रात्रीच्या जेवणानंतर चहा कॉफी पिणे अतिशय नुकसानकारक असते. शरीर जेवण पचवण्याचं काम करत असताना, चहा कॉफी पोटात गेली, तर पचनावर विघातक परिणाम होतो. मेटाबॉलिझम कमी होऊन चरबीचे प्रमाण वाढत जाते.
अनेकांना जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. जास्त गोड खाऊ नका; कारण त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढतं आणि पचनासाठी प्रदीप्त असलेला पोटातला अग्नी विझून जातो आणि कोणत्याच अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही.
काहीजण जेवल्यानंतर ताबडतोब झोपतात यामुळे मेटाबोलिजम बिघडते. त्यापेक्षा जेवणानंतर वज्रासनात बसावे आणि वीस मिनिटं तरी चालावे.
जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिऊ नये यामुळे शरीरातील पचनावर परिणाम होऊन पचन क्रिया मंदावते. जेवणानंतर अर्धा ते एक तासानंतर पाणी प्यावे.
जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी स्नान करण्याची काही जणांना सवय असते. तर जेवणानंतर स्नान करू नये. पचन पूर्णपणे मंदावते. खाल्लेले बरेचसे अन्न तसेच राहून चरबी वाढते.
रात्रीच्या जेवणानंतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नये. गॅस्ट्रोइंटरेस्टीनल समस्या उद्भवू शकतात. जेवणानंतर आपण फक्त वॉकिंग करू शकतो.
रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा नंतर कोणत्याही अँटॅसिडच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी खूपच घातक आहे किडनी लिव्हर व ह्रदय यांचे या गोळ्यांमुळे खूप नुकसान होते.