत. दिसतंय का चित्र? कमेंट्समध्ये सांगा कसल्या रंगांचे प्रकाश वाहतायत. जे इमॅजिन झालं तेच सांगा! नो चिटिंग!!

चौर्‍याऐंशी लक्ष योनीमध्ये जन्म घेऊन झाल्यानंतर मानवाची योनी प्राप्त झाली आहे. तिचा उपयोग कर। कारण मानवाला मिळालेल्या अशा अनेक स्पेशल एक्स्ट्रा गोष्टी आहेत, ज्यांचा वापर मानव हवा तसा आणि स्वतःच्या उत्थानासाठी हवा तितका करून घेऊ शकतो, असे असताना स्वभाव, भावना, मानसिकता यांच्यात जे वेगवेगळे द्वंद्व सतत चालू असते, म्हणून केवळ माती का खायची?!!

ही इलेक्ट्रिसिटी देणार्‍या सूर्याभोवती, सुर्याची फॅमिली चुंबकीय विद्युत शक्तीमुळे फिरतेय. ज्या पृथ्वीवरील विश्वात तुम्ही जगताय तिचं चुंबकत्व – उत्तम नियोजनयुक्त व अबाधित राखणं तुमच्या हातात आहे यावर नक्की विचार करा. एक सहजच आठवलेला विद्युत चैतन्य निर्माण करणारा मंत्र सांगते. ज्यांना बोलावासा वाटेल, त्यांनी जरुर म्हणावा. नो कम्पल्शन!

” ।। ॐ ह्रीं मम् प्राण देह रोम प्रतिरोम चैतन्य जाग्रय ह्रीं ऊँ नमः ।। “

अन्य लेखांप्रमाणेच हा लेखही मी स्वतः लिहिलेला आहे. हा लेख कॉपीराईटेड आहे. याचा स्क्रीनशॉट व copypaste करु नये. कॉपीराईट कायद्याचे व कर्म सिद्धांताचे उल्लंघन करू नये. लेखाची लिंक शेअर करु शकता.

माझ्या सर्वच लेखांच्या शेवटी संपर्काचा नंबर दिलेला असतो. हिप्नोथेरपी व अन्य कोणत्याही थेरपीसाठी संपर्क करावयाचा असल्यास दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर ‘फक्त मेसेज करावा’ कारण उपचारांचे सेशन्स सुरू असतात. त्यामुळे डायरेक्ट फोन करू नये. धन्यवाद.

डॉ. सुनेत्रा शैलेश जावकर 9820373281 Hypnotherapist, Mind Counselor, Life Coach, Naturopath, Past Life Regression & Crystal Healing Therapist.

About Dr. Sunetra Javkar 82 Articles
Dr. Sunetra Javkar is a highly experienced Hypnotherapist, Naturopath, Mind Counselor, and Past Life Regression Therapist at Quantum Holistic Health in Dombivli, Maharashtra. With a remarkable career spanning over two decades in the field of Hypnotherapy, she has honed her expertise in Hypnosis and Past Life Regression Therapy.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*